आमचे व्हेजेटेबल ब्रिक्स गार्डेन ही आपण साकारू शकता पण त्यासाठी मोठ्या गच्चीची गरज असते. पण ज्यांच्याकडे फक्त गॅलरी आहे, विंडो ग्रील आहे त्यांच्यासाठी हे उत्पादन आम्ही घेवून आलो आहोत. अन्नपूर्णा बॅग म्ह्णजे बिया पेरा, भाज्या वाढवा व कापणी करा, मिळवा.. होय. जी आपल्याला लॉकडाऊन घरच्या घरी भाज्या मिळवण्यासाठी मदतगार होणार आहे. कारण बाहेर जाणे म्हणजे संसर्गाची शक्यता वाढते. म्हणून या लॉकडाऊनच्या काळात व धावपळीच्या जगण्यात घरी भाज्या उगवण्यासाठी बरीच संसाधने गोळा करवी लागतात. पण हे सारे करूनही भाजी उगवण्याची भट्टी जमूनच येईल याची खात्री नाही. त्यामुळे आम्ही अन्नपूर्णा बॅग हे उत्पादन आणले आहे. आपल्याला या बॅग्स तीन प्रकाराच्या पॉटींग मिक्स Potting Mix स्वरूपात मिळणार आहे. आपल्याला या कुंड्या घरी घेवून जाऊन फक्त पाणी द्यावयाचे आहे. उन, वार्याची काळजी घ्यावयाची आहे. काही अडचण आल्यास व्हाट्स अप मार्गदर्शन केले जाईलच. गार्डेन केअर कीट आपण आमच्या कडून खरेदी करू शकता किंवा तुम्ही पण घरच्या घरी बागेची काळजी घेणारे औषधे तयार करू शकता. रेडी टू हार्व्हेस्ट क्रेट्स मिळतील. अन्नपूर्णा Bag size १६ बाय १६ इंच. १० लिटर क्षमतेची..काळ्या रंगाची.प्लास्टीक बॅग असून ति नर्सरीतील रोपे वाढीसाठी वापरली जातात.