गणेश आपल्याला प्रिय व गणेशाला दुर्वा प्रिय. खरंतर हिंदू संस्कृतीत जेवढे काही देव देवता आहेत. हे त्या त्या काळातले समाजसेवक, समाज रक्षक, संशोधक, शास्त्रज्ञ होते. माणून उत्क्रांत होत गेला. पण त्याला समाज म्हणून सामाजिक बांधणीसाठी या सार्यांनी फार मोठ योगदान दिले आहे. त्यांच्या योगदानामुळेच ते आपल्याला प्रातःसमयी वंदणीय आहेत.

भगवान गणेशांना दुर्वां प्रिय आहेत. कारण दुर्वा ही बुध्दी वर्धक आहे. ती शित आहे. तिच्या सेवनाने आजार बरे होतात. ही कमी पाण्यात तग धरणारी व अधिक पाण्यातही जोमाने वाढणारी असते.

पण आपणं माणसं तिचा उपयोग फक्त पुजेसाठी, देवाला वाहण्यासाठी करतो. तसे न करता तिचे सेवन केले पाहिजे. गव्हांकुराचा रस जसा शरिराला शक्तिवर्धक व कर्करोगास रोखणारा आहे. तसाच दुर्वांकुराचा रस मेंदुला ताकद देणारा आहे.

असे दर्वांकुर आपण घरी सुध्दा लागवड करता येते. ही वनस्पती तशी चिवट असते. ति मुळासहित आणून लावावी म्हणजे लवकर लागवड होते. फांदीपासून सहसा मातीत रूजत नाही.

यास चार इंच खोलीची जागा सुध्दा पुरेशी आहे. स्वच्छ व भरपूर उन असल्यास वेगाने वाढते. पाण्याचा निचरा होणारी जागा लागते. दुर्वा व हरळी एकच असते. पण लॉन्सचे गवत यात फरक आहे. दुर्वी ही आकाशाकडे झेपावणारी वेलवर्गीयात मोडते. जिचे पाने तलवारीसाऱखे असतात.

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.