Free Gardening Sunday Classes for Children


Free Gardening Sunday Classes for Children

FB_IMG_1575558042926.jpg

मूल हे आपलं भविष्य असतं. त्यासाठी आपण त्यांच्यात विविध माहिती, ज्ञान, अनुभव, कौशल्य विकसीत व्हावी म्हणून प्रत्येक पालकं जागृक व प्रयत्नशिल असतो. भाषा, गणित, विज्ञान, संगीत, शारिरिक क्षमता, अभिनय अशी बहुविध कौशल्य विकसीत व्हावीत म्हणून त्यांना व्यासपिठ मिळवून देतो. त्याचं भविष्य य़ातूनच घडतं हे खरं असलं तरी हे सारं प्रत्यक्षात येण्यासाठी पर्यावरणीय भविष्य हे शाबूत असलं पाहिजे. हे पर्यावरणीय भविष्य समजून घेण्यासाठी त्यांच्यात पर्यावरणीय बुध्दीमत्ताही विकसीत होण गरजेचं आहे. त्यांना त्यातून कृतीशील बनवंण हे तितकच महत्वाचे आहे. पर्यावरणाबद्दल संवेदनशील असणं, त्याला समजून घेतलं तरच त्यावर त्यांना भविष्यात संशोधन, रोजगार, उदयोग निर्माण करता येईल. हे त्यांच्यापर्यंत शालेय जीवनातच पोहचवणं व रूजवणं गरजेचं आहे. कारण ते आपलं भविष्य असलं तरी त्यांच भविष्य जपण हे त्यांच्याच हाती आहे. हा विचार करूनच आम्ही शालेय विद्यार्थांना पर्यावरणातील काही गोष्टी त्यांच्या पर्यंत निशुल्क पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
त्यासाठी त्यांना काही अभ्यास, काही प्रात्यक्षिक, काही कृतीशीलता देणार आहोत. त्यात कंपोस्टीग व गार्डेनिंग हे दोन विषय प्रामुख्याने असणार आहेत. त्यासाठी आपल्या पाल्याला खालील प्रमाणे सहभाग देता येईल.
इयत्ता सातवी ते आठवीच्या मुलांमुलीसाठी हे उपक्रम असणार आहे.
१) प्रश्न मंजूषाः (Questions) यात विविध वनस्पती, कंपोस्टींग, गार्डेनिंग बदद्ल निवडक प्रश्न मुलांना देणार आहोत. त्यांची उत्तरे त्यांनी स्वतःच शोधायची आहेत. (पालकांना फक्त दिशा देण्याची मदत करायवयाची आहे) त्यातील निवडक मुलां-मुलींना प्रत्यक्ष कंपोस्टींग व गार्डेनिग एक दिवसीय वर्गात निशुल्क प्रवेश मिळणार आहेत.
२) एक दिवसीय वर्गः ( Orientation Session) यात आम्ही मुलांना घरच्या कचर्याचे वर्गीकरण, त्यांचे व्यवस्थापन, बाग फुलविण्यासाठीचे ज्ञान,अनुभव व प्रात्यक्षिकं प्रदान करणार आहोत.
३) प्रोजेक्टः ( Personal Project) सहभागी मुलांना एक बिज लागवड ते बिज निर्मीतीपर्यंत पर्यंतचा एक प्रकल्प दिला जाईल. त्यांचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव तर घ्यावयाचा आहेच. यासाठी निवड केलेल्या बिजाची पूर्व माहिती, उपयोग व प्रत्यक्ष लागवडीचा अनुभव त्यांनी घ्यावयाचा आहे. यासाठी मुलांना वर्षभर गाईड करण्यात येणार आहे.
४) माध्यम निर्मीती (Media Creation) निवडलेल्या बिज लागवड ते बिज निर्मितीच्या वर्षभरांनतरच्या अनुभवावर आधारित त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या नावाची एक पुस्तिका तयार तयार करण्याचे योजीले आहे. जे त्यांना निरतंर त्यांच्या आयुष्यात तर उपयोगी तर होईलच पण मुलांना त्यातून संशोधन, प्रकल्पाची मांडणी, त्याची विविध माध्यमे तयार करता येणार आहेत.
५) स्नेहसंमेलन (Annual Function) या उपक्रमात तयार होणार्या मुलांचे व पालकांचे स्नेहसंमेलन घेण्यात येणार आहे. ज्यातून आपले मुलं नेमकं काय शिकले हे सादर होईल. त्याविषयी त्यांना योग्य ती प्रसिध्दी दिली जाईल.
सहभाग फक्त १० मुलां-मुलीनाच मिळणार आहे.
अर्थसहाय्यः आपण आपल्या ईच्छेनुसार मुलांच्या या उपक्रमासाठी अर्थसहाय्य, वस्तू सहाय्य करू शकता.

Join our facebook page for daily updates

Like , share करा
अधिक माहितीः संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
Call: 8087475242 Wts app: 9850569644www.gacchivarchibaug.in

Enroll form…

https://forms.gle/xtnGYSrfS4LF8fYs6