उपलब्ध जागेत ऑरगॅनिक भाजीपाला उगवणे हे फार गरजेचे आहे. आपल्याकडे हे नाही ते नाही म्हणत आपण आरोग्याची हेळसांड करत तर नाही ना याचा खरं विचार केला पाहिजे. खरं तर आम्ही भाज्या नाही उगवत औषधे उगवतो. कारण विषमुक्त भाजी हे औषधासारखंच काम करतय. पण हे आपल्याला ते खाल्यानंतर लक्षात येते. औषधं ही कमी प्रमाणात लागतात. तसेच घरी उगवलेल्या भाज्या या औषधाप्रमाणेच कमी असल्यातरी पुरतात. तसेच त्यांचे कच्चे स्वरूपात सलाड म्हणून खाणं गरजेचं आहे.

या संबधी वेळोवेळी प्रत्यक्ष फेस टू फेस कार्यशाळा घेण्यात येतात. पण कोरोना संसर्ग आजारामुळे हे मागील दोन वर्ष टाळण्यात आले. वेळोवेळी इच्छुकांकडून विचारणा होत असल्यामुळे गच्चीवरची बाग व्दारे Online व्हेजेटेबल गार्डन क्लासेस स्वरूपात घेण्यात येणार आहेत.
गच्चीवरची बागेव्दारे लवकर zoom वर vegetable Gardening consultation / class / tuition.
स्वरूपः कोंटुबिक किंवा व्यक्तिगत मार्गदर्शन
४५ मिनंटाचे एक सेशन असेल असे पाच सेशन होतील, त्यात सविस्तर पणे सहभागीला विषय समजून सांगण्यात येईल.
विषय खालील प्रमाणे असतील.
- बाग फुलवण्यासाठीचे उपलब्ध पर्याय, त्यासाठी असलेल्या गरजेच्या गोष्टी
- खत (द्राव्य व विद्राव्य) व खत निर्मिती आणि त्याचा वापर
- कीड व कीडनियंत्रके बनवणे
- बि बियाणे व त्याची लागवड ( सविस्तर)
- इतर काळजी, महत्वाचे मुद्दे,
( प्रत्येक सत्रात आपणास पडलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिले जातील.)
सहभागी फी ही संपूर्णतः २५०० असेन. (व्यक्तिगत / कुटुंबातील व्यक्तिसाठी)
क्लासची वेळ आपल्या वेळेनुसार असेन, प्रत्येक बैठकीत मागील Follow up घेण्यात येईल.
आपल्याला पुढे वर्षभर मोबाईल किंवा व्हाट्सअप मार्गदर्शन करण्यात येईल.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644