Site icon Grow Organic

लेखः २/३९ गच्चीवरची बाग G2G, (V:2, E:1) पुस्तक

फुलांची, फळझाडांची, भाजीपाल्याची बाग फुलवायची म्हणजे बागेसाठी प्रामुख्याने लाल माती, कोकोपीट, गांडूळ व इतर खते, तयार रोपे, बी- बियाणे आणणे, याशिवाय पर्याय नाही, असे आपण मानतो. पण यांना खूप सारे पर्याय आहेत व ते सहज साध्य आहेत.

Advertisements

सदर लेख लोकसत्ता- चतुरंग पुरवणीत प्रकाशीत झाला आहे. जवळपास ३९ लेखांची लेखमाला प्रकाशीत झाली आहे. बाग प्रेमीसाठी सादर करत आहे.

२)गच्चीवरची बाग – उपलब्ध जागा आणि वस्तू …

उपलब्ध जागाः कुंडीतील बाग फुलवण्यासाठी उपलब्ध जागा व वस्तू कोणत्या तर आपण राहतो त्या ठिकाणी जी जागा उपलब्ध असेल ती. उदा गच्ची, बाल्कनी, खिडकी, इमारतीतीलमधील जिना, फ्लॅटच्या दाराबाहेरील छोटासा कोपरा किंवा घर-बंगला-अपार्टमेंट, शाळा, कंपनीच्या परिसरातील कोणतीही उपलब्ध जागा.

उपलब्ध वस्तूः आता उपलब्ध वस्तू म्हणजे काय तर बाजारात प्लॅस्टिक, माती, सिमेंटच्या विविध आकाराच्या, रंगीबेरंगी कुंडय़ा व प्लॅस्टिकच्या बॅगाही उपलब्ध असतात. प्रथम आपल्याला कुठे बाग फुलवायची याचे नीट नियोजन करावे.. जागेचा अधिकाधिक वापर कसा करता येईल याचा विचार करावा.. व त्याप्रमाणे कुंडय़ाचे प्रकार, त्यातील सहज हाताळता येतील, अशा कुंडय़ाची किंवा पिशव्याची निवड करावी.

हा झाला एक सरळधोपट पण खर्चीक मार्ग.. आपल्याला आत्ताच यावर खर्च नाही करायचा, असे ठरवले असेल तर तसेही अनेक वस्तूंत बाग उत्तमरीत्या फुलवता येते.. दुधाची पिशवी, वेताचे करंडे, टोपल्या, तुटलेले टब, गळक्या बादल्या, माठ, प्लॅस्टिकचे उभे आडवे काप केलेले ड्रम, सिमेंटच्या गोण्या, विटांचे वाफे किंवा टाकाऊ बॅनर.. अगदी तुटलेल्या बेसिनपासून ते बुटापर्यंत व पाण्याच्या बाटलीपासून तर पाणी शुद्ध करणाऱ्या एखाद्या निकामी प्युरिफायपर्यंत.. कापडाच्या पिशवीपासून तर तेलाच्या डब्यापर्यंत.. अगदी केळीच्या कापलेल्या खांबापासून तर प्लॅस्टिकच्या तीन इंच पाइपापर्यंत.. व लाकडाच्या खोक्यापासून तर पृष्ठय़ापर्यंत.. म्हणूनच उपलब्ध जे जे.. ते ते आपले.

 फुलांची, फळझाडांची, भाजीपाल्याची बाग फुलवायची म्हणजे बागेसाठी प्रामुख्याने लाल माती, कोकोपीट, गांडूळ व इतर खते, तयार रोपे, बी- बियाणे आणणे, याशिवाय पर्याय नाही, असे आपण मानतो. पण यांना खूप सारे पर्याय आहेत व ते सहज साध्य आहेत.

गच्चीवरची बाग,  संदीप चव्हाण, नाशिक.

आपल्याला लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.. आमच्या पर्यावरण कार्याचा, नावाचा उल्लेख करावा. ही विनंती… 

व्हिडिओ पहाः Organic Terrace Farming by Sandip Chavhan, Nasik, Maharashtra

============================================================================

टीपः १) सदर लेख लोकसत्ता- चतुरंग पुरवणीत पूर्व प्रकाशीत झाला आहे.  जवळपास ४० लेखांची लेखमाला प्रकाशीत झाली आहे. सदर लेखमालेचे पुस्तक रूपात (Version 2, Edition 1) प्रकाशीत करणेकामी सर्वप्रकारचे प्रकाशन संस्कार पूर्ण झाले आहेत. पंरतू पैशाअभावी पुस्तक प्रकाशीत करणे अडचणीचे आहे. पर्यावरण हेतूसाठी काही आर्थिक मदत करू इच्छित असल्यास आपले स्वागत आहे.  आपले नाव आर्थिकमदत म्हणून पुस्तकात प्रकाशीत केले जाईल.. (आमची कोणतीही संस्था नाही. हे व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवर पर्यावरण संवर्धनाचे काम चालू आहे)

२) सद्य स्थितीत गच्चीवरची बाग (Version-1, Edition 2)- व्दितीय आवृत्ती हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. लोकसत्ता -चुंतुरंग पुरवणीत प्रकाशीत केलेले लेख हे ग.बा. २०१३ आवृत्तीपेक्षा वेगळया स्वरूपाची मांडणी केली आहे.  (सदर लेख  मालिका पुस्तक स्वरूपात – रंगीत आवृत्ती प्रकाशीत करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. आपण अर्थ सहाय्य केल्यास पुस्तिका इतरांपर्यंत पोहचवण्यास नक्कीच मदत होईल. आपले योगदान सन्मानपूर्वक पुस्तकाच्या प्रथम पानावर प्रकाशीत केले जाईल, आपले छोटेसे योगदान ही आमच्यासाठी बहूमुल्य असणार आहे)  

गच्चीवरची बाग,  संदीप चव्हाण, नाशिक.

http://www.gacchivarchibaug.in

Email: sandeepkchavan79@gmail.com

Exit mobile version