नाशिकचा हटके नाशिक हाट बाजार


गांधी जयंती हे औचित्य साधून दिनांक 1 ऑक्टोबर ते तीन ऑक्टोबर 2021 दरम्यान विविध संस्था संघटनाव्दारे नाशिक हाट बाजारचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या वस्तूंचे कलाकृतीचे नैसर्गिक उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री असणार आहे या प्रदर्शनात गच्चीवरची बाग नाशिक सुद्धा सहभागी होत आहे तेव्हा नक्की या प्रदर्शनात सहभागी व्हा . सविस्तर पुढील प्रमााणे..

नाशिक हाट बाजार माझी आवड – स्थानिक निवड

मराठा विद्या प्रसारक समाजाचे उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रालय, जन शिक्षण संस्थान, डायमंड थ्रेड, पोएसिए लाईफ डिझाईन्स व सोमधा खादी यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजीत होत आहे नाशिक हाट बाजार माझी आवड स्थानिक निवड

महात्मा गांधी यांच्या स्वदेशी आणि कुटीरोद्योग आधारित अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेला पुरक अशा या नाशिक हाट बाजारचे उद्देश आहेत.

  • स्थानिक कलाकार, कारागिर व उत्पादक, यांच्यासाठी बाजारपेठ उपल्बध करून देवून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे
  • जंगल व शेती आधारित नैसर्गिक संसाधनापासून बनलेल्या वस्तूंच्या वापराला, उत्पादनाला आणि व्यापाराला प्रोत्साहन देणे.
  • पारंपरिक कलाकौशल्य व उद्योगांना प्रोत्साहन देत त्यांचे संवर्धन करणे.
  • निसर्गपुरक कचरामुक्त जिवनशैलीबद्दल जनजागृती करणे.
  • पर्यावरणपुरक उद्योगांना प्रोत्साहन देणे.

या उद्देशांच्या पूर्तेतेसाठी गांधी जंयती निमित्ताने स्थानिक उद्योग निर्मित उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करीता नाशिक हाट बाजारचे आयोजन केले आहे. नाशिक हाट बाजार सर्वांसाठी खुला आहे.

यात बांबूच्या विविध वस्तू, खादी व सुती कपडे, तसेच वस्तू स्थानिक महिला उद्योजकांनी बनवलेल्या कापडी पिशव्या, मास्क, अगरबत्ती तसेच शेती उत्पादनांचे विविध स्टॉल असतील.

पारंपरिक खाद्य पदार्थांचा आस्वाद हा तर या बाजाराचा केंद्रबिंदू.

स्थानिक अर्थव्यवस्था आणी अहिसंक, सहिष्णू, समाजाचे प्रतिनिधित्व करणारा चरखा चालविण्याचा अनुभव नाशिक हाट बाजार येथे घेवू शकता.

दिनांकः १ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर, २०२१ वेळः सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत

ठिकाणः उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रालय

उदाजी मराठा बोर्डिंग कॅम्प, डी. के. नगर, आकाशवाणी केंद्राजवळ, गंगापूर रोड. नाशिक.

नाशिक हाट बाजारचे इतर आकर्षण

  • क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो सुचना व प्रसाऱण मंत्रालय, भारत सरकार यांच्या तर्फे गांधी व्यक्ती परिचय या विषयी पोस्टर्स प्रदर्षण भरविले जाणार आहे.
  • २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त सर्वोद्य परिवार नाशिक व्दारा दुपारी ३ वाजता गांधी प्रेरणेने सामाजिक कार्यात महिलांचे योगदान या विषयावर व्याख्यान आयोजीत केले आहे.
  • गच्चीवरची (ऑरगॅनिक भाजीपाल्याची)  बाग नाशिक या पर्यावरणपुरक उद्मशिलतेचा स्टॉल असणार आहे. Grow, Guide, Build, Products Sale N Services  ची माहिती व उत्पादनांची विक्री करण्यात येणार आहे. (साहत्य विक्रीची खाली माहिती दिली आहे.
  • टीपः या प्रदर्शनात साहित्य विक्रीसाठी प्लास्टिक पिशव्याचा वापर करण्यात येणार नाही. खरेदीदारांनी आपआपल्या कापडी पिशव्या सोबत घेवून याव्यात.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

9850569644

thank you for connect.. please join on wts app 9850569644

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.