बागेत मुंग्या झाल्यात.. कारणे व उपाय
कुंडीत, वाफ्यात मुंग्या होणे ही नेहमीची तक्रार म्हणून त्याकडे पाहिले जाते. मुग्या या दोन प्रकारच्या असतात. त्यात काळ्या मुंग्या व लाल रंगाच्या मुंग्या.. मुंगी ही शेती क्षेत्रात मित्र किटकात गणणा होते. घरा भोवती, टेरेसवर बाग असते. त्यात मुंग्या झाल्या की घाबरायला होते. त्या घरात आल्या तर…
पण बागेत कुंडीत मुळात मुंग्या का होतात याचा मागोवा घेतला पाहिजे. त्याचे महत्व समजून घेतले पाहिजे. आपल्या दंतकथामधे सुध्दा कबुतर व मुंगीच नात सांगितल आहे. अर्थातच सारेच जिव जंतू, किडे मकोडे, पशू पक्षी हे सारेच जैवविविधतेच्या अन्न प्रक्रियेतील साखळीचा भाग आहे. जिव जिवस्य जिवनम् हे तत्व लक्षात घेतले पाहिजे. जिव सृष्टीतल्या एकाही जिवाचा खात्मा झाला तर अन्न साखळी खंडीत होते व त्यातून नवे जैविक संकट उभे राहते. जे आपण सध्या कोरोनाच्या विषाणूरूपात अनुभवत आहोत.. ( या विषयावर नविन लेखाचा प्रपंच होईल.) (पुढे वाचा)़
तर रासायनिक शेतीत सारेच मित्र व शत्रू किटक हे मारून टाकले जातात. तर नैसर्गिक, सेंद्रिय, वनशेतीत या सार्यांना मुख्यत उपद्रवी किटकांना पिटाळून लावले जाते किंवा त्यांचे नियंत्रण केले जाते.
तर मुंग्या या नेहमी काम करत असतात त्या अन्नाच्या शोधात असतात. त्या वनस्पतीच्या वाळलेल्या मुळांचा संग्रह करतात. कारण कोणतेही वाळलेले मुळात साखरेचे प्रमाण असते. तसेच ते तृणधान्य अर्थातच बिज अन्न म्हणून गोळा करतात. तसेच पांढरा मावा ज्याला गोडवा असतो. त्याचेही त्या वहन अथवा संग्रह करत असतात. फक्त पांढर्या माव्याला वाहून नेतात म्हणून त्यांना उपद्रवी मानले जाते.पण हे चूक आहे. मुळातच पांढरा मावा का लागतो याच्या मुळाशी गेले पाहिजे. (पुढे वाचा)
तर आपण जेव्हां बाग तयार करतो. गच्च मातीने कुंडी भरली असेन तर कालांतराने त्यातील माती अधिक घट्ट होते. वनस्पतीचे काही मुळ वाळून जातात. अशा रिकाम्या कुंडीला बराच काळ पाणी दिलेले नसते. अशा वेळेस त्या मुळांभोवती असलेली साखर गोळ करतात. व तेथेच अन्न व सुरक्षा मिळाल्यामुळे तेथे अंडी घालतात. बरेचदा कुंडीत झाड जिवंत असले व पुरेसे पाणी, त्यात वाफसा नसेल अशा वेळेसही त्यात मुंग्या कोरड्या जागेत आपले घर तयार करतात. कारण पुरेशा पाण्याअभावीसुध्दा वनस्पतीच्या मुळ्या तेथे वाळलेल्या असतात. खरं तर कुंड्यांना , बागेला पाणी नसणे , विलंब होणे हे सुचवण्याचे काम मुंग्या करत असतात. त्यामुळे बागेला कुंड्याना पाणी दिले की लगेच मुंग्या गायब होतात. मुंग्या या विशेषतः माती उकरण्याचे वर खाली करण्याचे विना पैशानी काम करतात. त्यामुळे त्यांना मित्र किटक मानले जाते.
मुंग्या या पाणी जमीनीखाली पाणी शोधणार्या संशोधक असतात. जमीनीखाली पाण्याचा योग्य साठा असल्यास त्या ठिकाणी ते वारूळ बनवतात. व एका रांगेत वारूळ असलेल्या रेषेत पाण्याचा भूमीगत साठा असतो. त्यामुळे त्यांना मारू नये. वाळवीला खाण्याचे काम मुंग्या करतात. त्यामुळे त्याही दृष्टीने ते आपले मित्र किटक आहेत. (पुढे वाचा)
मुंग्याना मारण्यासाठी अनेक रासायनिक उपाय आहेत. पण मुंग्या मारू नये.. त्यांना दूर करावे. त्यासाठी बागेत, वेखंडाची पावडर मिळते. ती चिमूटभर टाकल्यास त्या गायब होतात. तसेच पावाचा तुक़डा ठेवल्यास त्यास असंख्य मुंग्या लागतात. एकदा का त्यांचा पावावर हल्ला झाला की तो पाव उचलून बाहेर फेकून देवू शकतात.
आपण नेहमीच बागेत काम करत असाल तर मुंग्या तुम्हाला चावणार नाही. कारण त्यांना आपला गंध माहित असतो. किंवा त्यांचा एवढा त्रास होत नाही. शिवाय मधमाशा, मुंग्या या बिनविषारी असतात. त्या चावल्या तर खूप काही त्रास होत नाही. चावल्या तर त्यावर कांद्याचे साल चोळावे खाजवेची तिव्रता कमी होते.
आपल्या ज्योतिष शाश्त्रात मुंग्याना साखर खावू घातल्यास कर्ज कमी होते. साखर जावूच द्या पण त्यांना मारू तरी नका. असे माझे आवाहन आहे.
आपल्या लेख आवडल्यास नक्की शेअर, लाईक व कंमेंट करा.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.
Subscribe our Hindi You Tube channel