वाचाल तर वाचाल असं कुणीतरी म्हटलच आहे. माणूस हा प्राणी दोन गोष्टींनी समृध्द होतो त्यातील एक म्हणजे अनुभव व दुसरे म्हणजे वाचन… अनुभवात अनेक प्रयोग असतात. निष्कर्षांची वाट पहावी लागते. त्याला तर्काची जोडी द्यावी लागते. मिळालेल्या ज्ञानाचे शहाणपणात रूपांतर करावे लागते. तेव्हां कुठे समृध्द होता येते. दुसरे असते वाचन… चित्र-नाटक -चित्रपट का पहावा तर त्याचे मुख्य गोष्ट आहे त्यात एक आयुष्य सामावलेले असते. एका आयुष्याची गोष्ट तुम्हाला त्यातून अनुभवता येते. तसेच वाचन.. वाचनात सुध्दा एक आयुष्य, जिवन सामावलेले असते. त्यात अनुभव असतात. ते व्यक्तिसापेक्ष, कालानुरूप असले तरी त्यातून आपण जे अभ्यासतो ते लेखकाच्या अनुभवाच्या एका टप्प्यावर आपण पोहचतो व त्यातून नव्याने सुरवातही ही दुसर्या टप्यापासून आपल्याला करता येते. तर वाचन हे फार महत्वाचे आहे.
वाचनाचा हा मुख्य भाग लक्षात घेवूनच आम्ही एक विशेष ग्रंथालय सुरवात करत आहोत. ते म्हणजे गच्चीवरची बागेला अनुरूप अशी कृषी ग्रंथालय. काही पुस्तके विकत घेतली आहेत. काही पुस्तके दानात मिळाली आहेत. ( तुमच्याकडेही काही पुस्तके असतील तर आमच्या पत्त्यावर पाठवू शकता किंवा पुस्तके सुचवू शकता अथवा ते खरेदी करण्यासाठी आम्हाला आर्थिक मदत करू शकता.) ही छोटीशी १०० पुस्तकांची लायब्ररी आहे.
आमच्या कडे येण्याचे अनेक कारणे आहेत जसे की बागे संर्दभातले निशुल्क मार्गदर्शन, भाजीपाला व खत निर्मिती संदर्भातले उत्पादने.., चुलीवरची मिसळ, सुला वाईन्स, बॅकव्हाटर, बालाजी मंदीर, सोमेश्वर मंदीर, धबधबा, इ. विकएंड पॉईन्टसला कधी आलात तर आमच्याकडे येणं सोप्प आहे. आता आणखी एक कारण आमच्या कडे येण्याचे ! कृषी संदर्भातील पुस्तकांचे ग्रंथालय.
हे सुरू करण्याचे कारण म्हणजे आमच्याकडे बागेसंदर्भात प्रश्न घेवून अनेक जण येतात. आमच्या गच्चीवरची बाग एकस्टेशन (वर्कशॉप) ला अनेक जण भेटी देतात. ५२ प्रकारची उत्पादने आहेत. ते खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांना उपयोगी पडेल असे लेखन साहित्य आम्ही द्यावे हे असा विचार बर्याच दिवसापासून होता.
तसेच आम्ही बागे संदर्भात काही साहित्य घरपोहोच देत असतो. त्यामुळे हे ग्रंथालय आपल्याला आजपासून घरपोहोच इच्छित पुस्तक देणार आहोत. ही पुस्तकांचे ग्रंथालयाचा आपणही उपयोग करून घ्यावा हा त्यामागचा उद्देश आहे.
तुम्ही प्रकाशीत केलेली कृषी आधारित पुस्तिके, मासिके आम्ही विक्री करू. विक्रीसाठी असलेल्या पुस्तकांची माहीती आमच्या संकेत स्थळावर प्रकाशित केली जाईल. त्यासाठीही आपण आमच्याशी संपर्क करू शकता.
याची मासिक रक्कम ही 150रु असून त्याची अनामत रक्कम ही 1000 रू आकारण्यात आली आहे. कारण सर्वात महागडे पुस्तक वा दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह आम्ही करत आहोत.
http://www.gacchivarchibaug.in
पुस्तकांची यादी सोबत दिलीच आहेच.
You must be logged in to post a comment.