बोनमिल म्हणजे काय रे भाऊ…

बोनमिलला असलेला माझा विरोध. ते खत म्हणून उत्तमच आहे. त्या बद्दल वादच नाही. पण ते ज्या कारणामुळे तयार होते त्याला विरोध आहे. अर्थात मी सफेद रंगाची टूथपेस्ट वापरतच नाही. मी सारेच मजंण एकत्र करून दात घासतो. असो. विरोध यासाठी आहे की आपण एका बाजूला गोधन वाचले पाहिजे म्हणून प्रयत्न करायचे. पण त्याना ज्या मासांहारासीठी जिवंत कापले जाते. त्यासाठी ज्या पध्दतीने त्यांची तस्करी होते त्यांचे मांस विकले जाते त्यांच्याच हाडातून तयार होणारे हे खत झाडांना वापरणे हे खरचं किती अर्थाने नैतिक आहे.


बोनमिल म्हणजे काय ?

ते कसे तयार होते ?

बोनमिल हे नैसर्गिक खत आहे का ?

त्याचा कुंड्यातील झाडांना कसा उपयोग करायचा?

ते उन्हाळ्यात वापरले तर चालते का ?

बोनमिलला पर्याय आहेत ?

या वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.

बोनमिल या नावावरूनच ते कशापासून बनलेले असावे याचा अंदाज येतो.

अर्थातच हाडांचा हा चुरा असतो. कत्तलखान्यात मारल्या जाणार्या जनांवरांची जी हाडे उरतात. त्याचा चुरा तयार केला जातो. अर्थात ही हाडाचा चुरा दात घासण्यासाठी ज्या ब्रॅंडेड टूथपेस्ट तयार होतात त्यातही वापरली जाते. तर हाडांमधे फॉसस्परस अर्थात गंधक व कॅल्शियमचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. झाडांना फुले येण्यासाठी नैसर्गिक गंधकाची गरज असते. अर्थात फूल येण्यासाठी बोनमिल हाच एक पर्याय आहे असे नाही. मी गेल्या दहा वर्षापासून भाजीपाला उगवून देण्याचे काम करत आहे पण एकदाही बोनमिल वापरलेले नाही. याचे कारण म्हणजे….

बोनमिलला असलेला माझा विरोध. ते खत म्हणून उत्तमच आहे. त्या बद्दल वादच नाही. पण ते ज्या कारणामुळे तयार होते त्याला विरोध आहे. अर्थात मी सफेद रंगाची टूथपेस्ट वापरतच नाही. मी सारेच मजंण एकत्र करून दात घासतो. असो. विरोध यासाठी आहे की आपण एका बाजूला गोधन वाचले पाहिजे म्हणून प्रयत्न करायचे. पण त्याना ज्या मासांहारासीठी जिवंत कापले जाते. त्यासाठी ज्या पध्दतीने त्यांची तस्करी होते त्यांचे मांस विकले जाते त्यांच्याच हाडातून तयार होणारे हे खत झाडांना वापरणे हे खरचं किती अर्थाने नैतिक आहे. हा माझा प्रश्न आहे. याचे समांतर उदाहरण म्हणजे मला माझा देश, परिसर स्वच्छ असावा म्हणायचे व त्यासाठी आग्रही धरतो पण मीच येता जाता कचरा कुठेही फेकला तर याला काय म्हणायचे. याला भ्रमित व्यक्तिमत्व मानले जाते.  तर बोनमिल बद्दल हे माझे मत आहे. ते तुम्ही वापरून नये असा आग्रह नाही. ज्याला त्याला स्वांतत्र्य आहे.  तर असो…

कुंड्यामधील झाडांना व परसबागेतील झाडांना खत देण्यात विविधता असावी हे मी बरेचदा सांगितले आहे. त्या विविधतेत बोनमिला समावेश करता येईल पण हाच एक पर्याय आहे असे नाही. गंधक हे भुरू भूरू जळते. ते सर्वच प्राण्याच्या हाडात जसे सापडते तसे ते कोणत्याही काष्ट वा झुडुपाच्या वाळलेल्या काड्यामधेही आढळते. जे झाडांत आहे ते पानांतही असणारच त्यामुळे गंध पुरवण्याची व्यवस्था निसर्गाने आपसूच केली आहे. निसर्गाने हा ईनबिल्ट प्रोग्राम केलेलाच आहे. पण माणूस म्हणून आपली बुध्दी तोडकी पडतेय. जे विकलं जातय तेच वापरलं जातय हा आजच्या अर्थव्यस्थेचा तकलादू पाया आहे. असो..

खत कोणते आहे त्यावर त्याचे झाडांना देण्याचे प्रमाण ठरते. बोनमिल, तंबाखू पावडर, राख,  निमपेंड हे एका चौरस फुटाला एक चमचा भर द्यावे. शक्यतो ते सायंकाळी द्यावे, माती उकरून दिल्यास उत्तमच. म्हणजे उत्तमपणे ते मातीखाली झाकले जाते वा मिक्स होते.  कारण तिव्र उन्हामुळे कोणत्याही खतातील घटक हे करपू शकतात. किंवा दिल्या नंतर मोजके पाणी द्यावे. म्हणजे ते अधिकच्या पाण्यामुळे वाहून जाणार नाहीत. तसेच जिवामृत, गोमुत्र, ह्युमिक जल या मधेही गंधक व कॅल्शियमचे प्रमाण असते.

खतं कोणतही असोत ती मोजक्याचा स्वरूपात द्यावी. कारण हे वर खत आहेत. वरखतं ही जेवणातील तेल मिठ, मिरची, लोणच्या सारखी असतात. किंवा बडी शोफ सारखी असतात. ती योग्य प्रमाणात सेवन केली तरच त्याला चव असते व त्याचा योग्य परिमाणात योग्य तो परिणाम साध्य करता येतो.

कोणत्याही दोन खतात ७ ते १५ दिवसांचे अंतर असावे. अर्थात त्यात खतांत विविधता असावी. एकच एक खत टाकल्यानेही झाडं किडीना बळी पडतात.

गंधक हे कंपोस्ट खतातून मिळते. तसेच गारबेज इंजाईम मधूनही मिळते. तसेच देशी गायीचे शेणखतातही असते. खरं तर डॉक्टर आपल्याला वरून साखर वा मिठ खायला सांगत नाही. त्यांचे म्हणणे असते की जे नैसर्गिक रित्या फळातून धान्यातून भाजीतून मिळते ते खरं मिठ साखर. तुम्हाला माहित असेन की घरची पालकात नेहमी प्रमाणे मिठ टाकून चालत नाही. कारण तिच्यात नैसर्गिकरित्या मिठाचे प्रमाण हे अधिक असते.

तर सारी व्यवस्था ही निसर्गात आहे. त्याचा वापर करायला आपण शिकले पाहिजे. काही मंडळीना हा लेख एकांगी वाटेलही पण थोडा विचार करून पहा.. आपल्याला निसर्ग फुलवायचा आहे. निसर्ग जपण्यासाठी तेही निसर्गालाच सोबत घेवून.. जे निसर्गाने त्यागले आहे त्याचा पूर्नवापर करण्याची अक्कल ही फत्त माणूस प्राण्यालाच दिली आहे. त्याचा वापर करायला आपण सर्वानी शिकले पाहिजे.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.

9850569644 / 8087475242

 www.gacchivarchibaug.in

लेखक: Gacchivarchi Baug Nashik

Grow, Guide, Build, Procuts. Sale N Services

thank you for connect.. please join on wts app 9850569644

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: