अक्षय तृतीया हा सण आता जवळ येतोय. शेतातली सारी पिके काढून होतात. हातात वेळ असतो. पण जागृत शेतकरी हा पावसाळाची तयार करीत असतात. या दिवसांमधे बियाणे आणून ठेवणं, नागरंटी करून माती वाळवून ठेवणं. खताची उपलब्धता तयार करून ठेवणं ही सारी शेतातली कामे आहेत. त्याच प्रमाणे शहरातील बागप्रेमीनीही खर्या अर्थाने पावसाळा पूर्वी कामास लागावयास हवे.
बरीच मंडळी ही देखल्या देवाला दंडवत घालणारी असतात. म्हणजे आता पाऊस सुरू झाला की त्याना हुरूप येतो. सर आम्हालाही गच्चीवर भाजीपाल्याची बाग फुलवायची आहे. कधी येतात बोला? पावसाळयात संदीप चव्हाण सर अंत्यत व्यस्त असतात. मग आपली बाग फुलवायची राहायची ती राहूनच जाते. तर बागेला सुरवात ही उन्हाळ्यातच करा… कारण उन्हाळ्यात सर्वत्र पानगळ झालेली असते. पालापाचोळा प्रचंड प्रमाणात सहज उपलब्ध असतो. गच्चीवर अथवा जमिनीवर काही पूर्वतयारी करायला वेळ हाताशी असतो.
आता ज्यांच्याकडे गच्चीवर भाजीपाल्याची एरोब्रिक्स पध्दतीने बाग फुलवली आहे किंवा काही कुंड्या, ग्रो बॅग्जसमधे बाग फुलवली आहे. त्यांनीही उन्हाळातच पावसाळ्याची तयारी केली पाहिजे. तुम्ही डेव्हिल डायजेस्टर या ऑल इन वन कंपोस्टर मधे खत तयार केले असेल तर ते काढून घ्या. खताला थोडे सावलीत वाळू द्या. पुन्हा हा डेव्हिल डायजेस्टर वर्षभराचा कचरा जिरवायला तयार करा..
कुंड्या, ग्रो बॅग्जस मधील माती वाळवून घ्या.. एरोब्रिक्स बेड मधील काही माती वाळवता आली तरी उत्तम… माती सातत्याने ओलीताखाली राहणे म्हणजे किडीना निमंत्रण. विशेषतः हयुमनी अळीच प्रादुर्भाव होतो. तो कमी करायचा असेन तर माती वाळवणे हे फार गरजेचं आहे.
तर उन्हाळ्यातच आपल्याला पावसाळ्यात वाढणारी वेलवर्गीय बियाणांची रोप तयार करणे गरजेचं आहे.
कारण मकर संक्रतीला माता भगिनींनी वाणाचं देवाण घेवाण झालेल असतं. अक्षय तृतीयाला वेलवर्गीय बियाणं लावण्याची परपंरा आहे. याचे कारण ही वातावरणाच्या सुसंगत आहे. कारण पावसाळ्यात उब नसल्यामुळे नव्याने बियाणं रूजवलेल्या बियाणासं उगवून येण्यास उशीर लागतो. कधी कधी अधिकचा पावसामुळे बियाणं सडतात. त्यामुळे अक्षय तृतीयाच्या गरम वातावरणातच बियाणं पिशव्यामधे रूजवून त्याची रोपे तयार करावीत. पावसाळा आला की त्या पिशव्या सहित एरोब्रिक्स बेडवर ठेवून द्याव्यात म्हणजे त्यांची वाढ भराभर होते. पिशवीत लावलेल्या बियांना मे व जूनच्या मध्यापर्यंत ही रोपे दोन किंवा चार पाने घेवूनच वाढतात. हे बियाणं खराब असावं अशी शंका येते. पण खरं तर ते सुध्दा पावसाळ्यात सुसाट वाढण्यासाठी सुप्त तयारी करत असतात. पावसाळ्यात वेलवर्गीय तयार रोपांना मातीत अथवा एरोब्रिक्स व्हेजेटेबल बेड मधे लागवड केले की त्यांची वाढ झपाट्याने वाढतात व महिनाभरा त्यास फळे लागण्यास सुरवात होते.
महत्वाचे म्हणजे पिशवीत उगवलेले बियाणं पिशवीत सहित एरोब्रिक्स बेडवर ठेवल्यास अधिकच्या पावसामुळे मातीतील ओलावा मुळांना लागत नाही त्यामुळे वेलांचे खोड हे कुजण्यापासून रोखले जातात.
दुधी भोपळा, कारले, गिलके (घोसाळे), वाल, डांगर, दोडके यांची बियाणं छोट्या नर्सरी बॅग्ज मधे रूजवून ठेवा. त्याचा नक्कीच फायदा होईल.
आपल्या वेलवर्गीय बि बियाणं रूजवण्यासाठी बियाणं, काळ्या रंगाच्या नर्सरी बॅग्जस मिळतील.
आपल्याला लेख आवडला असेल तर नक्की प्रतिक्रिया नोंदवा. प्रयोग करा. व आम्हाला कळवा.
संदीप चव्हाण, गच्चीवरची ( रसायनमुक्त भाजीपाल्याची) बाग. नाशिक.
9850569644 / 8087475242