बागेतील माती वाळवणे का गरजेचे आहे

आपले पूर्वज हे मोसमानुसार शेती करायचे तेव्हां शेतातील माती वाळवून घ्यायचे. काळी माती तर अधिक पाणी धरून ठेवते. तो तिचा गुणधर्मच आहे. त्यामुळे ही माती फेब्रुवारी महिण्यानंतर पावसाळ्यापर्यंत वाळवून घेत असत. कडक उन


भाजीपाल्याची बाग फुलवायाची म्हणजे काही कामे ही ठराविक वेळाने करणे फार गरजेचे असते.

त्यातील महत्वाचे काम म्हणजे बागेतील माती वाळवणे. विटांच्या वाफा असेल, अन्नपूर्णा बॅग असो वा कुंड्या असोत.

माती वाळवणे का गरजेचे आहे…

  • सातत्याने पाणी दिल्याने अथवा संततधार पावसामुळे कुंडी, वाफा, बॅग्जसमधील माती ही तळापासू त्यात मातीचे सुक्ष्म कण साचत जातात. तसेच सुक्ष्म कणांनी माती ही घट्ट होत जाते. माती घट्ट झाल्यामुळे ती कडक होत असते. (अर्थात बिशकॉम हे पॉंटीग मिक्स वापरल्यामुळे एवढी कडक होत नाही.) त्यात हवा खेळती असणे फार गरजेचे आहे. जेवढी हवा खेळती राहिल तेवढे पांढर्या मुळ्यांची संख्या वाढून फळधारणा चांगली होते. त्यामुळे कडक होणारी माती हे वाळवल्यानंतरच ति हलकी, भुसभुशीत होते. त्यामुळे माती वाळवणे गरजेचे आहे. माती भुसभुशीत नसेल तर मुळ्यांची वाढ ही चौफेर होत नाही. पर्यायाने झाडं हे खुरटून जाते.  पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते पर्याने अधिक पाण्यामुळे झाडे रोगांना बळी पडतात.
  •  कुंडी, वाफा अथवा बॅगेत आपण खतं पाणी देत असतो. खत ही वरच्या भागात अधिक असतात. तर खालील भागात पाणी दिल्यामुळे ते वाहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे थरानुसार वेगवेगळे खतांची मात्रा साचण्याची शक्यता असते. तसेच तिची सुपिकतेचे भिन्न भिन्न थर बनतात. व भिन्न थरात झाडांची योग्यरित्या वाढ होत नाही. अशा वेळेस माती बाहेर काढून एकत्र करून वाळून घ्यावी. म्हणजे संपूर्णतः मातीत पोषकत्व हे पसरवता येते.
  • सततच्या पाण्यामुळे माती ही चिकट होते. अथवा त्यात पाणीजन्य सुक्ष्म विषाणूंची वाढ झालेली असते किंवा एकाच प्रकारच्या उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे सुध्दा झाडांची वाढ पूर्ण क्षमतेने होत नाही. अशा वेळेस त्यातील सुक्ष्म विषाणू व जिवाणू हे माती उन्हात वाळवल्याने मृत पावतात. त्यांचे सुक्ष्म खत नंतरच्या झाडांना पोषक होते.

या वरील तिन कारणांमुळे माती वाळवणे हे फार गरजेचे आहे.

आपले पूर्वज हे मोसमानुसार शेती करायचे तेव्हां शेतातील माती वाळवून घ्यायचे. काळी माती तर अधिक पाणी धरून ठेवते. तो तिचा गुणधर्मच आहे. त्यामुळे ही माती फेब्रुवारी महिण्यानंतर पावसाळ्यापर्यंत वाळवून घेत असत. कडक उन लागल्यामुळे मातीतील विषाणू हे मृत पावतात. त्यांचे खत तयार होते. तसेच काळ्यामातीचे ढेकळे हे मोठे मोठे असतात. ऊन लागल्यामुळे त्यांचा आपोआप चुरा होतो. माती भुसभुशीत होते. पण सध्याच्या बारमाही शेती मुळे शेतीत कीड वाढण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच माती चिकट होणे त्याचे ढेकळे होतात. म्हणूनच अधिक अश्वशक्तिचे  टॅक्ट्रर वापरले जाते आहेत. अर्थात रसायनांच्या वापरामुळेही हे होत आहे पण त्या खालोखाल कारण म्हणजे माती न वाळवणे हाच आहे.

वर्षायु झाडं असलेल्या कुंड्यातील माती ही वर्षा दोन वर्षातून पुर्नभरण करावे. पण भाजीपाल्याचे अन्नपूर्णा बॅग्जस व कुंड्यातील माती संपूर्णत वाळवणे गरजेचे आहे., विटांचा वाफा जशी जागा मिळेल तसे माती वाळवणे गरजेचे असते.

माती कधी वाळवावी….

साधरणतः माती वर्षातून तीन वेळा वाळवणे गरजेचे आहे.

  • ऑक्टोबर महिना… ऑक्टोबर महिण्यात कडक ऊन असते. ऑक्टोबर हिट मधे माती महिणाभर तरी वाळवून घ्यावी.
  • फेब्रुवारी महिण्यात माती वाळवावी.
  • मे किंवा जून महिण्यात माती वाळवावी. 

वाळलेल्या मातीत उत्तम प्रकारचे शेणखत, बिशकॉम हे पॉटींग मिक्स एकत्र करावे. कुंड्या व अन्नपूर्णे बॅग ही भरभरून भाजीपाला देतात.

गच्चीवरची बाग संशोधित एरो ब्रिक्स व्हेजेटेबल बेड म्हणजे विटांच्या वाफा हो दोन वर्षानी पुर्नभरण करणे गरजेचे आहे. पण बाराही महिने काहीना काही भाजीपाला असतोच. अशा वेळेस वाफेतील ठराविक तुकडा किंवा जागा सुचवलेल्या महिण्यात झाडे असतील तर त्याच्या आजूबाजूची माती वाळवून घ्यावी. त्यात बिशकॉम मिक्स करावे, किंवा तळाशी सुका पालापोचोळा किंवा वाळवलेले किचन वेस्टची भर टाकावी.

बागेतील जूनी माती फेकू नये…

बरेचदा कुंडीतील माती बदलावयाला सांगतात. म्हणजे आधिची माती ही फेकून देतात. पण तसे करू नका. कारण या मातीत आपण खते पाणी दिलेले असल्यामुळे माती फेकून दिल्यामुळे तो खर्च, मेहनत वाया जातो. अशा वेळेस माती वाळवणे शक्य नसल्यास ति काढून नवीन माती जरूर वापरा. पण आधिची माती वाळवून गोण्यात भरून ठेवा. म्हणजे ती परत आपल्याला वापरता येईल.

माती कशी वाळवावी…

कुंड्या, अन्नपूर्ण बॅगेतील माती बाहेर काढा. त्यातील ढेकळे फोडून घ्या. तिला उपलब्ध जागेच्या एका कोपर्यात ढिग करा, दोन चार दिवसातून त्यास फावड्याने वरखाली करा. कण नि कण कडक उन्हात वाळवून घ्या. माती हलकी व रिचार्ज होते.

आपल्याला लेख आवडला तर नक्कीच शेअर, लाईक व कॉमेंट करा.

या संकेतस्थळाचा वार्षिक खर्च हा जवळपास २५ हजार एवढा आहे. आमचे काम आपल्याला आवडल्यास संकेतस्थळ चालवण्यासाठी आर्थिक मदत करू शकता. किंवा यासाठी मदत करणार्या दानशूरापर्यंत हा संदेश पोहचावा ही विनंती…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

लेखक: Gacchivarchi Baug Nashik

Grow, Guide, Build, Procuts. Sale N Services

One thought on “बागेतील माती वाळवणे का गरजेचे आहे”

thank you for connect.. please join on wts app 9850569644

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: