Birth Day Wishes And Gift


आज ११ संप्टेंबर, या दिवसांचे आजही जाम अप्रुप वाटते. माझ्या वाढदिवस आहे म्हणून नाही तर विनोबाभावेंचा वाढदिवस आहे म्हणून. हा दिवशी जन्माला आलेल्या व्यक्ती आपल्या कार्यकर्तॉत्वाने समाज मनावर छाप पाडतात. (असे लहानपणी वाचले होते. त्यामुळे आपला जन्म दिवस या दिवशी आहे. आपण जन्माला येऊन काय काय दिवे लावणार हे तरूण पणापर्यंत कळत नव्हते. पण जन्माला आलेल्या प्रत्येकाला निसर्ग कर्म देत असतो. ते ओळखू आले पाहिजे. ते मलाही गच्चीवरची बाग फुलवण्यातून ओळखता आले)

आज माझा वाढिदवस, सालाबाद प्रमाणे ओळखीच्या, प्रत्यक्ष भेटीतील, नेटवरील मैत्रीच्या धाग्यांनी गुफलंले मित्रांनी वाढदिवसाच्या सदिच्छा व्यक्त केल्या. खूप भरून आले. खरं तर गच्चीवरची बागेला आता पूर्ण वेळ काम करत आठ वर्ष पूर्ण होतात. आमच्या कडून शक्य होईल तेवढे लोकांना भाजीपाला उगवण्याविषयी मार्गदर्शन करत आहोत. आपण वाढदिवसाच्या व्यक्त केलेल्या सदिच्छा व त्याला मी व्यक्त केलेले धन्यवाद एवढाच शब्दसंवाद न राहता.. हा संवाद संस्मरणीय व्हावा म्हणून हा लेख लिहित आहे.

बरेच मित्रांनी विचारले या वाढदिवसाचा नविन संकल्प काय? खरं आहे. संकल्प हाच आहे हे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे, त्याचां निसर्ग संवर्धनात सहभाग घेणे.. या साठी आपल्या प्रत्येकाची मदत हवी आहे. त्यामुळे आपल्याकडून फक्त शुभेच्छांचे हद्यस्पर्शी शब्दांसोबत काही गिफ्ट हवं… ते सांगणार आहेच..

गच्चीवरची बाग.. येत्या मार्च २०२१ रोजी आठ वर्षाची पूर्ण होतेय. फक्त ऐकले होते की असे काही पुण्या मुंबईला चालतेय. पण कसे करतात. याचा थांगपत्ता नव्हता… निसर्गाची आवड होती. सवड काढली. विविध प्रयोग केले. नाशिककरांचा पांठिबा मिळत गेला. पण यास एक उद्योग म्हणून पाहतांना आमचा लोक सहभागाचा, त्यांना प्रेरीत करण्याचा बाणा कुठे हरवू दिला नाही. आजही इच्छुक घरी आले तर त्यांना मार्गदर्शन करतो. तसेच सोशल मिडीयाव्दारे बागेविषयी, कचरा व्यवस्थापन विषयीच्या अडचणी सोडवण्याचा, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. हे आजन्म चालू राहिल हा संकल्प आम्ही करत आहोत. या निमित्ताने मी व माझे कुटुंब या मातीचे, या देशाचे कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतोय. (या देशाचे, या मातीचे कर्ज या जन्मीतरी खरंच फेडता येईल का ? जिच्या उदरातून उगलेले अन्न खाऊन आपण वाढलोत. विचार पोसले गेले. तिच्या अन्न-पाण्याच्या अमृताने गच्चीवरची बागेचा विचार रूजला. निसर्ग सेवेचे व्रत अंगीकारले हे खरंच फेडण्या पलिकडे आहे.)

गच्चीवरची बाग हे स्त्री रूपाचे प्रतिक आहे. हे काम उभे करतांना स्त्रियांनीच खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. ताई, माई, अकका, मॅडम, सार्यानी तर हे काम उचलून धरले आहे. पण हे काम पडद्या मागे माझी आय (जिजाबाई) , माझी बाय (बायको वैशाली) माझी गाय (प्राचू उर्फ मोनी) यांच्या पांठीब्यामुळे उभं राहतय. यांची जागा कोणीही घेवू शकणार नाही. यांचेही काही कर्ज आहे. जे फेडणे शक्य नाही. अर्थात या सार्या कामात मातृ हद्यांचे संवेदनशील पुरूषांचीही काही कमी नाही. त्यांनी वारंवार मानसिक, आर्थिक, विचार प्रचाराची मदत केली आहे. त्याचीं संख्याही फार मोठी आहे. या समाजाचे ऋण फेडणे खरंच शक्य नाही. पण प्रयत्न करणार आहोत. खर तर हे काम करतांना मागणीची झोळी फार मोठी आहे. पण ती आता आपल्या सर्वांच्या निर्हेतूक सहकार्यामुळे समाधानाने एक दिवस नक्की भरेल याची खात्री वाटतेय. तसेच यास उद्योग म्हणून उभा करतांना अनेक बॅंकांची कर्ज घेतलीत. ती या वर्षी पूर्णतःहा परत फेडीचा संकल्प आहे. (त्यांनी तर जाम तगादा लावलाय पण आम्ही बॅटींग करतोय) आपल्या पांठिंब्यामुळेच मैदान अजून सोडले नाहीये.

आपल्या कडून आम्हाला वाढदिवासाच्या शुभेच्या मिळाल्यात पण त्या बदल्यात एक रिटर्न गिफ्ट हवंय. ते हक्काने मागतोय. ते म्हणजे आमच्या खालील यू ट्यूब चॅनेल ला Subscribe व व्हिडीओला Like करा.

आपल्याला माहितच आहे की कालच Wandering mind या Vlog व्दारे गच्चीवरची बागेची फिल्म तयार झाली. खूपच सुंदर झाली. सुशिल अहिरे व किंजल अहिरे यांच्या व्दारे मला वाढदिवसा निमित्त मिळालेलं हे सर्वात मोठ्ठ गिफ्ट म्हटलं पाहिजे. जे मी आपल्यासोबत Share केले. त्याच्या बद्दल प्रेरणादायी प्रतिक्रियांचा खूप पाऊस पडला… हा व्हिडीओ आपण पाहिलाच पण त्याला Like जरूर करा. कारण या जोडप्याने खूप मेहनतीने हा व्हिडीओ बनवला आहे. आपल्याला किमान आज –उद्यामधे ३0००० हजार व्हीव्हस व ५००० लाईक्स मिळवायचे आहे. त्यासाठी तुम्हाला शक्य होईल तेवढे Shre करा. like करायला सांगा. या Charnel लाही Subscrobe कराच. त्याने दोन फायदे होतील आम्ही करत असलेले काम लोंकांपर्यत पोहचवण्यात आपली मदत होईल त्यांनतर यू ट्यूबच हे काम सर्वदूर प्रसारासाठी मदत करणार आहे. थोडक्यात तो आपोआप सर्वीकडे दिसू लागेल. तुम्ही केलेले एक Like हेच माझ्यासाठी माझ्या वाढदिवसाचे गिफ्ट असेन.

गच्चीवरीच बाग अब हिंदी में हा एक यू ट्यूब चॅनेल गणेश गंवादे व गौरव गंवादे या दोन तरूणांनी सूरू केला. माझ्या कडील माहिती अनुभव ते स्वखर्चाने चित्रबध्द करत आहेत. त्यालाही कृपया Subscrobe करा.

यातून एक मात्र साध्य होणार आहे. आमचे काम लोकांपर्यंत पोहचले तर त्यांना मिशुल्क मार्गदर्शन करता येईल. त्यानां बाग फुलवतांना येणार्या अडीअडचणी वेळेवर सोडवल्या तर त्यांचा हुरूप वाढेल. पर्यायाने ते शिक्षीत होऊन आपण निसर्ग संवर्धनात हात भार लागेल.

माय, गाय, बाय आणी मातीचे कर्ज फेडण्यास मदत करावी ही विनंती…

Channel Subscribe करा… Wandering Minds
Like करा…गच्चीवरची बाग- Garbage to Garden

Organic Terrace Farming

सज्जा पर सब्जी

टीपः या महिण्यात एक आनंदाची गोष्ट म्हणजे सकाळ वृत्तपत्राने दर मंगळवारी विचार धन नावाचे सदर चालू केलेय. त्यात गच्चीवरची बाग हे सदर सिविस्तर लिहण्यास वाव दिला आहे. हे पहिले वृत्तपत्र आहे ज्याने लिखाणाला वाव दिला. या सदरात भाजीपाला फुलवण्याचे, कचरा व्यवस्थापनाचे तंत्र मंत्र तर आहेच पण सोबत त्यामागची दृष्टी, अध्यात्म मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही मालिका पुन्हा चालू झाली. हे ही माझ्यासाठी सकाळ वृत्तपत्राव्दारे मिळाले वाढदिवासाची भेट आहे. दर मंगळवारी सकाळ वृत्तपत्र वाचा..

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.