Home Composter


Includes: 

1 Composter, 

2 Gardening tools, 

2 Months Composting Powder, 

1 Powder container, 

3 visits ( 1st visit for home delivery and demo, 2nd visit  after 1 month for rotation and 3rd visit after two months for removing the compost)

Mob:8007411800

गांडूळखत हे ताजे का असावे व इतर खतातील फरक…


गांडूळखत हे ताजे का असावे व इतर खतातील फरक… ( Difference Between organic Fertilser )

बरेचदा आपण हौशी बागप्रेमी गच्चीवरील बागेला विविध खते पुरवत असतो. या खतांमधे शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खतांचा समावेश असतो. या तिनही खतांमधे बराच फरक आहे. एकाद्या आजारी पेशंटला आपण चांगल खावू घाला असे म्हटले की आपण फळं, नारळपाणी असे देतो सहसा जे आपल्या रोजच्या आहारात कमी असते. पण बागेतील आजारी, रूसलेल्या झाडांना चांगली खते द्या असे म्हटले की मंडळी नेहमी जी खतं देतात त्यातीलच खतांचा डोस वाढवतात. हे चुकीचे आहे. त्यांना खतांमधे वेगळेपण गरजेचे असते.

कंपोस्टखत हे एसिडिक ( Acidic) असते. ते फुल झाडांना, फळ येणार्या झाडांना गरजेचे असते. तर गांडूळखत हे गांडूळांनी तयार केलेले असते. असा नैसर्गिक कचरा जो अर्धेवट कुजलेला असतो तो गांडूळ खातात व त्यांची जी विष्टा असते त्यास गांडूळखत असे म्हणतात. या खतात झाडांना जी खनिजद्रवे गरजेची असतात ती त्यातून मिळतात. बरेचदा मंडळी सुकलेले गांडूळखत वापरतात. मित्रांनो जे खत कोरडे झाले आहे. ते त्यात गांडूळांची अंडी कशी जिवंत राहतील किंवा त्यातील जे पोषण द्रवे असतात ही हवेत विरून जातात. त्यामुळे गांडूळखत हे नेहमी निमओले, ताजे असावे. म्हणजे त्यातील अंडी ही जिवंत राहतात. तसेच त्यातील घटक पाण्यात विरघळून ते झाडांना मिळतात.

शेणखत हे गांडूळांचे उत्तम अन्न आहे. एकतर ते मऊसूत व कुजलेले असल्यामुळे ते पचवू शकतात. त्यांचे ते आवडते अन्न असते.

बागेत शेणखत टाकल्यामुळे बागेत गांडुळांची संख्या वाढते. त्यांचा आकारसुध्दा वाढतो. तसेच झाडांच्या फळांचा आकार वाढतो.

त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते. आपल्याला फक्त झाडाना पोषण देवून चालत नाही. मातीतील जे काही सुक्ष्म जिवाणू, गांडूळे आहेत त्यांनाही पोषक ठरतील असे अन्न द्रवे (खतं) देणं गरजेचे असते.

वर्मी कंपोस्टः वर्मी कंपोस्ट व वर्मी कल्चर व गांडूळखत हे वेगवेगळे आहे. वर्मी कंपोस्ट म्हणजे नैसर्गिक कचर्याचे खत बनवतांना आपण जर गांडूळाचा वापर केला असेल तर वर्मी + कंपोस्ट बनते. तयार कंपोस्ट खत हे गांडूळांचे खाद्य नाही. कारण कंपोस्ट म्हणजे पूर्णपणे कूजलेला पालापाचोळा होय. त्यामुळे त्याचा वापर केला तरी त्यात गांडूळे उत्तम प्रकारे वाढू शकत नाही.

वर्मी कल्चर म्हणजे एकाद्या खताच्या प्रकल्पात आपल्याला गांडूळं प्रविष्ट करावयाचे असल्यास त्यास वर्मीकल्चर असे म्हणतात.

गांडूळखत हे वर सांगतीलेच आहे.  तेव्हा. आपल्या कुडींत वाफ्यात कशा पध्दतीने गांडूळे तयार होतील, ते वाढीस लागतील अशी कृती करा.

खतातील प्रकार ओळखायला शिका. झाडांना कोणत्या काळात काय गरजेचे आहे त्यानुसार खतांचा वापर करा.

आम्ही खालील मो. क्रंमाकावरून व्हाट्सअपवर गार्डेन अपडेटस पाठवत असतो.

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

पर्यावरणपुरक कामासाठी गच्चीवरची बागेला सातपूर MIDC  नाशिक परिसरात जागा हवी आहे.

एकादी जूनी कंपनी असल्यास तिची स्वच्छता ठेवणे, राखणारी करणे, झाडे जगवणे इ. कामे करू. आम्ही यासाठी आमचे स्वतःचे योगदान देवू.  आपणास विनंती आहे की आम्ही पर्यावरण काम पुढे जाण्यासाठी संघर्ष करत आहोत. चेहरा हा व्यावसायिक असला तरी आमचा पिंड हा सामाजिक आहे. त्यामुळे कृपया हा लेख नाशिकमधील मित्र, आप्तेष्ठांना पाठवा.


व्यावसायिक जोड दिली आहे. आतापर्यंत गरजेचे भांडवल आम्ही वैयक्तिक कर्जाऊ रक्कम घेवून उभे करत आहोत. विविध माध्यमांव्दारे लोकांना निशुल्क व कमीत कमी खर्चात सेवा पुरवत आहोत. काम जसे जसे लोकांपर्यंत पोहचत आहे तसे तसे त्याची व्याप्ती वाढत चालली आहे. सध्या गच्चीवरची बाग एक्सटेन्शंन ही जागा कमी पडत आहे. ( २५ बाय ५० फूटाचे पत्र्याचे शेड व एकल गो पालनसाठी (५० बाय साठ फूटांचा प्लॉट- खरं तो आपला नाही) .

जसे जसे काम वाढत चालले आहे तसे तसे जागेची कमतरता भासत आहे. जागा कमी असल्यामुळे कमी जागेत अधिक पर्यावरणाचा संसार थाटतांना बराच वेळ खर्च होत आहे. सध्या या जागेत खालील प्रमाणे उपक्रम राबवत आहोत.

  • देशी गोपालन ( गोठा)
  • जिवामृत, ह्यमिक जल, दशपर्णी बनवणे
  • गायीच्या शेणाचे खताचा प्रकल्प
  • सुका पालापाचोळा (मर्यादीत स्वरूपात) संग्रहीत करणे
  • विटां व बागेसाठी गरजेची खत, माती संग्रहीत करणे
  • पालापाचोळ्याचा चुरा संग्रहीत करणे
  • यासाठी रिकाम्या सिमेंटच्या गोण्या, रिकाम्या बाटल्या, कॅन यांचा संग्रह आहे.
  • बाग प्रेमींना उपयुक्त साहित्याचे छोटासा sale Display ( मांडण्या) आहेत.
  • भाजीपाल्याची रोपे मर्यादीत स्वरूपात तयार करणे.
  • गाडी पार्किंग
  • कृषी ग्रंथालय

भविष्यात मोठी जागा भेटल्यास वरील उपक्रमांची व्याप्ती वाढवण्यासोबतच खालील उपक्रम राबवण्याची इच्छा आहे.

  • भटक्या देशी गायींचे संवर्धन व पालन करणे
  • बारमाही किचन गार्डन सेटअप तयार करणे
  • बारमाही टेरेस गार्डेन सेटअप तयार करणे
  • बारमाही सेंद्रिय शेतीचे प्रयोग करणे
  • कचरा व्यवस्थापनाची विविध प्रारूपे तयार करणे
  • फळबाग तयार करणे
  • इच्छुकांना पर्यावरण कामात लोक सहभाग घेता येतील असे कचरा व्यवस्थापन व शेतीचे प्रयोग.
  • शाळांच्या अभ्यास सहली वाढवणे
  • गोपालनासाठी आवश्यक चारा निर्मिती करणे
  • औद्योगीक क्षेत्रात होणारी पानगळ ही मोठ्या प्रमाणात संग्रहीत करणे व त्यावर प्रक्रिया करणे
  • लोक सहभागासोबत स्थानिक प्रशासनाला ( कचरा व्यवस्थापनात मार्दर्शक होईल) असे प्रयोग उभे करणे.
  • स्थानिक रोपांची व औषधी वनस्पतींचे गार्डेन तयार करणे ( जे मोफत दिले जाईल)

यासाठी आम्हाला सातपूर MIDC  नाशिक परिसरात कमीत कमी ६००० चौरस फुटांची व जास्तीची जागा हवी आहे.

एकादी जूनी कंपनी असल्यास तिची स्वच्छता ठेवणे, राखणारी करणे, झाडे जगवणे इ. कामे करू. आम्ही यासाठी आमचे स्वतःचे योगदान देवू.  आपणास विनंती आहे की आम्ही पर्यावरण काम पुढे जाण्यासाठी संघर्ष करत आहोत. चेहरा हा व्यावसायिक असला तरी आमचा पिंड हा सामाजिक आहे. त्यामुळे कृपया हा लेख नाशिकमधील मित्र, आप्तेष्ठांना पाठवा.

http://www.gacchivarchibaug.in

Zero waste-City Farming | Clean Nashik | Garbage To Garden


Lock down Inspiration Film Making winner


World Kitchen garden Day..

गच्चीवरची बाग नाशिक मधे गेल्या आठ वर्षापासून सातत्याने पर्यावरण संवर्धनात काम करत आहे. Grow, Guide, and Build, Products Sale & Services या पाच प्रकारची कार्यक्षेत्र लक्षात घेवून लोकांना प्रयोग, प्रशिक्षण, प्रकल्प, सेवा व साहित्य उपलब्ध करून दिले आहे. ही संपूर्ण प्रक्रियेचा कणा हा गारेबज टू गार्डेन असा आहे. कमीत कमी मातीत घरातील व बागेतील कचर्याचे सृजनशील व्यवस्थापन करत विषमुक्त भाजीपाला पिकवण्याचे काम अविरत करत आहोत.

मार्गर्दशनाचा भाग म्हणून lock downच्या काळात Lock down Inspiration Film Making या स्पर्धेचे आयोजन केले होते. यात जवळपास ५०० लोकांनी सहभाग नोंदवला होता. ज्यांनी सहभाग घेतला त्यातील काही निवडक दोन कुटुंबाची यात निवड झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत महिला प्रतिनिधीचा समावेश होता.

या स्पर्धेत एक प्रथम क्रमांक विजेता व उत्तेजनार्थ विजेता असे दोनच क्रमवारी ठरली होती पण.. आमच्या हाती आलेल्या माहितीपटातून दोनही स्पर्धेकांना संयुक्त पध्दतीने प्रथम क्रंमाकाचे विजेता घोषीत करावे लागले. कारण दोघीचा सहभाग, त्यासाठी घेतलेले कष्ट, वय, आवड यांचा विचार करता त्यांच्यात उत्तेजनार्थ ठरवणे फार अवघड होते.

प्रथम क्रंमाकाचे संयुक्त विजेते हे नित्या पाटील, नाशिक व अनुष्का कशाळकर, नाशिक असे आहेत.

यांनी बनवलेला माहितीपटाची लिंक सोबत देत आहोतच…

अनुष्का कशाळकर ही दहावीची विद्यार्थीनी. आई बांबाना शेतीची, निसर्गाची पूर्वीपासूनची आवड. शासकीय कामानिमित्त अगदी जंगलाच्या सहवासात झाडं, झुडपे, फुलात रमलेले हे कुटुंब. पण शहरात आल्यावर झाडांशिवाय कसे राहणार? जागा आहेच कुठे.. अरूंद रस्ते.. उंच उंच ईमारती त्यांच्यामुळे आहे त्या अंगणात पुरेसा प्रकाशही येत नाही. मग पर्याय गच्चीचाच… त्याच्या तनूजा ही आनंद निकेतन या प्रयोगशील शाळेची कृतीशील व उत्साही विद्यार्थिनी.. तर तनुजा व कुटुंब निसर्गाचा आनंद तर घेत आहेतच शिवाय चविष्ट, रसदार, अशा विषमुक्त भाज्यांचेही उत्पादन घेत आहेत.

तर नित्या पाटील ही सहावीची विद्यार्थिनी. दोघेही पालक वैदयकिय सेवेत कार्यरत आहेत. नित्या ही सिंब्वायसिस या शाळेची विद्यार्थीनी. मितभाषी, उत्सुक. विविध उपक्रमात सहभागी होणारी, निसर्गासोबत रमणारी, त्यातील किटकांचा अभ्यास करणारी. आजूबाजूच्या प्रश्नांची जाण, त्यामुळे ती वयाच्या पाचव्या वर्षापासून फटाके फोडत नाही. कारण त्यामुळे आपल्या भूमातेचे संरक्षण होते. तिन नुकतच HOMI BHABHA YOUNG SCIENTIST EXAM उत्तीर्ण झाली. त्याल तिला चांदीचे पदक देवून गौरवण्यात आले ..

तिने या परिक्षेत शहरी शेतीचा अभ्यास केला होता. त्यासाठी गच्चीवरची बाग, नाशिक ची निवड केली. तिने प्रकल्प संशोधन केले. त्यातूनच तिने काही घरी प्रयोग केले, त्यातून तिला बागेची आवड निर्माण  झाली व गच्चीवर तिनेही बाग फुलवली…

या स्पर्धेत विजेत्यांना काय देणार हे गुलदस्त्यात असूनही त्यांनी सहभाग घेतला याचे कौतुक वाटते. बरेचदा मंडळी काय व किती मिळतयं यावर सहभाग अंबलबून असतो. पण Lockdown Inspiration Film Making स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतलाच पण त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांना भक्कम पाठबळ दिले. त्यांना गच्चीवरची बाग तर्फे सलाम… गच्चीवर बाग फुलवून निसर्गाजवळ जाण्याचा, त्याला समजून घेण्याच्या या प्रयत्नात आपण सर्वेच सहभागी झाला या बदद्ल धन्यवाद मांडतो. विजेत्यांना त्याचे बक्षीस लवकरच देण्यात येईल… अशा रितीने WORLD KITCHEN GARDEN DAY संपन्न केला.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Home composting and kitchen gardening workshop

सर्वात महत्वाचे म्हणजे रासायनिक भाज्यांना चवच नसते अशी चव हरवलेले आपण शहरातली माणसे हॉटेलचे जेवण जवळ करतात पण यातून योग्य पोषण मिळतच नाही. खरं पोषण आणि खरं खरी चव अनुभवायची असेल तर घरच्या घरी भाजीपाला पिकवणे याशिवाय दुसरा पर्याय नाही.


Home composting and kitchen gardening workshop

विषमुक्त भाजीपाला ही काळाची गरज झाली आहे. योग्य पोषणाअभावी आधुनिक जगातील सुख सुविधा व आरोग्य सुविधा यांचा योग्य तो परिणाम यावा यावयास वेळ लागतो. रासायनिक भाजीपाला हा आरोग्याला घातकच आहे हे आता सर्वमान्य होत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रासायनिक भाज्यांना चवच नसते अशी चव हरवलेले आपण शहरातली माणसे हॉटेलचे जेवण जवळ करतात पण यातून योग्य पोषण मिळतच नाही. खरं पोषण आणि खरं खरी चव अनुभवायची असेल तर घरच्या घरी भाजीपाला पिकवणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. घरचा भाजीपाला म्हटलं की पहिल्यांदा आपल्या डोक्यात येतं की त्यात खूप खर्च लागेल पण हा केवळ गैरसमज असून आपण वेळ दिला, त्याचे विज्ञान, निसर्गचक्र समजून घेतलं तर सहजरीत्या घरच्या घरी भाजीपाला पिकवू शकतो आणि त्याचा जोडीला होम कंपोस्टिंग हे खूप महत्त्वाचं आहे म्हणूनच गच्चीवरची बाग नाशिक व महाराष्ट्र टाइम्स नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मागील दोन वर्षातील ही चौथी कार्यशाळा संपन्न करत आहोत येत्या 6 ऑक्टोबर 2019 रविवार रोजी नाशिक येथे संपन्न होणार आहे. या कार्यशाळेत लोकसत्ता ह्या वर्तमानपत्रातील गच्चीवरची बाग या सदराचे व गच्चीवरची बाग पुस्तकाचे लेखक संदीप चव्हाण हे स्वतः स्लाईड शो द्वारे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळे नंतरही ही आपण त्यांच्याशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून भाजीपाला निर्मिती व कंपोस्टिंग साठीचे मार्गदर्शन मिळवू शकता. तर आपण सहकुटुंब सहभागी व्हावे या अपेक्षेने. http://www.gacchivarchibaug.in

9850569644/8087475242


Home composting and जे kitchen gardening workshop

Chemical free food is necessary of this era. Lack of proper & origin nutrition takes time to bring about the right effects of the well-being and health care of the modern world. It is becoming increasingly common that chemicals are dangerous to health, and most importantly, people in the city who miss the taste of chemicals have no taste, but they do not get proper nutrition. There is no choice but to cook homemade vegetables if you want to experience true nutrition and true taste.
Home vegetable said that it comes to our head for the first time, it will cost a lot, but it is only a misunderstanding and if we give the time, understanding the nature and nature of the cycle, we can easily grow vegetables in our house and home composting is very important for the couple. This is the fourth workshop in the last two years in collaboration with Maharashtra Times Nashik doing nuns.
It will be held on Sunday, October 6, 2019 in Nashik. The workshop will be directed by Sandip Chavan, author of the Gachivarchari Bagh column in the newspaper Lokasatta, and Sandeep Chavan, the author of the Gachchivar Bagh book. After the workshop you can also contact them through social media and get guidance on vegetable production and composting. So expect you to join a family.

http://www.gacchivarchibaug.in

9850569644/8087475242

Grower Cum composter

सलाडसाठी उपयुक्त अशा भारतीय व विदेशी पालेभाज्यांची लागवड करू शकता. प्रत्येकी ५ किंवा १० कप्प्यात आपण एक भाजी या प्रमाणे १० प्रकारच्या भाज्या लागवड करू शकता. वरील भागात वर्षायु झाड लागवड करू शकता. तसेच उर्वरीत २ कप्प्यात वेलवर्गीय बियांची लागवड करू शकता.


Copy of Copy of Picture 003 copy copy

Grower Cum composter by गच्चीवरची बाग

गच्चीवरची बाग नाशिक हा participatory environmental activities गेल्या सात वर्षापासून नाशिक मधे व महाराष्ट्रात रूजवत आहोत. आम्ही पूर्णवेळ प्रत्यक्ष भाजीपाल्याच्या बागा फूलवून देण्याचे काम करत आहेत. या विषयी आम्ही वेगवेगळे प्रयोग करून पाहतो. ते विविध ठिकाणी रूजवून पाहतो. त्यातीलच एक प्रयोग आपल्यासाठी देत आहोत.

बाजारात सध्या कंपोस्टर यंत्राची धूम आहे. घरच्या कचर्याचे कंपोस्टींग हे गरजेचेच आहे. ते प्रत्येकाने आपले पर्यावरणीय कर्तव्य म्हणून पार पाडलेच पाहिजे. पण बाजारातील कंपोस्टर हे फक्त हिरव्या कचर्याचे खतात रूंपातर म्हणजेच त्याचे व्यवस्थापन करणेसाठी उपलब्ध आहेत. आम्ही याही पूर्वी गच्चीवरची बागेने All in one Waste composter – Devil Digester विकसीत केला आहे.

त्याचीच नवीन आवृत्ती म्हणजे “ग्रोव्हर कम कंपोस्टर” आम्ही विकसीत केला आहे. बाजारातील कंपोस्टरच्या किमती एवढा आहे. त्यात आपण रोजचा कचरा डंम्प करू शकता. तसेच त्यात कंपोस्टींग करता करता त्यात पालेभाजी, फळभाजी (वांगी, टोमॅटो, मिरची) वेलवर्गीय व एकादे वर्षायु झाड उगवू शकता. ( उदाः शेवगा, पपई) हा २०० लिटर क्षमतेचा ड्रम असून त्याला ५२ कप्पे करण्यात आले आहेत.

त्यात आपण सलाडसाठी उपयुक्त अशा भारतीय व विदेशी पालेभाज्यांची लागवड करू शकता. प्रत्येकी ५ किंवा १० कप्प्यात आपण एक भाजी या प्रमाणे १० प्रकारच्या भाज्या लागवड करू शकता. वरील भागात वर्षायु झाड लागवड करू शकता. तसेच उर्वरीत २ कप्प्यात वेलवर्गीय बियांची लागवड करू शकता.

कसे काम करते…. या ड्रमला बाहेरील बाजूस कपाच्या आकाराचे ५२ कप्पे केले असून त्यात ते चौफेर आहेत.

वरील बाजू कडून म्हणजे ड्रमच्या मधोमध एक पाईप दिलेला असून त्यात रोजचे खरकटे अन्न, हिरवा कचरा आपण त्यात टाकू शकता. तळाशी त्याला छिद्र दिलेले असून त्यातून पाण्याचा निचरा होतो. निचरा होणारे पाणी पुन्हा वापरू शकता. यात उत्तम प्रकारे यात पालेभाज्यांची निर्मिती होते.

याला चौफेर उन्हाची गरज असते. ते आपण बाल्कनीत, टेरेस व अंगणात मधोमध ठेवू शकता. यात गांडूळ सोडलेली असल्यामुळे कंपोस्टींगचे ते खत बनवतात. व तेच खत रोपांना पुरवतात. यात थोडी सोय सुविधा केल्यास त्यास सहजतेने फिरवता येताे. पण फिरवणे शक्य नसल्यास अर्ध्या भागात ऊन येत नसल्यास तेथे Exotics भाज्या सहजतेने उगवता येतात.

आपल्याला “ग्रोव्हर कम कंपोस्टर” पहावयाचा असल्यास नक्कीच आमच्या बागेला भेट देवू शकता.

गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.

www.gacchivarchibaug.in

गच्चीवरची बाग updates साठी गच्चीवरची बाग नाशिक page like करा ..

Waste: व्यवस्थापन, विकेंद्रीकरण व लोकसहभाग….


नाशिक हे आपले आवडते शहर आहे. त्याला स्मार्ट सिटी म्हणून विकसीत करायचे मान्य झाले आहे. मुळातच नाशिक शहराला स्मार्ट बनायला बर्याच काही शक्यता आहेत. स्मार्ट सिटी म्हणून बरेच मुद्यावर चर्चा, कार्यशाळा संपन्न झाल्यात..

स्मार्ट सिटी विकास होण्यासाठी शहरातील कचरा व्यवस्थापन हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कचरा प्रश्नाला संबधीत किंवा तिला सोडवण्यासाठीची जी काही वर्तमान पध्दत आहे तिच्यात आमुलाग्र बदल घडवून आणणे गरजेचे आहे. हे बदल तीन प्रकारे घडवू शकतात. या तीन गोष्टी म्हणजे कचरा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण, बहुपर्यायी लोकसहभाग….

1)व्यवस्थापनः सध्या कचर्याची विल्हेवाट लावली जातेय. या विल्हेवाटीवर आज प्रशासन करोडो रूपये खर्च करत आहेत. एक म्हणजे कचर्याचे विल्हेवाटी ऐवजी व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. या दोन संकल्पनेत मोठा गभितार्थ आहे. विल्हेवाटीत प्रश्न संपवला अशी भावना असते पण प्रत्यक्षात त्यातून अनेक उपप्रश्नांची उत्पत्ती होत जाते. जे आज घंटागाडी प्रश्न, सफाई कामगार प्रश्न, डंपीग ग्रांऊड प्रश्न असे आहेत. व्यवस्थापन ही निरंतर प्रक्रिया आहे आणि स्वंयभू असते. . त्यावर अनेक पातळीवर एकाच वेळीस काम करता येते व त्यातून येणारे रिर्टन हे कायम स्वरूपी असतात. मुळात ते अबादीत तर असतात पण ते परिवतनशील सुध्दा असतात. अशी ही व्यवस्थापनाची संकल्पना कचरा प्रश्नाबाबत लागू केली पाहिजे.

2)विकेंद्रीकरणः व्यवस्थापनाचाच भाग पण त्यास ठळक व स्वंतत्र्यपणे पाहता येईल असा मुद्दा म्हणजे कचर्याचे विकेंद्रीकरण होय. सध्या कचरा विविध ठिकाणाहून गोळा करणे, तो साठवणे (नव्हे सडवणे) त्यासाठी अनेक अर्थांचे अर्थकारण साधने हे नियंत्रित केले पाहिजे थोडक्यात कचरा जेथे तयार होतोय तेथेच तो जिरवला पाहिजे.. त्या जिरवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले पाहिजेत.

3)बहुपर्यायी लोकसहभागः कचरा व्यवस्थापनात लोकसहभाग महत्वाचा आहे. लोकसहभाग वाढावा यासाठी स्मार्ट पर्याय शोधले जाणार आहेत. पण हा पर्याय पण एकच एक असून चालणार नाही.. त्यासाठी अनेक पर्यायांची गरज आहे. शहरातल्या एकाद्या मुद्यावर परिवर्तन गरजेचे आहे असे मानल्यास त्यात लोकसहभाग खूपच महत्वाचा आहे. एकादे ध्येय साध्य करण्यासाठी लोकसहभाग हे साधन असले तरी ते काही यांत्रिक साधन नाही आहे. ते एक जीवंत प्रक्रिया आहे. त्यात अनेक भावभावना, समज-गैरसमज, हेवे-दावे, फायदा- तोटा, मान-सन्मान असे सारेच काही आले.. हा मुद्दा लक्षात घेवूया…

नेमकं येथेच गच्चीवरची बाग हे महत्वाचे काम करत आहे. कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा हा निकाली काढण्यासाठी लोकसहभागानेच काम करत आहे. वरील तीनही मुद्यांचे येथे एक चांगले व्यावहरिक गणित व सहभागाचे मेतकूट जमून येते ते कसे पाहूया…

राव (प्रशासन) न करी ते गाव करी… ही म्हण प्रख्यात आहेच. याच्या मुळाशी लोकसहभाग हे तत्व आहेत. एकाद्या मुद्यावर लोकांचा सहभाग कधी वाढतो असा विचार करूया… तर लोक सहभाग जेव्हांच वाढतो जेव्हा लोकांचा त्यातून फायदा होवू शकतो. कचरा व्यवस्थापनातून गच्चीवरची बाग फूलवून इच्छुक विषमुक्त भाजीपाला, फळे आहे त्याजागेत फुलवू शकतात. गच्चीवरची बागेने खूप उपयोगशील तंत्र विकसीत केले आहे. 20 टक्के माती व 80 टक्के कचरा वापरून छान पणे घरच्याघरी भाजीपाला पिकवू शकतो.

लोकांना रासायिनक भाज्या, फळे यांचे तोटे लक्षात येवू लागले आहे. बाजारात सेंद्रीयभाजीपाला मिळतो खरा पण त्याची खात्री पाहता लोकांना घरीच भाजीपाला पिकवणे हे महत्वाचे वाटू लागले आहे. तसेच घरीच बाग फुलवून बाग बगीचा फुलवण्याचा आनंदही घेता येईल..जो आजच्या धावपळीच्या जीवनात निसर्गाच्या जवळ जाणे खूप महत्वाचे आहे. ते त्यातून साध्य होते. त्यामुळे गच्चीवरची बाग फुलवणे हे गरजेचे वाटू लागले आहे. गच्चीवरच्या बागेने हे तंत्र खूपच सोप्प तंत्र विकसीत केले आहे. उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तूत, उपलब्ध नैसर्गिक संसाधनात ही बाग फूलवता येते.

कचरा व्यवस्थापनात गच्चीवरची बाग सल्ला, प्रशिक्षण, जन जागृती, सोशल मीडियावर मोफत मार्गदर्शन करत आहे. घरघूती पातळीवर लोकांनी कमीत कमी खर्चात कचरा व्यवस्थापन करावे यासाठी विविध उपाय सुचिवले जातात. ज्यांना जो उपाय पटेल, रोजच्या कामातून करणे सोपे वाटेल तो त्यांनी अवलंबावा यासाठी मार्गदशर्न केले जाते. जेष्ठ नागरिक, तरूण, महिलामंडळे यांना गटानुसार किंवा कार्यशाळा घेतल्या जातात.

असे ही साधी सोप्या तंत्राची गच्चीवरची बाग आपण ही फूलवू शकता.

संदीप क. चव्हाण, नाशिक. www.gacchivarchibaug.in contact & wts app: 9850569644

Needs to equipments/ funds


vertical garden 1 1 (1098)संदीप चव्हाण, नाशिक, महाराष्ट्र में रहते है। पिछले चार साल से गारबेज टू गार्डन तंत्र को लेकर नाशिक में जहर से मुक्त सब्जिया और बागवानी बनाने के लिए लोगोंको प्रेरीत करते है। उनका सपना है की लोग अपने छोटी छोटी कौशिसे व्दारा जहर मुक्त सब्जिया घरपर ही उंगाये, पर्यावरण का खयाल रखे और निसर्ग के साथ जुडे रहे। इसलिए खेती की जरूरू नही है। शहर में जो भी जगह उपलब्ध है जैसे की (पंराडा, टेरेस, बाल्कनी, विंडो) उसीमें उपलब्ध नैसर्गिक संसाधनो (किचन वेस्ट, सुखे पत्ते,)  के साथ और जो भी उपलब्ध वस्तूंए में बागवानी करने के लिए प्रेरीत करते है। आज शहर में डंपीग ग्रांऊड की समस्या बढ रही है। अगर लोगों ने इस तरह किचन वेस्ट का जगह ही पर उसका सुखाकर इस्तेमाल किया तो डंपीग ग्रांऊड की समस्या नही रहेगी। और यह एक कारगर व आसान तरीका है। किचन वेस्ट का कंपोस्टिंग बनाने की कोई जरूरी नही.. ऐसा उनका कहना है। खाद बनाना यह प्राकृतिक के खिलाफ है और उसमें समय का गवाना है यह उनका मानना है।

इसलिए वह पिछले १२ साल से प्रयत्न कर कर रहे है। इस प्रयत्नों के पिछले चार साल में अपने परिवार के लिए उपजिवाका का माध्यम बनाया है। उनके साथ उनका परिवार और दो लोगों को भी रोजगार की प्राप्ती होती है।

जहर मुक्त खेती की आज बहूत जरूरी है। इसके बारे में लोगों को जागृत करना और निसर्ग के प्रती उनका सहयोग लेना जरूरी समजते है। इसलिए उन्होंने एक देशी नस्ल की गाय पाली है। उसीके गोमुत्र और गोबर से टेरेस फार्मिंग में उपयोग करते है।  इस काम को गती मिलने के लिए लंबे प्रयोसो के बाद एक चार पैयावाली गाडी खरेदी है। उसीसे थोडा आसानी हो गयी है। लेकीन यह सब कर्जा है। और कुछ कुछ करना है। उसके लिए और कर्जा मिलना मुश्किल है। और उनके सपने की कडी में कुछ साधनों की कमतरता है। अगर निचे नमुद कियें हुंए साधन का जुगाड हो जाता है तो  में पर्यावरण के क्षेत्र में लोगोंका और बडी मात्रा में सहयोग ले सकत है। और अपनी सिंमेंट की निस्तेज वंसुधरा को हरे हरे रंग के कुछ रंग भरना चाहते है।

  • Petrol Shredder machine 65000/- छत पर बागवानी के लिए 80 % बायोमास ( नारियल के छिलके, गन्ने का छिलके, पेड पौध्दे के पत्ते, सुका हुआ किचन वेस्ट और 20%  मिट्टी और खाद का उपयोग करते है। उपरोक्त मशीन व्दारा जो भि बायोमास लोगोव्दारा फेका या जलाया जाता है। उनको क्रश करके उपयोग कर सकते है। इससे दो फायदे है। एक  कम जगह में जादा से जादा संग्रहीत कर सकते है। और ट्रान्सपोर्ट के लिए सुविधा होगी।
  • किताब प्रकाशन 75000/- अब गच्चीवरची बाग ( टेरेस फार्मिंग) ये किताब की व्दितीय आवृत्ती प्रकाशीत करना चाहते है। जो स्वः एक प्रशिक्षण पुस्तिका की तरह होगी। ताकी इसे पढकर इच्छुक लोंग अपने घरपे ही किताब पढकर छत पर बागवानी कर सकते है। इससे पर्यावरण के क्षेत्र में बढा काम खडा रह सकता है।
  • बफींग machine 10000/- मंदीर से जमा किए नारियल के कठीण कवच से मैं किचेन्स बनाना चाहते है। कुछ चिंजे हातोसेही बनायी है इसमें बहोत सारा वक्त लग जाता है। उपरी मशीन अगर मिल गयी तो मैं कोकोनट शेल से अलग अलग चिंजे बना सकते है। जो पर्यावरण पुरक होगी। और स्थानिक महिलांए के लिए रोजगार की प्राप्ती होगी।

Total amt: 150000/-(1.5 lakh)

उनके कार्यपर युट्यूब पर एक फिल्म है उसे हर रोज २५० लोग देखते है। इसी विषय में मैने लोकसत्ता इस वर्तमान पत्र में एक साल कॉलम लिखा है। इसी काम की विविध माध्यमों व्दारो समाचार पत्र में जीवन परिचय प्रकाशित हुए है।

www.gacchivarchibaug.in

www.youtube.com

 

 

%d bloggers like this: