गच्चीवरची बाग नाशिक ही पर्यावरणपुरक उदयोग आहे. यात आम्ही पर्यावरणाच्या संवर्धनासोबतच त्यात उपयोगीता शोधणे. वाढवणे व त्यात लोकांचा सहभाग घेणे असे काम करत आहोत.
यासाठी वाढत्या शहरीकरणासोबत निसर्गाची साथसंगत हे कशा रितीने संगोपन करता येईल यासाठी प्रयत्नरत आहोत. उपलब्ध जागेत फुलझाडे व भाजीपाला पिकवण्यासाठी लोकांना सोयीचे व सोयीस्कर उत्पादनांची निर्मिती करत आहोत.
गेल्या दहा वर्षात आम्ही ५२ प्रकारची उत्पादने, सेवा व सुविधा तयार केल्या आहेत.
यातील रेडी टू सो अशी अन्नपूर्णा बॅग्जसची निर्मिती केली. त्याला महाराष्ट्रातील निसर्गप्रेमीनी भरभरून प्रेम दिले. उत्पादन विकत घेतले व विकत घेत आहेत. अन्नपूर्णा बॅग्ज मधे आपल्याला आवडेल ते फुलझाड लागवड करू शकता किंवा त्यात भाजीपाल्याची बियाणे, रोपेपण लागवड करू शकता.
या मालिकेतील पुढेचे उत्पादन म्हणजे संपूर्णान्न ( संपूर्ण अन्न) ही बॅग्ज तयार केली आहे. यात आपल्याला रेडी टू हार्व्हेस्ट अशी बॅग मिळणार म्हणजे आपणास वांगी, अळूची पाने, मिरच्या, फ्लॉवर, कोबी ( कॅबेज) यांची रोपे ठराविक काळापर्यंत वाढवलेले तयार बॅग देणार. आपण ति घरी नेवून त्याला योग्य ती काळजी घ्यावी व काही दिवसात आपल्याला त्यातून भाजीपाला मिळू लागेल.
य़ातील रोपाचे आयुष्यमान संपले की आपणास फक्त पिशवी रिकामी करून माती वाळवून घ्यावयाची आहे. व पुन्हा बिशकॉम व खत टाकून पिशवी भरावयाची आहे. पुन्हा त्यात भाजीपाला बियाणे लावून आपण पुन्हा भाज्या निर्मिती करू शकता.
यासाठी आपणास गार्डेन केअर बास्केट मधील ( ज्याची किंमत यात पकडलेली नाही) खते वापरू शकता. किंवा आम्ही मार्गदर्शन करून तुम्ही घरी बनवत असलेली खते वापरू शकता.
हे उत्पादन फक्त नाशिक शहरासाठी डिलेव्हरी चार्जेस घेवून घरपोहोच पोहचवले जाईल. इतर जिल्हे व राज्यातील मंडळी खरेदीसाठी संपर्क करून यावे.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.