Its TRULY GROW CHEMICAL free VEGETABLE


Sandeep Chavan with Home grow vegetable.
Sandeep Chavan with home Grow vegetable

आम्ही गच्चीवर बाग फुलवून देतो. पण हे सर्वच खरचं रसायमुक्त असते का… या साठी कोणतेच रासायनिक औषधे वापरली जात नाही का असे प्रश्न विचारली जातात.

हो हे खरयं. आम्ही वाफे भरण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचा वापर केला जातो. त्यात सुरवातीला कुठेही व नंतरही भाज्या उगवतांना रासायनिक खताचा, औषधांचा वापर ही केला जात नाही. एक वेळ भाज्या कमी आल्या (खरे तर असे होत नाही) किंवा नाहीच आल्या तरी त्यात रसायनांचा वापर आम्ही करत नाही व करू देत नाही. कारण सुंगधी माती तयार होणे खूप गरजेचे असते. बरेचदा कीड वाढते अशा वेळेसही आम्ही गोमय आधारीत औषधांचा, किड वेचण्याचा, मानवी हस्तक्षेपाचा पर्याय निवडला जातो पण रासायनिक अंश कुठेही वापरली जात नाही. आम्ही पंचस्तरीय पध्दतीने भाज्याचे प्रकारांचे लागवड करतो. तसेच Vegetable Forest (भाजीपाल्यांचे जंगल) तयार करावयाचे तत्व वापरतो. जी पधद्त जंगलात निसर्ग वापरत असतो. तर अशा प्रकारे आम्ही नैसर्गिक पधद्तीने भाज्या उगवतो. म्हणूनच आम्ही आपल्या डोळ्यासमोर उगवून दिलेल्या भाज्या या चविष्ट व समाधान देणार्या व आरोग्यदायी असतात. ज्या आम्ही संजीवन औषध म्हणून उगवतो.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Fertiliser choice & use

आपल्याला रोज बदाम अक्रोड खाणे परवडले म्हणून आपण रोज तेच तेच खात नाही.. का तर आपल्या शरिराला इतरही सुक्ष्म घटकांची गरज असते म्हणूनच गरजेचे आहे म्हणून नागली, बाजरी, उडीड व इतर धान्य किंवा खाद्यपदार्थ खात असतो. तसेच बागेतील झाडांचे आहे.


soil-766281_960_720.jpgआपल्याला रोज बदाम अक्रोड खाणे परवडले म्हणून आपण रोज तेच तेच खात नाही.. का तर आपल्या शरिराला इतरही सुक्ष्म घटकांची गरज असते म्हणूनच गरजेचे आहे म्हणून नागली, बाजरी, उडीड व इतर धान्य किंवा खाद्यपदार्थ खात असतो. तसेच बागेतील झाडांचे आहे. आपल्याला ब्रॅंडेड खत किंवा एकादे निवडक तेच तेच खत आपण विकत घेवून झाडांना देत असू तर ते मातीच्या आरोग्यासाठी व बागेच्या स्वास्थासाठी उपयोगी ठरत नाही. आपणही रोज रोज तोच पदार्थ खाऊ का… नाही ना… तर अशा विचाराने आपल्या बागेला सुध्दा विविध निविष्ठांची (खताची गरज असते. अर्थातच ते आपल्याला घरच्या घरी किंवा खात्रीलायक ठिकाणाहून खरेदी करू शकता)

उदाः शेणखतः आपल्या बागेसाठी बहुतेकदा शेणखत हे खत वापरले जाते. पण ते शेणखत खरोखरच उपयोगाची आहे का, त्याची बनवण्याची प्रक्रिया आपण अभ्यासली आहे का… तर नाही…

आम्ही बनवत असलेले शेणखत हे वैज्ञानिक व तर्कसंगत पध्दतीने बनवलेले आहे. ते कसे पाहूया..

पहिले म्हणजे तुम्ही जे शेणखत आणता त्यात शेणाचे खडे किंवा गोळे असतात. हे शेणखत उकीरड्यावर कंपोस्ट केलेले असते. उन्हामधे शेणातील जीवाणू ही मृतवत होतात. तर पावसाळ्यात त्यातील सत्व वाहून जाते. तसेच उकीड्यावर शेण टाकल्यामुळे उकीरड्याचा गाभा फक्त कंपोस्ट होतो. काही शेण हे कंपोस्ट न होताच आपल्या बागेत मिसळून हे झाडांना दिले जाते. जे शेण कंपोस्ट होत नाही त्यात किंवा जमीनीवर कंपोस्ट होण्यासाठी टाकले जाते. त्यात हुमणी अळीचे प्रमाण प्रचंड असते. हुमणी अळ्या या झाडांच्या गोड अन्न मुळ्या खाण्याचं काम करतात. झाडं जिवंत वाटतं पण वाढत नाही किंवा एकादे मोठे झाडं अचानक वाळून जाते.

तसेच दुभत्या जनावरांना दुध अधिक येण्यासाठी हार्मोन्स वाढीचे इंजेक्शन दिले जातात. या इंजेक्शन मुळे सेवन केले जाणार्या दूधामुळे मुली लवकर वयात येणे, मुलांमधे प्रौढत्वाची लक्षणे दिसू लागतात.

हे हार्मोन्सची इंजेक्शन विक्रीला बाजारात बंदी आहे. पण ते सर्सास विकली जातात. तर या औषधाच्या मात्रा जशा दुधात उतरतात त्याच्या क्रित्येक पटीने ते शेणात मिसळतात. माझ्या अभ्यासानुसार अशा जनावरांचे शेण हे खत म्हणून वापरले असता फळांचा आकार हा दुप्पटीने वाढतो. म्हणून यापासून सावधान…

आमच्या घरची ही गाय ही दुधासाठी नसून ती गौमुत्र व फक्त शेणासाठी पाळली आहे. त्यामुळे तिला कोणतेही इंजेक्शन देत नाही. तसेच तिच्या शेणापासन आम्ही बनवत असलेल्या खताची प्रक्रिया ही संपूर्णतः सावलीत व पावसापासून बचावलेली असते. त्यामुळे वरील मुद्दयात नमूद केलेले मुद्दयानुरूप त्याचे सत्व जपले जाते.  तसेच ते जमीनीपासून वर अश्या सच्छिद्र विटांच्या हौदात तयार केले जाते. त्यामुळे त्याची दुर्गंधी नसते तसेच वेळो वेळी त्यातील उष्णता बाहेर पडते. तसेच चारही बाजूने त्याचे व्यवस्थित कंपोस्ट होण्यास मदत होते. या प्रकारात हुमणी अळी सापडत नाही. तसेच खत बनवण्याची प्रक्रिया ही सावलीत झाल्यामुळे त्यातील जीवाणू हे सुप्तावस्थेत जातात. व योग्य वेळी पाणी व मातीचा संपर्क झाल्यास ते पूर्नजीवीत होतात.  हे खत चाळणीने चाळून 21 रू. किलो प्रमाणे  किलोच्या पॅकिंग मधे 105 रूपयात उपलब्ध आहे.

रंग, रूप व गंध ..

आम्ही वरील पध्दतीने तयार केल्याल्या खताचा रंग हा काळसर, तपकीरी भासतो. वजनाला हलके. मऊशार असते. क्वचितच त्याला मातीचा सुगंधही जाणवतो.

बागेला देण्याची पध्दतः खत हे सहसा सायंकाळी द्यावे. कारण उन्हात टाकलेले खत हे वाळण्याची परिणामी त्यातील जीवाणू मृत होण्याची दाट शक्यता असते. आपणास कुंडीत खत द्यावयाचे असल्यास रोपाभोवतालची माती म्हणजे कुंडीच्या कडेची माती उकरून बाजूला करावी. त्यात मूठभर शेणखत घालावे व वरून मातीने झाकून द्यावे.  जमीनीत देतांनाही हीच पध्दत वापरावी. फक्त प्रमाण बदलते. खत देवून झाल्यावर लगेचच पाणी द्यावे म्हणजे त्यातील जीवाणू हे मातीबरोबर संयोग पावतात.

शेणखत हे गुलाब, मोगरा अशा फुलं येणार्या तसेच फळझाडं, फळभाज्यासाठी वापरणे गरजेचे असते.

दक्षताः हे खत झाकून व सावलीत ठेवावे. कोरडे पडू देवू नये.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक

%d bloggers like this: