शेवंती मदं सुवासाची, आर्कषक रंगाची तसेच नाजूक पातळ्याचे फुल आहे. ते देवपुजेसाठी सुध्दा वापरले जाते.
शेवंतीच्या गावठी (मूळ) जाती तसेच कलमीजाती सुध्दा आढळतात. शेवंतीला बारमाही फुले येणार्याही जाती आहेत. तसेच मोठ्या आकाराचे व बटन शेवंती सुध्दा उपलब्ध आहेत. हे एक व्यापारी उत्पन्न देणारे पिक असल्यामुळे याचे शेतीत मोठ्या प्रमाणात लागवडही करतात. त्यामुळे यात अनेक जाती तयार झाल्या आहेत व होत राहतील. तसेच याचे घराच्या बागेतही लागवड केली जाते. त्यामुळे याच्या मुळ जाती टिकून राहतात किंवा त्या विकसीत होत जातात.
नर्सरीतून आणलेले शेवंती हे काही काळच फुल देतात. त्यानंतर ते फुल देत नाही. तर काही जाती एकदा लागवड केल्या की सासत्याने किंवा कालातंराने ट्प्याटप्प्यात फुल देत राहतात.
गावठी अर्थात मुळ जातीच्या शेवंतीच झुडूप उपलब्ध असल्यास त्याच्या फांदीपासून आपल्याला नव्याने रोप तयार करता येते. किंवा यांच्या फुलांमधे बियाणे असतात. ते सुध्दा रूजवून रोपे तयार करता येतात. शक्यतो नर्सरीतील शेवंतीच्या झाडाचे फांद्या काढून अथवा फुलांचे बियाणे तयार होत नाही. गावठी शेवंतीचेच फुलांचे अथवा फांदयांचे रोपे तयार करता येतात.
गावठी शेवंतीचे काडीपेटीपेक्षा जास्त जाडीची फांदी कापून त्यास वाळूत अथवा भुसभुशीत मातीत रूजवता येते. अर्थात यासाठी छोट्या काळ्या रंगाच्या नर्सरी बॅग्ज वापराव्यात.
शेंवतीला अधिक ऊन चालत नाही. तापमान कमी असल्याच्या कालावधीत म्हणजे नोव्हेंबर ते माहे फेब्रुवारी दरम्यान भरपूर फुले येतात.
शेवंतीला योग्य पाण्याचा निचरा होणारी जागा लागते अथवा पॉटींग मिक्स लागते.
कुंडीत अथवा मातीत जास्त पाणी झाल्यास त्याची मुळे सडण्याची दाट शक्यता असते. शेवंतीचे झाडांचे दरवर्षी रिपॉटींग करावे. म्हणजे नव्याने फुटवे येतात. तसेच यास जिवामृत, कांदापाणी यांचा वापर करावा. शेणखत असल्यास उत्तम…
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.