Annapurna Bags अन्नपूर्णा बॅग्ज्स काळजी कशी घ्यावी?


गच्चीवरची (ऑरगॅनिक भाजीपाल्याची) बाग ही सेंद्रीय पध्दतीने शहरी भागात उपलब्ध जागेत भाजीपाला उगवण्यासाठी काम करते. या व्दारे विविध स्तरांवर काम करत आहे. खरं तर हे पर्यावरण संवर्धनासोबत पर्यावरणीय सामाजिक उद्मशिलता म्हणून आम्ही विकसीत करत आहोत. म्हणजे पर्यावरणाचा विचार , संवर्धन करत त्यातून लोक आरोग्याचा, सुरक्षित अन्नाचा विचार करत लोकांना शिकवत आहोत. त्यांना रोजच्या कामातून वेळ काढत आपले अन्न हे आपण तयार करू शकतो यासाठी प्रेरीत करतो.

यासाठी विविध उत्पादने तयार करत असतो. यातीलच युनिक गार्डेन प्रोडक्ट म्हणजे अन्नपूर्णा बॅग्जस होय. छोट्या जागेत स्मार्ट पध्दतीने भाज्या उगवण्यासाठी या रेडी टू सो बॅग्जस फारच उपयुक्त ठरत आहेत.

या बॅग्जस मधे भाज्या उगवण्यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे. अर्थात द्राव्य व विद्राव्य खतांची गार्डेन केअर बास्केट वापरणे बंधनकारक ठरते. किंवा त्यातील गोष्टी तुम्हाला तयार करून त्या वापरणे गरजेचे ठरते. याही व्यतिरित्क इतरही काळजी घेणे गरजेचे आहे. ती काळजी काय घ्यावी या बद्दलची माहिती पुढील प्रमाणे..

  • अन्नपूर्णा बॅग्जस मधे हवा खेळती रहावी यासाठी बिशकॉम पॉटींग मिक्स ने भरलेल्या असल्या तरी त्यात काही चुकांमुळे झाडांची मुळे खराब होतात.

यासाठी बॅग्जसखाली विटा ठेवाव्यात कारण टेरेस लगत असलेया बॅग्जस खाली ओलावा रहातो. तो ओलावा वाफेत रूपांतर होतो. तो बॅग्जस मधील मुळांना घातक असते. विटा खाली ठेवल्यामुळे हवा खेळती रहाते.

  • या बॅग्जला विळ्याने उकरी करण्याची गरज नाही. केवळ हाताच्या बोटांनी माती वर खाली करू शकता. तसेच बॅग्जला हाताच्या कडेने अथवा त्यास बुक्के मारले, थोपडले तरी बॅग्जस मधील माती सैल होते. मुळांशी हवा खेळती रहाते. हा सराव साधारण पाऊस संपल्यानंतर अथवा आठवड्यातून एकदा करावी.
  • यात तिनस्तरीय पिक लागवड करता येते. मध्यभागी फळभाजी लागवड करावी, आजूबाजूला पालेभाजी व कंदमुळेही लागवड करता येतात. मात्र वेळोवेळी वरील प्रमाणे काळजी घेणे गरजेचे असते.
  • एक पिक संपल्यानंर त्यातील संपूर्ण माती वाळवून माती वाळवून घेणे गरजेचे आहे. पुन्हा त्यात बिशकॉम व खत मिसळून पुन्हा भाज्या लागवड कराव्यात.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644 / 8087475242

शेती प्रकार | जिवामृत | Type of Farming | Chemical V/s Organic | MarathI | Audio | Nashik | मुलाखत

शेतीचे प्रकार असतात का ? हो.. त्याविषयीची माहिती सदर माहितीपटात दिली आहे.. नक्की पहा..


Make Ur Home & Garden Beautiful | Best from Waste | टाकाऊतून टिकावू | पर्यावरण संरक्षण | Pots idea

This is Music Video, Video is basic on (DIY) do it yourself garden Pots.
प्लास्टिक प्रदुर्षन टाळायचे म्हणजे नेमकं काय करणं. तर नविन प्लास्टिक विकत घ्यायच्या नाहीत. म्हणजे बागेसाठी तरी नविन प्लास्टिक कुंड्या विकत घेण्यापेक्षा पूर्वी विकत घेतलेल्या रोजच्या दैनंदिन वस्तूंचा पूर्नवापर करायचा.. तो कसा करायचा हे सांगणारा माहितीपट.


Nashik : Plantation On Roof top Of building | Terrace Gardeing


गच्चीवरची बाग – Garbage to Garden | Marathi Vlog| | VocalForLocal | Wandering Minds


How to Grow Cauliflower at Home | फूलकोबी कशी उगवावी |

घरी फूलकोबी कशी उगवावी


How to grow garden…

बरेचदा आपण ते सारेच खर्चिक बाब म्हणून ते टाळत असतो. पण म्हणतात ना.. इच्छा तेथे मार्ग.. उपलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत व उपलब्ध नैसर्गिक संसाधनात फुलांची, शोभेच्या झाडांची अगदी भाजीपाल्याची बाग फुलवता येते.


Picture  with name 44.jpg

बाग कशी फुलवावी…

बाग म्हटली की त्यासाठी जागा, रोप फुलवण्यासाठी कुंड्या व भरण पोषणासाठी साहित्य हे गरजेचे असते.

बरेचदा आपण ते सारेच खर्चिक बाब म्हणून ते टाळत असतो. पण म्हणतात ना.. इच्छा तेथे मार्ग.. उपलब्ध जागेत, उपलब्ध वस्तूत व उपलब्ध नैसर्गिक संसाधनात फुलांची, शोभेच्या झाडांची अगदी भाजीपाल्याची बाग फुलवता येते. बाजारात कुंड्याचे असंख्य प्रकारात म्हणजे सिमेंट, माती, प्लास्टिक, बॅग्ज स्वरूपात उपलब्ध आहेत.

तसेच विविध आकारात गोल, चौकोनी, आयताकृती, लांबोळक्या स्वरूपात उपलब्ध होतात. जागेच्या उपलब्धतेनुसार हॅंगीग, भिंतीवर(व्हर्टीकल) मांडणी करता येईल यानुसारही उपलब्ध होतात. कुंड्यासाठी खत, कोकोपीठही उपलब्ध असते. यापैकी आपण निवड करता येते.

पण ही झाली खर्चिक बाब. खर्च जरूर करावा पण गरजेनुसार, आवडीनुसार. पण कमी खर्चातही आपल्याला सहजतेने उपलब्ध जागेनुसार घरात, घराच्या आवतीभोवती. विंडो ग्रील, हालच्या खिडकीत, किचन समोरील खिडकी, पायरी, टेबल यावर सुध्दा बाग फुलवता येते.

कुंड्या म्हणून शितपेयाची बाटली, दुधाची पिशवी, लेडीज पर्स, नारळाची कंरवटी, छोट्या नर्सरी बॅग्ज अगदी जे जे मिळेत की ज्यात बिया, रोपं रूजतील वाढतील, अशा साहित्याचा कल्पकतेने वापर करता येतो. शेवटी कुंडीतील रोप हे किती सुंदर वाढलय, हिरवगार आहे यावरून कुंडीची शोभा वाढते.

बरेचदा माती, खत कुठुन आणावयाचे हा प्रश्न असतो. अगदी शुन्य मातीतही आपण बाग फुलवू शकतो. पण त्यासाठी आपल्याला थोड्या पेशन्सची, धिराची गरज असते. माती थोडीफार म्हणजे कुंडीच्या आकारमानाच्या २० टक्के माती उपलब्ध असेन तरी चालते. माती ही शक्यतो लाल रंगाची असावी. काळी माती असेन तर त्यात मुरूम, लाल माती, वाळू मिश्त्रीत करता येते.

कुंडी कशी भरावीः एक फूट उंचीची कुंडी कशी भरावी यासाठी पुढील प्रमाणे प्रमाण देत आहे. ते कुंडीच्या उंचीनुसार बदलू शकतो. कुंडीला खाली तळाशी पाण्याचा निचरा होण्यासाठी भोकं असावीत. त्यावर नारळाच्या शेंड्याच्या चार इंचाचा थर द्यावा, त्यावर वाळवलेले किचन वेस्ट (प्रि-कुक्ड म्हणजे भाज्याची सालं, काड्या), पालापाचोळा यांचा आठ इंच थर द्यावा. त्यावर खत मिश्त्रीत मातीचा दोन इंच थर टाकावा. एकादे झाडं लावावयाचे असल्यास कुंडी दिलेल्या प्रमाणे अर्धी भरून त्यात हुंडीतील झाडं मधोमध लावावे त्याभोवती सुका कचरा भरून वरून २ इंच मातीचा थर दयाव. पाणी मोजके द्यावे, पाणी जास्त दिल्याने कुंडीतील आवश्यक घटक वाहून जातात.

कालांतराने कुंडीतील झाडं रिपोटींग करण्याची गरज असते. वरील प्रमाणे भरलेल्या कुंडीतील माती ही भुसभूशीत, रवाळ, वजनाला हलकी पण उत्पादक असते. याच मातीचा पुन्हा वापर करून आपण दोन ते तीन कुंड्या पून्हा वरील प्रमाणे भरू शकतो.

बागेसाठी खत म्हणून घरच्या घरी कंपोस्टींग करता येते. आपल्याकडे कचरा किती निर्माण होतो, त्यासाठी जागा किती उपलब्ध आहे. यानुसारही बाजारात किंवा घरच्या घरी कंपोस्टीग सेटअप तयार करता येतात. अगदी माठ, जूनी बादली, टब, कापडी पिशवी, बास्केट ही वापरता येते. फक्त त्याचं विज्ञान, त्यामागील तंत्र, मंत्र शिकून शिकून घेणं गरजेचे आहे. अगदीच जमलं नाही तर त्याला वाळवून कुंडयामधे भरण पोषण म्हणून त्याचा वापर करता येतो.

आपल्याला जसे नास्ता, जेवणात विविध प्रकारचे घटक लागतात. तसेच झाडांना पोषणासाठी केवळ एकच प्रकारचे खत वापरून चालत नाही. त्यातही विविधता असावी, उदाः शेणखत, गांडूळखत, लिंबोळी खत, राख, खरकटे पाणी, गोमुत्र, जिवामृत, खरकट्या अन्नाचे फंरमेंट केलेले पाणी अशी विविधता आपल्याला साधता येते.

आणल्या कुंड्या, भरली माती व खत की झाडे जगतात असे मुळीच नाही. आपल्याला त्यासाठी अभ्यासाची गरज असते. त्यासाठी अनुभवी लोकांशी बोलावं, इंटरनेटवरही मराठीतही बरीच माहिती, युट्यूबवर व्हीडीओ उपलब्ध आहेत. हा अभ्यास रोज थोडा थोडा करावा व त्याला सरावाची जोड दिल्यास आपल्याला बाग फुलवता येते. यातील महत्वाचे शिकण्याचे का असा प्रश्न स्वतःला विचारावा, उदाः एकादे झाडं चांगले का वाढले, अचानक का पिवळे पडेले, पाणी जास्त झाले की कमी झाले. झाडांना उन, सावली किती आवश्यक आहे. असे प्रश्न विचारल्यास घरात थोडी चर्चा केल्यास त्यातून स्वतःला बरेच काही शिकता येते. एकादे झाडं, हे कशापासून उगवतं म्हणजे बियापासून, फांद्यापासून की कंदापासून याचाही अभ्यास गरजेचा असतो. अर्थात तो रोजच्या निरीक्षणातून आपल्याला साध्य होतो.

बागेची निगा राखण्यासाठी मी रासायनिक खतांचा, फवारणीचा वापर शक्यतो टाळावा. त्यासाठी आपल्या पारंपरिक उग्र वासाच्या पदार्थापासून कीड नियंत्रक तयार करेन, उदाः दही पाणी, लसून पेस्ट पाणी, हिंग पाणी, गोमुत्र पाणी याची फवारणी ही दर सात ते पंधरा दिवसांनी करावी. म्हणजे कीड ही दूर राहते. अगदीच जमले नाही तर हातात धरता येईल अशा एक लिटरच्या पंपात पाण्याचा फवारणी केली तरी झाडे ही धूळमुक्त होतात. त्यांची प्रकाश संश्लेषंणाची प्रक्रीया उत्तम होते. झाडे ही स्वतःचे अन्न स्वतःत तयार करतात. व झाडे निरोगी राहण्यास मदत होते.

घरात, खिडकीत छोटं छोटं झाडं लागवड करता येतात. त्यात शोभेची झाडे, निवडूंग कमी पाणी, कमी सुर्यप्रकाश, यावर जगणारी, प्राणवायू देणारी झाडे निवड करता येतात. दोन महिने फुलं देणारी फुलं झाडं तसेच घच्या घरी, कोथंबिर, मेथी, पुदीना, अळूची पाने अशी सहज येणारी पालेभाजी लागवड करता येते.

झाडांच्या सहवासात वेळ जातो. डोळ्यांना सुखवतं, मन शांती देतं, थकवा घालवत. समाधान पावतं. निसर्गाच्या सानिध्यात, सहवासात बरच काही शिकता येते. आपल्याला छोट्याश्या प्रयत्नांनी वाढत्या प्रदुर्षणावर मात करता येते.

=============================================================

IMG_20181114_190053_227

पालापाचोळा, किचन वेस्ट, चला फुलवूया बगीचा बेस्ट. घरच्या घरी फुलवा भाजीपाल्याचा मळा… घरच्या घरी भाजीपाल्याची बाग फुलवण्यासाठी वाचणीय, उपयुक्त, संग्रही ठेवावं, वाढदिवसाला भेट द्यावी अशी गच्चीवरची बाग पुस्तिका… २४० रू. बाय पोस्ट घरपोहोच… 9850569644

============================================================

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

www.gacchivarchibaug.in 9850569644 /808747524

लेखावरून १५ जून १९ रोजी प्रकाशीत झालेली बातमी…

4 FB sakal news 15 06 19 edited.jpg

Terrace gardens with organic farming a fad

“The popularity of terrace gardens has drastically increased these days.”


By -TNN Gayatri Deshmukh

vertical garden 1 1 (18).JPG

Terrace gardens with organic farming a fad
Terrace gardens are the next big thing in Nashik. With people aiming to not only beautify their place but also spread the message of organic farming, this has caught the fancy of most Nashikiites.
 
 
 
 
 
 

Thirty-four-year-old Sandeep Chavan has made a 150 sq feet terrace garden at his place and focuses on organic farming. He even gets visitors who take his advice on farming. “One can easily grow the basic vegetables like cauliflower, brinjal, tomatoes, leafy vegetables on their terraces. I also guide people on making organic fertilizers at home without spending much time. Awareness about organic vegetables is also increasing among people,” said Chavan.There are several people like Chavan who have made terrace gardens a fad in the city. Ranjani Gehani, a retired banker, has been nurturing her terrace garden for the last couple of years. She said, “We have now got a professional to help us with our terrace garden. We dry the kitchen waste and make fertilizers out of it. About four days a week, we eat the vegetables which grow in our terrace garden. I am quite proud of the aloe vera plants growing in our garden. I even grow herbs like lemon grass and mint and make herbal tea from it.”
 
 
In fact, the concept of terrace gardens has become so strong that most people looking to buy a place are looking for a bigger terrace to accommodate a terrace garden. Vikram Matlani, a banker, is a case in point. “I rejected a few places because they did not have a terrace. I want to develop a terrace garden as it is essential to have the presence of trees and plants around us.”
 
 “The popularity of terrace gardens has drastically increased these days.”
 
Terrace gardens are also looked upon as a psychological need of people. Dr Supriya

Aagashe, a clinical psychologist said, “People are advised to talk to trees. I have my own terrace garden the fertilizers for which I make out of vermiculture. The response to the demos of terrace gardens has also gone up considerably.”

Terrace gardens are also proving to be beneficial for the improving the environment. A translator and writer by profession Vandana Atre, said, “I have a terrace garden for the past seven years. It is an amazing feeling to see birds make nests in your terrace gardens.”

 
 

Needs to equipments/ funds


vertical garden 1 1 (1098)संदीप चव्हाण, नाशिक, महाराष्ट्र में रहते है। पिछले चार साल से गारबेज टू गार्डन तंत्र को लेकर नाशिक में जहर से मुक्त सब्जिया और बागवानी बनाने के लिए लोगोंको प्रेरीत करते है। उनका सपना है की लोग अपने छोटी छोटी कौशिसे व्दारा जहर मुक्त सब्जिया घरपर ही उंगाये, पर्यावरण का खयाल रखे और निसर्ग के साथ जुडे रहे। इसलिए खेती की जरूरू नही है। शहर में जो भी जगह उपलब्ध है जैसे की (पंराडा, टेरेस, बाल्कनी, विंडो) उसीमें उपलब्ध नैसर्गिक संसाधनो (किचन वेस्ट, सुखे पत्ते,)  के साथ और जो भी उपलब्ध वस्तूंए में बागवानी करने के लिए प्रेरीत करते है। आज शहर में डंपीग ग्रांऊड की समस्या बढ रही है। अगर लोगों ने इस तरह किचन वेस्ट का जगह ही पर उसका सुखाकर इस्तेमाल किया तो डंपीग ग्रांऊड की समस्या नही रहेगी। और यह एक कारगर व आसान तरीका है। किचन वेस्ट का कंपोस्टिंग बनाने की कोई जरूरी नही.. ऐसा उनका कहना है। खाद बनाना यह प्राकृतिक के खिलाफ है और उसमें समय का गवाना है यह उनका मानना है।

इसलिए वह पिछले १२ साल से प्रयत्न कर कर रहे है। इस प्रयत्नों के पिछले चार साल में अपने परिवार के लिए उपजिवाका का माध्यम बनाया है। उनके साथ उनका परिवार और दो लोगों को भी रोजगार की प्राप्ती होती है।

जहर मुक्त खेती की आज बहूत जरूरी है। इसके बारे में लोगों को जागृत करना और निसर्ग के प्रती उनका सहयोग लेना जरूरी समजते है। इसलिए उन्होंने एक देशी नस्ल की गाय पाली है। उसीके गोमुत्र और गोबर से टेरेस फार्मिंग में उपयोग करते है।  इस काम को गती मिलने के लिए लंबे प्रयोसो के बाद एक चार पैयावाली गाडी खरेदी है। उसीसे थोडा आसानी हो गयी है। लेकीन यह सब कर्जा है। और कुछ कुछ करना है। उसके लिए और कर्जा मिलना मुश्किल है। और उनके सपने की कडी में कुछ साधनों की कमतरता है। अगर निचे नमुद कियें हुंए साधन का जुगाड हो जाता है तो  में पर्यावरण के क्षेत्र में लोगोंका और बडी मात्रा में सहयोग ले सकत है। और अपनी सिंमेंट की निस्तेज वंसुधरा को हरे हरे रंग के कुछ रंग भरना चाहते है।

  • Petrol Shredder machine 65000/- छत पर बागवानी के लिए 80 % बायोमास ( नारियल के छिलके, गन्ने का छिलके, पेड पौध्दे के पत्ते, सुका हुआ किचन वेस्ट और 20%  मिट्टी और खाद का उपयोग करते है। उपरोक्त मशीन व्दारा जो भि बायोमास लोगोव्दारा फेका या जलाया जाता है। उनको क्रश करके उपयोग कर सकते है। इससे दो फायदे है। एक  कम जगह में जादा से जादा संग्रहीत कर सकते है। और ट्रान्सपोर्ट के लिए सुविधा होगी।
  • किताब प्रकाशन 75000/- अब गच्चीवरची बाग ( टेरेस फार्मिंग) ये किताब की व्दितीय आवृत्ती प्रकाशीत करना चाहते है। जो स्वः एक प्रशिक्षण पुस्तिका की तरह होगी। ताकी इसे पढकर इच्छुक लोंग अपने घरपे ही किताब पढकर छत पर बागवानी कर सकते है। इससे पर्यावरण के क्षेत्र में बढा काम खडा रह सकता है।
  • बफींग machine 10000/- मंदीर से जमा किए नारियल के कठीण कवच से मैं किचेन्स बनाना चाहते है। कुछ चिंजे हातोसेही बनायी है इसमें बहोत सारा वक्त लग जाता है। उपरी मशीन अगर मिल गयी तो मैं कोकोनट शेल से अलग अलग चिंजे बना सकते है। जो पर्यावरण पुरक होगी। और स्थानिक महिलांए के लिए रोजगार की प्राप्ती होगी।

Total amt: 150000/-(1.5 lakh)

उनके कार्यपर युट्यूब पर एक फिल्म है उसे हर रोज २५० लोग देखते है। इसी विषय में मैने लोकसत्ता इस वर्तमान पत्र में एक साल कॉलम लिखा है। इसी काम की विविध माध्यमों व्दारो समाचार पत्र में जीवन परिचय प्रकाशित हुए है।

www.gacchivarchibaug.in

www.youtube.com

 

 

%d bloggers like this: