पाण्याचे लाड कमी करा…

दिवसभर काम करून सायंकाळी घरी येतो तेव्हा मरगळलेले, थकलेले असतो की आजारी ? थकलेले असतो ना. तसेच झाडे रोजच्या सुर्यप्रकाशात काम करून थकतात. तर थकणे आणी मेलेले झाडं यात फरक ओळखायला शिका.


less watering to Garden…

बरेचदा आपली बाग ही आपण लेकरांसारखी वाढवत असतो. कारण लहान बाळं ही जेवढा आपल्याला निर्व्याज आनंद देतात तेवढाच आनंद आपल्या बागेतील झाडे, पाने, फुले, फळे देत असतात.

रोजचा नेम म्हणून आपण झाडांना पाणी देतो. पण हे अति पाणी हेच झाडांसाठी घातक ठरते. जसे अति लाडामुळे मुलं बिघडतात. तशीच अति पाण्यामुळे झाडांचे आरोग्य बिघडते. झाडांच्या या पाण्याच्या मानसशास्त्राला समजून घेणे फार गरजेचे आहे. कारण पाणी हे माध्यम असे आहे की ते झाडांवर परिणाम तर करतेच पण मातीचे आरोग्य ही घडवण्यात मदत करत असते.

Advertisements

कुंडीतील झाडांना मिलीबग येणे, पाने कर्ली होणे (मुरडा, बोकड्या रोग) येणे, अकाली झाडं कोमेजून जाणे, हे अतिपाण्यामुळेच होतात. तर कधी कधी अति पाण्यामुळे झाडांना योग्य मोसमात फुले, फळे न लागणे हे सुध्दा घडते.

पाण्यात नत्राचे प्रमाण अधिक असते. पाण्याव्दारे नत्र हे अधिक झाडांच्या पानांमधे साचलं की त्यांच्या अन्न वाहून नेणार्या नसात नत्र साठते. (Saturate) होते. तेथे पुढील प्रक्रिया होत नाही. त्यामुळे त्या गाठी, अडथळा काढून टाकण्यासाठी मिलीबग, पिठ्या ढेकून येतात. जर यांची वाणवा असल्यास तेथे पाने मुरडतात. पाने आकसली गेली की त्यांची अन्न प्रक्रिया होत नाही. मग पुढे झाड आजारांना बळी पडते.

पाण्याचा योग्य ताण दिल्यास झाडांमधे असुरक्षतेची भावना तयार होते अशा वेळेस ते साहजिकच त्यांचा वंश वाढण्यासाठी फळांची उत्पत्ती करतात. त्यामुळे झाडांना आठवड्यातून एकदा पाणी देवू नये. जसे आपण आपली पचनसंस्था स्वच्छ व जोमाने कार्यरत व्हावी यासाठी उपवास पकडतो त्याप्रमाणे झाडांना अर्थात बागेला पाण्याचा उपवास घडवावा.

अधिक पाण्यामुळे कुंडीतील माती नेहमी ओली राहते. त्यामुळे तेथे विषाणूंची वाढ होते. खरंतर वर्षातून एकदा माती संपूर्णतः वाळवून घेणे फार गरजेचे असते. म्हणून तर आपले पूर्वज हे उन्हाळयात शेती नांगरून ठेवत असे. तसेच वर्षा दोन वर्षातून एकदा कुंडी रिपॉटींग करणे अर्थात माती बदलवणे (म्हणजे नवीन नाही पण आदला बदल करणे) गरजचे असते.

पाण्याच्या अति वापरामुळे कुंडीत अथवा मातीतील अन्न घटकांचे विषमतेने विभाजन होते. त्यातून निर्माण होणारे वायू अर्थात वाफसा पध्दतीतील गंध हा विपरीत पणे अन्न पुरवठा करत असतो. जसे की आपल्याला करपट ढेकर येणे हे अन्न व पाण्याचे विषम प्रमाण झाले की होते त्या प्रमाणे झाडांनाही होते. आपण जड आहार घेतला ( पुरणपोळी, रव्याचे लाडू, मासांहार) व त्यावर पुरेसे पाणी न पिले तर अपचन होणे तसेच त्याच्या विरोधात की आपण सुपच पिले व भरपूर पाणी पिले तर भूक लागणे पुढे कमजोरी जाणवणे असा प्रकार झाडांच्या बाबतीत होत असतो.

झाडांना रोज पाणी देत असल्यास त्यात खंड पाडा. बरेचदा मंडळी सांयकाळ झाली की झाडे (मरगळलेली असतात) मेली की काय घाबरून जातात.  आजारी आहेत असे सागंतात. एक सांगा, आपण रोज दिवसभर काम करून सायंकाळी घरी येतो तेव्हा मरगळलेले, थकलेले असतो की आजारी ? थकलेले असतो ना. तसेच झाडे रोजच्या सुर्यप्रकाशात काम करून थकतात. तर थकणे आणी मेलेले झाडं यात फरक ओळखायला शिका. त्यांना सारखं सारखं पाणी देवू नका. वातावरणातील उष्मा कमी झाला की ते पुन्हा टवटवीत होतात.

कुंड्या योग्य प्रकारे भरा. बरेचदा मंडळी कुंडी भरताना माती व खत टाकतात.

खताचे अवशेष वापरून झाले की उरते फक्त माती. ही माती कालातंराने दगडासारखी टणक, जड होते. त्यात एकतर पाणी साचून राहते. मुळांना श्वास घ्यायला जागा उरत नाही. अशा वेळेस कुंडी भरताना पालापाचोळा, किंवा बिशकॉमचा वापर करावा. 

कुंडीत जेवढी हवा खेळती राहिल तेवढे कुंडीतील झाडं अधिक टवटवीत राहते. कारण मुळंसुध्दा श्वास घेतात. बरेचदा मुळं हे हवेतून पाणी ग्रहण करत असतात. म्हणूनच इस्त्राईल सारखा देश थेंब न थेंब पाण्याचे नियोजन करून जगाला पोसण्याची धमक दाखवतो त्याचे कारण म्हणजे त्यांनी पाण्याचे ओळखलेले महत्व. व आपल्याकडे शेतीसाठी पाण्यााच अधिकचा होणारा वापर हा जमीनी खारपट, नापिकी होण्यास कारणीभूत ठरत आहेत. अर्थात त्यात रासायनिक खतांचाही वाटा आहेच.

पाण्याच्या अधिक ताणामुळे किंवा अधिकच्या पुरवठ्यामुळे फळगळती होत असते. त्यामुळे योग्य पाणी कसे द्यावे याचा संभ्रम निर्माण होईल. आता हे अनेक कारणांवर अवलंबून आहे. मातीचा पोत कसा आहे, पाण्याचे बाष्पीभवन कसे होते. वाहणारा वारा किती व वेग कसा आहे. झाडाची प्रकृती नेमकी कोणती आहे या सार्यांचा विचार करूनच पाणी देणं गरजेचे आहे. आईला सांगावे लागते का बाळाला कधी, केव्हां, किती पाणी द्यावे. हे तिला हद्यापासून समजते. त्याचे कुठेही पुस्तक नाही, गाईडलाईन नाही. कारण ती मनापासून बाळाशी जुळलेली असते. तशीच आपली नाळ सुध्दा बागेशी जुळली पाहिजे. म्हणून तर बाळ व बाग ही या शब्दांची सुरवात एकाच अक्षराने तर होतेच शिवाय त्यांची संख्या सुध्दा सारखीच आहेत.

तसेच बागेत झाडांवर मिलीबग, पिठ्या ढेकूण, मावा या सारखे आजार आल्यास त्यावर नैसर्गिक औषधांची नक्कीच फवारणी करा. पण फक्त फवारणी करून चालत नाही. त्यासाठी झाडांला नेमकं पाणी कमी पडलं की जास्त झालयं याचा विचार करा. जास्त झालं असेल तर कमी द्या. जसे रोग्याला आजारावर औषधपण देतात व पथ्थ पण पाळायला सांगतात. त्यामुळे पाण्याचे पथ्थ पाळा.

आम्ही खालील मो. क्रंमाकावरून व्हाट्सअपवर गार्डेन अपडेटस पाठवत असतो.

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Lockdown : 2 Bumper offer

कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी गच्चीवरची बागे तर्फे विक्री होणार्या उत्पादने ही उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Lockdown : 2 Bumper offer

कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी गच्चीवरची बागे तर्फे विक्री होणार्या उत्पादने ही उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आमच्या उत्पादनाच्या सविस्तर माहितीसाठी www.gacchivarchibaug.in हे संकेतस्थळ अभ्यासावे.

 उत्पदनांचे मुळ विक्री किमत व आताची कमी केलेली रक्कम यांची यादी खालील प्रमाणे

(सदर उत्पादनातील काही उत्पादने ही डिजिटल स्वरूपात आहेत. तर पुस्तके, ग्रो बॅग्जस, बियाणे ही  ही  बाय पोस्ट ने पाठवली जातील. बाकीची उत्पादने ही आपल्याला गच्चीवरची बाग एक्सटेंशन येथून आपल्याला घेवून जावे लागतील, कारण कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आम्हाला आमची उत्पादने १५ मे पर्यंत घरपोहोच पोहचवता येणार नाहीत)

  • Bishcom ( Potting Mix) 15 Kg –  Offer Price 10 Kg
  • गच्चीवरची बाग छापिल पुस्तक (पोस्ट खर्चा सहित 240/-) – offer Price 140/-
  • तुम्हाला माहित आहे का ? छापिल पुस्तक (पोस्ट खर्चा सहित 240/-) – offer Price 140/-
  • डॉ. बगीचा (पी.डी.एफ) 150/- Offer Price 99/-
  • तुम्हाला माहित आहे का ? ( पी.डी.एफ) 150/- Offer Price 99/-
  • जिवामृत, गोमुत्र, ह्युमिक जल, फ्रुट इंजाईम 21 रू. प्रति लिटर – Offer Price 11/- प्रति लिटर.
  • दशपर्णी 25 रू. लिटर Offer Price 15 रू. लिटर.
  • ग्रो बॅग्जस 16/- प्रति नग
  • भाजीपाला बियाणे 11 रू.
  • निमपेंड 51 रू किलो.
  • तंबाखू पावडर 51 रू. किलो.
  • लाल माती सिमेंट गोणी भरून 120 रू. Offer Price 100/-

टीपः वरील साहित्य आपल्याला हवे असल्यास पण आता घेवून जाणे शक्य नसल्यास तर तुम्ही साहित्याची यादी प्रमाणे आगाऊ पेमेंट करता येईल. त्याची तुम्हाला पावतीपण देण्यात येईल. तुमच्या सवडीने ते केव्हांही घेवून जाता येईल.

घरपोहोच पोहचवणे शक्य झाल्यास पूर्वीचीच किंमत + डिलेव्हरी चार्जेस आकारले जातील

  • Online स्वरूपात तुमच्या कुंटुबासाठी गच्चीवरची बाग ही कार्यशाळा आयोजीत करता येईल. त्याची 2500/- ऐवजी 1500 रू. फी असेन. (एक तास)

वरील उत्पादने नाशिक अथवा नाशिक बाहेरील व्यक्तिनां व्यवसायीक स्वरूपात विक्रि करावयास दयावयाची आहेत. त्यांनी कृपया संपर्क साधावा. इच्छुकांना केवळ वस्तूची विक्री केली तरी चालणार आहेत. वस्तूच्या वापरा विषयी अथवा ग्राहकांच्या समाधानासाठी आमच्याकडून सेंट्रल सपोर्ट केला जाईल.

आमच्या समोर उभ्या असलेल्या आर्थिक आव्हानांसाठी व तुमच्या सकारात्मक प्रतिसादासाठी वाचा

पुढील लेख वाचा

करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात गच्चीवरची बाग

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक

9850569644 / 8087475242

तुम्हाला माहित आहे का ? E Book

कचरा व्यवस्थापन, पर्यावऱण, आरोग्य, लोकसहभाग, भाजीपाल्याची बाग, निसर्ग अशा विविध विषयावर “घंटो का ग्यान मिनंटो में”  थोडक्यात आपली डोळे उघडणारी ही वाक्ये  तुम्हाला माहित आहे का या पुस्तिकेव्दारे देण्याचा प्रयत्न केला आहे.


तुम्हाला माहित आहे का ? E Book

Instamojo वर खरेदी करण्यासाठी

https://imojo.in/2r37ao8

कचरा व्यवस्थापन, पर्यावऱण, आरोग्य, लोकसहभाग, भाजीपाल्याची बाग, निसर्ग अशा विविध विषयावर “घंटो का ग्यान मिनंटो में”  थोडक्यात आपली डोळे उघडणारी ही वाक्ये  तुम्हाला माहित आहे का या पुस्तिकेव्दारे देण्याचा प्रयत्न केला आहे. काम करता करता चिंतनातून सुचणारी वाक्य सुरवातीला फेसबुकवर प्रकाशित करत गेलो. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या वाक्यांचे पुस्तक रूपात दिले आहे. छापिल मुळ पुस्तकाची किमंत 240 रू असून पी.डी.एफ स्वरूपात आपल्याला केवळ 99 रूपयात उपलब्ध करून दिली आहे.

Fast Food? TMAK Book 5/636

घरचा पानकोबीची चव वेगळीच असते. एकदाच त्याची भाजी करा. यथासावकाश कॅबेज मोठा झाला. त्यांनी कढईत फोडणी दिली. घरातील मुलगी केवळ फोडणी दिल्याबरोबर भाजीच्या नुसत्या सुंगधाने तो तिला पहिल्यांदा खावासा वाटला. यातच घरच्या भाजीचे महत्व लक्षात येते.


menu-3206749_1280.jpgमुलं पालेभाज्या खायला नाक का मुरडतात? फास्ट फूड, जे अबाल वृध्दांना का आवडत? थोडा विचार तर करा… संदर्भः तुम्हाला माहित आहे का? पान. न.१२ कोट न. ५/६३६“अहो आमची मुलं भाज्या खायलाच नाही म्हणतात”. अशी प्रत्येक गृहदक्ष असलेल्या आईची तक्रार असते. आपण फक्त तक्रार करतो. त्यावर उपाय शोधत नाही. अर्थात त्यावर आजच्या बाजारातील उत्पादनांनी बेमालूम तोडगा काढलाय. मुलांना अमूक तमूक पोषणासाठी आमची उत्पादने वापरा. मग काय आपण ती रासायनिक दुधात देवून त्यांना वाढवत असतो. किंवा मुलांना समजायला लागल की दुकानात मिळाणारी दोन मिनटांत तयार होणारा किंवा पॅक्ड असणार्या उत्पादनांना बळी पडतात. त्यात “तेढा है लेकीन मेरा है” पासून तर कुरकुरे, चिप्स पासून सारेच आले. स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून तयार केलेले पदार्थ व तेही कनिष्ठ अशा प्लास्टिकच्या वेष्टनात मिळायला लागलेत.बरं हे फक्त मूलंच खात नाही. आपल्या मोठ्यांच्या जिभेलाही त्याची चव लागली की ते खावेसे वाटते. बरं ते एवढंस खावून पोट भरणं सोडाच खाल्ल्याचे समाधानही मिळत नाही. अर्थातच त्यात त्यांनी अशा प्रकारचे रसायनं मिसळेली असतात. की ते खात रहावसं वाटतं. याला चटक लागणं नाही तर व्यसन लागणं म्हणतात. तर अशी ही उत्पादने वय झालेल्यांनाही आवडतात. जसे मूलांना कार्टुन बघावसं वाटतं तसेच वृध्दांनाही आवडतं. त्यातलं ढिशुम ढिशुम…पाहण्यातून अबाल वृध्द सारेच आनंद लुटतात. कारण लहान मूल व वृध्द मंडळी याची आवड निवड सारखीच होत जाते. काही वृध्द व्यक्ती तर दुकानात मिळणारी साखरेच्या गोळ्या खातांना पाहिली आहेत. असो…आपण कर्ते म्हणून याचा विचार केला पाहिजे. फक्त वयच तसं आहे म्हणून तो प्रश्न बाजूला सारण्यासारखा नाही. हे सारं चटपटीत खावंस वाटणं हे सारं रासायनिक प्रिर्झेव्हेटीवची कमाल आहे. जी आपल्याला घातक असतात. आपल्या परंपरेत असे फास्ट फूड नाहीच काहो? दोन मिनटातं तयार होणारी पदार्थ. शेवया, पोहे, मुरमुरे, ओली भेळ, राजगिरांचे लाडू… पण हे सारं आपण लक्षात कुठं घेतो. तर असो… मुद्दा होता. मुलं भाज्या खात नाही..माझा एक अनुभव आपल्याला सांगावासा वाटतो…दहा वर्षापूर्वी नुकतीच बागेला गच्चीवर सुरवात केली होती. टेरेसवरच्या बागेत चार टोमॅटो पिकले होते. ते खाली किचनमधे बायकोला आणून दिले. तिनेही नुकतेच बाजारातून टोमॅटो विकत आणले होते. बाजारातले व घरचे टोमॅटो तिने एकत्र करून फ्रिज मधे ठेवून दिले. माझा मुलगा बाहेर खेळून आला व त्याला टोमॅटो खावसा वाटला. बायकोने त्याला घाई गडबडीत हाताला आला तो टोमॅटो त्याच्या हातात दिला. त्याला तो खूप आवडला. त्याला दुसरा खावासां वाटला. तिने दुसरा दिला. पण या वेळेस त्याने तोंडातून थूंकून टाकला. छि… काय हा टोमॅटो, म्हणून खेळायला गेला.नंतर यावर घरात चर्चा झाली. मी जरा चौकशी केली असता. असे लक्षात आले की पहिला टोमॅटो त्याने जो खाल्ला, त्याला आवडला तो बागेलतला विषमुक्त होता. तर दुसरा हा बाजारातला होता. बघा मुलांना खाण्यांच्या बाबतीत जी नैसर्गिक चव आहे त्याला ते किती पटकन प्रतिक्रीया देतात. (बाजारातल्या भाज्या न खाणं म्हणजे त्याला चवच नसते हे मुख्य कारण आहे) आपण मोठ्यांच्या जिव्हा आता बोथट झाल्या आहेत. त्या त्या भाजीचे महत्व आहे म्हणून गिळलं नाही गेलं तरी ते पोटातं ढकलतो आहोत. नेमकं मुलाना काय आवडतं त्याचा कुत्रीम इंसेन्स पॅक्ड् फूड मधे बेमालूमपणे मिसळेला असतो. जो मोठ्यांच्या लक्षात येत नाही. पॅक्ड फूड खाण्यानेच भारतातील मूलांचे लठ्ठपणाचा आजार वाढतोय. गुबगुबीत असणं वेगळं व अंगावर सुज असणं वेगळं हे आपल्या लक्षात येत नाही किंवा जाणून बूजून त्याकडे दुर्लक्ष करत आहोत.घरच्या भाजीचा दुसरा एक अनुभव आहे. आम्ही एका ताईंच्या घरी भाजीपाल्याची बाग फूलवयाला सुरवात झाली. त्यात पान कोबी (कॅबेज) ही लागवड केला. पण घरातली आठवतील जाणारी मुलगी म्हणाली काका बागेत पान कोबी नका लावू. मला अजिबात आवडत नाही. त्या ताईही म्हणाल्या की जागा अडेल व तसेही कुणाला आवडत नाही म्हणून लागवड करूच नका. मी त्यांना आग्रह केला. घरचा पानकोबीची चव वेगळीच असते. एकदाच त्याची भाजी करा. यथासावकाश कॅबेज मोठा झाला. त्यांनी कढईत फोडणी दिली. घरातील मुलगी केवळ फोडणी दिल्याबरोबर भाजीच्या नुसत्या सुंगधाने तो तिला पहिल्यांदा खावासा वाटला. यातच घरच्या भाजीचे महत्व लक्षात येते.एकूणच काय हरकत आहे. चार कुंड्यामधे चार भाज्या लावयाला. आपल्याला निसर्गाची घडी बसवून दयावयाची आहे. बाकी सारं काम निसर्गच करणार आहे. माझा अनुभव असा सांगतो की घरचा एक टोमॅटो सुध्दा आपल्या जेवणातील वरण हे चवदार बनवू शकते. बघा… प्रयत्न करून. जमेलच.

लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.cc tmak COVER.jpg

लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)पुस्तक माहिती- (PDF Download)पुस्तक माहिती (Video)Online खरेदीसाठी लिंक पहा..पुस्तकाबद्दलची या पूर्वी प्रकाशीत झालेली माहिती वाचा…http://www.gacchivarchibaug.inटीपः अशाच टीप्स वाचण्यासाठी व्हाट्स अप करा… ९८५०५६९६४४

वाचकांची प्रतिक्रिया

Don’t theft: TMAK 4/636

आपण माणूस म्हणून अजून बरेच विकसीत होण्याचे बाकी आहोत. श्रध्देने रोज देव पुजतो. पण त्यासाठी दुसर्यांच्या बागेतील फूल, न विचारता किंवा चोरून देवपुजा केली जाते. खरंच काहो अशाने देव पावेल का?


castle-1789929_1280म्हणतात की दुकानातल्या उसन्या उडदावर देव पूजू नये. तसेच परक्याच्या बागेतील चोरलेल्या फुलांवर देव पूजू नये… स्वतःच बाग फुलवा.. संदर्भः तुम्हाला माहित आहे का? पान. न.१२ कोट न. ४/६३६आपण माणूस म्हणून अजून बरेच विकसीत होण्याचे बाकी आहोत. श्रध्देने रोज देव पुजतो. पण त्यासाठी दुसर्यांच्या बागेतील फूल, न विचारता किंवा चोरून देवपुजा केली जाते. खरंच काहो अशाने देव पावेल का? आपल्याला तरी समाधान मिळेल का…?मराठीत एक म्हण आहे. पुजेसाठी लागणारे उडदाचे चार दाणे आपण दुकानदाराकडे मागवून पुजा केली तर ती पुजा तरी कुणाची लागू होईल. तसेच फुलांचे आहे. ति बाग फुलवणार्या व्यक्ती खरचं सकाळी सकाळी तरी चांगले चार शब्द फुल तोडून नेणार्यासाठी वापरतील का…?अगदीच अपरिहार्यता असेल तर गोष्ट वेगळी आहे. बागेला जागाच नाही असेही कधीच होणार नाही. काहीना काही पर्याय नक्कीच असतात. आपण शोध घेतो का? मुळातच काही माणसांमधे आळसंच तेवढा भरलेला असतो. पुरूष असतील तर हातावर तंबाखू चोळत बसून राहतील, टी. व्ही. पाहत बसतील व महिला असतील तर चारचौघी एकत्र बसून सुख दुखाःपेक्षा हिच तिच किंवा सुनेचं, जावयाचं बोलत बसतील.. पण एकादी कुंडी दारात, खिडकीत ठेवून चार फुलं पुजेसाठी येतील याची तसदी घेत नाही.. फूल चोरून आणण्यात गंमत वाटतही असेल पण समाधान नाही पावणार. मूलं ही लहाणपणी आंबे, बोरं चोरून खाण्यात जी मजा असते. ती मजा फूलं चोरण्यात नक्कीच नाही. अशा असमाधानाने केलेली पूजा तरी कशी लागू होईल.तेव्हा विचार करा. घरात जेष्ठ मंडळीकडून पुजेसाठी फूलं कुठून येतात याच भान घरातल्या कर्त्यांनी ठेवलं पाहिजे. त्यांना चार कुंड्या आणून द्या, झाडं लावण्यास, त्यांची काळजी घेण्यास प्रेरीत करा. तेवढचं त्यांच मनही निसर्गात रमेल. निसर्गासारखा दुसरा मित्र नाही, आनंद व मंनोरंजन देण्यासारख निस्रर्गाची दुसरी देन नाही. चार कुंड्यात झाडं लावण्यानं तेवढच टिव्हीच्या रिमोट वर कुणाचा रिमोट असावा यावरून भांडण होणार नाही. निसर्गाच्या निर्वाज्य प्रेमाने घरातही आनंद पसरले. समाधान मिळेल. चार कुंड्या घरा दारात फुलवण्यानं शुध्द हवा मिळेल, पर्यावरणासाठी काहीतरी मदत होईल. तसही कुठं कुंड्या विकत आणून आपल्याला बाग फुलवायची आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेला पालापाचोळा, नारळाच्या चार शेंड्या, वाळलेलं किचन वेस्ट नि ते भरण्यासाठी एक लिटरच्या शितपेयाच्या बाटल्या, दुधाच्या, पिठाच्या पिशवा, जूने माठ सहज वापरता येतात की.. सुरवात करा… बघा पटलं तर आम्ही आहोतच…संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. ९८५०५६९६४४, ८०८७४७५२४२

लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.

====================================================================

cc tmak COVER.jpg

लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)

========================================================================

तुम्हाला माहित आहे का? पुस्तक माहिती- (PDF Download)

पुस्तक माहिती (Video)

तुम्हाला माहित आहे का? Online खरेदीसाठी लिंक पहा..

पुस्तकाबद्दलची या पूर्वी प्रकाशीत झालेली माहिती वाचा…

 

http://www.gacchivarchibaug.in

टीपः अशाच टीप्स वाचण्यासाठी व्हाट्स अप करा… 9850569644

वाचकांची प्रतिक्रिया….

its Enough? TMAK 3/636


ad-nauseum-1562850_1280.jpg

झाडे लावा, झाडे जगवा, चळवळ गरजेचीच, पण सिमेंटच्या जंगलातील वैराण वाळवंटरूपी टेरेसही हिरवाईने सजवणे तेवढेच गरजेचे.

संदर्भः तुम्हाला माहित आहे का? पान. न.१२ कोट न. ३/६३६

पर्यावरणाचं महत्व हे सर्वच जाणत आहेत. ज्यांना रोजच्या भाकरीची चिंता पडली आहे. ते रोजच्या भाकरीच्या शोधात आहेत. त्यामुळे ते व ज्याचं पोट भरून सात पिढ्या बसून खातील एवढलं कमवलं आहे अशा दोन वर्गातील मधील जो वर्ग आहे. तो म्हणजे आपण मध्यमवर्गीय.. तो जगाची सारीच चिंता वाहतो तसेच आपले कर्तव्य ही जाणतो. पर्यावरणाचं भान असणारा व त्यासाठी काही करू इच्छिणारा हाच तो मध्यमवर्ग. या वर्गाचा पूर्वीही व आता पर्यावरण संरक्षणात बर्यापैकी सहभाग वाढू लागलाय. म्हणजे आपल्या बरोबर आपली जीवसृष्टी वाचावी, ति पुढील पिढीपर्यंत पोहचावं म्हणून संसार सांभाळून शक्य तेवढं करत आहेत. परोपकार, भूतदयेची भावना असलेली ही मंडळी झाडं कशी वाढतील यातही सहभाग घेत आहेत. काही मंडळीना झाडं लावण्याची हौस असते. पण ती जगवणे हे आपले कर्तव्य आहे हे मानणारी मंडळी अहोरात्र रक्ताचे पाणी करून झाडं, वनराई जगवताहेत. त्याला आता चळवळीचे स्वरूप येवू लागले आहे. हे सध्याची खूप जमेची बाजू आहे. आणि हे सारं करणार्या व्यक्तिंना, गटाला खरंच खूप धन्यवाद, की तुम्ही आमच्या वाटेचाही प्राणवायू तयार करत आहात. …

हे सारं महत्वाच आहेच… ही झाली पर्यावरण वाचवण्यासाठीच्या अनेक आघाडीपैकीची एक आघाडी, एक पुढाकार, मग तेवढा पुढाकार पुरेसा का?, झाली आता झाडे लावून, जगवून मग संपल का आपलं काम? नाही ना… औद्योगीक क्रांतीनंतर मानवप्राण्याने आपल्या स्वतःसाठी इतरांचही बरंच ओरबाडलं आहे आपण ते एका रात्रीत नि एका प्रयत्नात ते भरून येण्यासारखं नाही. पर्यावरण हानीची जखम फार मोठी आहे. ती भरण्यासाठीसुध्दा प्रत्येकाला व सामुहिकपणे बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. आपण ज्या शहरात राहतो. त्या शहरात पर्यावरणाला विरोधी असे साहित्य म्हणजे सिमेंटच्या वाळंवटातच राहतो असे म्हणा ना… जरा कडक उन्हात, सुर्य माथ्यावर असतांना टेरेसवर गेलं की सारे चटके कळतात. अधिक उंचावर गेलं की हे सारं शहरभर दिसतं. टेरेस वर कितीतरी जागा रिकामी, ओस पडली आहे. किंबहूना वाया जात आहे. आपण हे सारे हिरवाईने फुलवली तर! ही कल्पना नाही आहे. काही लोक यासाठी प्रयत्न सुरू केलेत. आणि गच्चीवरची बाग, नाशिक तर पूर्णवेळ काम करत आहे. झाडं ही आपल्यासाठी पब्लिक आक्सीजन हब आहेत. तर आपल्या बाल्कनीत, टेरेसवर लागवलेली चार कुंड्यातली झाडं ही सुध्दा प्राईव्हेट आक्सीजन हब आहेत. त्यामुळे फक्त झाडं जगवून चालणार नाही तर आपल्या घराच्या, आजूबाजूला छतावर बाग फुलवणं खूप गरजेचं आहे.

मध्यंतरी ठाणे या शहरात गच्चीवरची बागचे प्रदर्शन आयोजीत केले होते. तेथे त्यांना याची गोडीच नव्हती. विचारपुस केली असता कळाले की कळाले की अपार्टमेंट मधे खिडकीत, बाल्कनीत अशी कुंड्यात झाडे लावण्यास मनाई आहे. कारण रंग दिलेल्या भिंती खराब होतात. नाशिक मधील एका अपार्टमेंट मधला अनुभव तर त्याहून भयंकर आहे. सामूहिक मालकी असलेले टेरेसवर, ते कुटुंब वरच्या मजल्यावर राहत होते त्याला लागूनच वरच्या टेरेस वर बाग फुलवण्याची इच्छा होती. तर बाग फुलवत असेलेल्या कुटुंबाला इतरांनी हाताघाईवर येत त्याला मनाई केली. का तर ती सामूहिक मालकी आहे. कुणा एकट्यानेच का बागेचा आनंद घ्यावा… कुणा एकट्याने विषमुक्त भाज्या का खाव्यात, अशा जेलेसीपायी ते इतरांना पर्यावरणाचा जपू पाहणार्या इच्छुक मंडळीना आडकाठी केली. असल्या आडमुठेपणाला काय म्हणावं..?. माझ्या निरिक्षणात असे आले आहे की अशी बाग फूलण्यास विरोध करणारी मंडळी मानसिक रोगांना बळी पडलेली असतातच पण ते आपल्या कुंटुबातील सदस्यांनाही त्यात ओढतात नि कौटुबिक विनाश करून घेतात. मुळातच गच्ची, बाल्कनीत बाग फुलवणार्यांना विरोध करणारी मंडळी खरंच समाधान जगणं सोडाच… मरत तरी असतील का हो..?. अशी चिंता नेहमी सतावते. वातावरणात किती उष्मा वाढलाय. जिवाची काहीली होतेय. काही माणसं निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी आसूसलेली असतात. अशा कामांनाही विरोध होत असेल तर मला वाटत ही विरोधी करणारी मंडळी आंतकवादीच आहे. जे Suicide Bom बनून समाजात फिरत आहेत. कायद्याची भाषा, अवास्तव तार्किक (अकलेचे तारे) म्हणणं मांडतात. भिंती खराब होण्यापेक्षा आज प्राणवायूची, शुध्द हवेची जास्त गरज आहे. हे कसे त्यांना कळत नाही. असो.. जे वांच्छिल ते ते लाभो….

लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.

cc tmak COVER.jpg

लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)

पुस्तक माहिती- (PDF Download)

पुस्तक माहिती (Video)

Online खरेदीसाठी लिंक पहा..

पुस्तकाबद्दलची या पूर्वी प्रकाशीत झालेली माहिती वाचा…

http://www.gacchivarchibaug.in

टीपः अशाच टीप्स वाचण्यासाठी व्हाट्स अप करा… ९८५०५६९६४४

At. Post .. 2/636 तु.मा.आ.का?


मु. पो. स्वयंपाक घर

“पाटा, वरंवटा, चुल्हीवरचा स्वयंपाक, घरचा भाजीपाला कुटुंबाचे आरोग्य राखणं, हे पूर्णवेळ काम, पण आपण ते अर्धावेळपण करत नाही…”

आईच्या हाताने बनवलेल्या जेवणाला किती चव असायची, आजही गावात, एकाद्या खेड्यात, मळ्यात शेतात गेले तर तेथील जेवण किती चविष्ट लागते. आपल्या डोक्यात काही गंध, चवी या कायम स्वरूपी या नोंद झालेल्या असतात. पूर्वी जेवण बनवण्यास बराच वेळ लागायचा. आजच्या घडीला तर कंटाळवाणं काम… खरच आहे ते… पण पूर्वी आजच्या सारखी स्वंयपाक घरात अदयावत अशी साधने नव्हती. सारी कामे ही हाताने, यंत्राच्या पण श्रम शक्तीचा वापर करून तयार केले जायचे. साध्या चार हिरव्या मिरच्या, चार लसणाच्या पाकळ्या, थोडं मीठ टाकून दगडावर किंवा दगडाच्या खलबत्यात ठेसून खाल्ला तरी अप्रतिम चव असायची. एवढचं काय, सकाळी अंगोळीसाठी पाणी तापलं चुल्हीतल्या गरम राखेच्या फुफाट्याच चार हिरव्या मिरची भाजून त्यावर तेल मीठ टाकलं तरी चव लागायची.. आज मेलं भाजीत कुणाकुणाचे मसाले वापरले तरी अन्नाला चव नसते. चव असेलच कशी… कारण भाज्या रसायनं वापरून उगवलेली असतात अर्थातच या सार्यासाठी आपण वेळ देतो का व दिला तर किती हा मोठा प्रश्न आहे.

स्मार्ट किचन मधे अत्याधुनिक यंत्राचा शिरकाव झाला. वेळ वाचला.. तो वेळ आपण नोकरी, उदयोग धंदयासाठी देवू केला. पण आयुष्याची गोळाबेरीज ही सारी अनारोग्यात खर्च होते. कारण आपण यात आपले व आपले कुटुंबाचे आरोग्यच विसरलो. कारण जेवण हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे हे विसरलो. अन्न हे पूर्ण ब्रम्ह पण त्यासाठीच्या सार्याच गोष्टी आपण आऊट सोर्स करू लागलो. मग त्यातली गुणवत्ता संपुष्टात आली. ( बघा घरी आलेली स्वयंपाकीन बाई किती घाईने स्वयंपाक करते) अर्थातच महिलावंर इतर कामाची जबाबदारी वाढलीत हे खरं आहे. पण त्या सार्या बदल्यात आपल्याला काय मिळतेय. आयुष्याची संध्याकाळ मु. पो. दवाखाना.. असतो. जितके लवकर उगवलं जातं, तितक्याच लवकर शिजवलं जातं, तितक्याच लवकर आयुष्याची दोरी झिजते सुध्दा… कारण स्वयंपाक करणे याला आपण कितीसा वेळ देतोय.

जेवणासाठी पाटा वरवंटा वापरणे, चुल्हीवर स्वयंपाक करणे, त्यासाठी आपल्याच अंगणात पिकवलेला विषमुक्त भाजीपाला खाणे हे तर सर्वात चांगल. या सार्या कामासाठी आपण पूर्ण वेळ दिलाच पाहिजे. तो महिलांनीच द्यावा या मताचा मी अजिबात नाही. स्वयंपाक करणे हे भलेही पारंपारीकरित्या आजही महिलांचेच काम असले तरी आधुनिक जिवनशैलीत ही जबाबदारी पुरूष किंवा महिला यापैकी एकाने अंगावर घेतलीच पाहिजे तरच आपण व आपले कुटुंब हे निरोगी राखू शकतो.

लेख आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा.

cc tmak COVER.jpg

लेखाच्या आरंभी असलेले स्वलिखीत, स्वअनुभवीत, स्वः चिंतीत असलेल्या बागबगीचा, आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन संदर्भातील मोजक्या समर्पक शव्दातीत, बागप्रेमीनी फेसबूकवर लाईक्स केलेल्या मराठी- हिंदी भाषेतील डोळे उघडणार्या व कृतीला प्रवृत्त करणार्या ६३६ बोधपर वाक्यांचा संग्रह असलेले तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. फक्त २०० रू. ( पोस्ट खर्चासहित)

पुस्तक माहिती- (PDF Download) Book trailer: तुम्हाला माहित आहे का?

Online खरेदीसाठी लिंक पहा..

पुस्तकाबद्दलची या पूर्वी प्रकाशीत झालेली माहिती वाचा…

http://www.gacchivarchibaug.in

टीपः अशाच टीप्स वाचण्यासाठी व्हाट्स अप करा… ९८५०५६९६४४

%d bloggers like this: