How to avoid this Five types of dangerous Foods …
गच्चीवरची बाग, नाशिक व्दारे घरच्या घरी नैसर्गिक पध्दतीने अर्थातच रसयानमुक्त पध्दतीने भाज्या पिकवून देतो व त्यासाठी आम्ही मार्गदर्शन ही करतो.
पण या भाज्या घरी पिकवल्याने नेमका आपल्या आरोग्यात काय बदल होतो ते येथे नमूद करणार आहे. घरी पिकवलेल्या भाज्यांचे सेवन केल्याने पाच प्रकारचे खाद्यपदार्थ हे आपल्या जेवणातून हळू हळू कमी होतात व नंतर बाद होतात. जे आज सर्वाथाने विषारी आहेत. किंवा विषं टाकूनच आपल्या खाण्यातून पोटात जातात.
१)साखरः घरच्या भाज्या सेवन होत असल्या की आपल्या रोजचा चहातील साखर ही कमी कमी होत जाते. मी याचा अनुभव स्वतः घेतला आहे. किंवा इतरांच्या घरी चहा घेतांना त्यात साखर अधिक प्रमाणात वापरल्याचे लक्षात येते. तसेच बरेचदा paid Consultancy साठी जातो तेव्हा तेथील चहा, कॉफीतील साखरेचे प्रमाण जास्त असते. तेथे भाजीपाला लागवड केल्यानंतर काही महिण्यांनी चहातील साखरेचे प्रमाणात लक्षात येईल एवढे कमी झाल्याचे आढळून आले आहे. कारण नैसर्गिक पध्दतीने पिकवलेल्या भाज्या, फळातून आपल्याला सर्व प्रकारचे अन्नतत्व मिळत असल्यामुळे कुत्रिम साखर सेवन करण्याची इच्छा होत नाही. तोच अनुभव गुळ सेवनाबद्दल आला. साखर ही सफेद रंगाच्या पदार्थात येते. जे अधिक रसायने वापरून तयार करण्यात येते. आपल्याला साखर टाळावयाची असल्यास शक्यतो गुळ खावा…
२)दूधः दुध हे हाडांच्या मजबूतीसाठी गरजेचे आहे. पण आता A2, A1 दुधांचा फरक शास्त्रज्ञांनी स्पष्ट करून सांगीतला आहे. देशी गायीचा दूध हे आधुनिक आजार वाढवण्यास पुरक ठरताहेत. आणि गावरान, देशी गायीचे दूध सर्वत्र उपलब्ध होत नाही. आणि झालेच तर ते बरेचदा हारमोन्स वाढीचे इंजेक्शन दिल्यामुळे ते शरिरालाही घातक ठरतेय. पण घरच्या भाज्यांचे सेवन केल्यास दुध सेवन करण्याची इच्छा होत नाही. हा फरक मुख्यत्वे स्वानुभवावरून लक्षात आला आहे.
३)मासांहारः आज मासांहाराचे प्रमाण समाजात वाढलेले आहे. त्यामुळे मागणी तसा पुरवठा करण्यासाठी इंजेक्शनं देवून त्यांची अत्पावधीत जिवांची वाढ करतात. व ते लोकांना खावू घातले जाते. पण घरच्या भाज्या सेवन सुरू झाले तसे दर आठवड्याला होणारा मांसाहार हा महिण्यावर गेला नंतर तो बंदच झाला. आता इच्छा होत नाही.. ही कमाल फक्त घरच्या भाज्यांनीच केली आहे हे मी सांगू शकतो.
४)मीठः आज आहारात मीठाचे प्रमाण वाढले आहे. जे काही फास्टफूड आहेत त्यात प्रचंड प्रमाणात मीठ टाकलेले असते. घरच्या भाज्या सेवन केल्याने आहारातील मीठ सुध्दा कमी कमी होत गेले याचा अनुभव मला व माझ्या कुटुंबियांना आला आहे. किंबहूना वरून अतिरिक्त मीठ घेण्याची गरज पडत नाही. अतिरिक्त मीठ सेवनामुळे तब्बेत वाढतच नाही तर अंगाला सुज दिसते.
५)शेल्फ फूडला सुट्टीः घरच्या भाज्या सेवन केल्याने बेकरी प्रोडक्टस,जंक फूडस, पॅकेट्स फूड, तळलेले पदार्थ यांनाही आपोआप फाटा फुटतो. याचाही अनुभव आला आहे.
वरील पाचही पदार्थ हे विविध महागडी आजारपण वाढवण्यास मुख्यतः काम करत आहेत. बरेचदा डॉ. हे पदार्थ कमीतकमी सेवन करण्याचे सुचवतात.
घरच्या भाज्या खाल्यांने सर्व प्रकारचे नैसर्गिक तत्व त्यात आल्याने रात्रीची झोप शांत लागते व दिवसभर उत्साहही जाणवतो. छोट्या छोट्या आजारांना गुडबाय म्हटले जाते. थोडक्यात आपला दवाखाण्याचा खर्च वाचतो व त्याचा अनुभव माझे कुटुंब घेत आहे.
घरी उगवलेली भाजी ही थोडी असली तरी ती समाधानाने पुरते याचाही अनुभव बरेचदा घेतला आहे. आता नविन प्रयोग सुरू केला आहे. घरी उगवलेल्या भाज्यांची भाजी रात्री केली ती खाल्ली, व उरलेली भाजी पुन्ही सायंकाळी व रात्री खाल्ली तर आणखीच चवदार लागते याचा अनुभव येवू लागला आहे. शिवाय ती नासत नाही.
त्यामुळे आपल्याल शक्य असल्यास उपलब्ध जागेत जमेल तेवढ्या भाज्या पिकवा. त्यांचे आठवड्यातून एक-दोनदा सेवन झाले तरी ते औषधासारखे नक्कीच काम करू लागते.
गच्चीवरची बाग, नाशिक.
८०८७४७५२४२
website
http://www.gacchivarchibaug.in
website https://organic-vegetable-terrace-garden.com
profile
https://about.me/sandeepchavan
cover story https://udyojak.org/gachchivarchi-baug-success-story/
YouTube https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q
my link http://www.mylinq.in/9850569644
https://organic-vegetable-terrace-garden.business.site/
👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.