चाहे आप एक नया बागवान हों या अनुभवी बागवान हों, हमारा कोर्स आपकी जानकारी और कौशलों को बढ़ाने में मदद करेगा। आप सीखेंगे कि कैसे अपनी खुद की सब्जियां, जड़ी-बुंटीया, फुल पौधे, धान उत्पादन के साथ साथ …..
क्या आप अपने घर की सुरंगत से भरी एक सुंदर बागवानी बनाना चाहते हैं? हमारा ऑनलाइन बागवानी कोर्स आपके लिए सटीक विकल्प है! हमारे विस्तृत कोर्स की पाठ्यक्रम व्यवसायिक एवंम अनुभवों द्वारा तैयार किया हैं और आपको बागवानी के सभी पहलुओं को समझाने में मदद करेंगे।
हमारा कोर्स सब्जी उत्पादन से लेकर बागवानी की योजना तक, मिट्टी विज्ञान, रोपण तकनीक, संचार, फसल संरक्षण, और बागवानी में उपयोग किए जाने वाले तंत्र और मंत्र तक शामिल होता है। आपको इंटरैक्टिव ऑनलाइन पाठ्यक्रम, वीडियो, प्रश्नोत्तरों के विकेंड सेशनका एक्सेस मिलेगा, जो आपको आपकी बागवानी की रफ़्तार से सीखने और हमारे विशेषज्ञों से व्यक्तिगत प्रतिक्रिया प्राप्त करने में मदद करेंगे।
चाहे आप एक नया बागवान हों या अनुभवी बागवान हों, हमारा कोर्स आपकी जानकारी और कौशलों को बढ़ाने में मदद करेगा। आप सीखेंगे कि कैसे अपनी खुद की सब्जियां, जड़ी-बुंटीया, फुल पौधे, धान उत्पादन के साथ साथ टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, फार्महाऊस, खेती बाडी में भी ईस्तेमाल कर सकते है.. अगर आप गार्डेनिंग को लेकर कुछ व्यवसाय बनाना चाहते है, विस्तार करना चाहते है तो डिजिटल मीडिया के कौशल को आप प्राप्त कर सकते है.
आएं हमारे मराठी और हिंदी भाषा में विस्तृत कोर्स की जानकारी निचे दि गयी लिंक व्दारा पांए.
मागील दहा वर्षात आमची उत्पादने प्रयोगाच्या ( Experiments) त्याच्या परिणामकारकतेच्या, ( Effectiveness) उपयोगीतेच्या ( Useful) कसोटीवर पारखून पहात होतो. तेव्हा त्यांची किंमत ही ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही विक्री करत होतो. थोडक्यात ही आरंभीची किंमत होती. (Welcome Price) पण येत्या काळात गच्चीवरची बाग या उपक्रमाची व्यापकता ( Scope, Reach) वाढवण्यासाठी (उदाः लाईव्ह वेबिनार, ( zoom webinar) तसेच वाढती महागाई, डिजीटल प्लॅटफार्मचे वाढते वार्षिक सभादत्व व मागील उत्पादनांच्या खर्चाची तूट भरून काढण्यासाठी आमच्या उत्पादनांच्या किंमती १ जाने . २०२३ पासून वाढवत आहोत.
नमस्कार, गच्चीवरची बाग, नाशिक.
तुमच्या आमच्या आवडीची
बाग गच्चीवरची…
गच्चीवरची बाग अर्थात रसायनमुक्त भाजीपाल्याची बाग.
गच्चीवरची बागेला दहा वर्ष ( 10thAnniversary) पूर्ण होऊन अकाराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. मागील दहा वर्षापासून पूर्णवेळ काम (full time work) करत आहोत. या दहावर्षात विविध समाज माध्यमांव्दारे, (social Media) वर्तमानपत्राव्दारे, ( news paper & Magazine) ई पुस्तकांव्दारे, ( E Books) सेटअप बिल्डव्दारे ( vegetable Setup) आम्ही आमचे अनुभव, ( Experience) प्रयोग, ( experiments) संसोधन, ( research) उत्पादने पोहचवत आहोत. आम्ही साधारण एक कोटी लोकांपर्यंत पोहचलो
(Reach) आहोत. येत्या काळात आम्ही हिंदी व इंग्रजी भाषेतही आमची सेवा पुरवणार आहोत. त्यामुळे येत्याकाळात शंभर कोटी लोकांपर्यंत पोहचण्याचा मानस आहे.
रसायनमुक्त भाजीपाल्याची (Chemical Free Food) ही काळाची गरज आहे. त्यामुळे आम्ही मागील दहा वर्षात जी काही उत्पादनं तयार केलीत. सहजरित्या भाजीपाला उत्पादनांसाठी (vegetable production) त्याचा वापर करता येतो. असे टॉप फाईव्ह प्रोडक्ट ( Top Five Garden Products) व इतर उत्पादनांच्या किंमती ( Increase price) आता वाढवत आहोत.
मागील दहा वर्षात आमची उत्पादने प्रयोगाच्या ( Experiments) त्याच्या परिणामकारकतेच्या, ( Effectiveness) उपयोगीतेच्या ( Useful) कसोटीवर पारखून पहात होतो. तेव्हा त्यांची किंमत ही ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही विक्री करत होतो. थोडक्यात ही आरंभीची किंमत होती. (Welcome Price) पण येत्या काळात गच्चीवरची बाग या उपक्रमाची व्यापकता ( Scope, Reach) वाढवण्यासाठी (उदाः लाईव्ह वेबिनार, ( zoom webinar) तसेच वाढती महागाई, डिजीटल प्लॅटफार्मचे वाढते वार्षिक सभादत्व व मागील उत्पादनांच्या खर्चाची तूट भरून काढण्यासाठी आमच्या उत्पादनांच्या किंमती १ जाने . २०२३ पासून वाढवत आहोत.
आपणास या किंमती जास्त वाटू शकतात. पण व्यवसाय व लोकांना निशुल्क शिकवतांना तारेवरची कसरत होतेय. तरी सुध्दा आपण ३१ डिसें. २२ पर्यंत आपण आपणास हवे असलेले साहित्य हे आहे त्याच किंमतीत आरक्षित ( Pre Book Offer) करू शकता. हवं तर आपण मार्च २०२३ पर्यंत त्याचा स्विकार केला, किंवा घेवून गेलात तरी चालेल. पण यासाठी तुम्हाला ३१ डिसेंबर २२ पूर्वीच त्याची रक्कम अदा ( Payment) करावी लागेल.
टॉप फाईव्ह प्रोडक्टस ( आताच्या किमंती – २०२३ मधील किंमती)
अन्नपूर्णा बॅग्ज – ३५० रू. – ५०० रू. प्रति नग,
एरो ब्रिक्स बेड ३५०- ५०० रू. प्रति चौरस फूट
छापिल व ई पुस्तके. २५०- ५०० रू.,
बिशकॉम ( १६रू. शेणखत २२ रू.) ३२ रू. किलो.
इतर द्राव्य खतं.गोमुत्र, निम व करंज स्प्रे, जिवामृत २२ रू. – ३२ रू. लिटर
नमस्कार मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक येथून.
आज तुम्हाला वेलवर्गीय भाज्या वाढवण्याचे सिक्रेट सांगणार आहे.
एरो ब्रिक्स बेड व जमिनीवर वेलवर्गीय लावतांना सगुणा बॅगेत वेल वाढवण्याच्या पध्दतीचा वापर करा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. कितीही पाऊस आला, कितीही पाणी साचलं तरी वेलाची मुळ खराब होणार नाही. अधिक पाण्यामुळे वेलाचे खोड व मुळ सडण्याची दाट शक्यता असते. कारण ते फार नाजूक असतात. त्यामुळे वेलवर्गीय बिया लावतांना सगुणा बॅगेचा वापर करा. याचे शास्त्रीय कारण म्हणजे अधिकच्या पाण्यात मुळं सडली तरी पाण्याच्या संपर्कापासून खोड वर रहाते. त्यामुळे खोड तग धरते. व त्यामुळे वेल दगावत नाही.
अधिक पावसामुळे बॅगेतील मुळं व वर पर्यंत खोड सडून जाते. पण खोडाने अशा प्रतिकूल परिस्थतीत मुळांचा फुटवा तयार करून वेल जिवंत ठेवतात. आणि याला खात्रीने भरपूर फळे लागणार यात शंकाच नाही. या पध्दतीने वेलवर्गीयाची लागवड करून आम्ही जमिनीवर दूधी भोपळ्याचे अनपेक्षीत असे उत्पादन घेतले आहे. याचा फायदा भाजीपाला उत्पादन करणारी शेतकरी सुध्दा करू शकता. लाईक करा, शेअर करा. कॉमेंट करा. कारण शेअरींग ईज केअरिंग. आम्हाला गुगलवर शोधा. धन्यवाद.
या मालिकेतील पुढेचे उत्पादन म्हणजे संपूर्णा ( संपूर्ण अन्न) ही बॅग्ज तयार केली आहे. यात आपल्याला रेडी टू हार्व्हेस्ट अशी बॅग मिळणार म्हणजे आपणास वांगी, अळूची पाने, मिरच्या, फ्लॉवर, कोबी ( कॅबेज) यांची रोपे ठराविक काळापर्यंत वाढवलेले तयार बॅग देणार.
गच्चीवरची बाग नाशिक ही पर्यावरणपुरक उदयोग आहे. यात आम्ही पर्यावरणाच्या संवर्धनासोबतच त्यात उपयोगीता शोधणे. वाढवणे व त्यात लोकांचा सहभाग घेणे असे काम करत आहोत.
यासाठी वाढत्या शहरीकरणासोबत निसर्गाची साथसंगत हे कशा रितीने संगोपन करता येईल यासाठी प्रयत्नरत आहोत. उपलब्ध जागेत फुलझाडे व भाजीपाला पिकवण्यासाठी लोकांना सोयीचे व सोयीस्कर उत्पादनांची निर्मिती करत आहोत.
गेल्या दहा वर्षात आम्ही ५२ प्रकारची उत्पादने, सेवा व सुविधा तयार केल्या आहेत.
यातील रेडी टू सो अशी अन्नपूर्णा बॅग्जसची निर्मिती केली. त्याला महाराष्ट्रातील निसर्गप्रेमीनी भरभरून प्रेम दिले. उत्पादन विकत घेतले व विकत घेत आहेत. अन्नपूर्णा बॅग्ज मधे आपल्याला आवडेल ते फुलझाड लागवड करू शकता किंवा त्यात भाजीपाल्याची बियाणे, रोपेपण लागवड करू शकता.
या मालिकेतील पुढेचे उत्पादन म्हणजे संपूर्णान्न ( संपूर्ण अन्न) ही बॅग्ज तयार केली आहे. यात आपल्याला रेडी टू हार्व्हेस्ट अशी बॅग मिळणार म्हणजे आपणास वांगी, अळूची पाने, मिरच्या, फ्लॉवर, कोबी ( कॅबेज) यांची रोपे ठराविक काळापर्यंत वाढवलेले तयार बॅग देणार. आपण ति घरी नेवून त्याला योग्य ती काळजी घ्यावी व काही दिवसात आपल्याला त्यातून भाजीपाला मिळू लागेल.
य़ातील रोपाचे आयुष्यमान संपले की आपणास फक्त पिशवी रिकामी करून माती वाळवून घ्यावयाची आहे. व पुन्हा बिशकॉम व खत टाकून पिशवी भरावयाची आहे. पुन्हा त्यात भाजीपाला बियाणे लावून आपण पुन्हा भाज्या निर्मिती करू शकता.
यासाठी आपणास गार्डेन केअर बास्केट मधील ( ज्याची किंमत यात पकडलेली नाही) खते वापरू शकता. किंवा आम्ही मार्गदर्शन करून तुम्ही घरी बनवत असलेली खते वापरू शकता.
हे उत्पादन फक्त नाशिक शहरासाठी डिलेव्हरी चार्जेस घेवून घरपोहोच पोहचवले जाईल. इतर जिल्हे व राज्यातील मंडळी खरेदीसाठी संपर्क करून यावे.
गच्चीवरची (ऑरगॅनिक भाजीपाल्याची) बाग ही सेंद्रीय पध्दतीने शहरी भागात उपलब्ध जागेत भाजीपाला उगवण्यासाठी काम करते. या व्दारे विविध स्तरांवर काम करत आहे. खरं तर हे पर्यावरण संवर्धनासोबत पर्यावरणीय सामाजिक उद्मशिलता म्हणून आम्ही विकसीत करत आहोत. म्हणजे पर्यावरणाचा विचार , संवर्धन करत त्यातून लोक आरोग्याचा, सुरक्षित अन्नाचा विचार करत लोकांना शिकवत आहोत. त्यांना रोजच्या कामातून वेळ काढत आपले अन्न हे आपण तयार करू शकतो यासाठी प्रेरीत करतो.
यासाठी विविध उत्पादने तयार करत असतो. यातीलच युनिक गार्डेन प्रोडक्ट म्हणजे अन्नपूर्णा बॅग्जस होय. छोट्या जागेत स्मार्ट पध्दतीने भाज्या उगवण्यासाठी या रेडी टू सो बॅग्जस फारच उपयुक्त ठरत आहेत.
या बॅग्जस मधे भाज्या उगवण्यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे. अर्थात द्राव्य व विद्राव्य खतांची गार्डेन केअर बास्केट वापरणे बंधनकारक ठरते. किंवा त्यातील गोष्टी तुम्हाला तयार करून त्या वापरणे गरजेचे ठरते. याही व्यतिरित्क इतरही काळजी घेणे गरजेचे आहे. ती काळजी काय घ्यावी या बद्दलची माहिती पुढील प्रमाणे..
अन्नपूर्णा बॅग्जस मधे हवा खेळती रहावी यासाठी बिशकॉम पॉटींग मिक्स ने भरलेल्या असल्या तरी त्यात काही चुकांमुळे झाडांची मुळे खराब होतात.
यासाठी बॅग्जसखाली विटा ठेवाव्यात कारण टेरेस लगत असलेया बॅग्जस खाली ओलावा रहातो. तो ओलावा वाफेत रूपांतर होतो. तो बॅग्जस मधील मुळांना घातक असते. विटा खाली ठेवल्यामुळे हवा खेळती रहाते.
या बॅग्जला विळ्याने उकरी करण्याची गरज नाही. केवळ हाताच्या बोटांनी माती वर खाली करू शकता. तसेच बॅग्जला हाताच्या कडेने अथवा त्यास बुक्के मारले, थोपडले तरी बॅग्जस मधील माती सैल होते. मुळांशी हवा खेळती रहाते. हा सराव साधारण पाऊस संपल्यानंतर अथवा आठवड्यातून एकदा करावी.
यात तिनस्तरीय पिक लागवड करता येते. मध्यभागी फळभाजी लागवड करावी, आजूबाजूला पालेभाजी व कंदमुळेही लागवड करता येतात. मात्र वेळोवेळी वरील प्रमाणे काळजी घेणे गरजेचे असते.
एक पिक संपल्यानंर त्यातील संपूर्ण माती वाळवून माती वाळवून घेणे गरजेचे आहे. पुन्हा त्यात बिशकॉम व खत मिसळून पुन्हा भाज्या लागवड कराव्यात.
आज हम शहर का जीवन जी रहे हैं। जैसे-जैसे शहर बढ़ते हैं, वैसे-वैसे खेत भी बढ़ते हैं। इसके अलावा, हमारे दुनिया छोटी हो जा रही है जैसे की भविष्य में रहने की जगह शौचालय, स्नानघर और बिस्तरों तक सीमित हो जाएगी। नैनो फ्लैट बनकर तैयार हैं। क्योंकि बाहर खाने-पीने के लिए होटल होंगे, घूमने के लिए बाग बगीचे होंगे, मनोरंजन की तमाम सुविधाएं होंगी।
हालांकि ऐसा होने की उम्मीद नही बल्की हो रहा है। सारे सर्व्हिसेस हमे बाहर मिल रहे है। घर तो नाम का हो गया है। इस सारे दौर में हमारा जरूरत एैसा अच्छा, पौष्टिक, निश्चित, गैर-विषाक्त भोजन दुर्लभ होने जा रहा है। भले ही महानगर विकास की हमारी यात्रा निकट आ रही हो, लेकिन यह महत्वपूर्ण है कि आप स्वस्थ खाने के विकल्प विकसित करें। और इसे स्वयं करना बहुत महत्वपूर्ण होगा।
घर की सब्जीयां...
पुणे, मुंबई और नासिक के सुर्वणाकिंत ट्राएंगल शहरों में अब हमें छोटी गैलरी, किचन की खिड़कियों, खिड़की की ग्रिल में सब्जियां उगाने की जरूरत है। छत पर बागवानी जमीन पर या छत पर एरोब्रिक्स द्वारा की जाती है। लेकिन सवाल यह है कि छोटी सी जगह में कैसे उगाया जाए।
इसके समाधान के लिए टेरेस गार्डन से अन्नपूर्णा बैग उपलब्ध हैं। ये बैग कम दामों में उपलब्ध हैं। लेकिन अगर वे हमारे रास्ते में भरे हुए हैं, तो वे सात या आठ साल तक रहेंगे। इन बैगों को सब्जी के बगीचे को उगाने के लिए खिड़की की ग्रिल, बालकनी पर रखा जा सकता है।
इसके समाधान के लिए टेरेस गार्डन से अन्नपूर्णा बैग उपलब्ध हैं। ये बैग कम दामों में उपलब्ध हैं। लेकिन अगर वे हमारे तरीकों में भरे हुए हैं, तो वे सात या आठ साल तक रहेंगे। इन बैगों को सब्जी के बगीचे को उगाने के लिए खिड़की की ग्रिल, बालकनी पर रखा जा सकता है।
इन थैलियों में कंद (अदरक, हल्दी, मूली, गाजर, शकरकंद) के साथ-साथ सभी प्रकार की पत्तेदार सब्जियां पैदा की जा सकती हैं और कुछ फल और सब्जियां भी उगाई जा सकती हैं। उदाहरण के लिए, बैंगन, टमाटर, मिर्च, भिंडी, फूलगोभी, पत्ता गोभी को अच्छी तरह उगाया जा सकता है।
इन बैगों को डाक से भेजने की व्यवस्था है।
एक वेळ पायातली चप्पल परवडणार नाही पण ही बॅग भाजीपाला फुलवण्यासाठी परवडते. सर्वात स्वस्त असलेली ग्रो बॅग ( सगुणा बॅग्ज ) आम्ही सांगतो तशी भरल्यास तुम्हाला भाजीपाल्याची बाग सहज फुलवता येईल दिवसाला खर्च फक्त 2 पैसे , खर्च कमी असलेली ही बॅग नेमकी का कुठे कशी उपयोगात येते तिच फायदे काय हे सांगणारा माहितीपट…
याच मालिकेतील बॅग्जस
१) सगुणा बॅग्जस
२) अन्नपूर्णा बॅग्जस
३) संपुर्णान्न बॅग्जस
४) व्हेजिस टॉवर
अन्नपूर्णा बॅग्जसचे व्यवस्थान कसे करावे वाचा सविस्तर लेख
येणार्या अनिश्चित काळासाठी होम डिलेव्हरीला प्राधान्य असणार आहे. गच्चीवरची बाग गार्डन केअर शॉपी सोबत तुमचा इतरकाही घरून चालणार्या उद्योगांना मदत होणार आहे.) कृषी उद्योग असल्यामुळे कोणत्याही दुकान परवान्याची गरज नाही.)
गच्चीवरची (रसायनमुक्त भाजीपाला) बाग हा पर्यावरण पुरक उदयोगास मार्च २०२१ रोजी आठ वर्ष पूर्ण होऊन नवव्या पदार्पण केले आहे. नाशिककरांना बागेची असलेली आवड, रसायमुक्त भाज्या निर्मितीची आस, आणि कचरा व्यवस्थापनाची धरलेली कास या तीन गोष्टीनी गच्चीवरची बागेचे बालपण जोपासत आता संवेदनशील असे पालकत्वही स्विकारले आहे. म्हणूनच गच्चीवरची बागेने नवव्या वर्षात पदार्पण केले आहे. आम्ही मागील आठ वर्षात विविध समाज माध्यमांव्दारे रसायनमुक्त भाजीपाला निर्मिती, गारबेज टू गार्डेन याव्दारे पर्यावरण संवर्धना विषयी जन जागृती करत आहोतच. म्हणूनच Grow, Guide, Build, Products & sale या पाच वर्क एरिया व्दारे कामाचा, विक्रिचा व लोकसहभागाचा व्याप वाढतच चालला आहे. थोडक्यात मागणी वाढत चालली आहे. पण आम्ही नाशिकच्या एका टोकाला असल्यामुळे बाग प्रेमींना इच्छा असूनही आमचे साहित्य त्यांच्या पर्यंत पोहचवणे अवघड होते कधी कधी शक्य होत नाही. किंवा वेळ लागतो. पण झाडांना वेळेवर खाऊ पिऊ दिले तर ते आपल्याला योग्य तो आनंदाचा परतावा देतात जो पैशात मोजणे अशक्य आहे. पण पर्यावरणासाठी नाशिककरांनी हा घेतलेला पुढाकार फार ठळक व स्पष्ट आहेच. म्हणून आम्ही इथपर्यंत पोहचलो आहोत. (पुढे वाचा)
तर वरील सर्व मुदयांचा विचार करता.. आम्ही नाशिक शहरात गच्चीवरची बागेचे विविध नगरात गार्डन केअर शॉपी सुरू करत आहोत. कारण एकतर स्थानिक बाग प्रेमीना आमची उत्पादनांची सहज उपलब्धता व्हावी तसेच लॉकडाऊन मधे गच्चीवरची बागेवर आलेले आर्थिक संकटाला तोंड देता यावे हा हेतू तर आहेच पण शिवाय यात इतर छोट्या दुकानदारांना, गृहुद्योग करणार्या महिलांना रोजगार मिळावा हा ही हेतू लक्षात घेतला आहे. कारण करोनामुळे अथवा नंतर येणारे आर्थिक संकट हे फार मोठे व खोलवर जखमा करणारे असणार आहे. जे आम्ही सध्या लॉकडाऊनचे आर्थिक संकट आम्ही अनुभवतो आहोतच. या आर्थिक झळीत इतरांनाही दोन पैसे मिळवून कमी करता यावी अशी प्रामाणिक इच्छा आहे.
आम्ही आमच्या उत्पादनाच्या किमती या मागील सात वर्ष स्थिर ठेवल्या होत्या यापुढे दरवर्षी या किमती १ रू. यूनिट (लिटर, किलो, नग) प्रमाणे वाढवले होते. पण यात आम्ही Lock down Bumper Offer सुरू केलीच आहे. मग त्यात इच्छुक विक्रेत्यांना का सहभागी करून घेवू नये हा विचार प्रामुख्याने मनात आला. त्यामुळे आम्ही इच्छुक विक्रेत्यांना गच्चीवरची बाग गार्डेन केअर शॉपी सुरू करण्यासाठी (प्रथम येणार्यास प्राधान्य या तत्वावर ) आमंत्रीत करत आहोत. (पुढे वाचा)
इच्छुक विक्रेत्यांना आम्ही विक्रि करतो त्या किमतीतच विक्री करण्याची विनंती असेन. पण आपण यात स्थानिक उपलब्धता रक्कम (L.A.C – Local Availability Charges) तुमच्या सोयी नुसार आकारू शकता. तसेच घरपोहोच पोचवण्याचे चार्जेस (H.D.C- Home delivery Charges तुम्हाला ग्राहकाशी ठरवून आकारता येईल. (आमची उत्पादने इच्छुक विक्रेत्यांना काय किमतीने मिळेल हे प्रत्यक्ष भेटीत सांगू. आमची उत्पादने आपल्या विक्री नुसार Gacchivarchi Baug Extension येथून घेवून जाणे बंधनकारक असेन.
जागा किती हवी?
पाऊस पाणी, ऊन लागणारी नाही असे छोटेसे शेड असावे. मांडणी असेलतरी उत्तम.. तुमचा पूर्वीपासून घरूनच काही विक्री होत असेन अशा मंडळीना प्राधान्य असेन. कारण हा जोडधंदा म्हणून करता येणार आहे. आम्हाला Display वैगेरेची आवश्यकता नाही. ग्राहकांना उत्पादन वापरा विषयी शंका निरसन, माहिती, वैगेरे हवे असल्यास संदीप चव्हाण यांच्या व्दारे दिली जाईल. आम्ही दूरध्वनी व्दारे सपोर्ट करू. (पुढे वाचा)
तुमच्या शॉपीची जाहिरात अशी होणार…
आपल्या गच्चीवरची बाग शॉपीची जाहिरात आमच्या संकेतस्थळ, समाज माध्यमांव्दारे करणार आहोत. तसेच Google My Business वर तुमची गच्चीवरची बाग शॉपी लिंक केली जाईल. तसेच आमच्याशी पूर्वीच जोडलेले किंवा नव्याने येणारे ग्राहक हे तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शिवाय आमच्या व्दारे कचरा व्यवस्थापन, कौटुंबिक मार्गदर्शन कार्यशाळा, भाजीपाला सेटअप या विषयी काहीही सेवा पुरवायाचे असल्यास आमच्या व्दारे त्या पुरविल्या जातील. पण आपण संदर्भ मिळवून दिलेले ग्राहकांची मागणीची पूर्तता पूर्ण झाल्यावर आमच्या एकूण रकमेच्या ठराविक टक्केवारी इच्छुक विक्रेत्यांना अदा केली जाणार आहे.
आमच्या कडील उत्पादने हे घाऊक किमतीत (तुम्हाल जेवढे नग, लिटर, प्रति, किलो) विकत घेतल्या नंतर ग्राहकांकडूनच आपण स्वतःच त्याचे पेमेंट रिसिव्ह करू शकता. आम्ही फत्त मार्गदर्शक असू.. (पुढे वाचा)
जोड धंदा का म्हणून करावा.
येणार्या अनिश्चित काळासाठी होम डिलेव्हरीला प्राधान्य असणार आहे. गच्चीवरची बाग गार्डन केअर शॉपी सोबत तुमचा इतरकाही घरून चालणार्या उद्योगांना मदत होणार आहे.) कृषी उद्योग असल्यामुळे कोणत्याही दुकान परवान्याची गरज नाही.)
आम्ही इच्छुक विक्रेत्या सोबत दिर्घकाळ व्यावसायिक नातं तयार करू इच्छितो. जे कायम पारदर्शकता विश्वास व नाविण्यतेवर अवलंबून असेन.
कचरा व्यवस्थापन, पर्यावऱण, आरोग्य, लोकसहभाग, भाजीपाल्याची बाग, निसर्ग अशा विविध विषयावर “घंटो का ग्यान मिनंटो में” थोडक्यात आपली डोळे उघडणारी ही वाक्ये तुम्हाला माहित आहे का या पुस्तिकेव्दारे देण्याचा प्रयत्न केला आहे.
कचरा व्यवस्थापन, पर्यावऱण, आरोग्य, लोकसहभाग, भाजीपाल्याची बाग, निसर्ग अशा विविध विषयावर “घंटो का ग्यान मिनंटो में” थोडक्यात आपली डोळे उघडणारी ही वाक्ये तुम्हाला माहित आहे का या पुस्तिकेव्दारे देण्याचा प्रयत्न केला आहे. काम करता करता चिंतनातून सुचणारी वाक्य सुरवातीला फेसबुकवर प्रकाशित करत गेलो. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या वाक्यांचे पुस्तक रूपात दिले आहे. छापिल मुळ पुस्तकाची किमंत 240 रू असून पी.डी.एफ स्वरूपात आपल्याला केवळ 99 रूपयात उपलब्ध करून दिली आहे.
आपल्या घरपरिसरात, बाल्कनीत, गच्चीवर भाजीपाल्याची बाग फुलवणे होय. यातून दोन गोष्टी साध्य होतात. एकतर ही प्राणवायू तयार करणारी Privet Oxygen Hub आहेत. ज्याचा आम्ही कोणत्याही वेळेस त्याचा उपयोग करू शकतो. दुसर असे की आपल्याला संसर्गमुक्त भाज्या व त्याही रसायनमुक्त मिळू शकतात. आजच्या कठीण परिस्थीतीने हे स्पष्ट केले की आपल्या कडे कितीही पैसा असला तरी सार काही विकत घेता येत नाही. त्यामुळे घरी भाज्या पिकवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. कोव्हीड-१९ या आजारापासून, वाचण्याचे प्रमाण अशाच लोकांमधे अधिक आहेत. ज्यांच्यामधे प्रतिकार शक्ती अधिक आहे. अर्थात वयोवृध्दांनासुध्दा योग्य आहार म्हणजे पोषक घटक असलेला, रसायनमुक्त आहार मिळाल्यास ते सुध्दा या विषाणूशी लढा देवू शकतात. आजच्या रासायनिक कृषी पध्दतीत आपल्याला कमी कालावधीत तयार झालेला पोषक घटकांचा अभाव असलेले अन्न सेवन करत आहोत. त्यामुळे त्यातून प्रतिकार शक्ती वाढत नाही. त्यामुळे आपण घरीच पिकवलेल्या भाज्या खाल्या तर नक्कीच त्याचा फायदा होईल. या विषयी माहिती, मार्गदर्शन करणारी पुस्तिका आपल्यासाठी निशुल्क उपलब्ध आहे.
हे सुरू करण्याचे कारण म्हणजे आमच्याकडे बागेसंदर्भात प्रश्न घेवून अनेक जण येतात. आमच्या गच्चीवरची बाग एकस्टेशन (वर्कशॉप) ला अनेक जण भेटी देतात. ५२ प्रकारची उत्पादने आहेत. ते खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांना उपयोगी पडेल असे लेखन साहित्य आम्ही द्यावे हे असा विचार बर्याच दिवसापासून होता.
वाचाल तर वाचाल असं कुणीतरी म्हटलच आहे. माणूस हा प्राणी दोन गोष्टींनी समृध्द होतो त्यातील एक म्हणजे अनुभव व दुसरे म्हणजे वाचन… अनुभवात अनेक प्रयोग असतात. निष्कर्षांची वाट पहावी लागते. त्याला तर्काची जोडी द्यावी लागते. मिळालेल्या ज्ञानाचे शहाणपणात रूपांतर करावे लागते. तेव्हां कुठे समृध्द होता येते. दुसरे असते वाचन… चित्र-नाटक -चित्रपट का पहावा तर त्याचे मुख्य गोष्ट आहे त्यात एक आयुष्य सामावलेले असते. एका आयुष्याची गोष्ट तुम्हाला त्यातून अनुभवता येते. तसेच वाचन.. वाचनात सुध्दा एक आयुष्य, जिवन सामावलेले असते. त्यात अनुभव असतात. ते व्यक्तिसापेक्ष, कालानुरूप असले तरी त्यातून आपण जे अभ्यासतो ते लेखकाच्या अनुभवाच्या एका टप्प्यावर आपण पोहचतो व त्यातून नव्याने सुरवातही ही दुसर्या टप्यापासून आपल्याला करता येते. तर वाचन हे फार महत्वाचे आहे.
वाचनाचा हा मुख्य भाग लक्षात घेवूनच आम्ही एक विशेष ग्रंथालय सुरवात करत आहोत. ते म्हणजे गच्चीवरची बागेला अनुरूप अशी कृषी ग्रंथालय. काही पुस्तके विकत घेतली आहेत. काही पुस्तके दानात मिळाली आहेत. ( तुमच्याकडेही काही पुस्तके असतील तर आमच्या पत्त्यावर पाठवू शकता किंवा पुस्तके सुचवू शकता अथवा ते खरेदी करण्यासाठी आम्हाला आर्थिक मदत करू शकता.) ही छोटीशी १०० पुस्तकांची लायब्ररी आहे.
आमच्या कडे येण्याचे अनेक कारणे आहेत जसे की बागे संर्दभातले निशुल्क मार्गदर्शन, भाजीपाला व खत निर्मिती संदर्भातले उत्पादने.., चुलीवरची मिसळ, सुला वाईन्स, बॅकव्हाटर, बालाजी मंदीर, सोमेश्वर मंदीर, धबधबा, इ. विकएंड पॉईन्टसला कधी आलात तर आमच्याकडे येणं सोप्प आहे. आता आणखी एक कारण आमच्या कडे येण्याचे ! कृषी संदर्भातील पुस्तकांचे ग्रंथालय.
हे सुरू करण्याचे कारण म्हणजे आमच्याकडे बागेसंदर्भात प्रश्न घेवून अनेक जण येतात. आमच्या गच्चीवरची बाग एकस्टेशन (वर्कशॉप) ला अनेक जण भेटी देतात. ५२ प्रकारची उत्पादने आहेत. ते खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांना उपयोगी पडेल असे लेखन साहित्य आम्ही द्यावे हे असा विचार बर्याच दिवसापासून होता.
तसेच आम्ही बागे संदर्भात काही साहित्य घरपोहोच देत असतो. त्यामुळे हे ग्रंथालय आपल्याला आजपासून घरपोहोच इच्छित पुस्तक देणार आहोत. ही पुस्तकांचे ग्रंथालयाचा आपणही उपयोग करून घ्यावा हा त्यामागचा उद्देश आहे.
तुम्ही प्रकाशीत केलेली कृषी आधारित पुस्तिके, मासिके आम्ही विक्री करू. विक्रीसाठी असलेल्या पुस्तकांची माहीती आमच्या संकेत स्थळावर प्रकाशित केली जाईल. त्यासाठीही आपण आमच्याशी संपर्क करू शकता.
याची मासिक रक्कम ही 150रु असून त्याची अनामत रक्कम ही 1000 रू आकारण्यात आली आहे. कारण सर्वात महागडे पुस्तक वा दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह आम्ही करत आहोत.
आपण सारे आपल्या बागेबद्दल जागृत असतो. जणू काही आपली ती बाळंच असतात. त्यांना वेळेवर खाऊ पिऊ घालणं हे आपलं काम बाकी सारं पुढचं काम निसर्ग सांभाळतोच. झाडांना खतपाणी वेळेवर देणं हे आपल्या हातात असतं नि हातचं काहीच राखून न ठेवता ते परतं निस्वार्थपणे दान करणं हा निसर्गाचा स्वभाव.
हे खताचं देन आपण कधी कधीच करतो पण त्यात नियमितता, सातत्यता राखल्यास माती सुपिक व उत्पागकही होते. या देण्यातही आपल्याला विविधता सांभाळावी लागतो. यात तोच तोच पणा आल्यास मातीतील घटक हे (पी.एच) थोडक्यात मातीचा सामू स्थिर होतात. मग आपल्याला प्रश्न पडतो की इतकं सारं वेळेवर देवूनही झाडांना फळं, फुलं, वाढ का दिसत नाही. साहजिकच आहे. एकच प्रकारची खतं टाकल्यामुळे माती अनुत्पादक होण्याची शक्यता वाढते. कारण माती ही अल्कलीक व असिडिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे झांडाना दिली जाणारी खतात विविधता आणणे गरजेचे असते. त्यात द्राव्य खते व विद्राव्य खते हे द्यावी लागतात.
झाडांचे अमृत म्हणून त्यांना जिवामृत हे देत असतो व ते वेळोवेळी देणं गरजेचं असतही. जिवामृत हे जमीनीत दिल्यानंतर काही कालांनंतर त्यातील जिवाणू हे मृत पावतात व त्यांचे खत झाडांना मिळते. (जिवामृताचे खताचे उपयोग व त्याची माहिती स्वतंत्र लेखात दिलीच आहे) जिवामृतामुळे झाडांना पालवी फुटणे, फुटवा येणे, फुले येणे, फळांची वाढ होणे, फळे गोड व मधूर होतात.
नियमित पणे जिवामृत देवूनही कधी कधी परिणाम दिसून येत नाही. अशा वेळेस व अशा ठिकाणी ह्यूमिक जल वापरणे गरजेचे आहे. विशेषतः व्हेजेटेबल फॉरेस्टसाठी गच्चीवर अथवा जमीनीवर एरोब्रिक्स पध्दतीने केलेल्या वाफ्यामधे इंच इंच जागेवर बियाणे लागवड करणे गरजेचे असते. जिवामृत व नैसर्गिक खतांचा वापर करूनही अशा जागेत बियाणं न रूजणं, रोपे वाढत नाही, झाडांचे सर्व लाड करूनही काहीच बदल दिसत नसल्यास अशा वेळेस समजावे की मातीचा पी. एच. (सामू) स्थिर झाला आहे. अशा वेळेस ह्यूमिक जल या एक लिटर द्रावणात पाच लिटर पाणी टाकून दे हातांने एरोब्रिक्स पध्दतीने शिंपडावे किंवा कुंडीला द्यावे, माती काही दिवसातच सजीव होते. भुसभुशीत होते. मागील काही प्रयोगावरून असे जाणवले आहे की काळा मावा व सफेद मावा हा सुध्दा नष्ट होते. तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बागेला देत असलेल्या खतांचे सुक्ष्म पातळीवर विघटन करून ते झाडांना पुरवण्याचे काम करत असते. थोडक्यात ह्यूमिक जल हे खतांची प्रक्रिया करणारे प्रेरक आहे. त्यामुळे ह्यूमिक जलचा वापर आपण दोन जिवामृताच्या पाळीमधे एकदा वापरावयास हरकत नाही.
ह्यूमिक जल हे सफेद रंगाचे असते. त्यास आंबट दही सारखा गंध असतो. ही बाटली वापरतांना नेहमी हलवून वापरावी म्हणजे तळाशी बसलेले घटक पाण्यात निट मिसळतात. तुम्हाला हयुमिक जल हवे असल्यास संपर्क साधावा. २२ रू. लिटर ( २०२२ साठीचा दर)
तर आपणही वापरून पहा व आपल्याला जाणवलेले परिणाम आम्हाला सांगा…
संदीप चव्हाण, गच्चीवरची (रसायनमुक्त भाजीपाल्याची) बाग, नाशिक
काय तुम्ही आजही कोकोपीठ वापरताहेत… का? याचा नेमका फायदा तोटा सांगणारा हा लेख… व त्या ऐवजी नेमंक काय वापरावं….
COCO-PITH : GAIN & LOSSES
कोकोपीटला पर्याय बिशकॉम बद्दल वाचा..
कोकोपीठ का नको…
प्रथम कोकोपीठ म्हणजे काय ते समजून घेवू. कोकोपीठ म्हणजे नारळाच्या शेंड्यामधून धागे वेगळे केल्यानंतर जो भूसा उरतो तो भाग म्हणजे कोकोपीठ होय. कोकोपीठचा वापर पॉटींग मिस्क म्हणून करण्याची प्रचलीत पध्दत आहे. तर बाग आणि कोकोपीठ याचा इतका सहसंबध असतांना हा मुद्दा येथे व तेही वापरू नये अशा अर्थाने चर्चिणे जरा आश्चर्यकारक वाटेल. पण यावर कुणीही सहसा चर्चा करत नाही. कारण त्याची बाजारातील सहज उपलब्धता, त्याची मौखीक जाहिरात, कौतुक पहाता व विशेष म्हणजे त्याला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे त्यावर सहसा कोणी बोलत नाही. पण त्याचे परिणाम खूप काही उत्तम नाही. असे तरी अभ्यासातून जाणवले आहे. खरचं दुसरा पर्याय नाही का.. आणि त्याचा नेमका उपयोग कुठे कसा केव्हा का करावा. हे समजून घेवूया..
तर कोकोपीठ हे स्वतः काही खत नाही. कुंडीतील, वाफ्यातील पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेले माध्यम आहे. कारण माती खूप काळ पाणी धरून ठेवत नाही कुंडीत ओलावा राहावा म्हणून वापरले जाते. खरे तर कोकोपीठ हे भाजीपाल्याची रोपे तयार करतांना वापरले जाते. कारण रोपे तयार करतांना त्याला योग्य ओलावा देणे, बियासोबत तण उगवून न येणे, त्याच्या सोबत द्राव्य खतांचे समायोजन होणे व एवढेच काय ते अंगभूत गुण आहेत. त्यामुळे त्याचा बियांपासून रोपे तयार करतांना अथवा रोपे तयार करणार्या नर्सरीत वापर योग्य आहे. पण त्याचा वापर कुंड्याभरण्यासाठी पॉटींग मिक्स म्हणून केला तर झाडे अधिक पाण्याने मरतात. मुळांना पाण्याचा संसर्ग होतो अथवा अधिक ओलावा, पाण्यामुळे कुजतात. वाढलेले तापमान व कुंडीतील पाणी याचे विषम परिणाम झाले की झाडांची मुळे शिजतात. पर्यायाने झाडे दगावतात. खरे तर कुंड्याच्य मुळाशी योग्य प्रमाणात ओलावा असावा. ओलावा व खेळ्त्या हवे मुळे योग्य प्रमाणात वाफसा तयार होतो. व झाडांची मुळे हे वाफ (गंध) स्वरूपात अन्न ग्रहन करतात. फुलांचा गंध आला की आपले मन ताजे तवाणे होते, व्हिक्सची वाफ घेतल्यावर बरे वाटते. तसेच झाडांनाही गंधरूपी वाफसातून अन्न घेतात. त्यासाठी बाग फुलवतांना स्थानिक नैसर्गिक संसाधनाचा ( नारळ शेंड्या, पालापाचोळा) वापर करणे हे कधीही चांगले. कारण त्याच्या वापरामुळे स्थानिक कचर्याचे व्यवस्थापन तर होतेच. शिवाय त्याच्या दूरस्थ वाहतूकीत जो काही खर्च होतो तो वाचतो. प्रदुर्षणामुळे पर्यावरणाची, संसाधनाची जी काही हानी होते ती आज व यापुढे परवडणारी नाही. तसेच कोकोपीठ बनवतांना बरेचदा त्यास भिजवून ठेवले जाते. त्याचा अर्क हा बाय प्रोडक्ट म्हणून इतर उत्पादनात त्याचा वापर होतो म्हणजे एकार्थाने निसत्व असलेला चौथा आपल्या पदरात पडतो. त्यामुळे कोकोपीठचा वापर झाडे जगवण्यासाठी करू नये… आता… कोकोपीठ वापरावयाचे नाही.. मग काय वापरायचे हा प्रश्न येणारच…
तर कोकोपीठ ऐवजी नारळाच्या शेंड्या वापराव्यात. कारण नारळाच्या शेंड्या मधे नैसर्गिक खताचे घटक तसेच राहतात. त्याचा थेट उपयोग मुळांना होतो. तर नारळाच्या शेंड्या या जत्रेत, यात्रेत देवळात, किराणादुकानात, खोबर्यापासून मिठाई तयार करणार्या कारखाण्यात सहज मिळते. नारळाच्या शेंड्या या पाणी तर धरून ठेवतातच. पण त्यातील धाग्यामुळे त्यात जो काही पोकळ पणा राहतो त्यामुळे हवा खेळती राहते. कारण कुंडीत नारळाच्या शेंड्या टाकल्यातर पाण्याचा निचरा तर होतोच. पण कुंडीतील वायू विजनास मदत होते. शिवाय त्यात गांडूळे निवास करतात. ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता असल्यामुळे पाण्याचा ताण वाढला तरी गांडूळे जगतात. वर्षभराने या नारळाच्या शेड्या कूजून जातात. व माती हलकी होण्यास मदत होते. नारळाच्या शेंड्या कुंडीच्या तळाशी वापरल्या तर विटांचे तुकडे वापरायची गरज पडत नाही. कुंडी वजनाला हलकी होते. मातीत कोकोपीठ हे पॉटींग मिक्स म्हणून वापण्यापेक्षा पालापाचोळ्याचा चुरा वापरावा. आम्ही पालापोचोळ्याचा चुरा करून त्यास जिवामृत व गोमुत्रात अंबवून वाळवून त्याचा (Bishcom) वापर केल्यास त्यातून नैसर्गिक खत मिळते. रोपांची, भाजीपाल्याची वेगाने व उत्तम वाढ होते. तसेच वर खत म्हणून त्याचा वापर करता येतो.
बरेचदा नारळाच्या शेंड्याही नाही मिळाल्या तर बोटाएवढ्या जाडीच्या वाळलेल्या काड्या तळाशी वापरता येतातच त्याही नाही मिळाल्या तर रसळ नारळाच्या फांद्याचे धारधार कोयत्याने शेंडी एवढ्या आकाराचे तुकडे तयार करावेत. त्यांचा सुध्दा उत्तमप्रकारे परिणाम पहावयास मिळतो. कारण त्यामधेही तंतुमयता असल्यामुळे नारळाच्या शेंडी सारखेच काम करते. घरच्या घरी बियाणं रूजवण्यासाठी हमखास कोकोपीठचा वापर करावा. बियाणं निव़ड व रूजवण पुढील भागात…
सोबत दिलेली यादी ही उपलब्ध भाजीपाला बियाणांची आहे. तसेच या यादी प्रमाणे आपण आपल्या बागेत भाजीपाला लागवड करू शकतो. तसेच या फोटोत दिलेल्या यादीपुढील Y/N म्हणजे बिया सध्या Y: उपलब्ध आहेत N: उपलब्ध नाही या विषयी आहे. seeds Details
आता घरी भाज्या उगवणे अगदी सोपे, अन्नपूर्णा- रेडी टू सो बॅग घरी आणा पेरा, वाढवा आणि मिळवा..
आपावसाळा आला की कसा बाग कामासाठी हुरूप येतो. प्रत्येकालाच घरा भोवती फुलांची, भाज्यांची बाग फुलवाविशी वाटते. एवढचं काय तर वरणाच्या फोडणीला टोमॅटो, कड्डीपत्ता मिळावा याची आपण गरज ओळखतो. त्यानुसार आपण भाजीपालासाठी प्रयत्न करतो. या सर्व संसाधनाची जमवाजमव करणे जरा अवघड वाटते म्हणून आपण तो नादच नको म्हणूनच बाग काम सोपे व्हावे म्हणून आम्ही अन्नपूर्णा बॅग्जस हे उत्पादन घेवून आलो आहोत. जणू काही या कूल आयडीयासाठी हॉट प्रोटक्ट..
.आमचे व्हेजेटेबल ब्रिक्स गार्डेनही आपण साकारू शकता पण त्यासाठी मोठ्या गच्चीची गरज असते. पण ज्यांच्याकडे फक्त गॅलरी आहे, विंडो ग्रील आहे त्यांच्यासाठी हे उत्पादन आम्ही घेवून आलो आहोत. अन्नपूर्णा बॅग म्ह्णजे बिया पेरा, भाज्या वाढवा व कापणी करा, मिळवा.. होय. जी आपल्याला लॉकडाऊन काळात घरच्या घरी भाज्या मिळवण्यासाठी मदतगार झाली आहे.
कारण बाहेर जाणे म्हणजे संसर्गाची शक्यता वाढते. म्हणून या लॉकडाऊनच्या काळात व धावपळीच्या जगण्यात घरी भाज्या उगवण्यासाठी बरीच संसाधने गोळा करवी लागतात. पण हे सारे करूनही भाजी उगवण्याची भट्टी जमूनच येईल याची खात्री नाही. त्यामुळे आम्ही अन्नपूर्णा बॅग हे उत्पादन आणले आहे.
हे उत्पादन आता सर्वांचे आवडीचे व कौतुकास पात्र होत आहे. आपल्याला या कुंड्या घरी घेवून जाऊन फक्त पाणी द्यावयाचे आहे. उन, वार्याची काळजी घ्यावयाची आहे. काही अडचण आल्यास व्हाट्स अप मार्गदर्शन केले जाईलच. गार्डेन केअर कीट आपण आमच्या कडून खरेदी करू शकता किंवा तुम्ही पण घरच्या घरी बागेची काळजी घेणारे औषधे तयार करू शकता. रेडी टू हार्व्हेस्ट क्रेट्स मिळतील. अन्नपूर्णा Bag size ही रिकामी असतांनाच १६ बाय १६ इंच. तर भरल्यानंतर १२x 8 inch असते. १० लिटर क्षमतेची..काळ्या रंगाची.प्लास्टीक बॅग असून ति नर्सरीतील रोपे वाढीसाठी वापरली जातात.
या अन्नपूर्णा बॅगेत आपण पालेभाजी, कंदमुळं व फळभाजीची लागवड तर करू शकतातच पण फुलझाडे ही छान वाढतात. दोन किंवा तीन महिण्याचे एक पिक निघाले की माती वाळवून घेणे गरजेचे आहे. माती का वाळवून घ्यावी या विषयी यावर क्लिक करून लेख वाचा
या बॅगमधील एकदा माती वाळवून घेतली की त्यात थोडे बिशकॉम, खत मिसळा व ही बॅग पुन्हा वापरण्यासाठी तयार होते.आम के आम गुटलींयोके दाम.. म्हणजे ३०० रूपयातील या रेडी टू सो बॅग वापरल्यानंतर पहिल्या तीन महिण्यात आपल्याला ऑरगॅनिक भाजी तर मिळणारच ( ३० रू प्रमाणे ३ भाज्या मिळणार ९० रू. त्यातूनच आपल्याला आठ किलो खतासारखी सुपिक माती मिळणार २२ रू. प्रमाणे १७६ रू. व सात वर्ष टिकणारी बॅग- २२ रू. म्हणजे सौदा फायदे का है ना बॉस. बस नजर पारखी चाहिएं… ज्याला समजलं त्याला उमजलं… फायदा कसा याची बेरीज करून पहा… बागेतून जो आनंद मिळणार, घरची भाजी खावून तोंडाला जी चव येणार, मनाला समाधान होणार.. त्याची किंमत नाय करता येणार … तरी करून पहा… अन्नपू्र्णा बॅगेची काळजी कशी घ्यावी… वाचा सविस्तर लेख.
potting mix (Biomass shredding compost) हे असं मटेरिअल आहे जे कधी पाहिलं नव्हत. त्याचा उपयोग करून पहा.. भाज्याच भाज्या…
potting mix (Biomass shredding compost Material)
आपणास माहीतच आहे की गच्चीवरची बाग मागील १२ वर्षापासून भाजीपाला निर्मितीमधे काम करत आहे. बाग काम हे सहज सोपे व्हावे म्हणून आम्ही नवनविन प्रयोग व उत्पादने तयार करत आहोत. कुंडी वजनाला हलकी, रोपनां पोषक ठरेन व ति पण बराच काळ चालेल यासाठी आम्ही विशिष्ट पध्दत वापरत होतो. ती पध्दत आम्ही अजूनही काही सेटअप मधे वापरत आहोतच. तसेच ही पध्दत आता सर्वदूर सुरू झालीय य़ाचा आनंदही वाटतो.
त्यात नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा असे ऐंशी टक्के व खत आणि माती विस टक्के प्रमाण वापरतो. ति पध्दत कुंडयानां निरंतर खताचा पुरवठा करतेच. पण दिर्घकाळ चालले. नैसर्गिक संसाधने तीच आहेत पण त्यात आता नवीन गोष्टीचा थोडक्यात इंप्रुव्हमेंट केली आहे. थोडक्यात वरील सार्या गोष्टीचा आम्ही चुरा करून घेतो. जेव्हां त्याचा बारीक चुरा करून बघितल्या व त्याचे प्रयोग करून बघितले. विशेषतः यात भाजीपाला लागवड करून पाहिला. त्याचे छान परिणाम समोर आलेत. आपण ते पहावयास येवू शकता.
यालाच आम्ही BISHCOM असे म्हणतो. यात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करतो. थोडक्यात आम्ही Potting Mix तयार केले आहे. Natural potting mix (Biomass shredding compost Material) याचे फायदे…
मातीत मिश्त्रण करून टाकल्यास योग्य तो वाफसा तयार होतो. (वाफसा मुळे रोपांची वाढ छान होते)
अन्न मुळ्या वाढून झाड व फळ वाढीचा वेग वाढतो.
फक्त माती व खत टाकल्यामुळे कुंडी जड होते. potting mix (Biomass shredding compost Material) टाकल्यामुळे कुंडी हलकी होते.
झाडांच्या मुळाशी, कुंडीच्या पृष्ठभागावर टाकल्यास पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
Aerobic composting करतांना लाकडाच्या भुसा ऐवजी Biomass shredding compost वापरल्यास Home Composting गतीने होते. कारण Natural Potting Mix BISHCOM हे कंपोस्ट करतांना वापरलं तर ओल्या कचऱ्यातील पाणी शोषण करून moisture maintain करण्यास मदत करते.
तुम्ही २० टक्के माती, १० टक्के विविध खतं व ७० टक्के Shredding material compost एकत्र करून वापरू शकता
Potting Mix
Natural Potting Mix २० Kg packing उपलब्ध….
हे मॅझीकल Potting Mix ३ प्रकारात उपलब्ध आहेत.
१) प्लॅटिनम २) गोल्डन ३ सिल्व्हर
सविस्तर पुढील प्रमाणे….
३) सिल्व्हर या प्रकारात फक्त Biomass Shredding Compost Material BISHCOM मिळेल. ( 20 Kg Packing bag X 16/- kg= 320/- + Dilevery charges in nashik 50/-
हे खत आहे का? हो, use as mulching, fertilizer, potting mix, composting powder, असा विविधतेने वापर करता येतो
२) गोल्डन या प्रकारात BISHCOM ( 20 Kg Packing bag X 16/- kg= 320/- + लाल माती 100/- सिमेंटच्या आकाराची बॅग्जस मिश्त्रण मिळेल Dilevery charges in nashik 50/-
१) प्लॅटिनम या प्रकारत BISHCOM + लाल माती+ व नैसर्गिक खते ( शेणखत निमपेंड, तंबाखू पावडर यांचे योग्य प्रमाणात मिश्त्रण मिळेल.
( 20 Kg Packing bag X 16/- kg= 320/- , माती 100/- विविध खतं 16 kg, 475/- Dilevery charges in nashik 50/- to 250/-
वरील मिश्त्रण तुम्हीही तयार करू शकता. किंवा आपणास तयार हवे असेन तर फक्त प्लॅटिनम प्रकारातील potting Mix मिळेल.
प्लॅटिनम प्रकारातील potting Mix हे अन्नपूर्णा बॅग असेन तर २५०/- प्रमाणे व होलसेल हवे असेल तर २० लिटर रंगाची बादली भरून ३०० रू. + Dilevery charges वेगळे.
प्लॅटिनम प्रकारातील potting Mixer हेच अन्नपूर्णा बॅग मधे वापरले जाते.
राख ही रान गोवर्या (शेण्या) देशी गायीच्या शेणाच्या गोवर्या असाव्यात. त्या खालोखाल लाकडांची राख चालेल. पण शक्यतो प्लास्टिक कचरा, कागद जाळलेली राख नसावी. राखेत कोळश्याची भूकटी असली तरी चालेल. जी राखेत असतेच. ( अर्धवट जळालेले गोवरी अथवा लाकडामुळे ती तयार होते.)
How to Use Cow dunk Ash…
र र राखेचा…. आजच्या आ
धुनिक जगतात जी काही सुविधा, सोयी तयार झाल्या आहेत. त्याखूप वरवरच्या, तकलादू व अल्पजिवी आहेत. म्हणून कचरा निर्मीती, आजारपण, शेतीतील घटते उत्पादन व पर्यावरण नाश अटळ झाला आहे. हजारो वर्षापासून माणूस समूहाने राहू लागला. तेव्हापासून त्याने निसर्गाला धक्का न लावला त्याची जीवनशैली ठरवली व त्याची परस्पर पुरक अशी सांगड सुध्दा घातली. त्यातील चूल ही महत्वाची पध्दत. चुल्हीला आपल्या संस्कतीत महत्व आहेच. पण त्यापासून तयार होणार्या राखेला सुध्दा कृषी उत्पादनात अनन्यसाधारण महत्व आहे.
शुध्द गोवर्याची वस्त्रगाळ केलेली राख ही दात घासण्यासाठी करत असत तर गर्भारपणात स्त्रिया कॅल्सशियमची पूर्तता व्हावी यासाठी राख खात असत.
राखेचे गुणधर्मः राख ही पाणी धरून ठेवण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे तिचे प्रमाण हे पंधरा दिवसाला किंवा महिण्याला एका चौरस फूटाला तळ हाताच्या चार बोटावर मावेल एवढेच असावे. अधिक प्रमाणात टाकल्यास पाणी धरून ठेवण्याच्या गुणामुळे कुंडीत किंवा झाडा भोवती गाळ होण्याची शक्यता असते. कारण राख बराच काळ पाणी संग्रहीत करून ठेवते.
खत म्हणून उपयोगः राखेत सुक्ष्म अन्नद्रव्य असतात. जी कीड नियंत्रणाचेही कार्य करत असते. त्या नत्र, स्फूरद व पालाश याचे प्रमाण बर्यापैकी असते. उत्पादक मातीतील अन्नद्रव्य संतूलन करण्यासाठी राख हा महत्वाचा घटक आहे. रोपांना राख दिल्याने पानांचा रंग हिरवागार होतो. फळ फूलांची गळती होत असल्यास त्यास सुक्ष्म द्रव्य मिळाल्याने फळ फूल धरू लागते. शिवाय फळ वाढीस राख ही महत्वपूर्ण भूमिका बजावते. राखेमुळे जमीन भूसभूशीत व्हायला मदत होते.
कीडनियंत्रणः राख व भस्म यात सुक्ष्मसा फरक आहे. राख ही भुरभरीत असते. तर भस्म हे तळहातावर राख घेतल्यानंतर ती हलकीशी झटकल्यास तळरेषांच्या मधे साचून बसते ते भस्म. तर राखेत सुध्दा भस्माचे प्रमाण ( म्हणजे अति बारिक कण) असल्यामुळे तिचा उपयोग हा कीड नियंत्रणासाठी होतो.
काळा मावा, सफेद मावा विशेषतः वालावर येणारा काळा मावावर हाताने फोकल्यास (डस्टींग, धुरळणी केल्यास) राखेतील भस्म हे सुक्ष्म किडीच्या डोळ्यात अथवा पोटात जाते. व त्यांचे कुपोषण होवू लागते. व त्यांचे प्रजोत्पदानास अडथळे येतात. साहजिकच नियत्रंण होवू लागते.
राख ही रान गोवर्या (शेण्या) देशी गायीच्या शेणाच्या गोवर्या असाव्यात. त्या खालोखाल लाकडांची राख चालेल. पण शक्यतो प्लास्टिक कचरा, कागद जाळलेली राख नसावी. राखेत कोळश्याची भूकटी असली तरी चालेल. जी राखेत असतेच. ( अर्धवट जळालेले गोवरी अथवा लाकडामुळे ती तयार होते.)
त्यामुळे होळीची राख अथवा चुल्हीची, तंदुरी भट्टीची, बेकरीतील राख चालेल. तसेच अग्नीहोत्र व देवापुढील अगरबत्तीची राख ही बागेसाठी चालेल.
आम्ही चुल्हीतील राख ही संग्रहीत करून त्यास चाळणी करून एक किलो पॅकींगमधे विक्रीस उपलब्ध आहे.
सलाडसाठी उपयुक्त अशा भारतीय व विदेशी पालेभाज्यांची लागवड करू शकता. प्रत्येकी ५ किंवा १० कप्प्यात आपण एक भाजी या प्रमाणे १० प्रकारच्या भाज्या लागवड करू शकता. वरील भागात वर्षायु झाड लागवड करू शकता. तसेच उर्वरीत २ कप्प्यात वेलवर्गीय बियांची लागवड करू शकता.
Grower Cum composter by गच्चीवरची बाग
गच्चीवरची बाग नाशिक हा participatory environmental activities गेल्या सात वर्षापासून नाशिक मधे व महाराष्ट्रात रूजवत आहोत. आम्ही पूर्णवेळ प्रत्यक्ष भाजीपाल्याच्या बागा फूलवून देण्याचे काम करत आहेत. या विषयी आम्ही वेगवेगळे प्रयोग करून पाहतो. ते विविध ठिकाणी रूजवून पाहतो. त्यातीलच एक प्रयोग आपल्यासाठी देत आहोत.
बाजारात सध्या कंपोस्टर यंत्राची धूम आहे. घरच्या कचर्याचे कंपोस्टींग हे गरजेचेच आहे. ते प्रत्येकाने आपले पर्यावरणीय कर्तव्य म्हणून पार पाडलेच पाहिजे. पण बाजारातील कंपोस्टर हे फक्त हिरव्या कचर्याचे खतात रूंपातर म्हणजेच त्याचे व्यवस्थापन करणेसाठी उपलब्ध आहेत. आम्ही याही पूर्वी गच्चीवरची बागेने All in one Waste composter – Devil Digester विकसीत केला आहे.
त्याचीच नवीन आवृत्ती म्हणजे “ग्रोव्हर कम कंपोस्टर” आम्ही विकसीत केला आहे. बाजारातील कंपोस्टरच्या किमती एवढा आहे. त्यात आपण रोजचा कचरा डंम्प करू शकता. तसेच त्यात कंपोस्टींग करता करता त्यात पालेभाजी, फळभाजी (वांगी, टोमॅटो, मिरची) वेलवर्गीय व एकादे वर्षायु झाड उगवू शकता. ( उदाः शेवगा, पपई) हा २०० लिटर क्षमतेचा ड्रम असून त्याला ५२ कप्पे करण्यात आले आहेत.
त्यात आपण सलाडसाठी उपयुक्त अशा भारतीय व विदेशी पालेभाज्यांची लागवड करू शकता. प्रत्येकी ५ किंवा १० कप्प्यात आपण एक भाजी या प्रमाणे १० प्रकारच्या भाज्या लागवड करू शकता. वरील भागात वर्षायु झाड लागवड करू शकता. तसेच उर्वरीत २ कप्प्यात वेलवर्गीय बियांची लागवड करू शकता.
कसे काम करते…. या ड्रमला बाहेरील बाजूस कपाच्या आकाराचे ५२ कप्पे केले असून त्यात ते चौफेर आहेत.
वरील बाजू कडून म्हणजे ड्रमच्या मधोमध एक पाईप दिलेला असून त्यात रोजचे खरकटे अन्न, हिरवा कचरा आपण त्यात टाकू शकता. तळाशी त्याला छिद्र दिलेले असून त्यातून पाण्याचा निचरा होतो. निचरा होणारे पाणी पुन्हा वापरू शकता. यात उत्तम प्रकारे यात पालेभाज्यांची निर्मिती होते.
याला चौफेर उन्हाची गरज असते. ते आपण बाल्कनीत, टेरेस व अंगणात मधोमध ठेवू शकता. यात गांडूळ सोडलेली असल्यामुळे कंपोस्टींगचे ते खत बनवतात. व तेच खत रोपांना पुरवतात. यात थोडी सोय सुविधा केल्यास त्यास सहजतेने फिरवता येताे. पण फिरवणे शक्य नसल्यास अर्ध्या भागात ऊन येत नसल्यास तेथे Exotics भाज्या सहजतेने उगवता येतात.
आपल्याला “ग्रोव्हर कम कंपोस्टर” पहावयाचा असल्यास नक्कीच आमच्या बागेला भेट देवू शकता.
आपली फळा, फुलांची, भाजीपाल्याची बाग हिरवीगार, टवटवीत व शाश्वत रितीने वाढावी तसेच ती रसायनमुक्त असावी असे वाटेत असल्यास आपण या ग्रुपमधे सहभागी होऊ शकतता.
आपली फळा, फुलांची, भाजीपाल्याची बाग हिरवीगार, टवटवीत व शाश्वत रितीने वाढावी तसेच ती रसायनमुक्त असावी असे वाटेत असल्यास आपण या ग्रुपमधे सहभागी होऊ शकतता. गच्चीवरची बाग, नाशिक या ग्रुपव्दारे बागकाम साहित्य विक्री हेतूसाठी ग्रुप तयार करण्यात आला आहे.
या ग्रुपमधे स्वतः अॅडमीन – संदीप चव्हाण आहेत व केवळ तेच संदेश पाठवू शकतील. ही विक्री केवळ नाशिक व नाशिकरोड परिसरासाठी उपलब्ध होणार आहे. आपणास ग्रुपच्या नावानुसार (एरिया नुसार नावे दिली आहेत) आपण स्वतःहून सहभागी होऊ शकतात. आपल्याला ग्रुप मधे सहभागी न होता वैयक्तिक संदेश हवे असल्यास गच्चीवरची बाग –संदीप चव्हाण 9850569644 यांच्याशी जोडू शकता.
नाशिक व नाशिकरोड वगळता इतर कुणास सहभागी होण्याची इच्छा असल्यास वरील मो. क्रंमाकावर संपर्क करावा.तसेच बागेसंबधी आपणास काही चौकशी करावयाची असल्यास संपर्क साधू शकता. (फोनवर निशुल्क मार्गदर्शन केले जाईल)
एकापेक्षा अधिक ग्रुप मधे सहभागी झालेले आढळल्यास ग्रुपमधून वजा करण्यात येईल याची नोंद घ्यावी.विक्रीसाठी काय काय उपलब्ध आहे. याची यादी आम्ही वेळ, ठिकाण (पत्ता) दिंनाक यानुसार प्रकाशीत करू.
साहित्य वापराविषयी माहिती साठी 9850569644 संपर्क साधावा.
You must be logged in to post a comment.