Second inning of wash Dishes…

भांडी धुण्याची दुसरी इंनिग…

धुणं (त्या अर्थाने कुणाचचं नाही येथे कपडे धुणे असा अर्थ घ्यावा) धुवायला नि भांडे धुवायला (तसं कुणाला मार-ठोसे लगावून धुवतलं नाही.. तसे संस्कारच नाही म्हणा हवं तर)  जामच आवडतं. तसंच झाडायलाही आवडतं. (येथे आंगण, घर असा अर्थ घ्यावा., त्या अर्थाने कुणाला झाडायलां मला आजही आवडतं. समोरचा कुठे चुकला, त्याची चुक काय, तो कसा आहे.. त्याचं वय काय त्यासाठी कोणते शब्द,वाक्यरचना वापरची अशी वकीली करत धुवू शकतो अर्थात हा आत्मविश्वास वयामानाप्रमाणे खूपच लवकर आला होता. त्यामुळे कुणी नातेवाईक तर माझ्या नादाला लागतच नव्हत… आजही नाही. त्यामुळे झाडंण हे जन्मताच घेवून आलो आहे असे म्हटले तरी चालेल.)  तर थोडक्यात धुण्यासाठी स्वयंचलित मशीन आणलयं. पण कधी वाटले तर उगाच पाण्याचे प्रदुर्षण नको म्हणून निरमा ऐवजी स्वतःचे कपडे आहे तसे पिळून टाकतो म्हणा. नि झाडायंचच म्हटलं तर आजही गच्चीवरची बाग म्हणून काम करतांना आम्हाला बागेचे काने कोपरे लख्य स्वच्छ करण्याचेच पैसे घेतो. त्यामुळे झाडंण चालूच आहे. राहिलं भाडं धुवायचं…त्याची दुसरी ईंनिग आता वय वर्ष चाळीस पूर्ण केल्यानंतर सुरू झालीय. कालाय तस्मे नमः…

मग पहिली इंनिग कधी झाली असा प्रश्न पडला असेल… अर्थाच संस्कार होण्याच्या वयात.. आई –बाबा दोघेही कामावर जायचे त्यामुळे काही अंशी घरातली जबाबदारी मोठा मुलगा म्हणून माझ्यावर पडायची.. तेव्हाच आईच्या हाताखाली धुणं, झाडणं शिकलो. त्यामुळे बर्यापैकी धुणं, झाडंणं, पुसणं अशी घरकामाची बेसीक माहिती मिळवली आहे.

अगदी भांडेच धुवायचो तेव्हां राख वापरयचो. त्यामुळे धुतल्यानंतर भाडंयावरं राख दिसू नये म्हणून जी काही कौशल्य आत्मसात झाली… ती आजतागत म्हणजे दुसर्या इंनिगला कामास येवू लागली आहे.. भांडे धुण्याची दुसरी इंनिग अर्थातच बायकोच्या हाताखाली….

ही कौशल्य म्हणजे… भांड्यातील उरलेली भाजी योग्य त्या आकारातील भांडात पुन्हा काढून घेणे पासून सुरवात होते. खरकट काढून ते बागेतील खताच्या बादलीत पोहचवणं. नंतर  खरकटी भांडी साध्या पाण्याने आधी नळाखाली विसळून घ्यावीत… त्यातील काय सिंक मधे टाकेल तर ते सरळ ड्रेनेज पाईपाने बाहेर पडेल हे हळू हळू आत्मसात झालयं. कारण सिंक व ड्रेनेज पाईप  साफ करण्याचं काम माझ्याकडेच असते. (मला वाटते हे सार्या संसारी पुरूषही करत असावीत, मी आवडीने करतो) नंतर भांडे धुण्याची घासणी, भिजवून हवा तेवढाच साबण घ्यावा.. छान पणे भांडी तेलकट असो की नसो तरी त्यावर फिरवावा…. आधी छोटी छोटी भांडी सिंक मधे साबण लावून धुवावीत. त्यातही धुतांना आपली चार बोटे सराईत पणे भांड्याच्या आत बाहेर फिरवावीत. भांडी मोठी असतील तर तळ हात फिरवावा.. म्हणजे साबणाचा अंश राहत नाही. तेही एकदा नव्हे दोनदा—तिनदा… दुधाची, मसालाल्याची साय तशीच भांड्याला घासणी फिरवूनही असेल तर शक्य तेथे नखाचा वापर करावा… भांड्याची आतील बाहेरील कडा नख लावून धुवावीत. इतके सारे केले म्हणजे भांडी धुतली जातात. मग ति टोपल्या मावतील अशा बेताने पालथी रचावीत. म्हणजे पाणी नितरून जाते. आता इतके सारे कौशल्य स्वतःच आत्मसात केलेले. ते ही सौ. गावाला गेली त्या त्या काळात… आईने यातील कोणतेही कौशल्य शिकवलेले नाही. तिने आवड तयार केली फक्त.. असो. .तर

लहानपणी आई मलाच रोज भांडे धुवायला सांगायची. खूप भांडे आहेत. मदत कर.. पण त्याआधी घरातून ति सारी भांडी अंगणात नेवून ठेवायला लागायची… तेव्हा नळाला पाण्याची सोय नव्हती.. त्यामुळे पाटीत घेवून दुसर्या पाण्याने धुवायची गरज भासे ते काम माझ्याकडे असायचे… मीच का रोज रोज धुवू लागायचे.. असा प्रश्न नेहमी पडायचा.. मग हे काम कसे टाळता येईल.. म्हणून विचार करू लागलो…

आणि एक ट्रिक सापडली. आईने भांडे बाहेर काढयला लावले की मी त्यातील खरकटे पाणी फेकून ते छान एकात एक बसतील अशी रचायची.. मग ती अगदीच कमी दिसायची… मग आईच म्हणायची भांडी थोडीच आहेत. मीच घेते घासून … असं रोज होवू लागले नि माझं लहानपणी भांडे धुवायला करावयाची मदत सुटली… नंतर मधे मधे भांडी धुवायचं काम करायचो… वरील सारी कौशल्य हे मधे मधे धुवायांच्या कालावधीतच स्वतःच शिकलो…

तर आता दुसर्या इंनिगला सुरवात झाली. अर्थातच बायकोला लग्न झाल्याच्या दुसर्या दिवासापासून सांगतो मी स्वयंपाक घरात मदत करतो. पण मी किती सुगरण आहे… नि किचनचा रनवे हा माझ्याच आहे या सामित्वापायी… माझे किचन मधील कोणतीही लुडबुड नको होती.. ( तेव्हा आपल्या लुडबुडीचा त्रास होतो… म्हणून सावधपणे समजून त्यातून बाहेर पडलो.. पण एक मित्राला व वहिनीच्या भांडणाचं  मुळ कारण म्हणजे त्याने प्रमाणापेक्षा जास्त घेतलेला किचनचा ताबा… परपस्परालंबनच सपलं होतं. प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचलं होतं. नेमका वहिनीला त्रास काय होते… हेच सांगता येत नव्हतं. तेव्हा  त्याच्या किचन मधील जास्तीती लुडबुड कमी करण्याचा त्याला खाजगीत सल्ला  दिला… तेव्हा कुठे ते आता एकत्र नांदू लागलेत असो)  मग किचनचा संपर्क फक्त स्वतःहून पाणी घेणे, जेवायला बसणे एवढाच राहिला.. अर्थाजनच्या वयात.. व आता गच्चीवरची बागेच्या कामात व्याप वाढला.. नि किचनचा संपर्क तुटला… पण.. आता…

मुलं मोठं होवू लागलं तेव्हा पण सौ. ला सागिंतल बघ मुलगा असला तरी त्याला स्वयंपाक घरात छोट्या छोट्या मदतीला त्याला सोबत घे.. शिकेन तोही… उद्या सुनबाई नको बोलायला.. तुमच्या आईनं काहीच शिकवंल नाही का… पण काय व्हायचं तेच झालं.. एकलुता एक मुलगा आहे.. खेळू दे.. पण कार्ट खेळता खेळता बेजबाबदार व्हायलं लागलं तेव्हा… तेव्हा सौ.चा त्रागा, पारा हळू हळू वाढयला. लागला.. भांडी कशी कमी निघतील या विषयीअनेक टीप्स पण देवून झाल्यात.. ( त्यावर वेगळा लेख लिहता येईल) ताट व प्लेटाऐवजी पत्रावळी व द्रोणचा वापर करू.. पण कसलं काय… नि फाटक्यातच पाय…

मग शब्दांच्या फैरी चिकन मधून सुरू झाल्या.. सासू बोले सुने लागे.. तसे मला मुलाला मधे घालून मला बोलणं सुरू झालं… साधं किचन आवरून ठेवता येत नाही.. पसारा करून ठेवतात. चार भांडी विसळता येत नाही… मी मेलीन कुठं कुठं बघायचं. झालं… व्हायच तेच झालं… ते इतकसं लेकरू कसं नि किती भांडी विसळणार… त्याचा सिकं पर्यंत हातच पोहचत नाही. कधी कधी भांडे धुतांना माझंच कबंर आखडून जातं.. त्याला हे सारं कसं होईल… हे बोलणं मलाच होत… दोघंबाजूनं जाम शब्दाची फोडणी बसली… धुरं झालां.. दोन दिवस असहकार… त्यामुळे आता भांडे धुण्याची माझी दुसरी इंनिग त्या अर्थाने सुरू झालीय.. आठवडा झालाय.. पण म्हणतात ना.. नावडतीचं मीठ ही आळणं… त्यामुळे मला भांडी धुताच येत नाहीत.. असा गनीमी मारा सुरूच आहे. वरील सारे कौशल्य प्रत्यक्षात आमलांत आणली तरी  हे भाडं असेच राहिले… बरं असं मोलकरीणीला कधी बोलयाची ताकद झाली नाही..( तिच्या हातच्या भांड्याना साबण तसाच राहतो म्हणून शेवटी साडी नेसवून निरोप दिला)  कारण ती मधेच सोडून जाईल.. मी घर कसां.. सोडून जाईन… त्यामुळे बोलणं पचवावीत लागतात.

बरं या कामत मला इतका विश्वास आला आहे की भांडे कशी धुवावीत… त्यावर पुस्तक लिहू शकतो. एवढचं काय क्लासेस घेता येतील.. चार घरची भांडी धुतली तरी गच्चीवरची बागे पेक्षा चिक्कार पैसा कमवू शकतो. ( कारण फक्त भांडी धुणीच नाहीत तर शिकवू सुध्दा अशी टॅग लाईन असेन नवीन स्टार्टअपची) एवढं ज्ञान, अनुभव गाठीशी जमा झाला आहे. अर्थात हे ज्ञान सौ. माहेराला, गावाला गेली तेव्हा शिकलो आहे.  असो.. तर भांडी आता रोज धुतो आहे… पण एक गोष्ट लक्षात आली.. मी भांडी धुतो म्हणून चार भांडी जरा माझ्या वाटेला जास्तच काढून दिली जातात… आता यावर उपाय काय… शोधतोय… आलीया… असावे सादर…

टीपः हा लेख किती सुंदर लिहलाय अस माझ्या सौ. ना कळवू नका.. नाहीतर संदीपला फक्त छान लिहता येतं.. करत काहीच नाही… अस जर माझ्या कानावर आलं.. मग मग तुमची काही खैर नाही.. चार भांडी जास्तच निघातील म्हणून हा लेख भांडी धुता धुता सुचलाय.. म्हणून हा शब्द प्रपंच…

स्वानुभवः संदीप चव्हाण, नाशिक.

 

 

 

 

 

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.