असा फुलवा सोनचाफा

चाफ्यांना स्वच्छ व पूर्णवेळ उन्हांची गरज असते. कुंडीतील पिसोचाला दर २-३ वर्षांनी रिपॅटींगची गरज असते. दर वेळेस तुम्हाला कुंडी थोडी थोडी मोठी घेत जावी.
पि.सो.चा किंवा पासोचा हा जमीनीत असेल तर त्याला तीन वर्षानंतर पाणी देवूच नये. कारण तीन वर्षात ते आपली पाळमुळं घट्ट करतात. स्वतःचे अन्न स्वतः शोधतात. या झाडांना पाणी हे कमी लागते. त्यामुळे पाणी देवून त्यांना अर्जिर्ण करू नये. फुले येण्यास अधिक वेळ घेतात.


गच्चीवरची बाग

Michellia Champaca मायकेलीया चंपका…सोनचाफा…
चाफा बोलेना… चाफा चालेना…
चाफा म्हटला की कसं मन ताज होत… त्याचे आकर्षक आकार व रंगसंगती व त्याचा मंद सुवास.. बेधुंद करतो. काही केल्या फुलेना… तेव्हा काय करायचं… अर्थातच त्याला समजून घेतलं तर … तो नक्की फुलेल.. अगदी आपल्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीसारखा…
तर मग चाफा कोणताही का असेना… तो पांढरा चाफा असो गुलाबी असो की सोनचाफा… त्यातही दोन प्रकार…


तर सोनचाफा या प्रकारातील चाफ्याविषयी आज माहिती घेणार आहोत.
आपल्या नाकासाठी निसर्गाने दोन प्रकारचे सोनचाफ्याचं दान हे दिले आहे. एक आहे सोनेरी पिवळ्याधम्मक केशरी रंगाचा, मोठ्या पाकळ्याचा व दाटलेला, सुवासाने घमघमलेला पिवळा सोनचाफा व दुसरा… पातळ पाळळ्याचा थोडासा सफेद मंद सुंगधाचा… पांढरा सोनचाफा. (पुढे वाचा)

 

तर अशा वरील पैकी एकादे झाड आपण लावतो. सुरवातीला फुले असतात. नंतर नसतात. तर कधी कौतुकाने बि लागवड तर कधी नर्सरीतून रोप आणून लागवड करतो. झाड ताडामाडासारखे मोठे होते तर कधी खुरटेले असते. पण त्याला फूलच लागत नाही.. तर नेमके कोणता चाफा कसा केव्हा, कधी फुलतो हे सांगतो…
पिवळा सोनचाफाः पिवळा सोनचाफा हा नर्सरीतूनच आणून लावावा. खबरदारी म्हणून त्यास छान फांद्या असाव्यात. म्हणजे तो रूजेल. ( झाडं कसे लागवड करावे याचा सविस्तर लेख वाचावा) तर पि.सो.चा हा कलम केलेला असतो. म्हणजे पांढर्या चाफाच्या जे काही लाल बिज येते त्यापासून रोपे तयार केले जाते.
त्यावर आंब्यासारखे पि.सो.चा. कलम केले जाते. तर कलम कुठे केले आहे हे लक्षात ठेवावे. कलमावरील फांद्याच या पि.सो.चा. असतात. अनवधानाने जर पि.सो.चा.ची फांदी कापली गेली प पांढर्या सोन चाफाची फांदी वाढवली गेली तर त्या झाडाला अजन्म पिवळी फुले येणार नाही. पि.सो.चाची लागवड ही कुंडीत, ड्रममधेच करावी. तरच त्यास योग्य खते पाणी घालून फुले मिळतील. पिसोचा कलमी असेन तरच सातत्याने फुले मिळतात. जर ते जमीनीत लावले तर ही सुंगध आसमंतात विलीन होतो. कारण हाताला फुले कधीच लागत नाही. प्रथम हे लक्षात घ्या की पि.सो.चा. व पा.सो.चा. हे जंगलातील महावृक्ष आहेत. दोन व्यक्तीनी हातात हात घालूनही त्यास मिठी मारली तरी पुरणार नाही. एवढा मोठा घेर होतो. तर जमीनीत, बंगल्याच्या आजूबाजूला लावतांना विचारपुर्वक लागवड करा. कारण झाड मोठे झाले की ते तोडायला जिवावर येते. कारण त्यात भावना गुंतलेल्या असतात. तर पि.सो.चा हा नेहमी कुंडीत लावावा. (पुढे वाचा) 

पांढरा सोन चाफा… बरेचदा पिवळा चाफा घरी आणला व त्याची कलम फांदी तुटली तर आपल्या हाती आपसुकच पा.सो.चा चे झाड मिळते. किंवा पांढर्याच चाफ्याचे बि आणतो. व त्याची लागवड करतो. लहानाचे मोठे करतो व त्यापासून फुलांची लवकरच अपेक्षा करतो. पण पा.सो.चा. ला किमान पाच ते सात वर्ष लागतात. उशीरा का होईना पण पासोचाला फुले येतातच. त्यास कापून किंवा काढून टाकण्याचा विचार करू नये. आणि झाडांसमोर तर असा विचार व्यक्तही करू नये. तर पासोचाचिही वेळोवेळी छाटणी करावी लागते. पा.सो.चा. जमीनीत लावला असेन तरच वाट पाहता येते. बाकी कुंडीतील झाडाला एवढी वाट कुणीच पाहत बसत नाही.

तर पि.सो.चा आपल्या बागेत असेल तर त्याची उंची फांद्या कट मेन्टेंन करा. कुंडीत असेन तर फुले येवून गेले की त्याची कंटीग करावी. म्हणजे त्याला नव्याने फुटवे फुटून त्याला फुले येतील.

पिसोचा साठी द्रव्य खत म्हणून जिवामृत, गारबेज इंजाईम, गोमुत्र पाणी द्यावे. तर खत म्हणून शेणखत, निमपेंड टाकावी.
या चाफ्यांना स्वच्छ व पूर्णवेळ उन्हांची गरज असते. कुंडीतील पिसोचाला दर २-३ वर्षांनी रिपॅटींगची गरज असते. दर वेळेस तुम्हाला कुंडी थोडी थोडी मोठी घेत जावी.
पि.सो.चा किंवा पासोचा हा जमीनीत असेल तर त्याला तीन वर्षानंतर पाणी देवूच नये. कारण तीन वर्षात ते आपली पाळमुळं घट्ट करतात. स्वतःचे अन्न स्वतः शोधतात. या झाडांना पाणी हे कमी लागते. त्यामुळे पाणी देवून त्यांना अर्जिर्ण करू नये. फुले येण्यास अधिक वेळ घेतात. अपारमेंटच्या आजूबाजूला पि.सो.चा, पासोचा लागवड केली असल्यास त्यावर सावली पडत असल्यास ते उन्हाच्या दिशेला झुकते किंवा उंच वाढते. सावलीतील फांद्यांना फुले लागत नाहीत.
अशीही पिसोचा व पासोचाची कहाणी…
लेख आवडल्यास Like, Share, Comments करा…
गच्चीवरची बाग, नाशिक.

 

*Course Details*https://www.groworganic.club/n2vhxa6oसंदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644

%d bloggers like this: