पावसाळ्यात बागेला खत द्यावे की नाही व कोणती द्यावीत.


पावसाळ्यात बागेला खतं द्यावीत की नाही या बाबत बरेच लोकांच्या मनात व्दिधा मनस्थिती असते. याची कारणे म्हणजे पावसाळ्यात सर्वत्रच जीवसृष्टी बहरते. त्याला मिळणारे नैसर्गिक पाणी व वातावरण तयार झाल्यामुळे आपसुकच बहरतात मग कशाला द्या खतं पाणी असा एक विचार मनात असतो. तर दुसरे कारण म्हणजे दिलेली खते वाहूनच जाणार आहेत मग कशाला द्यावीत खतं. असा एका दुसरा विचार असतो. (पुढे वाचा)

खरं तर ही दोनही कारणांना वैज्ञानिक मूळाधार नाही. कारण ही वर वर विचार करता ती सहज मनात येणारी कारणे आहेत. खरं तर पावसाळ्यातही खतं देण्याची गरज असते. यात दोन प्रकार येतात.

एक कुंड्या किंवा वाफ्यामधील बाग व दुसरे म्हणजे जमीनीवरील बाग होय. कुंड्या किंवा वाफ्यामधे झाडांना एक ठराविक अवकाश असतो. त्यांना गरज असली तरी मुळं कुंडी बाहेर जावून अन्न शोधू शकत नाही. तसेच पावसामुळे जी काही त्या कुंडीत पोषण द्रवे असतात ति वाहून जाण्याची शक्यताच अधिक असते. अशा वेळेस त्यांना खतं पाणी देणे गरजेचे असते. तरच दिलेल्या खतांची मात्रा बिनचूक लागू पडते. कारण या काळात नैसर्गिक पाण्यामुळे कुंडीतील मातीचा कण न कण भिजलेला असतो. त्यामुळे खतं हे सर्वदूर पोहचायला मदत तर होतेच तसेच मातीत नैसर्गिक जिवाणूची निर्मिती होत असते. त्यांना पोषक म्हणून खतं देणे म्हणजे त्या सुक्ष्म जिवांना अन्न पूरवणे होय. जे मृत पावल्यानंतर त्यांचे खत झाडांना मिळणार आहे.

तसेच या काळात वातावरण अनुकूल असल्यामुळे रोपांची वाढ झपाट्याने होते. अशा वेळेस त्यांना अन्न संग्रहीत करण्यासाठी नवीन खतांची गरज लागते. खतंच दिली नाहीतर ते संचयीत अन्न वापरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कुंडीतील झाडांना पावसाळ्यातही खतं देणे फार गरजेचे आहे. (पुढे वाचा)

तसेच जमीनीवरील झाडांना तर पावसाळ्यात खतं पाणी देणे फार गरजेचे असते. कारण एक तर खोलवर झाडांभोवतालची जमीन ही भिजलेली असते. त्यामुळे दिलेली खंत ही खोलवर म्हणजे मुळांपर्यंत सर्वदूर पोहचतात. मातीतील गांडूळांना नैसर्गिक खतांची (शेणखत, निंमपेंड) गरज असते. त्यांचे पोषण उत्तम झाले तरच ते कार्यरत राहतात. तसेच त्यांची विष्टा ही म्हणजे गांडूळ खत लागू पडते. ताजे गांडूळखत हे सर्व खतांमधे उत्तम ठरते. कारण त्यातील पोषण द्रव्यांचे अंश पुन्हा मुळापर्यंत पावसाच्या पाण्यामुळे पोहचण्यास मदत होते. (पुढे वाचा)

आता या काळात कोणती खते द्यावीत असा विचार आपल्या मनात येत असतात.

पावसाळ्यात द्राव्य खतं व विद्राव्य खतं दोन्हीही द्यावीत. कारण द्राव्य खते ही टॉनिक सारखी काम करतात. ते लगेच लागू पडतात. कुंड्या मधे द्राव्य खत देतांना पावसाची उघडीप असणे फार गरजेचे आहे. संततधार पाऊस असल्यास खतं देणे टाळावे. तो पैशाचा अपव्यय ठरेन.  मात्र जमीनीवर असलेल्या झाडांना खतांत केलेली गुंतवणूक ही फायदेशीरच ठरते. कारण पाणी खाली खोल मुरत असते. येथे मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ति म्हणजे आपल्या बागेतील पाणी वाहून जात नाही ना याची खबरदारी घ्यायला हवी. बागेत पडणारे पावसाचे पाणी हे बागेतच मुरवायला शिका. कारण आपण देत असलेले नळाचे पाणी हे सहसा फिल्टर होऊन येते. त्यातील नैसर्गिक घटकांवर प्रक्रिया झाल्यामुळे झाडांना पोषक अशी द्रवे नष्ट झालेली असतात. बोअरवेलचे पाणी देत असाल तर उत्तमच आहे. (पुढे वाचा)

लेंडी खत, शेणखत (उकीरड्यावरचे नको ते अर्धे कच्चे असते), निंमपेंड ही उत्तम ठरते. कारण ही खतं गांडूळांना फार आवडतात. तसेच ते पावसाच्या पाण्यात हळू हळू झिरपतात. त्यामुळे या खतांचा वापर आवश्यक करावा.

द्राव्य खतांमधे जिवामृत, गोमुत्र पाणी, ह्यूमिक जलचा अवश्यक वापर करावा. त्यांच्या वापरामुळे झाडांना ताबडतोब ऊर्जा प्रदान होते. एक गोष्ट लक्षात घ्या. पावसाळ्यात प्रत्येक झाडांचा पर्णसंभार वाढतो. जेवढा पर्णसंभार वाढणार आहे तेवढे दिलेल्या खतांचे अन्नात रूंपातरीत होऊन खोडात संग्रहीत होणार आहे. त्यामुळे पुढील काळात त्याचे फुल, फळांच्या रूपात परतावा मिळणार आहे. तेव्हां पावसाळ्यातही द्राव्य व विद्राव्य खतांचा वापर आवश्यक करावा.

आम्ही खालील मो. क्रंमाकावरून व्हाट्सअपवर गार्डेन अपडेटस पाठवत असतो.

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

thank you for connect.. please join on wts app 9850569644

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.