शेती येणार्या काळाची गरज आहे. अतिसंपर्कामुळे कोव्हीड १९ हा पसरत आहे. अशा वेळेस आपली पूर्वीची शेत व शेतातील कुटुंब अशी विलगीकरणाची, कमी संपर्काची, स्वातंत्र्यतेची राहणी गरजेची ठरणार आहे. बरेचदा माळरानावर शेती उभी करतांना आपल्याला नैसर्गिक कुंपनाची गरज असते. नैसर्गिक कुंपने ही वनभिंतीचेही कामे करतात. ही नैसर्गिक कुंपनही विविध तर्हेने आपल्याला उपयोगी पडतात. डुक्करे, जनावरांपासून आपली शेती वाचवू शकतो. यास सजीव भिंत असेही म्हणतात. शक्यतो जनावरे खाणार नाहीत अशा या वनस्पती असतात. वनभिंत तयार झाल्यामुळे आपली शेती उष्ण लाटेपासून वाचवता येते. ही वनभिंत किंवा संरक्षण भितीसाठी वेगवेगळ्या वनस्पती लागवड करतात येतात. प्रत्येकाची लागवड, काळजी, त्याला लागणारी जागा यात विविधता असते. पण त्यातील एकसमान सुत्र म्हणजे यांची लागवड ही पावसाळ्यात करावी तसेच यास जगण्यासाठी कमीत कमी पाणी लागते.
कुंपनासाठी खालील नैसर्गिक वनस्पतींची लागवच करावी.
- घायपात : घायपात ही पसरट पाणांची तिक्ष्ण काट्याची टोकदार पाने असतात. यांची लागवड ही कंदापासून करता येते. काही घायपतांना फुलोरा येतो तेथूनही नवीन कंदासारखी पाने फुटतात त्याची रोपे करून लागवड करू शकतात.
- सागर गोटा: ही काटेरी वेलवर्गीय वनस्पती आहे. या वेलीला आधार मिळाला तर ते वरच्या दिशेने वाढतात नाहीतर स्वतःच एकमेंकावर फांद्या वाढवून त्याचे दाट काटेरी कुंपन तयार होते.
- बांबू : शेती क्षेत्र मोठ असल्यास शेतीच्या कडेने बांबूची लागवड करता येते. हे दाट वाढते
- विलायती चिंचा: शेतीला नैसर्गिक भिंत ही विलायती चिंचाची सुध्दा लागवड करता येते.. फक्त या चिंचा काही उंचीवर तुम्हाला दरवर्षी ठराविक उंचीवर कापून त्याची काटे कुंपनाभोवती टाकता येतात.
- करवंद: ही सुध्दा काटेरी व झुडुपवर्गीय वनस्पती कुंपनासाठी लागवड करू शकता.
- बोगनवेल ( कागदी फुलं) ही सुध्दा काटेरी वेलवर्गीय वनस्पती आहे. रंगी बेरंगी फुलांमधे उपलब्ध असल्यामुळे कुंपनसुध्दा हे सुंदर व शोभिवंत बनवता येते.
- मेंदी व डुरांटाः या दोनही वनस्पती या दोन्ही वनस्पती या काटेरी असतात. तसेच दाटीने वाढतात. शिवाय यांना हेज कटरचा वापर करून कुपनांला ऐच्छिक आकार, उंची देता येते.
- घाणेरी: ही वनस्पती झुडुप वर्गीय असते. शिवाय याचा गंध उग्र असतोच. शिवाय त्याला जनावरेही खात नाहीत. तसेच याच्या काट्या हा जळावू असल्यातरी कणखर असतात. तसेच यांना बारिक दानेदार काटे असतात. त्यामुळे सहजतेने त्यांना पार करून अथवा काढून टाकणे शक्य नसते.
- काटे कोरांटी या खूपच लहान पण काटेरी वनस्पती आहेत. त्यांचा सुध्दा वापर आपण कुंपनासाठी करू शकतात. विविध रंगाची फुले येत असल्यामुळे त्यामुळे कुंपनाची शोभा वाढते.
- गावठी गुलाबः गावडी गुलाबांना सुध्दा काटेरी वेलवर्गीय असतो. त्यामुळे त्यालाही कुंपनाभोवती लागवड करू शकता.
- पान साबर : काटेरी व पसरट पानांचे ही साबर वर्गातील एक काटेरी वनस्पती आहे. कमी पाण्यात वाढणारी, पानांनाच सुक्ष्म पण काटेरी साज असलेली वनस्पती ही कुंपनासाठी चांगली मानली जाते.
बरेचदा या वनस्पती लागवड केलेही जातात पण कालांतराने लागवड केलेल्या वनस्पती मोठ्या होतात व जमीनीलगत काहीच नसल्यामुळे त्यातून काही सरपटणार्या, छोट्या प्राण्यांची ये जा सुरू होते अशा वेळेस लाजाळूची लागवड करावी.
वरील वनस्पती या रुंद खोल व मोठे चर खोदून करावी म्हणजे पावसाळ्यात तेथे पाण्याची साठवण तर होतेच. त्यात त्याचा वनस्पतीचा वर्षानुवर्ष पालापाचोळा पडून त्याचे खत बनत असते.
तारेचे कुंपन केले तरी स्थानिक लोक, जनावरे ही टिकू देत नाही. त्यामुळे तारेच्या आधाराने आपण बोगनवेल, सागर गोटा यांची लागवड करू शकता.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक
आमच्या उत्पादनांच्या माहितीसाठी पहा…
http://www.gacchivarchibaug.in