Site icon Grow Organic

कोणती माती निसर्गपुरक

Advertisements

आपण पर्यावरणाचा विचार करत हाताने गणपती बनवतो त्याचे विसर्जन सुध्दा  घरी करतो. पण नंतर लक्षात येते की हाताने अर्थात गणपतीसाठी वापरलेली शाडूची माती ही बागेतील मातीत मिसळत नाही. याविषयी माहीती देण्यासाठी हा व्हिडीओ बनवला आहे.

लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ येते. नित्य नेमाने धुप आरती करत गणरायाशी लागलेला लळा साश्रू नयांनाने दुर करावा लागतो. कारण त्याने पुन्हा यावे म्हणून त्याला निरोप द्यावा लागतो.

पर्यावऱणाबद्ल जागृत असलेली मंडळी ही घरीच किंवा घरच्या बागेत गणरायाचे विसर्जन करतात. ते बर्याच अर्थानी फायदेशीर आहे. तशाही नद्या कुठे स्वच्छ राहिल्यात, गटारी झाल्यात. अशा पाण्यात तर गणरायाचे विसर्जन करू नका ही विनंती,  घरी विसर्जन करण्याचे कारण म्हणजे मनोभावे आनंदाने पूजा अर्चा तर करता येतेच तसेच घरचे पाणी स्वच्छ तरी असते. दूर कुठेतरी गणरायाला सोडून त्याची बिटंबना होण्यापेक्षा घरच्या बागेत विसर्जन करणे कधीही चागंले.

तर आम्हीपण या वर्षी गणपती हातानेच बनवला. सुजल गणपतीच्या मूर्ती कार्यशाळेला गेला होता. सहसा गणपती विकत आणणे टाळतो. कारण त्यात काहीही मजा, त्याच्याशी भावना जुळत नाही. हाताने केलेला गणपती कसा आपला वाटतो. सृजनांचा देव असलेला गणराया हा आपल्या हात, डोकं व भावनांनी तयार केला की तो आपला वाटतो.

तर बाजारातील गणपती आणत नाही कारण तो पॅल्स्टर ऑफ पॅरीस अर्थात पी. ओ. पी. चा बनलेला असतो. पी. ओ. पी. तसे फार घातक. ते पाण्यात मिसळले तर पाणी प्रदुर्षीत तर होतेच पण त्यांचे अशं हे बराच काळ पाण्यात असतात. तसेच यामुळे पाण्यातील जिवांची जैवविविधता संपते. अर्थात याला न्यायालयीन बंदी आहे. पण आपल्याकडे सर्वच चालतय. पण या पी. ओपी. ची वैशिष्टय म्हणजे एकतर फारच मऊ, चिकन माती असते. त्यावर सुबक व बारिक नक्षीकाम करता येते. तसेच वाळते लवकर, वाळल्यावर टणक असते. वाहतूक करता येते. तसेच मूर्त्यांना साच्यात बनवता येतात. त्यामुळे त्याचे व्यापारी उत्पादन करता येते. त्याच्या निर्मितीस फार कौशल्य लागत नाहीत. फार फार तर रंगरंगोटीसाठी कलाकार असणे गरजेचे असते. पण घी देखा लेकीन बडघा नही देखा अशी गमंत या पी. ओ. पी. ची असते.

तर या खालोखाल येतो शाडूचा गणपती… पी. ओ.पी. नको ना.. मग घ्या शाडूचा गणपती… हे म्हणजे दगडा पेक्षा विट मऊ या अर्थाने पी. ओ.पी. पेक्षा शाडू माती चांगली. पण शेवटी ती सुध्दा घातकच. ही माती दिसालयला भुरकट असते. या मातीचे वैशिष्ट म्हणजे ही पण फार मऊसूत असते. तिलाही बर्यापैकी नक्षीकाम करता येते. पण साच्यात बसवता येत नाही. याला हातानेच बनवावे लागते. वाळायला वेळ लागतो. व्यापारी उत्पादन करता येत नाही. पाण्यात लगेच विरघळते. पण ही शाडूची मातीसुध्दा माती व पाण्याच्या आरोग्यासाठी घातकच आहे. ही माती बाहेरच्या राज्यातून येते. खरी शाडू माती म्हणजे नदी पात्रात साचलेला गाळ, त्यापासूनही फार सुंदर मूर्ती बनत असते. पण आता गाळ कुठे सापडतो. त्यात काचेचे, प्लास्टिकचे तुकडे. बरच काही असतात आता ति औषधालाही मिळणार नाही. पण मागणी आहे ना मग करा पुरवठा कुणाला काय कळतयं मग यालाच शाडूची माती म्हणू लागते. मला तर शंका आहे. ही विविध रसायनं, माती मिसळून तयार केली जात असावी. नाहीतर एवढा पुरवठा होतो कसा…  तर ही शाडूची माती पाण्यात विशेषतः नदी पात्रातील झर्यांच्या तोंडावर जावून बसली तर झरे बंद होतात. एवढी ती घट्ट, चिकट असते. तर  वाळल्यानंतर टणक असते. शाडूची माती ही बागेत टाकली तर ति इतर मातीत मिसळत नाही. तिच्यात बिज रूजत नाही. फार चिकट असते. तसेच वाळली तर टणक गोळे तयार होतात. व ओलीच राहिली तर चिकट राहते. खुरपी करतांना ति विळ्याला चिकटते. थोडक्यात शाडू माती पर्यावऱण पूरक नाही हे लक्षात घ्या.

या पेक्षा लालमातीचा, काळ्या मातीचा, देशी किंवा गिरगाईच्या गोमय अर्थात शेण मातीचा गणपती बनवणे हे कधीही चांगले. वरील पी. ओ.पी. व शाडू मातीसारखा कोणताही दोष नसतो. ही माती आपल्या बागेत सहजतेने वापरू शकतो. तसेच यावर नैसर्गिक रंग ही छान बसतात. माती विरघळते. ति माती इतर झाडांना पोषक ठरते.

तर मग ठरवा तुम्ही पुढील वर्षी कशाचा गणपती बनवणार…

Exit mobile version