Bougainvillea
बोगलवेल तारेच्या संरक्षण जाळीवर वाढणारा, कुंपनावर वाढणारा, रंगी बेरंगी फुलांचा हा वेल उन्हाळा लागला की गच्च फूलांनी बहरू लागतो. अल्पायुषी असणारे फुले पण गुछाने येणारी फुले आपले मन वेधून घेतात. त्यांना कागदी फुले असेही म्हणतात. आमच्या एका स्नेहाकडे पूर्वच्या दिशेला बेडरूमच्या खिडकीत बोगनवेलीच्या कुंड्या ठेवलेल्या होत्या. मे ते जून दरम्यान तो फुलांनी ती खिडकी बहरेली असायची व इतर दिवस हिरव्यागार पानांनी. याला काटे असतात. याला कागदी फुले असेही म्हणतात.
बोगनवेल ही सर्वांनाच आवडते. फार्म हाऊसच्या संरक्षण भितींवर, झाडाच्या खोडावरही हा छान बहरतो. थोडक्यात आधाराने किंवा आधाराशिवायही वाढत असतो. यात बरीच रंग असतात. गुलाबी, गर्दलाल, पांढरा, पिवळा, नारंगी, जाभंळी अशी फिकट रंगाची फुले नेहमी पहावयास मिळतात. लॉकडाऊनच्या काळात रस्त्याच्या विभाजकांमधे लावलेली झुडपे छानच सुंदर दिसतात.
यांना पूर्णवेळ उन्हांची गरज असते. तसेच या वेलाला इतर खतांची तशी फारशी गरज नसते. पण यास जिवामृत, कांदापाणी, केळामृत दिल्यास छानपणे फुले येतात. यांना माती भरलेल्या, पाणी निचरा होणार्या जागेत लागवड करता येते. यांची छांटणी वेळोवेळी करावी. यास छानसा हवा तसा आकारही देता येते. हिरव्या गार पानांच्या पार्श्वभूमीवर याची रंग संगती मनोवेधक असते. विविध रंगाची झाडे एकत्र लावली तर त्यांचे फोटो काढून जतन करावीत इतकी सुंदर दिसतात. याचा वेलाला चांगला टोपी सारखा, टोपली सारखी आकार देवून त्याखाली एकादे चित्रही काढल्यास निर्जीव वाटणारी कुंपनाची भिंत ही बोलू लागते.
जमिनीत लागवड केलेले असल्यास त्यास जून ते फेब्रुवारी पानी देऊ शकतात. पण मार्च पासून याचे पाणी कमी कमी करत जावे किंवा देवूच नये. जेवढा पाण्याचा ताण निर्माण होईल तेवढा हा जोमाने फुटतो. जेवढा फूटवा फुटेल तेवढी फूलांचे गुच्छ बहरतात. बहुतांशी काही वेलांना पानेही नसतात. फक्त फुलेच असतात.
सहसा याला कुंडीत वाढवताना कमीच पाणी द्यावे. दरवर्षी यास इतर कुंड्याप्रमाणे रिपॉटींगची गरज नसते. भरपूर उन्ह मिळेल अशा ठिकाणी त्याची बैठक जमवावी. टेरेस अर्थात गच्चीवर कुंड्यामधे लावणे हे तर फारच उत्तम. जमीनीवर लावलेला वेल हा दोरीने गच्चीवर नेला तर वास्तूच्या प्रथमदर्शनी भागात वास्तूची शोभा वाढवतो. काटेरी वनस्पती असल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव हा काही नसतो. कुंडीत लावलेल्या रोपांना जमल्यास शेणखत द्या. म्हणजे छान फांद्या फुटुन त्यांना शिरोभागी फुले येतात.
याची पूर्नलागवड ही फांदीपासून होत असते. बोटाएवढी जाडीची फांदी ही काळ्या नर्सरी बॅगेत रूजवल्यास त्यास कालांतराने फूटवा फुटतो. त्यांनतर त्याची इतरत्र पूर्नलागवड करता येते. याची कलम करणेही तसे शक्य असते. त्यामुळे एकाच झाडावर विविध रंगाची फुले आणू शकतो.
थोडक्यात या झाडांचे संगोपन करतांना पाण्याचे लाड कमी करा म्हणजे त्यास फूले येतील.
गच्चीवरची बाग, नाशिक