पाण्याचे लाड कमी करा…

दिवसभर काम करून सायंकाळी घरी येतो तेव्हा मरगळलेले, थकलेले असतो की आजारी ? थकलेले असतो ना. तसेच झाडे रोजच्या सुर्यप्रकाशात काम करून थकतात. तर थकणे आणी मेलेले झाडं यात फरक ओळखायला शिका.


less watering to Garden…

बरेचदा आपली बाग ही आपण लेकरांसारखी वाढवत असतो. कारण लहान बाळं ही जेवढा आपल्याला निर्व्याज आनंद देतात तेवढाच आनंद आपल्या बागेतील झाडे, पाने, फुले, फळे देत असतात.

रोजचा नेम म्हणून आपण झाडांना पाणी देतो. पण हे अति पाणी हेच झाडांसाठी घातक ठरते. जसे अति लाडामुळे मुलं बिघडतात. तशीच अति पाण्यामुळे झाडांचे आरोग्य बिघडते. झाडांच्या या पाण्याच्या मानसशास्त्राला समजून घेणे फार गरजेचे आहे. कारण पाणी हे माध्यम असे आहे की ते झाडांवर परिणाम तर करतेच पण मातीचे आरोग्य ही घडवण्यात मदत करत असते.

Advertisements

कुंडीतील झाडांना मिलीबग येणे, पाने कर्ली होणे (मुरडा, बोकड्या रोग) येणे, अकाली झाडं कोमेजून जाणे, हे अतिपाण्यामुळेच होतात. तर कधी कधी अति पाण्यामुळे झाडांना योग्य मोसमात फुले, फळे न लागणे हे सुध्दा घडते.

पाण्यात नत्राचे प्रमाण अधिक असते. पाण्याव्दारे नत्र हे अधिक झाडांच्या पानांमधे साचलं की त्यांच्या अन्न वाहून नेणार्या नसात नत्र साठते. (Saturate) होते. तेथे पुढील प्रक्रिया होत नाही. त्यामुळे त्या गाठी, अडथळा काढून टाकण्यासाठी मिलीबग, पिठ्या ढेकून येतात. जर यांची वाणवा असल्यास तेथे पाने मुरडतात. पाने आकसली गेली की त्यांची अन्न प्रक्रिया होत नाही. मग पुढे झाड आजारांना बळी पडते.

पाण्याचा योग्य ताण दिल्यास झाडांमधे असुरक्षतेची भावना तयार होते अशा वेळेस ते साहजिकच त्यांचा वंश वाढण्यासाठी फळांची उत्पत्ती करतात. त्यामुळे झाडांना आठवड्यातून एकदा पाणी देवू नये. जसे आपण आपली पचनसंस्था स्वच्छ व जोमाने कार्यरत व्हावी यासाठी उपवास पकडतो त्याप्रमाणे झाडांना अर्थात बागेला पाण्याचा उपवास घडवावा.

अधिक पाण्यामुळे कुंडीतील माती नेहमी ओली राहते. त्यामुळे तेथे विषाणूंची वाढ होते. खरंतर वर्षातून एकदा माती संपूर्णतः वाळवून घेणे फार गरजेचे असते. म्हणून तर आपले पूर्वज हे उन्हाळयात शेती नांगरून ठेवत असे. तसेच वर्षा दोन वर्षातून एकदा कुंडी रिपॉटींग करणे अर्थात माती बदलवणे (म्हणजे नवीन नाही पण आदला बदल करणे) गरजचे असते.

पाण्याच्या अति वापरामुळे कुंडीत अथवा मातीतील अन्न घटकांचे विषमतेने विभाजन होते. त्यातून निर्माण होणारे वायू अर्थात वाफसा पध्दतीतील गंध हा विपरीत पणे अन्न पुरवठा करत असतो. जसे की आपल्याला करपट ढेकर येणे हे अन्न व पाण्याचे विषम प्रमाण झाले की होते त्या प्रमाणे झाडांनाही होते. आपण जड आहार घेतला ( पुरणपोळी, रव्याचे लाडू, मासांहार) व त्यावर पुरेसे पाणी न पिले तर अपचन होणे तसेच त्याच्या विरोधात की आपण सुपच पिले व भरपूर पाणी पिले तर भूक लागणे पुढे कमजोरी जाणवणे असा प्रकार झाडांच्या बाबतीत होत असतो.

झाडांना रोज पाणी देत असल्यास त्यात खंड पाडा. बरेचदा मंडळी सांयकाळ झाली की झाडे (मरगळलेली असतात) मेली की काय घाबरून जातात.  आजारी आहेत असे सागंतात. एक सांगा, आपण रोज दिवसभर काम करून सायंकाळी घरी येतो तेव्हा मरगळलेले, थकलेले असतो की आजारी ? थकलेले असतो ना. तसेच झाडे रोजच्या सुर्यप्रकाशात काम करून थकतात. तर थकणे आणी मेलेले झाडं यात फरक ओळखायला शिका. त्यांना सारखं सारखं पाणी देवू नका. वातावरणातील उष्मा कमी झाला की ते पुन्हा टवटवीत होतात.

कुंड्या योग्य प्रकारे भरा. बरेचदा मंडळी कुंडी भरताना माती व खत टाकतात.

खताचे अवशेष वापरून झाले की उरते फक्त माती. ही माती कालातंराने दगडासारखी टणक, जड होते. त्यात एकतर पाणी साचून राहते. मुळांना श्वास घ्यायला जागा उरत नाही. अशा वेळेस कुंडी भरताना पालापाचोळा, किंवा बिशकॉमचा वापर करावा. 

कुंडीत जेवढी हवा खेळती राहिल तेवढे कुंडीतील झाडं अधिक टवटवीत राहते. कारण मुळंसुध्दा श्वास घेतात. बरेचदा मुळं हे हवेतून पाणी ग्रहण करत असतात. म्हणूनच इस्त्राईल सारखा देश थेंब न थेंब पाण्याचे नियोजन करून जगाला पोसण्याची धमक दाखवतो त्याचे कारण म्हणजे त्यांनी पाण्याचे ओळखलेले महत्व. व आपल्याकडे शेतीसाठी पाण्यााच अधिकचा होणारा वापर हा जमीनी खारपट, नापिकी होण्यास कारणीभूत ठरत आहेत. अर्थात त्यात रासायनिक खतांचाही वाटा आहेच.

पाण्याच्या अधिक ताणामुळे किंवा अधिकच्या पुरवठ्यामुळे फळगळती होत असते. त्यामुळे योग्य पाणी कसे द्यावे याचा संभ्रम निर्माण होईल. आता हे अनेक कारणांवर अवलंबून आहे. मातीचा पोत कसा आहे, पाण्याचे बाष्पीभवन कसे होते. वाहणारा वारा किती व वेग कसा आहे. झाडाची प्रकृती नेमकी कोणती आहे या सार्यांचा विचार करूनच पाणी देणं गरजेचे आहे. आईला सांगावे लागते का बाळाला कधी, केव्हां, किती पाणी द्यावे. हे तिला हद्यापासून समजते. त्याचे कुठेही पुस्तक नाही, गाईडलाईन नाही. कारण ती मनापासून बाळाशी जुळलेली असते. तशीच आपली नाळ सुध्दा बागेशी जुळली पाहिजे. म्हणून तर बाळ व बाग ही या शब्दांची सुरवात एकाच अक्षराने तर होतेच शिवाय त्यांची संख्या सुध्दा सारखीच आहेत.

तसेच बागेत झाडांवर मिलीबग, पिठ्या ढेकूण, मावा या सारखे आजार आल्यास त्यावर नैसर्गिक औषधांची नक्कीच फवारणी करा. पण फक्त फवारणी करून चालत नाही. त्यासाठी झाडांला नेमकं पाणी कमी पडलं की जास्त झालयं याचा विचार करा. जास्त झालं असेल तर कमी द्या. जसे रोग्याला आजारावर औषधपण देतात व पथ्थ पण पाळायला सांगतात. त्यामुळे पाण्याचे पथ्थ पाळा.

आम्ही खालील मो. क्रंमाकावरून व्हाट्सअपवर गार्डेन अपडेटस पाठवत असतो.

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

खात्री नव्हती एवढ्या उथळ वाफ्यामधे पपई उगवेल का ? पण खरचं गच्चीवरची बाग म्हणजे जादू आहे

जाणून घ्या, नाशिक मधील रहाळकर कुटुंबियांनी नैसर्गिकरित्या विषमुक्त भाजीपाला कसा पिकवला… कमीत कमी वेळ देवून निसर्गाच्या कलेने घेत शेतीचा अनुभव कसा घेतात..


“की फरक पैंदा”?

घरी भाज्या पिकवणे व त्यांचे सेवन करणे हा सुध्दा सुक्ष्म धागा आहे. जर तो विस्कटला तर आपलं शरीर ही कापड विस्कटल्या प्रमाणे तक्रार करू लागतं. एक वेळ कापड बदलवता येईल. पण जीवात जो पर्यंत प्राण आहे. ते काहीही करून बदलवता येत नाही…


<a href=”http://Image%20by Gordon Johnson from Pixabay.wordpress.com/2019/05/ekg-2069872_1280.png” target=”_blank” rel=”noopener”>

ekg-2069872_1280.png

“की फरक पैंदा”?“क्या फरक पडता है”। “काय फरक पडतो”? असे आपले रोजच्या जीवनात कुठे ना कुठे एकदा तरी म्हणत असतो. एकाद्या व्यवहारात आपण तडजोड करतो तेव्हा हे वाक्य हमखास आपल्या डोक्यात येते. आता “की फरक पैंदा है” असं आणि आपल्या गच्चीवची बागेचा येथे का संबध असं आपल्या मनात आले असणार.. आलेच पाहिजे.. कारण अत्तर सोडून आपण कुत्रिम सुंगध वापरतांना सुध्दा फरक पडत असेन तर आपल्या रोजच्या जगण्यात ज्या भाज्या बाजारातून ताटात येतात. त्याचा सुध्दा आपल्या शरिरावर नक्कीच फरक पडत असतो.गेल्या सहा वर्षापासून रसायमुक्त भाजीपाला पिकवून देण्याचे नाशिक मधे पूर्ण वेळ काम चालू आहे. त्याआधी घरच्या गच्चीवर विषमुक्त भाज्या पिकवण्याचे प्रयोग चालू होते. काही ना काही रोजची भाजी मिळत होती. रोजच्या डोळ्यासमोरच्या भाज्या खाल्यामुळे घरातल्या छोट्या छोट्या आजारावंर होणारा खर्च बराच आटोक्यात आला होता. पण मागील वर्षी घरच्या बागेकडे दुर्लक्ष केले (खर तर या काळात इतरांच्या ठिकाणी भाज्या उगवण्याचं प्रमाण वाढलं होत) त्यामुळे साहजिकच घरी उगवलेल्या भाज्या या ताटात येणं कमी झालं. (त्याचा परिणाम काय होणार याचा अंदाज होता पण प्रयोग करून पहायचं होत) आणि झाला तसचं. घरच्या भाज्या खाणं कमी म्हणजे जवळ जवळ नाहीच झालं. नि दिवाळीमधे बायकोला हायपरटेशंनमुळे आठवडा भर अडमीट कराव लागलं. नको तेवढा पाण्यासारखा पैसा दवाखान्यात खर्च झाला. मनस्ताप झाला तो वेगळाच. (कळत असूनही विषाची परिक्षा घेतली) त्या काळात काम बुडालं ते नुकसान वेगळचं. तसंच शरिरात रासायनिक औषधांचा मारा झाला तो वेगळाच. घरी भाज्या न पिकवणं हे एकूणच महागात पडलं होतं.शक्यतो रोज संध्याकाळी वरण भात हा ठरलेला असतो. इतर कडधान्याच्या भाज्याही होतातच. (बाजारातल्या ताज्या भाज्या पेक्षा कडधान्यात कमी विषतत्व असतात. कारण बाजारात आलेल्या भाज्यावर रसायनं मारून २४ तासाच्या आत त्या शिजवून पचवलेल्या असतात. रेसुड्यू फ्री नसतात) त्यामुळे घरच्या हिरव्या भाज्या आठवड्यात तीन –चार असल्यातरी पुरेशा होतात. पण त्याहीकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं. याचा मला चांगलाच अनुभवाचा चटका लागलाय.

आपण बाजारातून रोजच्या भाज्या खातो त्यात कुठेना कुठे त्यात रसायनांचे अंश हे आपल्या पोटात, पचसंस्थेतून रक्तात मिसळतात. त्यातल्या त्यात आपलं रोजचा व्यायाम नसतोच. त्यातून हायपरटेशंन सारख्या गोष्टी घडतात. मी प्रयोग म्हणून केलेला हा प्रयत्न करतांना मी पण असेच म्हणालो होतो की काय फरक पडतो. पण फरक पडतो…. घरी उगवलेल्या भाज्या या मूठभर असल्यातरी तरी त्या औषधांच काम करतात. नि बाजारातल्या भाज्या स्लो पाईझनचे काम करतात. तेव्हा निवड तुमची आहे. ‘’की फरक पैंदा’’ म्हणून बेफिकीर होऊन चालणार नाही…. एकादे वस्त्र हे जसे सुक्ष्म धाग्यानीं विणून तयार होतं. तसचं आपल शरीर, आपलं जगणं सुध्दा छोट्या छोट्या प्रयत्नांनीच समृध्द, सुदृढ होत असतं. ते आपल्या लक्षात येत नाही… घरी भाज्या पिकवणे व त्यांचे सेवन करणे हा सुध्दा सुक्ष्म धागा आहे. जर तो विस्कटला तर आपलं शरीर ही कापड विस्कटल्या प्रमाणे तक्रार करू लागतं. एक वेळ कापड बदलवता येईल. पण जीवात जो पर्यंत प्राण आहे. ते काहीही करून बदलवता येत नाही… हे लक्षात घेवूनच आपल्या रोजच्या जगण्यात, धडपडण्यात घरच्या भाज्या घरीच पिकवण्याचा प्रयत्न करा. हळू हळू त्यात मास्टरकी येणारच.

वरील चित्रफितीत दाखवल्या प्रमाणे आम्ही जमीनीवर किंवा गच्चीवर विटांच्या वाफे बनवून रसायनमुक्त भाज्या पिकवून देतो.लेख आवडला तर नक्की लाईक,शेअर, व कंमेट करा…संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.9850569644/ 8087475242www.gacchivarchibaug.in

जाहिरात: उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तू व उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर करून घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला पिकवा. गच्चीवरची बाग पुस्तक (व्दितीय आवृत्ती)
घरपोहोच by post 240/-
WTS app 9850569644 / 8087475242
http://www.gacchivarchibaug.in


संदीप चव्हाण नाशिक.

Needs to equipments/ funds


vertical garden 1 1 (1098)संदीप चव्हाण, नाशिक, महाराष्ट्र में रहते है। पिछले चार साल से गारबेज टू गार्डन तंत्र को लेकर नाशिक में जहर से मुक्त सब्जिया और बागवानी बनाने के लिए लोगोंको प्रेरीत करते है। उनका सपना है की लोग अपने छोटी छोटी कौशिसे व्दारा जहर मुक्त सब्जिया घरपर ही उंगाये, पर्यावरण का खयाल रखे और निसर्ग के साथ जुडे रहे। इसलिए खेती की जरूरू नही है। शहर में जो भी जगह उपलब्ध है जैसे की (पंराडा, टेरेस, बाल्कनी, विंडो) उसीमें उपलब्ध नैसर्गिक संसाधनो (किचन वेस्ट, सुखे पत्ते,)  के साथ और जो भी उपलब्ध वस्तूंए में बागवानी करने के लिए प्रेरीत करते है। आज शहर में डंपीग ग्रांऊड की समस्या बढ रही है। अगर लोगों ने इस तरह किचन वेस्ट का जगह ही पर उसका सुखाकर इस्तेमाल किया तो डंपीग ग्रांऊड की समस्या नही रहेगी। और यह एक कारगर व आसान तरीका है। किचन वेस्ट का कंपोस्टिंग बनाने की कोई जरूरी नही.. ऐसा उनका कहना है। खाद बनाना यह प्राकृतिक के खिलाफ है और उसमें समय का गवाना है यह उनका मानना है।

इसलिए वह पिछले १२ साल से प्रयत्न कर कर रहे है। इस प्रयत्नों के पिछले चार साल में अपने परिवार के लिए उपजिवाका का माध्यम बनाया है। उनके साथ उनका परिवार और दो लोगों को भी रोजगार की प्राप्ती होती है।

जहर मुक्त खेती की आज बहूत जरूरी है। इसके बारे में लोगों को जागृत करना और निसर्ग के प्रती उनका सहयोग लेना जरूरी समजते है। इसलिए उन्होंने एक देशी नस्ल की गाय पाली है। उसीके गोमुत्र और गोबर से टेरेस फार्मिंग में उपयोग करते है।  इस काम को गती मिलने के लिए लंबे प्रयोसो के बाद एक चार पैयावाली गाडी खरेदी है। उसीसे थोडा आसानी हो गयी है। लेकीन यह सब कर्जा है। और कुछ कुछ करना है। उसके लिए और कर्जा मिलना मुश्किल है। और उनके सपने की कडी में कुछ साधनों की कमतरता है। अगर निचे नमुद कियें हुंए साधन का जुगाड हो जाता है तो  में पर्यावरण के क्षेत्र में लोगोंका और बडी मात्रा में सहयोग ले सकत है। और अपनी सिंमेंट की निस्तेज वंसुधरा को हरे हरे रंग के कुछ रंग भरना चाहते है।

  • Petrol Shredder machine 65000/- छत पर बागवानी के लिए 80 % बायोमास ( नारियल के छिलके, गन्ने का छिलके, पेड पौध्दे के पत्ते, सुका हुआ किचन वेस्ट और 20%  मिट्टी और खाद का उपयोग करते है। उपरोक्त मशीन व्दारा जो भि बायोमास लोगोव्दारा फेका या जलाया जाता है। उनको क्रश करके उपयोग कर सकते है। इससे दो फायदे है। एक  कम जगह में जादा से जादा संग्रहीत कर सकते है। और ट्रान्सपोर्ट के लिए सुविधा होगी।
  • किताब प्रकाशन 75000/- अब गच्चीवरची बाग ( टेरेस फार्मिंग) ये किताब की व्दितीय आवृत्ती प्रकाशीत करना चाहते है। जो स्वः एक प्रशिक्षण पुस्तिका की तरह होगी। ताकी इसे पढकर इच्छुक लोंग अपने घरपे ही किताब पढकर छत पर बागवानी कर सकते है। इससे पर्यावरण के क्षेत्र में बढा काम खडा रह सकता है।
  • बफींग machine 10000/- मंदीर से जमा किए नारियल के कठीण कवच से मैं किचेन्स बनाना चाहते है। कुछ चिंजे हातोसेही बनायी है इसमें बहोत सारा वक्त लग जाता है। उपरी मशीन अगर मिल गयी तो मैं कोकोनट शेल से अलग अलग चिंजे बना सकते है। जो पर्यावरण पुरक होगी। और स्थानिक महिलांए के लिए रोजगार की प्राप्ती होगी।

Total amt: 150000/-(1.5 lakh)

उनके कार्यपर युट्यूब पर एक फिल्म है उसे हर रोज २५० लोग देखते है। इसी विषय में मैने लोकसत्ता इस वर्तमान पत्र में एक साल कॉलम लिखा है। इसी काम की विविध माध्यमों व्दारो समाचार पत्र में जीवन परिचय प्रकाशित हुए है।

www.gacchivarchibaug.in

www.youtube.com

 

 

%d bloggers like this: