गच्चीवर उगणार्या पालेभाज्या..

गच्चीवर उगवता येणार्या पालेभाज्या…
गच्चीवर आपण वाफे पध्दतीत भारतीय उपखंडातून पालेभाज्या सहज पणे उगवू शकतो. पालक, शेफू, कोथंबीर, अंबाडी, गव्हांकूर, आंबट चुका, चंदन बटवा (चाकवत) , हिरवा माठ, लाल माठ, तांदुळजा (पोकळा), घोळ, करडई, कांदेपात, लसूनपात, टाकळा, मायाळू , मेथी, मोहरी, राजगीरा अळू, कोबी,पुदीना या सारख्या भाज्या उगवू शकतो. पाले भाज्यांना फक्त चार ते पाच तास उन मिळाले तरी चालते. पालेभाज्यांना चार इंच जागा गरजेची असते. पालेभाज्या वर्गात काही जमीनीलगत (Ground Cover) ,जमीनीपासून सहा इंच उंचीपर्यंत, काही २ फूटापर्यंत तर काही वेल वर्गीय असतात. यात काही बिजापासून उगतात तर काही कंदापासून, किंवा देठलागवडीपासूनही उगवता येतात.
पालेभाज्यांची बियांणे ही चार बोटांच्या अंतराने पेरू शकतो. तसेच ते इतर फळभाज्यांच्या खालीपण सहजतेने उगवू शकतात.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.