गोगलगायीचा करेक्ट कार्यक्रम


गोगलगाय नि पोटात पाय अशी आपल्याकडे म्हण आहे. दिसायला गरीब असली तरी फार उपद्रवी कीडा आहे. ऑरगॅनिनक पध्दतीने बाग फुलवायची म्हणजे कीडीचा त्रास आलाच. त्यातील झिरो टॉलरन्स म्हणजे अजिबात सहन करायची नाही डायरेक्ट एक्शनच घ्यायची. नाहीतर तिच बागेचा करेक्ट कार्यक्रम करते. कारण ही जलद गतीने स्वतःची संख्या वाढवते व त्याच गतिने बागेतील नवीन  व कोवळी पाने, छोटी रोपे, अंकुर फस्त करत असते. दिवसेंदिवस या कीडीचा शेतात व बागेत त्रास वाढत चालला आहे. थोडे जरी दुर्लक्ष केले तरी त्यांची संख्या फार त्रासदायक होते.

गोगलगाय ही विषारी कीड नाही. स्वरक्षणासाठी सोडत असलेला पांढरा स्त्राव हा सुध्दा विषारी नाही. तिला सहजतेने हाताळता येते. उचलून फेकता येते. काही मंडळीना हा किळसवाणा किडी वाटतो. कारण तो लिबलिबत, अतिशय मऊ, प्रसंगी थंड स्पर्श असेलला कीडा आहे. गोगलगायी ही चिकट शेबडासारखा स्त्राव सोडते. गांडूळ व गोगलगाय या कीडीना हाड नसते. जपान मधे गोगलगायीचा उपयोग ब्यूटी थेरेपी म्हणून करतात. तेथे चेहर्यावर फिरवतात. त्याने त्वचा तुकतुकीत व चमकदार होते. ही कीड निशाचर आहे. बागेतील ओलावा, थंडावा असलेल्या जागेवर, भेगामधे , कुंड्याच्या कडामधे, मातीखाली वास्तव्य करते.

ऊन, गरम हवा, प्रकाश यांना सहन होत नाही.  वाढत्या तापमानात यांची संख्या कमी होत जाते तर पावसाळ्यात यांची संख्या फार झपाट्याने वाढते. प्रतिकूल परिस्थीतही त्या तग धरून असतात. विना ऑक्सीजन व अन्नपाण्याशिवाय त्या राहू शकतात. गोगलगाय दोन प्रकारात असतात. जिला शंखाकृती वा गोलाकार कवच असते. व दुसरा  प्रकार जिला हे कसलेही कवच नसते. शंखाकृती गोगलगायी या मोठ्या असतात. तर पाठीवर गोलाकार कवच असलेल्या गोगलगायी छोट्या व लांबट असतात.

तर पाठीवर कवच असलेल्या व विचा कवच असलेल्या गोगलगायी छोट्या असतात. विना कवच असलेल्या गोगलगायी या पावसाळ्यात व हिवाळ्यात या गोर्या पाठीच्या असतात. तर वाढत्या उन्हाल्यात यांची पाठ ही काळी पडते. तसेच यांची पिल्लावळ ही नखाच्या आकाराची असतात. त्यांना शंखाकृती छोटे कवच असते. यावर रासायनिक उपाय आहेत. पण ऑरगॅनिक पध्दतीने बाग फुलवतांना मातीत रसायने टाकली तर माती खराब व निर्जीव होते. रसायनांच्या वापरामुळे मित्र किटक मरत असतात. जैवविविधता संपून जाते.

त्यामुळे रासायनिक उपाय करू नका. मग त्यावर नैसर्गिक उपाय हाच उत्तम पर्याय आहे. गोगलगायीवर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गोगलगायीना फक्त भारव्दाज पक्षी व बदक खातात. बाकी ते गिळगिळीत असल्यामुळे इतर पक्ष्यांच्या गळ्यात उतरत नाहीत. त्यातील रामबाण ठरणारी काही उपाय पाहणार आहोत. बागेत कोणतही कीड असेल तर त्या वेचून फेकणे हा सर्वात चांगला, रामबाण व बिनखर्चीक उपाय आहे. गोगलगाय सुध्दा वेचून फेकून देता येतात.

गच्चीवर बाग असेनतर त्या मोकळ्या प्लॉट, खुल्या मैदानात, पटागणांत फेकून द्याव्यात पण काही काळाने त्या परिसरात वाढतच जातात. जमिनीवर बाग असेन तर मग त्या हमखास तुमच्या बागेत परत परत फिरून येतात. गोगलगाय फेकून देणे सोपा मार्ग आहे. पण त्यापेक्षा त्यांना एकाद्या प्लास्टिक बॅगेत, बाटलीत हवा बंद कराव्यात. मग त्या घंटागाडीत टाकाव्यात किंवा संग्रहीत करून ठेवल्यास त्याचे कालातंराने छान खत तयार होते. महिनाभर प्लास्टिक बाटलीत भरून त्या सावलीत ठेवल्या तरी त्या जिंवत होत्या. अशी ही चिवट कीड आहे. गोगलगाय नियंत्रणासाठी दुसरा पर्याय आहे.

तो म्हणजे तंबाखू पावडरचा वापर करणे. तुबाखू पावडरचा दोन प्रकारे वापर करता येतो. बागेत कुठेही गोगलगाय, छोटी पिल्ल दिसली तर त्यावर तंबाखू पावडर टाकणे हा सोपा पर्याय आहे. व दुसरा पर्याय म्हणजे मुठभर तंबाखू एक लिटर पाण्यात भिजवावी व गोगलगायी वेचून त्यात टाकत जाव्यात. कालांतराने हे पाणी बागेत एकाद्या झाडाला खत म्हणून देता येते. नखाएवढ्या आकाराची गोगलगायीची पिल्ल वेचता येत नाही. त्यावर तंबाखू पावडर टाकावी.

गोगलगायीची अंडी ही साबुदाण्याच्या आकाराची गुच्छाने असतात. मोह वाटावा असा तो पुंजका असतो. मनुष्याचा सहसा वावर नसेन या ठिकाणी त्या निवास करतात वा अंडी घालतात. अशी अंडी तुम्हाला आढळल्यास त्यावर तंबाखू पावडर टाकावी अथवा प्लास्टिक पिशवीत बंद कराव्यात. बागेतील कॅल्शीयम हे खनिज कमी झाल्यामुळे यांची संख्या वाढत असते. अशा वेळेस चूना पाण्याची फवारणी करावी. तसेच यांनी रात्रीच्या वेळेस वेचावेत. किंवा बागेत फरशी, गोणपाठ, पृष्ठा ठेवावा त्याखाली त्या गारव्यामुळे जमा होतात. त्यामुळे एकाच ठिकाणी त्या मिळतात. गोगलगायीला कॅबेजची ताजी व सुकी पाने फार आव़डतात. ही पाने एका जागेवर ठेवावीत व रात्री ते खायला एकत्र जमतात. तेव्हा त्या  वेचून जमेल तो उपाय करावा.

तसेच बागेची वेळोवेळी कुंड्या हलवून स्वच्छता करावी. कुंड्याची जागा बदलवणे, त्याच्या बाहेरी कडा अथवा तळ तपासून पहावा. कारण त्या तिथे चिटकलेले असातात. हे उपाय केल्यास त्यांना नियंत्रीत करता येते. सांयकाळी चार पाच वाजता पाणी दिल्यास बाग लवकर थंड होते. व गोगलगाय या लवकर बागेत फिरायला येतात. त्यावेळेस त्यांना मोबाईल्या प्रकाशात वेचणे सोपे जाते.

thank you for connect.. please join on wts app 9850569644

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.