इंस्टट पॅकिंग फूड ( Instant Food) मधील रसायानांबद्दल बोलणार आहोत.. आज पाणीपुरीच्या दुकानापासून ते मिठाईच काय अगदी जगप्रसिध्द च्याऊ म्याऊ बनवणार्यापर्यंत तर अगदी अमृततूल्य बनणार्या पेय व शितपेयांपर्यंत सर्वच जण रसायनांचा (Chemical essence) वापर करत आहेत. (खरं तर चहाची पाने सुध्दा रसायनं टाकून वाढवली जातात) या रसायंन कृत्रीम चव, त्याचा दिर्घाआयुष्य (Preservative) वाढवण्यासंर्दभात असतात. कशात रसायनं नाहीत हे सांगा…खरं तर सारेच जण slow poisoning चे बळी पडत आहोत.
importance of home grow vegies
बाजारातील रासायनिक (Chemical) भाज्यांचं करायचं काय ?
तुमच्या आमच्या आवडीची बाग गच्चीवरची
अर्थात रसायन मुक्त भाजीपाल्याची!
नमस्कार मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक,
गच्चीवरची बाग नाशिक ही पर्यावरणीय उद्मशीलता (environmental entrepreneur) असून आम्ही मागील २२ वर्षापासून विषमुक्त (chemical Free) भाजीपाला पिकवण्यासंदर्भात काम करत आहोत. भाज्या कसल्या औषधंच (Medicinal Herbs) म्हणा हवं तर… आज प्रत्येक पदार्थात रसायनांचा (Chemical) वापर होत आहे. मग ते जनावरांना असो की माणूस प्राण्यांसाठी). अगदी शेतात (Farming) पिकणार्या भाज्यांपासून तर अगदी इंस्टट पॅकिंग फूड (Instant Food , Fast Food) थोडक्यात agriculture industry पासून ते Food industry पर्यंत सर्रास वापर होतोय. भाज्यांचा नैसर्गिक वाढीचा (Natural Growth) कालावधी कमी केला गेलाय. तर कुठे रसायनांचा (chemical) वापर करून खाल्या जाणार्या पदार्थांचे नैसर्गिक आयुष्यमान वाढवले गेले. काय तर एवढ्या मोठ्या जनतेला भाजीपाला, अन्न मिळावे (food Security) म्हणून, पण तुम्ही पाहत आहात की, ना पिकवणार्याला (Farmers) योग्य तो दाम मिळत, ना विकत घेणार्याला (buyers) त्याचा चवीचा, (Taste) पोषणाचा मोबदला… मग अशा बाजारातल्या भाज्यांना काय आग लावायची का? आग सोडाच पण सडवून सुध्दा खत (Home fertilizer) तयार होत नाही. असो…
ब्रॅडेंड मसाले वापरूनही घरची अन्नपूर्णा (House Wife) जर भाजीला चव नाही असं ऐकून घेत असेन तर तो तिचा दोष ( Guilt) नाही की, तिच्या आई बाबांनी स्वयंपाक (Cooking Skill) करायला शिकवलं नाही, असं नाही.. खरी मेख
रसायनं टाकून उगवलेला भाजीपाला (Chemical Farming) ही खरी गोची आहे.. पण या मुळांपर्यंत (Roots Problem) फार कमी लोक जातात. आणि त्यातले तूम्ही एक आहात, जे हा विषय मुळापासून समजून घेण्याचा विचार करत आहोत. म्हणूनच तर हा लेख वाचत आहात. असो… हे झाले भाज्यां संदर्भात,, भाजीचं रासायनिक पुराण फार मोठ आहे…
तर इंस्टट पॅकिंग फूड ( Instant Food) मधील रसायानांबद्दल बोलणार आहोत.. आज पाणीपुरीच्या दुकानापासून ते मिठाईच काय अगदी जगप्रसिध्द च्याऊ म्याऊ बनवणार्यापर्यंत तर अगदी अमृततूल्य बनणार्या पेय व शितपेयांपर्यंत सर्वच जण रसायनांचा (Chemical essence) वापर करत आहेत. (खरं तर चहाची पाने सुध्दा रसायनं टाकून वाढवली जातात) या रसायंन कृत्रीम चव, त्याचा दिर्घाआयुष्य (Preservative) वाढवण्यासंर्दभात असतात. कशात रसायनं नाहीत हे सांगा…खरं तर सारेच जण slow poisoning चे बळी पडत आहोत. तर अशी पदार्थ आपण जेव्हां खातो. अशी कोणकोणती पदार्थ सकाळी पासून अगदी चघळण्यापासून ते पोट भरण्यापर्यंत खातोय.. त्याची जरा यादी (monthly bucket List) करा… तुम्ही बाहेरची (Out Dore Food) पदार्थच नव्हे वेगवेगळी रसायनं खात आहात. तेव्हां या पदार्थात वापरलेले रासायनिक रंग, चव, त्यातील रसायनं हे जेव्हां पोटात जातात, त्याचे पचनास (Digestion) जेव्हां सुरूवात होत असेन तेव्हां त्यातून कोणता केमिकल लोचा होत असेन याचा कधी विचार केलाय… नाही… खरं तर विचार करायला लागलात तर खायचं काय हा बेसिक प्रश्न तुम्हाला पडेल. त्यामुळे काही मंडळी याचा विचार न केलेलाच बरा…असं म्हणतील. (म्हणजे प्रश्न तसाच सोडून दिला तर तो सुटेल की गुंता वाढवेल … ?) असो विचार करायचा कि नाही, किती खोलवर करायचा हे वैयक्तिक स्वांतत्र्य आहे. त्यावर मला गदा आणायची नाही असो..
तर पोटात जाणार्या या वेगवेगळ्या रसायनांची लक्षणं (Symptoms) साधी व सोपी आहेत. अनिद्रा, (Insomnia) अनामिक भिती, feeling unnecessary fears कसलंतरी भय, चिंता,(anxiety) चिडचिडेपणा, छोटे छोटे निर्णय घेण्यात चालढकल (Decision making) किंवा अगदीच दुर्लेक्ष, विसराळू पणा, विस्मरण अशी अनेक गोष्टी दिसून येतात.
या सर्वाचा आपल्या दैनदिन जिवनावर (Daily routines) कार्यक्षमतेवर (अगदी सकाळच्या मॉर्निंग वॉक पासून तर रात्री बेडवर निंवात झोपेपर्यंत) परिणाम करत आहेत. तो स्वतःवरही होत आहेच पण कुटुंबावरही होत आहे.त्यामुळे अशी पदार्थ टाळा, आता तर नुसंत घरी बनवलेलं खाऊन चालणार
नाही तर घरी पिकवून घरीच बनवलेलं खाणं गरजेचं आहे.. निवड तुम्हाला करायचीय.
आम्ही तर मागील २२ वर्षापूर्वीच सुरूवात केलीय.. आम्ही Grow, Guide, Build, Products, Sales N services या पाच सुंत्राव्दारे काम करत आहोत. भाजीपाला उत्पादन सहज सोपे व्हावे म्हणून आम्ही पाच प्रकारचे (Top Five products) तयार केले आहेत.
धन्यवाद आपण गच्चीवरची बागे व्दारे तयार केलेल्या दोन ही Intro ला यूट्यूब चॅनेलवर like केल्यामुळे आम्ही तयार केलेल्या Intro ला Filmora Film Contest मधे Entry मिळाली आहे. आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे या स्पर्धेचा पुढचा टप्पा सुरू झाला आहे.
Filmora या video Editing कंपनीच्या आव्हानानुसार गच्चीवरची बागेने Home Grow Vegetable Services- गच्चीवरची बाग या You Tube channel चा ५ सेंकदाचे दोन Intro तयार केले आहेत.
त्यास आता Entry Pass मिळाला असून हा व्हिडीओ त्यांच्या संकेतस्थळावर झळकू लागला आहे.
सोबत दिलेल्या लिंक वर जावून आपण तो पाहू शकता. पण त्यास जास्तीत जास्त Like मिळाल्यास कदाचित १ ते ३ क्रमांकाचे पारितोषीक मिळू शकते.
पण हे आपल्या सहकार्याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे आपण या दुव्यावर जावून आपल्या व्हिडीओ ला लाईक व शेअर केल्यास लाईक्सच्या जोरावर आपण ही स्पर्धा जिकूं शकतो.
गच्चीवर रताळी लागवड करणे सहज सोपे आहे. आरोग्यदाय़ी, भूक शमवणारे, तंतूमय पदार्थात उच्च स्थान असलेले तसेच जमीनीची उत्पादन क्षमता वाढणारी वनस्पती आपल्या प्रत्येकाच्या गच्चीवर असलीच पाहिजे. रताळी सेवनाचे फायदे, त्याची लागवड व काळजी विषयी…
कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी गच्चीवरची बागे तर्फे विक्री होणार्या उत्पादने ही उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Lockdown : 2 Bumper offer
कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी गच्चीवरची बागे तर्फे विक्री होणार्या उत्पादने ही उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्पदनांचे मुळ विक्री किमत व आताची कमी केलेली रक्कम यांची यादी खालील प्रमाणे
(सदर उत्पादनातील काही उत्पादने ही डिजिटल स्वरूपात आहेत. तर पुस्तके, ग्रो बॅग्जस, बियाणे ही ही बाय पोस्ट ने पाठवली जातील. बाकीची उत्पादने ही आपल्याला गच्चीवरची बाग एक्सटेंशन येथून आपल्याला घेवून जावे लागतील, कारण कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आम्हाला आमची उत्पादने १५ मे पर्यंत घरपोहोच पोहचवता येणार नाहीत)
Bishcom ( Potting Mix) 15 Kg – Offer Price 10 Kg
गच्चीवरची बाग छापिल पुस्तक (पोस्ट खर्चा सहित 240/-) – offer Price 140/-
तुम्हाला माहित आहे का ? छापिल पुस्तक (पोस्ट खर्चा सहित 240/-) – offer Price 140/-
डॉ. बगीचा (पी.डी.एफ) 150/- Offer Price 99/-
तुम्हाला माहित आहे का ? ( पी.डी.एफ) 150/- Offer Price 99/-
जिवामृत, गोमुत्र, ह्युमिक जल, फ्रुट इंजाईम 21 रू. प्रति लिटर – Offer Price 11/- प्रति लिटर.
दशपर्णी 25 रू. लिटर Offer Price 15 रू. लिटर.
ग्रो बॅग्जस 16/- प्रति नग
भाजीपाला बियाणे 11 रू.
निमपेंड 51 रू किलो.
तंबाखू पावडर 51 रू. किलो.
लाल माती सिमेंट गोणी भरून 120 रू. Offer Price 100/-
टीपः वरील साहित्य आपल्याला हवे असल्यास पण आता घेवून जाणे शक्य नसल्यास तर तुम्ही साहित्याची यादी प्रमाणे आगाऊ पेमेंट करता येईल. त्याची तुम्हाला पावतीपण देण्यात येईल. तुमच्या सवडीने ते केव्हांही घेवून जाता येईल.
घरपोहोच पोहचवणे शक्य झाल्यास पूर्वीचीच किंमत + डिलेव्हरी चार्जेस आकारले जातील
Online स्वरूपात तुमच्या कुंटुबासाठी गच्चीवरची बाग ही कार्यशाळा आयोजीत करता येईल. त्याची 2500/- ऐवजी 1500 रू. फी असेन. (एक तास)
वरील उत्पादने नाशिक अथवा नाशिक बाहेरील व्यक्तिनां व्यवसायीक स्वरूपात विक्रि करावयास दयावयाची आहेत. त्यांनी कृपया संपर्क साधावा. इच्छुकांना केवळ वस्तूची विक्री केली तरी चालणार आहेत. वस्तूच्या वापरा विषयी अथवा ग्राहकांच्या समाधानासाठी आमच्याकडून सेंट्रल सपोर्ट केला जाईल.
आमच्या समोर उभ्या असलेल्या आर्थिक आव्हानांसाठी व तुमच्या सकारात्मक प्रतिसादासाठी वाचा
कचरा व्यवस्थापन, पर्यावऱण, आरोग्य, लोकसहभाग, भाजीपाल्याची बाग, निसर्ग अशा विविध विषयावर “घंटो का ग्यान मिनंटो में” थोडक्यात आपली डोळे उघडणारी ही वाक्ये तुम्हाला माहित आहे का या पुस्तिकेव्दारे देण्याचा प्रयत्न केला आहे.
कचरा व्यवस्थापन, पर्यावऱण, आरोग्य, लोकसहभाग, भाजीपाल्याची बाग, निसर्ग अशा विविध विषयावर “घंटो का ग्यान मिनंटो में” थोडक्यात आपली डोळे उघडणारी ही वाक्ये तुम्हाला माहित आहे का या पुस्तिकेव्दारे देण्याचा प्रयत्न केला आहे. काम करता करता चिंतनातून सुचणारी वाक्य सुरवातीला फेसबुकवर प्रकाशित करत गेलो. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या वाक्यांचे पुस्तक रूपात दिले आहे. छापिल मुळ पुस्तकाची किमंत 240 रू असून पी.डी.एफ स्वरूपात आपल्याला केवळ 99 रूपयात उपलब्ध करून दिली आहे.
आपल्या घरपरिसरात, बाल्कनीत, गच्चीवर भाजीपाल्याची बाग फुलवणे होय. यातून दोन गोष्टी साध्य होतात. एकतर ही प्राणवायू तयार करणारी Privet Oxygen Hub आहेत. ज्याचा आम्ही कोणत्याही वेळेस त्याचा उपयोग करू शकतो. दुसर असे की आपल्याला संसर्गमुक्त भाज्या व त्याही रसायनमुक्त मिळू शकतात. आजच्या कठीण परिस्थीतीने हे स्पष्ट केले की आपल्या कडे कितीही पैसा असला तरी सार काही विकत घेता येत नाही. त्यामुळे घरी भाज्या पिकवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. कोव्हीड-१९ या आजारापासून, वाचण्याचे प्रमाण अशाच लोकांमधे अधिक आहेत. ज्यांच्यामधे प्रतिकार शक्ती अधिक आहे. अर्थात वयोवृध्दांनासुध्दा योग्य आहार म्हणजे पोषक घटक असलेला, रसायनमुक्त आहार मिळाल्यास ते सुध्दा या विषाणूशी लढा देवू शकतात. आजच्या रासायनिक कृषी पध्दतीत आपल्याला कमी कालावधीत तयार झालेला पोषक घटकांचा अभाव असलेले अन्न सेवन करत आहोत. त्यामुळे त्यातून प्रतिकार शक्ती वाढत नाही. त्यामुळे आपण घरीच पिकवलेल्या भाज्या खाल्या तर नक्कीच त्याचा फायदा होईल. या विषयी माहिती, मार्गदर्शन करणारी पुस्तिका आपल्यासाठी निशुल्क उपलब्ध आहे.
तुम्हाला भाज्या उगवण्यासाठी फार मोठी गोष्ट करायाची गरज नाही. सुरवातीपासून सारे प्रयोग तुम्हाला करायची गरज नाही. आम्ही हे सारे प्रयोग मागील २० वर्षात करून झाले आहेत. तुम्ही आमच्या खांद्यावर (अनुभवांचा उपयोग करून) पाय ठेवून पुढे जावू शकता. भाज्या उगवण्याचे ज्ञान व विज्ञान आमच्याकडून एकदा समजून घेतले तर तुम्हाला हा खडतर वाटणारा प्रवास सोपा व सहज, आनंददायी ठरेन. फक्त आम्हाला संपर्क करा. तुम्हाला सहजतेने उगवता येतील अशी काही उत्पादने तयार केली आहे. अगदी दोन मिनिटात मॅगी बनवण्यासारखी…
घरी भाज्या पिकवणे हे खरचं परवडते का ?
विषमुक्त भाजीपाला घरी पिकवणे हे आर्थिक दृष्टया परवडत नाही.. खरयं आहे हे … आर्थिक दृष्ट्या हे महागडेच जाते.. पण आपण असा विचार करून एकतर या विषयात हात घालत नाही. नि बाजारातील विषारी फरावणी असलेल्या, बेचव नि कोणतही सत्व नसलेल्या भाज्या आपण सेवण करतो नि भविष्यातील आजारांना आपण आमंत्रित करतो. पण हा निर्णय सार्या कुटुंबालाच घातक ठरतो.
आम्ही नेहमी सांगतो की चार चाकी गाडी घेणे परवडते का? बारकाईने विचार केला तर नाही परवडत. एकतर त्यात लाखाची गुंतवणूक करा, तिचे देखभालीचा खर्च, सरकारी कर नि सर्वात शेवटी तिला लागणारे इंधन.. याचे निट गणीत मांडले तर रोज स्पेशल केलेली रिक्षा अथवा ओला उबेर नक्की परवडेल. यात शंकाच नाही.
तरी आपण गाडी का खरेदी करतो. एकतर आपण करत असलेला प्रवास हा सुरक्षित असणे गरजेचे आहे. (आता कोरोना काळात तर हे अधिकच महत्वाचे झाले आहे) हव्या त्या वेळेत आपण हवे तेथे प्रवास करू शकतो. थांबू शकतो व सर्वात महत्वाचे मह्णजे आपला सोन्यासारखा वेळ वाचतो. कुणावर विसबून राहण्याची गरजच पडत नाही.
आम्ही गच्चीवरची बाग व्दारे एरो ब्रिक्स बेड तयार करून दिला जातो. निसंशय त्याची गुंतवणूक आपल्याला महाग वाटेल. पण ती एकदम करतो म्हणून महाग वाटते. खर तर या बेडचा खर्च हा तिमाहीत दोन वर्षासाठी विभागला तर हा खर्च बाजारातील भाजीईतकाच येतो. व तेही विषमुक्त भाज्या. शिवाय निसर्गाचा सहवास व आता धावपळीच्या युगात ताण तणाव कमी करणारा आनंद.
खरं पाहिल तर बाजारातील भाजी हे उदाः दहा रू किलो भेटते. पण ति भाजी खरंच दहा रूपये किमत असू शकते का ? तर नाही. भाज्या उत्पादन करणारी उत्पादक मंडळी म्हणजे शेतकर्यात स्पर्धा असते. भाजी हा नाशंवत माल असल्यामुळे तो वेळेत विकणे हे फार गरजचे आहे. नाही तर मुद्दलही निघत नाही. हे त्यांचे एकप्रकारे समाजाने केलेले शोषणच म्हटले पाहिजे. तसेच कमी वेळात भाजीपाला उगवेनही पण त्यासाठी निसर्गाने फार मोठी किमंत रसायनाच्या वापरामुले मोजलेली असते. ति गृहीत धरतच नाही. असो.
आम्ही असे म्हणतो की आम्ही भाज्या नाही उगवत, आम्ही औषधं उगवतो. मला एक सांगा आपण दवाखान्यात डॉ. फी असेन, मेडीकल वरील औषधे असतील तेथे घासाघिस करतो का… एकादे औषध परवडत नाही म्हणून विकत घेतच नाही. असे होत नाही. ते असेल त्या किमतीत विकत घ्यावेच लागते. मग आपले अन्न हे जर औषध आहे तर मग त्याच्या सेवनात आपण एवढी तरतूद का करतो. त्यामुळे विषमुक्त भाज्या उगवणे हे फार गरजेचे आहे. जो आपला भविष्यातील आजारपणांचा खर्च वाचवतो.
आपल्याला चार चाकी गाडी परवडत नसली तरी तिच्या छुप्या फायंद्याचा विचार करता ति विकत घेणेच हेच फार महत्वाचे आहे. तसेच गच्चीवरची बाग व्दारे जे एरो ब्रिक्स बेड तयार केले जातात त्याचे डोळ्यांना दिसेन, बोटावर मोजता येतील असे फायंदे फार कमी आहेत. पण छुपे फायंद्याचा विचार करता ते परवडणारेच आहे.
आता अमूक खर्चात भरपूर व पैसे वसूल भाज्या उत्पादन होतील का हा नेहमीचा प्रश्न असतो. तर हे त्या त्या ठिकाणच्या वातावरण, तेथील तापमान, आपण दिलेला वेळ व आपण किती लवकर शिकता या कौशल्यावर अवलंबून असतो. कंपनी सुध्दा नेहमी गाडीचा अव्हरेज हा आयडिल परिस्थीतीवर अवलंबून आहे असे सांगतो. खड्डेमय रस्ता असेन तर आपली कितीही सोन्याची ब्रॅंडेड गाडी असो तिचा अव्हेरेज हा कमी होणारच शिवाय देखभालीचा खर्च हा वाढणारच असो…
तर आम्ही एरोब्रिक्स बेड हे आपल्याकडे उपलब्ध जागे नुसार तयार करून देतो. थोडक्यात प्रत्येक ठिकाणचा बेड हा गाडी कस्टमाईज करावी तसे करून देतो. त्यात इंधन अर्थात खते देणे, त्याची देखभाल अर्थात त्यात किड नियंत्रण करणे इं कामे खर्च येतोच. शिवाय आपण स्वतःहून काम करत असाल तर त्यात मजूरी ही येतेच. पण यात आनंद असतो. नि हा आनंद म्हणजे शेती करण्याचा आनंद हा पैशात मोजता येत नाही…
शिवाय बागेसाठी लागणारी खते, औषधे हे दरवेळेस विकत आणलेच पाहिजे असे नाही. ते तुम्ही घरी सुध्दा तयार करू शकतात. म्हणजे सारासार असा की आपल्याला इच्छा असेल तर आपण सहजेतेने( सुरवातीला आमची मदत) घेवून घरच्या घरी भाज्या परवडणार्या भाज्या पिकवू शकतो.
एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. घरी भाज्या उगवणे हे जीवन कौशल्य आहे. जे आपल्या प्रत्येकाला शिवावेच लागणार आहे. कोरोनाची साथीचा काळ ही एक संधी आहे. हाताशी वेळ आहे. त्यामुळे हे कौशल्य शिकून जीवनभर त्याची अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. शिवाय साथ गेली तरी वाढता शहरीकरणाची गती पाहता, जीवनशैली पहाता आपल्याला हे जीवन कौशल्य कधी ना कधी आत्मसात करावे लागणारच आहे.
तुम्हाला भाज्या उगवण्यासाठी फार मोठी गोष्ट करायाची गरज नाही. सुरवातीपासून सारे प्रयोग तुम्हाला करायची गरज नाही. आम्ही हे सारे प्रयोग मागील २० वर्षात करून झाले आहेत. तुम्ही आमच्या खांद्यावर (अनुभवांचा उपयोग करून) पाय ठेवून पुढे जावू शकता. भाज्या उगवण्याचे ज्ञान व विज्ञान आमच्याकडून एकदा समजून घेतले तर तुम्हाला हा खडतर वाटणारा प्रवास सोपा व सहज, आनंददायी ठरेन. फक्त आम्हाला संपर्क करा. तुम्हाला सहजतेने उगवता येतील अशी काही उत्पादने तयार केली आहे. अगदी दोन मिनिटात मॅगी बनवण्यासारखी…
शेती म्हणजे निसर्गाची सोबत असते. जी आपल्याला सर्वार्थाने समृध्द करत असते. शेती नसली म्हणून काय झालं? शहरात राहूनही आपल्याला उपलब्ध जागेत शेती करता येते. त्यात विषमुक्त भाज्या उगवता येतात. योग्य मार्गदर्शन लाभले तर शेतीचा आनंद घेता येतो. मानवासाठीच अन्न सुरक्षा म्हणून न पहाता त्यात पर्यावरण जपणे, जैवविवधतेला वाव देणं हा फार गरजेचे आहे. जागतिक चिमणी संवर्धनाच्या दिवसानिमित्त देशपांडे कुटुंबाने पर्यावरण जपण्यासाठी केलेला हा प्रयत्न आपल्यालाही आवडेल.
अक्षय तृतीया हा सण आता जवळ येतोय. शेतातली सारी पिके काढून होतात. हातात वेळ असतो. पण जागृत शेतकरी हा पावसाळाची तयार करीत असतात. या दिवसांमधे बियाणे आणून ठेवणं, नागरंटी करून माती वाळवून ठेवणं. खताची उपलब्धता तयार करून ठेवणं ही सारी शेतातली कामे आहेत. त्याच प्रमाणे शहरातील बागप्रेमीनीही खर्या अर्थाने पावसाळा पूर्वी कामास लागावयास हवे.
बरीच मंडळी ही देखल्या देवाला दंडवत घालणारी असतात. म्हणजे आता पाऊस सुरू झाला की त्याना हुरूप येतो. सर आम्हालाही गच्चीवर भाजीपाल्याची बाग फुलवायची आहे. कधी येतात बोला? पावसाळयात संदीप चव्हाण सर अंत्यत व्यस्त असतात. मग आपली बाग फुलवायची राहायची ती राहूनच जाते. तर बागेला सुरवात ही उन्हाळ्यातच करा… कारण उन्हाळ्यात सर्वत्र पानगळ झालेली असते. पालापाचोळा प्रचंड प्रमाणात सहज उपलब्ध असतो. गच्चीवर अथवा जमिनीवर काही पूर्वतयारी करायला वेळ हाताशी असतो.
आता ज्यांच्याकडे गच्चीवर भाजीपाल्याची एरोब्रिक्स पध्दतीने बाग फुलवली आहे किंवा काही कुंड्या, ग्रो बॅग्जसमधे बाग फुलवली आहे. त्यांनीही उन्हाळातच पावसाळ्याची तयारी केली पाहिजे. तुम्ही डेव्हिल डायजेस्टर या ऑल इन वन कंपोस्टर मधे खत तयार केले असेल तर ते काढून घ्या. खताला थोडे सावलीत वाळू द्या. पुन्हा हा डेव्हिल डायजेस्टर वर्षभराचा कचरा जिरवायला तयार करा..
कुंड्या, ग्रो बॅग्जस मधील माती वाळवून घ्या.. एरोब्रिक्स बेड मधील काही माती वाळवता आली तरी उत्तम… माती सातत्याने ओलीताखाली राहणे म्हणजे किडीना निमंत्रण. विशेषतः हयुमनी अळीच प्रादुर्भाव होतो. तो कमी करायचा असेन तर माती वाळवणे हे फार गरजेचं आहे.
तर उन्हाळ्यातच आपल्याला पावसाळ्यात वाढणारी वेलवर्गीय बियाणांची रोप तयार करणे गरजेचं आहे.
कारण मकर संक्रतीला माता भगिनींनी वाणाचं देवाण घेवाण झालेल असतं. अक्षय तृतीयाला वेलवर्गीय बियाणं लावण्याची परपंरा आहे. याचे कारण ही वातावरणाच्या सुसंगत आहे. कारण पावसाळ्यात उब नसल्यामुळे नव्याने बियाणं रूजवलेल्या बियाणासं उगवून येण्यास उशीर लागतो. कधी कधी अधिकचा पावसामुळे बियाणं सडतात. त्यामुळे अक्षय तृतीयाच्या गरम वातावरणातच बियाणं पिशव्यामधे रूजवून त्याची रोपे तयार करावीत. पावसाळा आला की त्या पिशव्या सहित एरोब्रिक्स बेडवर ठेवून द्याव्यात म्हणजे त्यांची वाढ भराभर होते. पिशवीत लावलेल्या बियांना मे व जूनच्या मध्यापर्यंत ही रोपे दोन किंवा चार पाने घेवूनच वाढतात. हे बियाणं खराब असावं अशी शंका येते. पण खरं तर ते सुध्दा पावसाळ्यात सुसाट वाढण्यासाठी सुप्त तयारी करत असतात. पावसाळ्यात वेलवर्गीय तयार रोपांना मातीत अथवा एरोब्रिक्स व्हेजेटेबल बेड मधे लागवड केले की त्यांची वाढ झपाट्याने वाढतात व महिनाभरा त्यास फळे लागण्यास सुरवात होते.
महत्वाचे म्हणजे पिशवीत उगवलेले बियाणं पिशवीत सहित एरोब्रिक्स बेडवर ठेवल्यास अधिकच्या पावसामुळे मातीतील ओलावा मुळांना लागत नाही त्यामुळे वेलांचे खोड हे कुजण्यापासून रोखले जातात.
दुधी भोपळा, कारले, गिलके (घोसाळे), वाल, डांगर, दोडके यांची बियाणं छोट्या नर्सरी बॅग्ज मधे रूजवून ठेवा. त्याचा नक्कीच फायदा होईल.
आपल्या वेलवर्गीय बि बियाणं रूजवण्यासाठी बियाणं, काळ्या रंगाच्या नर्सरी बॅग्जस मिळतील.
आपल्याला लेख आवडला असेल तर नक्की प्रतिक्रिया नोंदवा. प्रयोग करा. व आम्हाला कळवा.
गच्चीवर बाग बनवतांना वाफे पध्दत ही सर्वात फायदेशीर व परवडणारी पध्दत आहे. यात वाफेची उंची नऊ इंच असली तरी त्यात संपूर्णतः माती व खत भरले जात नाही. यात जवळपास नव्वद टक्के पानझड झालेला, वाळलेला पालापाचोळाचा थर दिला जातो व दहा टक्के माती वापरली जाते. सुरवातीला २० टक्के माती वापरली जायची. पण पालापाचोळा पासून तयार केलेला चुरा (BI.SH.CO.M) मातीत मिश्त्रन केले जाते. त्यामुळे मातीची आवश्यकता ही पन्नास टक्के कमी झाली आहे. अशा प्रकारे ९० टक्के कमी मातीत बाग फुलवली जाते.
I am Feeling proud of this forum for give a chance to interact with other city farmers.
u can listen my interview …
Agriculture Information connects growers, buyers, and experts.
We are one of the earliest (founded in 2000) agriculture website on the internet. We have more than 300,000 members using this platform.
The information on this website is also available as print magazines in various languages.
Our discussion forums have more than 100,000 individuals threads and posts on thousands of agriculture-related topics.
We conduct online meetings and discussions with successful (and not successful!) agriculture entrepreneurs, farmers and business people. They talk about their experiences. You can also join these meetings from wherever you are and participate in the discussions.
We are one of the most respected, independent agriculture media platform in India today. We are pro-farmer, not funded by any university or corporate with a vested interest. We carry interviews and articles with a wide range of people ranging from actual growers, entrepreneurs, academic experts, professionals and senior political leaders.
Agriculture Information is headed by Kartik Isvarmurti, a graduate of Delhi School of Economics and Oxford University, UK.
Dr. Bagicha… E book on Organic Vegetable Terrace Gardening… grow your Chemicale Free own food at your home
घरच्या घरी भाजीपाला कशा उगवायाच्या याचे मागर्दशर्न करणारी पुस्तक थेट आपल्या मोबाईल व संगणकावर ई स्वरूपात…
गच्चीवरची बाग व्दारे Dr. Bagicha हे ई-पुस्तक आपल्या हाती देतांना विशेष आनंद होत आहे. कोव्हीड- १९ या आजारामुळे lockdown झाले आहे. आपल्या प्रत्येकाच्या वेळ आहे. या काळात वेळ सत्कारणी लावण्याचे अनेक पर्याय हाताशी आहेत. त्यातील एक पर्याय म्हणजे घरीच विषमुक्त भाज्या उगवणे. त्यासाठी अनेक फोन येत आहेत. पण प्रत्यक्ष रूपात आपल्याहाती छापिल पुस्तक पोहचवणे अवघड आहे. तसेच या काळात गच्चीवरची बाग उपक्रम आर्थिक दृष्टया अडचणीत आला आहे. त्यास हातभार लागावा म्हणून या पुस्तकाची निर्मिती केली आहे. वरील दोनही गरजा लक्षात घेवून Dr. Bagicha हे ई-पुस्तक तयार करण्यात आले आहे.
पुस्तकाचे पहिली पाच पाने पाठवत आहोत. ते वाचून आपण 9850569644 या क्रंमाकावर गुगल पे / Instamojo चा वापर करू शकता. पुस्तकाच्या दुसर्या पानावर त्याचे सहभाग मुल्य नोंदवण्यास आले आहे. तसेच महत्वाची सुचना केली आहे. सहकार्याच्या अपेक्षेत..
गच्चीवरची बाग ही पूर्णतः Garbage To Garden या संकल्पनेने प्ररीत आहे. जास्तीत जास्त नैसर्गिक संसाधनाचा वापर करत बागेतील माती ही सुपिक व सुंगधीत केली जाते. यामधे नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा वापरला जातो. ज्यामुळे आपल्या गच्चीवरील बागेतील वाफे व कुंड्या व कमी वजनाची होते. तसेच घरच्या कचर्याचे घरीच कचर्यात रूपांतर करण्याचे विविध कंपोस्टर्स डेव्हलप करण्यात आले आहेत. आपल्या जागेला भेट देवून , आपल्या घरची उपलब्ध जागा, वापर, कचर्याचे प्रमाण, खेळती हवा यानुसार आपल्याला कंपोस्टर्स सुचविले जातात.
सर्वात महत्वाचे म्हणजे रासायनिक भाज्यांना चवच नसते अशी चव हरवलेले आपण शहरातली माणसे हॉटेलचे जेवण जवळ करतात पण यातून योग्य पोषण मिळतच नाही. खरं पोषण आणि खरं खरी चव अनुभवायची असेल तर घरच्या घरी भाजीपाला पिकवणे याशिवाय दुसरा पर्याय नाही.
Home composting and kitchen gardening workshop
विषमुक्त भाजीपाला ही काळाची गरज झाली आहे. योग्य पोषणाअभावी आधुनिक जगातील सुख सुविधा व आरोग्य सुविधा यांचा योग्य तो परिणाम यावा यावयास वेळ लागतो. रासायनिक भाजीपाला हा आरोग्याला घातकच आहे हे आता सर्वमान्य होत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रासायनिक भाज्यांना चवच नसते अशी चव हरवलेले आपण शहरातली माणसे हॉटेलचे जेवण जवळ करतात पण यातून योग्य पोषण मिळतच नाही. खरं पोषण आणि खरं खरी चव अनुभवायची असेल तर घरच्या घरी भाजीपाला पिकवणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. घरचा भाजीपाला म्हटलं की पहिल्यांदा आपल्या डोक्यात येतं की त्यात खूप खर्च लागेल पण हा केवळ गैरसमज असून आपण वेळ दिला, त्याचे विज्ञान, निसर्गचक्र समजून घेतलं तर सहजरीत्या घरच्या घरी भाजीपाला पिकवू शकतो आणि त्याचा जोडीला होम कंपोस्टिंग हे खूप महत्त्वाचं आहे म्हणूनच गच्चीवरची बाग नाशिक व महाराष्ट्र टाइम्स नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मागील दोन वर्षातील ही चौथी कार्यशाळा संपन्न करत आहोत येत्या 6 ऑक्टोबर 2019 रविवार रोजी नाशिक येथे संपन्न होणार आहे. या कार्यशाळेत लोकसत्ता ह्या वर्तमानपत्रातील गच्चीवरची बाग या सदराचे व गच्चीवरची बाग पुस्तकाचे लेखक संदीप चव्हाण हे स्वतः स्लाईड शो द्वारे मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळे नंतरही ही आपण त्यांच्याशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून भाजीपाला निर्मिती व कंपोस्टिंग साठीचे मार्गदर्शन मिळवू शकता. तर आपण सहकुटुंब सहभागी व्हावे या अपेक्षेने. http://www.gacchivarchibaug.in
9850569644/8087475242
Home composting and जे kitchen gardening workshop
Chemical free food is necessary of this era. Lack of proper & origin nutrition takes time to bring about the right effects of the well-being and health care of the modern world. It is becoming increasingly common that chemicals are dangerous to health, and most importantly, people in the city who miss the taste of chemicals have no taste, but they do not get proper nutrition. There is no choice but to cook homemade vegetables if you want to experience true nutrition and true taste. Home vegetable said that it comes to our head for the first time, it will cost a lot, but it is only a misunderstanding and if we give the time, understanding the nature and nature of the cycle, we can easily grow vegetables in our house and home composting is very important for the couple. This is the fourth workshop in the last two years in collaboration with Maharashtra Times Nashik doing nuns. It will be held on Sunday, October 6, 2019 in Nashik. The workshop will be directed by Sandip Chavan, author of the Gachivarchari Bagh column in the newspaper Lokasatta, and Sandeep Chavan, the author of the Gachchivar Bagh book. After the workshop you can also contact them through social media and get guidance on vegetable production and composting. So expect you to join a family.
शहरी शेतीच्या प्रसारासाठी आयुष्य झोकून दिलेला तरुण
एखादा धनसंपन्न असलेला मनुष्य आजारपणाला कंटाळलेला, अंथरुणावर खिळलेला असेल आणि त्याला विचारलं की खरी संपत्ती कोणती तर तो निशंकपणाने सांगेल की, आरोग्य हीच खरी संपदा आहे. “आरोग्यम् धनसंपदा”. आरोग्य चांगले असेल तर धन संपत्तीत वाढ होईल. आधुनिक युगात माणूस हा आनंद व सुखाच्या शोधात असतो. सुखासाठी साधन, संपत्ती मिळवण्यासाठी धडपड करतो. तो पैशाने श्रीमंत, स्थिर होतोही, पण आपले अनमोल असे आरोग्य गमावून बसतो. ना खाण्यापिण्याकडे लक्ष, ना रोजच्या व्यायामाकडे. त्यातच आपण खात असलेले अन्न ही रसायनं टाकून पिकवलेलं असेल तर “थाली में जहर”च!
शेतीचं जसं जस यांत्रिकीकरण होऊ लागलं तसतसं अन्नधान्य पिकवण्यासाठी रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशंकाचा वापर वाढू लागला. ज्या भाकरीच्या श्वाश्वतीत तो धडपडू लागला. त्या विषारी भाकरीनेच त्याचा घास कधी घेतला हे त्याच त्यालाच कळलं नाही. कधी ऐकले नाहीत असे आजार व त्याला जोगोजागी कर्करोग होऊ लागले. बरं हे मानव प्राण्यापुरतच मर्यादित राहिलं नाही, तर जल, जंगल, जमीन, पशू, पक्षी यांनाही मारक होऊ लागलं. त्यातच वाढत्या शहरीकरणामुळे डंपिंग ग्रांऊड वाढू लागलेत.
माणसं शहरात नाही तर कचर्याच्या कुंडीत राहू लागलेत असे म्हटले तरी चालेल. यावर उपाय काय? यावर असा उपाय पाहिजे, जो लोकांना मनापासून पटला पाहिजे. त्यात लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. नुसता सहभाग नाही. तनमनधन देवून तो सहभाग घेता आला पाहिजे. हे शक्य आहे का? हो शक्य आहे. ही गोष्ट आहे नाशिकच्या तरुणांची, फक्त गोष्ट नाही, तर उद्योगारंभातील एका टप्यावरची. यशोगाथा ‘स्मार्ट उदयोजक’च्या वाचकांसाठी.
आमीर खान निर्मित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात शेतीमध्ये रसायनांचा वाढता वापर व त्याचे दुष्परिणाम यावर एक भाग होता. या भागातून प्रेरणा घेत नाशिकच्या संदीप चव्हाण यांनी आपली शेतीची, निसर्गाची, कचरा व्यवस्थापनाची आवड व छंदाचे रूपांतर उद्योगात करून व्यवसायाची मुहर्तमेढ रोवली. उद्योगाचं नाव ठेवलं ‘गच्चीवरची बाग’.
गाव मागच्या पिढीतच सुटलं होतं, पण गावाची, शेतीची ओढ कायमच. त्यातच आयुष्याच्या एका टप्प्यावर जाणवलं की आपल्याला शहरातील व त्यातल्या त्यात माध्यमांतील नोकरीपेक्षा शेतीत आवड जास्त आहे. नोकरीत एक तप पूर्ण झालं होतं, पण त्यातील हेवदावे, स्पर्धा कधीच संपणारी नव्हती व हे सारे रात्रदिवंस कष्ट हे नेमके कुणासाठी हा यक्ष प्रश्न उभा राहिला आणि एक दिवस नोकरीला राम राम ठोकला.
आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं याचा विचार केला. तेव्हा लक्षात आलं की आपल्याला निसर्गाची खूप आवड आहे. शेती केली पाहिजे. त्यातच पुणे, मुंबई, नाशिकात कचरा वेचणार्यांचा प्रश्न ऐरणीवर होता. नाशिकचे डंपिंग ग्रांऊडही एकदा पालथ घालून झालं. त्यातून आपला ओला कचरा आजपासून फेकायचा नाही असा मनाशी निश्चय करून वैयक्तिक पातळीवर विविध प्रयोग पूर्वीच सुरू झाले होते. या कचर्याचं काहीतरी करू म्हणून केलेली सुरुवातच यशस्वीतेत होत गेली. विविध प्रयोगांना हाती यश लागलं आणि त्यातून सुरू झाला गच्चीवरची बागेचा प्रयोग.
विदेशी पाहुण्यांना ‘गच्चीवरची बाग’ समजावून देताना संदीप चव्हाण
बाजारातून काहीही विकत आणायचं नाही. हे विकत आणणंच खरं तर शेतकर्याला व शेतीला संपवत आहे, या निष्कर्षापर्यंत पोहोचलेला अभ्यास आता प्रत्यक्ष कृतीत आणण्याची वेळ होती. ती सिद्ध झालीसुद्धा. ‘गारबेज टू गार्डन’ अशी संकल्पना घेवून घरच्या घरीच रसायनमुक्त भाजीपाला कसा पिकवायचा या विषयी प्रयोग यशस्वी झाले. या अनुभवातून ‘गच्चीवरची बाग’ हे पुस्तकही प्रकाशीत झालं.
पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला. ही गोष्ट आहे २०१४ मधली. विविध वर्तमानपत्रांव्दारे नाशिकमधे जागृती झाली. आता तर सोशल मीडियामुळे याला चांगला प्रतिसाद मिळतोय. उदयोजकतेचे धडे वाचताना एक गोष्ट कळली की एखादा व्यवसाय व्यवसाय म्हणून साकारताना तो १ हजार दिवस चालवून पाहावा. जमला, टिकला तर तो अंगाखांद्यावर खेळवावा. झालंही तेच पहिली तीन वर्षं याला चांगला प्रतिसाद मिळाला.
हे फक्त त्यांच्याशी चर्चा करताना समजून येते. तर अशा अनुभवाधारावर गच्चीवरची बाग हे पुस्तक प्रकाशीत झालं. अशा अनुभवाआधारीत पुस्तक विक्रीतून घरोघरी पे कंन्सलटंसी सुरू झाली. कंन्सलटंसीतून २० टक्के माती व ८० टक्के पालापाचोळातून भाजापाल्याची बाग फुलूवून देण्याचे काम सुरू झाले. त्यातून नैसर्गिक खते, गोपालन, त्याआधारित कीटकनियंत्रके यांची निर्मिती सुरू झाली व सुरू झाला आवडीच्या उद्योगाच्या शिडात हवा भरण्याचं काम.
३१ मार्च २०१९ ला ‘गच्चीवरची बाग’ला सहा वर्ष पूर्ण झाली. सातव्या वर्षात पदार्पण झालंय. एकाट्याच्या खांद्यावर पेलण्याचं उद्योग धनुष्य आता सात जणांच्या खाद्यांवर वाटलं गेलंय. ताफ्यात आता छोटा हत्ती आहे. देशी गाय आहे आणि हे सारं करण्यासाटी छोटी हक्काची जागा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभावाचं ज्ञान, जे अक्षय्य आहे. थायलंड, झिम्बांव्बे या देशातील विषमुक्त शेती, किचन गार्डनसोबत भारतातील विविध शेती प्रयोगांचाही प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास करत या संकल्पनेचा पाया रचला गेला. घरच्या बागेत पिकवलेल्या भाज्यांतून, आलेल्या अनुभावतून ‘गच्चीवरची बाग’ पुस्तकाची पहिली आवृत्ती संपून दुसरी आवृत्ती प्रकाशीत झालीय.
सोबत “तुम्हाला माहीत आहे का?” या दुसर्या पुस्तकाचीही जोरदार विक्री सुरू आहे. “तुम्हाला माहित आहे का?” हे पुस्तक म्हणजे संदीप चव्हाण यांनी गच्चीवरची बाग या विषयावर घेतलेल्या कार्यशाळांमध्ये सांगितलेलं आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन या विषयीचे मुद्दे संकलित करण्यात आले आहेत. हे पुस्तक वाचतांना तर आपण त्यांची कार्यशाळाच अनुभवत आहोत असे वाटते. जे वाचकांसाठी आय ओपनींग ठरावं.
संदीप चव्हाण यांनी नाशिकमध्ये पाचशे घरांत भाजीपाला पिकवण्याचे काम सुरू केले आहे. दहा हजारांपेक्षा अधिक लोकांना बाग फुलवण्यास प्रेरीत केले आहे व तितकीच लोक रोज संपर्कात असतात. बाग-कचरा व्यवस्थापनाविषयी प्रश्न विचारतात. त्यांच्या कामाची विविध दृकश्राव्य तसेच मुद्रित माध्यमांनी त्यांच्या कार्याची दखल तर घेतली आहे. सध्या www.gacchivarchibaug.in व www.organic-vegetable-terrace-garden.com अशी दोन संकेतस्थळे आहेत. यावर आपण नक्कीच भेट देवून अधिक माहिती जाणून घेवू शकता व त्यांच्या संपर्कात राहू शकता.
लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)
“What is Swacch Bharat abhiyaan? We take garbage from our area and dump it somewhere else or we burn it which causes pollution. Instead we must use it in this way for producing something. I hardly buy any vegetables. My family eats chemical-free food daily,” Sandeep added.
A Nashik resident has developed a unique terrace garden where he produces organic vegetables.
Sandeep Chavan, with minimal investment, claims to get maximum benefit from his garden. He uses bio-waste as feritliser for his garden and all the used plastic bottles as containers for some tiny plants. Sandeep uses just 2 kg of sand for growing the vegetables. He uses foliage, coconut extract and solid kitchen waste in place of sand. All these materials, he said, has high capacity to hold water.
Sandeep informed iamin that he does not buy any fertiliser for his plants, he himself produces it. “I collect sugarcane extract, coconut extract, liquid kitchen waste, and earthworms in a big drum which has an opening at its base. By adding liquid kitchen waste daily for a period of six months, I produce a liquid fertiliser,” Sandeep said.
He grows different types of vegetables like brinjals, tomatoes, chillies, pumpkins, onions, coriander, curry leaves and much more. He has also created a Facebook group, where he regularly posts about his garden and thus encourages others to follow suit.
“What is Swacch Bharat abhiyaan? We take garbage from our area and dump it somewhere else or we burn it which causes pollution. Instead we must use it in this way for producing something. I hardly buy any vegetables. My family eats chemical-free food daily,” Sandeep added.
वैशाली राऊत/ नाशिक
मी गेल्या वर्षापासून राहत्या घरी भाजीपाल्याची बाग फुलवली आहे.
वैशाली राऊत/ नाशिक मी गेल्या वर्षापासून राहत्या घरी भाजीपाल्याची बाग फुलवली आहे.
मी गेल्या वर्षापासून राहत्या घरी भाजीपाल्याची बाग फुलवली आहे. या वर्षी बागेतून आम्ही रताळी, वांगी, टोमॅटो, मिरच्या, पुदिना, ओवा, मोहरी, मोहरीची पाने, गवती चहा, बोरमिरची अशा अनेक भाज्या घेतल्या. मला बागेच्या कामात माझे पती व मुलगा मदत करतात. आम्ही बाजारातून कोणतेही खत, औषध विकत आणत नाही. खत म्हणून घरातीलच सुक्या व ओल्या कच-याचे व्यवस्थापन करतो. आमच्या गच्चीवरील या बागेमुळे उन्हाळ्यात गारवा राहतो. पक्षीही घरटी बांधतात व त्यांच्या मुलांना जन्म देण्यासाठी येतात, याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. आपण माणसांनी त्यांच्या राहत्या जागेत आक्रमण केले त्यांचे उतराई होण्यासाठी ही गच्चीवर फुलवलेली बाग समाधान देते. आमची बाग पाहून शेजारच्या मुलांनीही बाग फुलवण्याची प्रेरणा घेतली आहे. आजूबाजूचेही लोक ती पाहायला येतात. आमची बाग फुलवण्यासाठी गच्चीवरची बाग या संदीप चव्हाण लिखित पुस्तकाची खूप मदत झाली. हे छोटेखानी पुस्तक वाचून त्याची अंमलबजावणी करणे खूप सोपे आहे. हे पुस्तक आम्ही आमच्या नातेवाइकांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट देतो व त्यांनाही रसायनमुक्त भाजीपाला पिकवण्याचा आग्रह करतो. तसेच इंटरनेटवर व फेसबुकवर ही असे काम करणारी खूप हौशी मंडळी आहेत. वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शनही घेतो. ब-याचदा कुंड्यांतील सुकी पाने कुंडीतच जिरवतो, त्याचा छान परिणाम दिसून आला आहे.
आम्ही आमची माती पालापाचोळ्याचे कंपोस्टिंग करून घरीच तयार केली आहे. तिला छान सुगंध येतो. शिवाय त्यातून उत्पादकताही वाढली आहे. बियाणे व रोपे, त्यांला मिळणारे मातीतील घटक यांचा छान संयोग जुळून आला तर एका झाडाला भरपूर भाज्या येतात. त्या आम्ही आमच्या शेजा-यांनाही देतो. तेही आमच्या आनंदात सहभागी होतात. अर्थात त्या बदल्यात ते आम्हाला त्यांच्या घरचा नैसर्गिक ओला सुका कचराही देतात. बरेचदा चांगले फळे देणा-या झाडांची फळे बियाण्यासाठी साठवतो. ते बियाणे इतरांनाही देतो. गावाकडून गावरान बियाणे संकलित करतो. त्यांचे जतन व संवर्धनही करतो. आम्ही रोज सकाळ- संध्याकाळ मोजके पाणी देतो त्यामुळे गच्चीवर पाणी साठून राहात नाही. घरच्या घरी किंवा इतरांना देण्यासाठी टोमॅटो, मिरचीची रोपवाटिकाही तयार केली आहे. आमच्या बागेत फुलं व काही शोभेची झाडे आहेत. तसे लक्ष वेधून घेणारे काही निवडुंग आहेत. कुठून कुठून जमा करून आलेले वाण आम्ही जतन केले आहेत. आता नव्याने बागेत लेट्यूस या परदेशी भाजीची लागवड केली आहे. त्याची छान वाढ होत आहे. बाग ही आमची निवांत बसण्याची जागा आहे. रखरखत्या उन्हातही तेथे गारवा व हिरवाई डोळ्यांना सुखावते. अशी ही बाग आमच्या जीवनाची अविभाज्य भाग झाली आहे. एखाद दिवशी पाणी दिले नाही तर चुकल्या चुकल्यासारखे वाटते. अशी ही बाग प्रत्येकाने आपल्या घरी फुलवावी व आनंदाचे प्रवासी बनावे या सदिच्छेसह.
हे उपाय करा. भर ऊन्हाळ्यातही तुमची बाग हिरवीगार राहिल. घराला गारवा देत राहिन. नाहीतर
वाढत्या तापमनात आपली बाग कशी जगवाल…
HOW TO SURVIVE GARDEN IN HIGH TEMPERATURE
गेला उन्हाळा बरा होता… असं आपण प्रत्येक जणच म्हणत असतो. वाढता उन्हाळा हा सारीकडेच चर्चेचा विषय ठरतो खरा.. पण त्यावर कृती मोजकेच लोक करतात. कृतीशुन्य असणारी माणसे केवळ हातावर हात ठेवून वेळ वाया घालवतात. खरं तर अशा मानव प्राण्याची गंमत त्या हळू हळू गरम होणार्या पाण्यात बसलेल्या बेडकासारखी गोष्ट झाली आहे. गरम होणारे पाणी एक दिवस उकळेल व जिव घेईल हे त्याच्या लक्षातच येत नाही. मग तो त्यातच मरून जातो.
आपल्याच सोकाल्ड प्रगतीमुळे मानव आता कधी न परतू शकणार्या अशा जागतिक तापमान वाढीच्या महामार्गावर वेगाने प्रवास करत आहे. खर तर तापमान वाढ ही हिमयुगाकडे वाटचाल करणारी ठरणार आहे. सध्या आपल्या सर्वांनाच ग्लोबल वार्मिंगचे चटके बसू लागले आहेत. पण या विनाशाच्या प्रवासाची दाहकता छोट्या, छोट्या कृतीने नक्कीच कमी करू शकतो. काय आहेत उपाय…
आपण सारेच सिमेंटच्या जंगलात राहतो. पूर्वी मातीची घरे हे उशिरा तापायची व लवकर थंड व्हायची. पण सिमेंट हे लवकर तापते व उशीरा थंड होते. अगदीच विरूध्द गुणधर्म असलेल्या बांधकाम साहित्यात आपण राहतो. पण त्याला काही पर्यात नाही. मग करायचे काय… लवकर तापणार्या सिमेंटला आपण उशीरा तापवता येईल याची नक्कीच उपाययोजना करता येऊ शकते.
गच्चीवर फुलवा बाग…
गच्चीवर बाग फुलवण्याने तापणारे टेरेस हे १२ ते १४ अंशाने कमी होते. तसेच टेरेसचे आयुष्यमान वाढते. उशीरा टेरेस तापल्यामुळे छताखाली राहणार्या कुटुंबाला लगेचच एसी. वा पंखा लावायची गरज पडत नाही. या सार्यामुळे विजेच्या बिलातही बर्याच प्रमाणात घट होते. तसेच पहाटे वातावरणात गारवा तयार होतो. या सार्यांचा परिणाम विज व पैशाची व पर्यावरणाची बचत करता येते.
वाढत्या व घटत्या तापमानात टेरेस हे आकुंचन व प्रसरण पावत असते. त्यामुळे त्याचे आयुष्यमान कणा कणाने घटत जाते. त्यामुळे टेरेसवरील घोटाईला पापडी धरली जाते व ती स्लॅप पासून वेगळी होते. थोडक्यात अधिक तापमानाला टेरेस तापल्यामुळे एका अर्थाने घराचे नुकसान होते. ते वाचवायचे असेल तर छतावर बाग करण्याशिवाय पर्याय नाही.
छतावर बाग असेल तर असे करा उपाय… आपण छतावर कुंड्यामधे बाग तयार केली असेल तर अर्धवेळ ऊन लागेल अशा ठिकाणी कुंड्या हलवा. दोन वेळेस पाणी द्या..
न हालवता येणारी बाग म्हणजे मोठ्या कुंड्या, वाफे असतील तर त्यावर ३० ते ५० टक्के सुर्यप्रकाश झिरपेल अशा प्रमाणाचे हिरवे कापड टाका. तसेच आपल्या छतावर वारा वाहत असेल तर बाजूने कापड लावा. एक बाजू खुली ठेवा.. हवा खेळती राहिली पाहिजे नाहीतर कीड वाढते. पण वरून कापड लावलेच पाहिजे.
आपण नुकतीच बागेला सुरवात केली असेल म्हणजे आपल्या छतापेक्षा बाग ही २० टक्केच जागेवर असेल तर ८० टक्के छताची गरम हवा २० टक्के बागेला करपून टाकेन. त्यामुळे त्याठिकाणी अरेका पामच्या कुंड्याचा अडसर तयार करून वनभिंतासारखी भिंत तयार करा. म्हणजे गरम हवेला अटकाव होईल व आपल्या बाग फुलवण्याच्या प्रयत्नांना यश येईल.
केवळ छतावर, अंगणात पाणी मारून गारवा तयार होणार नाही. हे फक्त पाणी वाया घालवणं होईल. तेच पाणी किंवा त्याही पेक्षा कमी पाण्यात छतावर बाग फुलवली तर छत गार राहण्यात मदत होईल.
छत गरम होते म्हणून काही मंडळी सफेद रंग देतात. निःसंशय छत गार राहण्यास मदत होते. पण सुर्य किरण आकाशात परावर्तित होतात त्यामुळे तापमान वाढते. पण बागेतील काडीकचरा, पालापाचोळा यात ते सामावून जातात त्यामुळे तापमान कमी होते.
पाण्याची टंचाई किंवा पाणी कमी प्रमाणात द्यावयाचे असल्यास आपल्याला पाण्याच्या बाटली व्दारेही ठिबक पध्दतीने पाणी देऊन बाग जगवता येईल. हे उपाय आपण बाल्कनीत, जमीनीवर परसबाग असेल तर कल्पकतेने तेथेही करता येतात.
दुपारच्या वेळेत दारं, खिडक्या बंद ठेवा.. कारण गार हवेची जागा ही गरम होत असते. दारं खिडक्या उघडे असतील तर घर गरम होण्यास वेळ लागणार नाही. तेव्हा करा काही तरी… नुकतेच उन्हाळा उन्हाळा म्हणून रडत बसण्यात अर्थ नाही.. कृती करण्यात खरी सार्थकता आहे.
गच्चीवरची बाग हे प्रातिनिधीक नाव आहे. त्यास विविध नावाने ओळखले जाते. पूर्वी यास परसबाग असे म्हटले जात असे.. त्यावरून किचन गार्डन ही संज्ञा नावारूपाला आली. पण जस जसे शहराभोवती लोकसंख्येची दाटी वाढू लागली. त्याप्रमाणे हीच संकल्पना विविध नावाने ओळखली जावू लागली. ही संकल्पना जागा, वस्तूच्या उपलब्धतेनुसार, तिच्या आकारमानानुसार त्यास विविध बिरूदे लागली…जसे की शहरी शेती, टेरेस गार्डन किंवा टेरेस फार्मिंग, विंडो गार्डन, कुंड्यामधील बाग, बाल्कनी गार्डन, सज्जा पर सब्जी, छत पर खेत.. बॅकयार्ड फार्मिंग…वन स्टेप स्व्केअर फार्मिंग,मल्टी लेअर फार्मिंग, रूफ टऑफ गार्डर्निंग , व्हर्टिकल गार्डिनिनग अशी विविध नावे… विविध रूपं… असो.. महत्वाचा भाग म्हणजे तुमच्या कडे उलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत उपलब्ध नैसर्गिक संसाधनात आपल्याला सहज सोपी बाग फुलवता येते. खूप काही करायची मूळात गरजचं नसते. सारं काम करतो तो निसर्ग.. आपण फक्त त्याची फक्त छानसी घडी बसवून दयायची…निमित्त मात्र व्हायचे… या विषयी आपण मागील दोन लेखामध्ये सविस्तर पाहिलेच आहे… तर या लेखात आपण गच्चीवरची बाग ही सर्वस्पर्शी वैश्विक संकल्पना कशी आहे ते समजून घेवू या..
आज पर्यावरण हा बर्निंग इश्यू आहे… ग्लोबल पातळीवर असे अनेक प्रश्न आहेत..पण त्याची पाळमूळ पाहीली तर ती लोकलच आहेत हे विसरून चालणार नाही.. म्हणजेच ग्लोबल प्रश्नाना लोकल उत्तरे शोधली पाहिजेत…गच्चीवरची बाग हे ग्लोबल प्रश्नाला दिलेलं लोकल स्वरूपातलं रामबाण उत्तर आहे असे मला ठामपणे वाटते. यातील तत्वाचा परामर्ष घेतला तरी त्यावरून या संकल्पनेची व्याप्ती सहज लक्षात येईल… कचरा व्यवस्थापन, भूसंवर्धन, विषमुक्त-रसायनमुक्त अन्न निर्मिती, निखळ मंनोरंजन, निसर्गाची साथसंगत.
गारबेज टू गार्डन...हे पहिले तत्व…कचरा नव्हे कांचन ही म्हण आपण पूर्वापार चालू आहे. आज शहरात जैविक कचर्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कचर्याच्या विल्हेवाटीत प्रशासनाचा खूप पैसा खर्च होत आहे. अशा कुजणार्या कचर्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा व्यवस्थापन केले तर नक्कीच त्यातून अमुल्य असा फायदा होतो. खत बनवणार्या खर्चिक साधनांना फाटा देत सोपे सोपे उपाय अंमलात आणले तर आपण सहजतेने… शिकत शिकत घरच्या ओल्या, सुक्या कचर्याचे छान खत काय एक प्रकारे उत्पादक मातीच तयार करू शकतो. अशा प्रकारे पैसा वाचला तर त्याचा फायदा नक्कीच शहरातल्या इतर विकास कामांना होईल याची खात्री वाटते.
भूसंवर्धनः आज कुंड्यामध्ये शंभर टक्के माती वापरली जाते. त्यापेक्षा पालापाचोळा, नारळाच्य शेंड्या, वाळलेलं किचन वेस्ट, घरी बनवलेलं खत याचा वापर केला तर माती फक्त पंधरा ते वीसच टक्के वापरावी लागते. तिही पहिल्या प्रयत्नांत… नंतर मातीची गरजच पडत नाही… आज नाशिक शहराचा विचार केला तर जैवविवधतेने नटलेल्या त्र्यंबकश्वेरच्या पर्वत खोदले जातात. शहर सुशोभित केले जातात. काही वर्षानंतर ही माती फेकून दिली जाते. पुन्हा नवी माती ट्रक भरून आणली जाते. यात मातीचा वरचा थर खरवडला जातो. पावसाचे पाणी त्यामुळे साचत नाही. पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहून नदया, नाले , धरणे यात येवून साचते… असे अनेक प्रकारे आपण निसर्गाचे नुकसान करत असतो. तेव्हा.. गच्चीवरची बाग साकारण्याचे तंत्र वापरात आणले तर बर्याच प्रमाणात आपण पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो.
स्मोक फ्री सोसायटी, कॅलनी… आज सकाळच्या वेळेत लोक शुध्द हवा घेण्यासाठी सकाळी सकळी रपेट मारतात. पण नेमक्या याच वेळेस म.न.पा. कर्मचारी पालापाचोळा जाळतांना दिसतात व आपण धुर घेवून घरी परततो. अशा पाल्यापाचोळ्याचेही छान खत तयार करता येते. त्यापासून माती तयार करता येते…
रसायमुक्त अन्नः आज बाजारात रसायनयुक्त खते, औषधे मारून भरमसाठ व कमी वेळात भाजीपाला पिकवला जातो. असा हा भाजीपाला आपलं आयुष्य कमी करतो तसेच विविध आजारांना आमंत्रण देतो..किंबहूना यमसदनाच्या न परतणार्या वारीला पाठवायची गुपचूप तयारी करतो. आजच्या अन्नात पहिल्यासारखी चव, कस राहिला नाही हे आपण सारेच मान्य करतो.. असा हा भाजीपाला आपल्या डोळ्यासमोर व नैसर्गीक पध्दतीने पिकवता आला तर… नक्कीच आपण सुदृढ आयुष्य जगू शकतो… आणि असा भाजीपाला पिकवणे शक्य आहे…अशा विविध उपयोग व अर्थ सामावलेली गच्चीवरची बाग ही खर्या अर्थाने सर्वस्पर्शी वैश्विक संकलन्पा आहे असे आवर्जून सांगावसे वाटते.
सहा वर्षात आम्ही काय काय साध्य केलेय त्याचा हा प्रवास… आपल्या समोर मांडत आहेत. आपल्याला आवडल्यास नक्कीच लेखाखाली प्रतिक्रिया नोंदवा…
गच्चीवरची बागेला ३१ मार्च २०१९ रोजी सहा वर्ष पूर्ण होताहेत सहा वर्ष… या सहा वर्षात आम्ही काय काय साध्य केलेय त्याचा हा प्रवास… आपल्या समोर मांडत आहेत. आपल्याला आवडल्यास नक्कीच लेखाखाली प्रतिक्रिया नोंदवा…
फुलू लागलीय गच्चीवरची बाग ….गेल्या पंधरा वर्षापूवी शेतकर्यासोबत काम करता करता सेंद्रीय शेतीची गरज लक्षात आली. त्यामुळे शेती घ्यायची असं ठरवले. आधी घर की शेती अश्या व्दिधा अवस्थेत असलेले मनाने प्राथमिक गरज म्हणून घराची निवड केली. तसेच गगणाला भिडलेले शेतीचे भाव पाहता शेती विकत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे अपार्टमेंट मधील फ्लॅट घेण्यापेक्षा रो हाऊस घेण्याचे ठरवले आणि सुरवात झाली बागेला
ती पण एका कुंडीपासून अर्थात गच्चीवरच्या बागेला.
रोजचीच कचर्याची समस्या त्याचं करायचं काय व वाढत्या शहरीकरणासोबत ही समस्या वाढतच जाणार असा प्रश्न बारावीत असल्यापासून मनात होताच. त्यावर उपाय शोधले पाहिजेत तेव्हा या कचर्याचं आणि बागेची सांगड घातला येईल का हाही मुद्दा पिच्छा पुरवत होताच. मग सुरू झाले कचर्याचे प्रयोग. प्रयोग कसले वेगवेगळे खेळच म्हणा हवं तर .. छंदातून सुरू झालेले हे प्रयोगातून वेस्ट कंपोस्टिंगचे एक एक सुत्र, विज्ञान लक्षात येवू लागले आणि त्यातून तयार झाली गारबेज टू गार्डन ही संकल्पना अर्थात गच्चीवरची बाग…
उपलब्धतेचा मंत्र… बाग फुलवण्यासाठी हवी फक्त इच्छा शक्ती, 250 मिली ग्रॅमच्या दूधाच्या पिशवी पासून, शितपेयांच्या बाटली पासून तर वाफ्यांपर्यंत अश्या कोणत्याही उपलब्ध वस्तूत बाग फूलवता येते. तसेच विंडो ग्रिल, टेरेस, बाल्कनी जमीन अश्या कोणत्याही व कमीत कमी जागेत बाग फूलवता येतेच पण शिवाय उपलब्ध नैसर्गिक संसाधने उदाः नारळाच्या शेंड्या, ऊसाचे चिपाट, पालापाचोळा, वाळलेलं किचन वेस्ट अश्या नैसर्गिक संसाधनाचा वापर करता येतो.
विस टक्के मातीत फूलवली बाग… बाग फूलवण्यासाठी शंभर टक्के मातीची गरज नाही. कुंडी किंवा वाफा भरताना नारळाच्या शेंड्या, ऊसाचे चिपाट, पालापाचोळा, वाळलेलं किचन वेस्ट व सर्वात वरती माती असे पाच घटक २० -२० टक्के वापरले तरी बाग उत्तम प्रकारे फूलवता येते.
अनुभवावर आधारीत पुस्तकाचे लिखाण…गच्चीवरची बाग नावाचे स्व:अनुभवावर आधारीत पुस्तिका प्रकाशीत केली आहे. साध्या, सोप्या व सहज साध्य अशा पध्दतीमुंळे नव्याने बाग तयार करणार्यांसाठी ही पुस्तिका आजही मार्गदर्शक ठरत आहे. नुकतीच पुस्तकाची व्दितीय आवृत्ती प्रकाशीत केलीय.
तसेच लोकांनी बाग, कचरा व्यवस्थापन या विषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ही छोट्या वाक्यात देण्याचा प्रयत्न मागील दोन वर्ष चालला होता. त्या स्वःलिखित उत्तरांचे तुम्हाला माहित आहे का नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशीत झाले आहे. खरं तर यातील वाक्य ही कार्यशाळेत वापरली जातात. यात नमूद केलेली वाक्य ही डोळे उघडणारी व नव्याने माहिती व ज्ञान प्रदान करणारी आहे. लोकसत्ता- चतुंरग पुरवणीत गच्चीवरची बाग या नावाने वर्षभर सदर लिखाण केले. त्यास उभ्या महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळालाय. त्याचप्रमाणे वृत्तपत्र व मासिकांसाठी लिखाण, व स्तंभ लेखन सुरू असते.
हिंदी भाषीक दाणापाणी या मासिकात प्रकाशन.. गच्चीवरची बाग या पुस्तकाचे महत्व ओळखून इंदोर स्थित संस्थेतर्फे दाणापाणी या मासिकात हिदी भाषेत लेखमाला प्रकाशीत होत आहे.
गच्चीवरची बागेसाठी नोकरी सोडली…पंधरा वर्ष नोकरी केल्यानंतर गच्चीवरील निसर्ग हाक देवू लागला. नोकरी की निसर्ग या निवडीत नोकरी सोडली व निसर्गाला जवळ करत कामाला सुरूवात केली गच्चीवरची बाग. तेच उपजिवकेचे साधन बनले.
ऑल इन वन वेस्ट कंपोस्टर…घरात तयार होणारा हिरवा कचरा, खरकटे अन्न, पालापाचोळा व साबण विरहीत खरकटे पाणी यांचा एकाच कंपोस्टर मध्ये कंपोस्टिंग करता येते. असे घरच्या घरी प्रत्येकाला तयार करता येईल असे कंपोस्टर वापरले जाते. त्याबद्दल मार्गर्शनही केले जाते. त्यात गांडुळे सोडली जातात. यातून द्रव, घन स्वरूपात खत तयार होते. सहा ते बारा महिने थांबण्याची तयारी असल्यास माती आणण्याची गरज नाही. ही खत रूपी मातीचा बाग फूलवण्यासाठी वापर केला जातो.
पाचशे घरात फुलतेय बाग…गेल्या सहा वर्षापासून नाशिक शहरात गारबेज टू गार्डन ही संकल्पना राबवत आहेत. आतापर्यंत पाचशे घऱात कचर्याचं व्यवस्थापनातून बाग फूलवून दिली आहे.
मार्गदर्शनासाठी तयार केले संकेतस्थळ…गच्चीवरची बागची माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी www.gacchivarchibaug.in हे संकेतस्थळ तयार केले आहे. त्याला रोज नवनवीन लोक भेट देत आहे. या संकेतस्थळामुळे बाग कशी फूलवता येते याचे काही माहितीपट, फोटो, लेख, बातम्या उपलब्ध आहेत त्यामुळे बर्याच मंडळीची विचारपुस वाढली आहे. https://organicvegetableterracegarden.wordpress.com/ या दुसर्या संकेत स्थळावर अदयावत माहिती प्रकाशीत केली जाते.
सोशल मिडीया वर मोफत मार्गदर्शन…9850569644 हा व्हॉटस अप व टेलेग्राम क्रं. सर्वासांठी उपलब्ध केला असून त्यावर व्यक्तिगत मार्गदर्शन करतो. तसेच फेसबुक वर गच्चीवरची बाग, छज्जा पर सब्जी, Organic Vegetable Terrace Garden, गच्चीवरची बाग नाशिक page असे फेसबूक पेजेस असून त्यावर रोज भाज्या, टेरेस गार्डन बद्दल नवनवीन अपडेट्स पाठवले जातात. त्यातून लोकांना घरच्या घरी बाग फूलवण्याची प्रेरणा मिळते तसेच Sandeep k C नावाचे फेसबूक वॉल आहे. याशी जोडून घेता येईल. या पेजेस व जगभरातील मराठी माणूस जोडला असून बागकामाविषयी आवड नोंदवत आहे.
दोनशे लोक रोज बघतात चित्रफीत…इंदोर स्थित भारतीय सजीव कृषी समाज (OFAI) व्दारे गच्चीवरची बाग या कामाची दखल घेत पाच मिनीटांचा सज्जी पर सब्जी… (Hindi Organic Terrace Faring) माहितीपट बनवला आहे. तो यूट्यूब वर उपलब्ध असून त्यास रोज सरासरी २०० लोक बघतात. डिसेंबर २०१४ तयार झालेल्या माहितीपटाला आजपर्यंत 2 लाख ९० हजार लोकांनी पाहिला आहे. त्यावर संपर्क क्र दिला असल्यामुळे गोवा, नेपाळ, आसाम वरून बाग फूलवण्यासंबधीचे प्रश्न, शंका विचारले जातात. या माहितीपटामुळेच खर्या अर्थाने गच्चीवरची बाग ग्लोबल होत आहे. video
गच्चीवरील शेतीः एग्रोवन साम तर्फे माहितीपट….एग्रोवन साम तर्फे गच्चीवरील शेती माहितीपट तयार करण्यात आला. त्यामुळ राज्यातील इच्छुक शेतकर्यांतर्फे चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण १० मिनिटांचा माहितीपट हा सेंद्रिय शेतीचे महत्व विषद करतो. तसेच पालापाचोळा व घरच्या किचन वेस्टचे कसे व्यवस्थापन करावे याची माहिती यात दिली आहे. यूट्यूबर माहितीपट उपलब्ध आहे.
पूर्ण वेळ काम व रोजगार निर्मीती…घरोघरी बाग गारबेज टू गार्डन या संकल्पनेवर आधारीत बाग फूलवून देणे या विषयी, कंन्सलटंसी, सेटअप बिल्डींग, कार्यशाळा, आयोजीत केल्या जातात. या सार्या कामासाठी सध्या आमच्या कुटुंबातील पाच सदस्य व दोन व्यक्तिनां रोजगार उपलब्ध झाला आहे.
वसुंधरा मित्र पुरस्कार मिळाला…झिरो वेस्ट ही संकल्पना घरी साकारल्यामुळे किर्लोस्कर समुहाव्दारे आयोजीत होणारा वसुंधरा फिल्म फेस्टीव्हल व्दारे २०१५ या वर्षी वसुधंरा मित्र हा पुस्कार मिळाला आहे.
भाजीपालानिर्मीती विषयीप्रेम,आवड व कौशल्य…भाजीपाला निर्मीती हीच आवड आहे. फुलांपेक्षा भाज्या ही रोजची गरज आहे. घरच्या भाज्या ताज्या, स्वादिष्ट व आरोग्यदायी असल्यामुळे त्याची लागवड केल्यास कुटुंबातही पसरबागेविषयी आवड तयार होते याचा विचार करूनच भाजीपाला निर्मीतीत कौशल्य विकसीत करत आहे.
परदेशात अभ्यास व मार्गदर्शन…रसायनमुक्त शेती हा आवडीचा आहे. त्यामुळे विषयाच्या अभ्यासाठी महाराष्ट्रातील तसेच भारतभरातील कचरा व्यवनस्थापन, व विषमुक्त शेतीचा अभ्यास तर केलाच पण त्यासोबत थायलंड व झिम्बॉंबे येथेही महिनाभर वास्तव्य करून परसबागेचा अभ्यास केलाय. २००५ पासून सुरू झालेल्या या अभ्यासाला आता दीड तप पूर्ण होतेय.
सातत्याने विविध प्रयोग…पारंपारिक शेती कशी करत होते. याचा अभ्यास करत त्याची माहिती घेत तेच तंत्र आपल्या कुंड्या, वाफे, गच्चीवरची बाग आणण्याचे प्रयत्न करतोय. कचरा व्यवस्थापनासाठी कोणतेही कंपोस्टिंग कल्चर, पावडर न वापरता नैसर्गिक पध्दतीने खत तयार करता येते. यासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतो. बाजारमुक्त परसबाग फूलवता येते. यावर माझा ठाम विश्वास आहे.
प्रचार प्रसारासाठी केले स्पर्धेचे आयोजन…गारबेज टू गार्डन व उपलब्धतेच्या तंत्रात भाजीपाल्याची विषमुक्त बाग फुलवता यावी. यासाठी घराघरात संदेश जावा यासाठी गच्चीवरची बागेची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पदरमोड करत रोख विजेत्यांना पारितोषिक व पुरस्काराचे स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले.
गारबेज टू गार्डन साठी घेतोय मार्गदर्शन वर्ग…सोशल मिडीयाव्दारे मोफत मार्गदर्शन तर केले जातेच पण ज्यांना प्रात्यक्षिक करून बाग कशी फूलवावी यासाठी स्लाईडशो व्दारे मार्गर्शन केले जाते त्यात कचर्याचं व्यवस्थापन उपलब्ध जागा, खेळती हवा व निर्माण होणारा कचरा व कुटुंबाच्या हाताशी असणारा वेळ या नुसार कंपोस्टिंग सेटअप सुचविला जातो. मार्गदर्शनासाठी पूर्वी दिव्य मराठी व आता महाराष्ट्र टाईम्स सोबत कार्यशाळा आयोजीत केल्या जातात.
शाळाशाळात हा विषय पोहचवा यासाठी धडपड …कचरा व्यवस्थापनावरचा सृजनशील व रामबाण उपाय म्हणजे गच्चीवरची बाग हा विषय मुलांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. कारण तेच उदयाचे सूजाण नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर योग्य वेळेत निसर्गाविषयी संस्कार होणे गरजेचे आहे यासाठी पाचवी ते आठवीच्या मुलांपर्यंत पोहचावा यासाठी मोफत मार्गदर्शनाची तयारी आहे. त्यासाठी शासकीय व खाजगी शाळा संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे. सध्या नाशिक मधील प्रयोगशील शाळा आनंदनिकेतन शाळेत मुलांना दर शनिवारी हा विषय शिकवला जात आहे.
पर्यायी जीवनशैलीचा अवलंब…आजच्या कचरा निर्मीतीला आपली आधुनिक जीवनशैलीच कारणीभूत आहे त्यामुळे आपण पर्यायी जीवनशैलीचा अवलंब केल्यास कचर्याचा प्रश्न सुटू शकेल यासाठी गारबेज टू गार्डन, सुतकताई सोलर पेटीचा वापर, गाय पालन करत आहे.
गावरान बियाणांचे जतन व संवर्धन व विक्री… संकरीत बियाणांपेक्षा गावरान बियाणं हे महत्वाची आहेत. त्यांच्यात रूजवण क्षमता व औषधी गुणधर्म अधिक असल्यामुळे नष्ट होत जाणारे वाण गोळा करून त्यांची लागवड करून त्यांचे जतन संवर्धन केले जाते. व त्याची छोटया प्रमाणात विक्री सुध्दा केली जाते.
सिंलेडर एवढाले डांगर…घराच्या संरक्षण भिंतीबाहेर लावलेला डांगराच्या बियाणाला केवळ घरातील खरकटे पाणी देत राहिलो. त्यातून दोन डांगर तयार झाले. एक-एक डांगर सिलेंडर एवढ्या आकाराचे व ३०-३० किलो वजनाचे होते.
बागेत सर्वच प्रकारचा भाजीपाला…बागेत सर्वच प्रकारच्या पालेभाजी, कंदमुळ, वेलवर्गीय, व फळभाज्या घेतल्या आहेत. कोणतेही शेडनेट न टाकता भाजीपाला तयार केला.
गांडूळ हीच खरी मित्र मंडळी…गांडूळ हा शेतकर्याचा मित्र असतो असे आपण शाळेत शिकलो आहोत. पण त्याचा प्रत्यक्ष वापर गच्चीवरच्या बागेत करायला हवा. त्यांची संख्या, वावर वाढला की बाग फलदायी, फुलदायी बनते. त्यामुळ सुका कचरा हा कधी कधी पोत्या पोत्याने भरून आणावा लागतो.
विरोध मावळला…कचरा त्यातल्या त्यात गच्चीवर शेती… या विषयाला बायको व शेजारीही विरोध करत होते. पण विषयाची व्याप्ती, प्रयोगाचीं यशस्वीता लक्षात येत गेल्याने आता विरोध मावळला आहे.नैसर्गिक बाग फुलवण्यासाठी देशी गायीचे पालन केले आहे. तिच्या शेण व गोमुत्राचा उपयोग नैसर्गिक कीडनियंत्रक, संजीवक बनवण्यासाठी व खत तयार करण्यासाठी केला जातो.
प्रचार प्रसारासाठी सॅकची कल्पना….गच्चीवरची बाग या संकल्पनेची इच्छुकांना माहितीव्हावी यासाठी पाठीवरील सॅकवर गच्चीवरची बाग अशी नेमप्लेट तयार करून प्रदर्शीत केली आहे. त्यामुळे गाडीवरून प्रवास करतांना लोक कौतुकाने बघतात. तसेच सिग्नलवर उभे असता त्याचे फोटो काढले जातात व नंतर संपर्क केला जातो. पाठीवरील बॅगेतच सारे कार्यालय सामावले आहे.
सध्या नाशिककरांच्या जाणीव जागृतीसाठी व दैनदिंन उपयोगासाठी छोटा हत्ती टाईप गाडी घेण्यात आली आहे. त्याव्दारे लोकांमध्ये जागृती घडवून आणत आहोत.
दहा ट्रक पालापाचोळा रिचवला…नाशिक येथील एका शेतात भाजीपाल्याची बाग तयार केली आहे. त्यासाठी विटांचे २००० वर्ग फूटाचे वाफे तयार करण्यात आले. हे वाफे भरण्यासाठी दहा ट्रक पालापाचोळा रिचवण्यात आला. हा पालापाचोळा जॉगिंग ट्रकवर गोळा करण्यात आला. हा पालापाचोळा जाळून टाकण्यात आला असता. तो या कामासाठी उपयोगात आणून एकप्रकारे वायू प्रदुर्षनापासून शहराला वाचवले आहे.
घरची टेरेस वरील बाग व इच्छुकांच्या बागा फुलवून देतांना मोठ्या प्रमाणात सुका पालापोचोळ्याचा वापर केला जातो. त्यासाठी वर्षभर सिमेंट्च्या आकाराएवढ्या २५०० पोती पालापाचोळा हा उचलला जातो. त्याचा वापर भाजीपाल्याचे बेड तयार करण्यासाठी केलाा जातो.
प्लास्टिकचे तुकडे जमा करतो…. ८० टक्के पालापोचळा व २० टक्के माती बाग फुलवण्यासाठी वापरतो. ८० टक्के पालापाचोळा गोळा करतांना छोटे छोटे असे असंख्य प्लास्टिकचे तुकडे आढळतात. ते इतरत्र कुठे फेकून न देता ते पोत्यात भरून घंटागाडीस दिले जातात. आतापर्यंत मागील सहा वर्षात साठ लाख तुकडे जमा केले आहेत.
संकट हीच संधी …सध्या नाशिकमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे. पाणी रोजच्या वापराला पुरत नसल्यामुळे सध्या गच्चीवरील माती वाळवून ठेवली आहे. माती वाळवणे ही गरजेचे असते. कारण सातत्याने माती ओली राहिली असता ती उत्पादन देत नाही. म्हणून पाणी टंचाईचे संकट हीच संधी मानून बाग नव्याने पूर्नभरीत केली आहे.
व्हिडीओ व्हालेंटिअर तर्फे देशपातळीवर बातमी…व्हिडीओ व्हालेंटिअर ही संस्था असून मानवीहक्क व पर्यावरण विषयी दृष्यमाध्यमांव्दारे बातमी तयार त्याविषयी जनमत तयार केले जाते. वाढत्या कचर्यांच्या समस्येवरील सृजनशील उपाय म्हणजे गच्चीवरची बाग होय. कचरा व्यवस्थापन शुन्य पैशात, सहज सोप्या पध्दतीने व्यवस्थापन करता येते हे या माहितीपटातून दर्शविले आहे.
आमचा हा व्यवसाय नाही.. तर पर्यावरणासंबधी जाणीव पूर्वक काम करण्याची ही आमची, कुटुंबाची बांधिलकी आहे. जी केवळ सेवा देत नसून लोकांच्या शिकण्याला व बागेला फूलवत आहोत.
संदीप चव्हाण, नाशिक, महाराष्ट्र में रहते है। पिछले चार साल से गारबेज टू गार्डन तंत्र को लेकर नाशिक में जहर से मुक्त सब्जिया और बागवानी बनाने के लिए लोगोंको प्रेरीत करते है। उनका सपना है की लोग अपने छोटी छोटी कौशिसे व्दारा जहर मुक्त सब्जिया घरपर ही उंगाये, पर्यावरण का खयाल रखे और निसर्ग के साथ जुडे रहे। इसलिए खेती की जरूरू नही है। शहर में जो भी जगह उपलब्ध है जैसे की (पंराडा, टेरेस, बाल्कनी, विंडो) उसीमें उपलब्ध नैसर्गिक संसाधनो (किचन वेस्ट, सुखे पत्ते,) के साथ और जो भी उपलब्ध वस्तूंए में बागवानी करने के लिए प्रेरीत करते है। आज शहर में डंपीग ग्रांऊड की समस्या बढ रही है। अगर लोगों ने इस तरह किचन वेस्ट का जगह ही पर उसका सुखाकर इस्तेमाल किया तो डंपीग ग्रांऊड की समस्या नही रहेगी। और यह एक कारगर व आसान तरीका है। किचन वेस्ट का कंपोस्टिंग बनाने की कोई जरूरी नही.. ऐसा उनका कहना है। खाद बनाना यह प्राकृतिक के खिलाफ है और उसमें समय का गवाना है यह उनका मानना है।
इसलिए वह पिछले १२ साल से प्रयत्न कर कर रहे है। इस प्रयत्नों के पिछले चार साल में अपने परिवार के लिए उपजिवाका का माध्यम बनाया है। उनके साथ उनका परिवार और दो लोगों को भी रोजगार की प्राप्ती होती है।
जहर मुक्त खेती की आज बहूत जरूरी है। इसके बारे में लोगों को जागृत करना और निसर्ग के प्रती उनका सहयोग लेना जरूरी समजते है। इसलिए उन्होंने एक देशी नस्ल की गाय पाली है। उसीके गोमुत्र और गोबर से टेरेस फार्मिंग में उपयोग करते है। इस काम को गती मिलने के लिए लंबे प्रयोसो के बाद एक चार पैयावाली गाडी खरेदी है। उसीसे थोडा आसानी हो गयी है। लेकीन यह सब कर्जा है। और कुछ कुछ करना है। उसके लिए और कर्जा मिलना मुश्किल है। और उनके सपने की कडी में कुछ साधनों की कमतरता है। अगर निचे नमुद कियें हुंए साधन का जुगाड हो जाता है तो में पर्यावरण के क्षेत्र में लोगोंका और बडी मात्रा में सहयोग ले सकत है। और अपनी सिंमेंट की निस्तेज वंसुधरा को हरे हरे रंग के कुछ रंग भरना चाहते है।
Petrol Shredder machine 65000/- छत पर बागवानी के लिए 80 % बायोमास ( नारियल के छिलके, गन्ने का छिलके, पेड पौध्दे के पत्ते, सुका हुआ किचन वेस्ट और 20% मिट्टी और खाद का उपयोग करते है। उपरोक्त मशीन व्दारा जो भि बायोमास लोगोव्दारा फेका या जलाया जाता है। उनको क्रश करके उपयोग कर सकते है। इससे दो फायदे है। एक कम जगह में जादा से जादा संग्रहीत कर सकते है। और ट्रान्सपोर्ट के लिए सुविधा होगी।
किताब प्रकाशन 75000/- अब गच्चीवरची बाग ( टेरेस फार्मिंग) ये किताब की व्दितीय आवृत्ती प्रकाशीत करना चाहते है। जो स्वः एक प्रशिक्षण पुस्तिका की तरह होगी। ताकी इसे पढकर इच्छुक लोंग अपने घरपे ही किताब पढकर छत पर बागवानी कर सकते है। इससे पर्यावरण के क्षेत्र में बढा काम खडा रह सकता है।
बफींग machine 10000/- मंदीर से जमा किए नारियल के कठीण कवच से मैं किचेन्स बनाना चाहते है। कुछ चिंजे हातोसेही बनायी है इसमें बहोत सारा वक्त लग जाता है। उपरी मशीन अगर मिल गयी तो मैं कोकोनट शेल से अलग अलग चिंजे बना सकते है। जो पर्यावरण पुरक होगी। और स्थानिक महिलांए के लिए रोजगार की प्राप्ती होगी।
Total amt: 150000/-(1.5 lakh)
उनके कार्यपर युट्यूब पर एक फिल्म है उसे हर रोज २५० लोग देखते है। इसी विषय में मैने लोकसत्ता इस वर्तमान पत्र में एक साल कॉलम लिखा है। इसी काम की विविध माध्यमों व्दारो समाचार पत्र में जीवन परिचय प्रकाशित हुए है।
You must be logged in to post a comment.