पानांना बुरशी का लागते

पावडर मिल्यू ड्यू हा पावसाळ्यात केळीचे पानं, नारळांच्या फांद्या, हिवाळ्यात तुळस, अरेका पाम अशा झाडावंर प्रामुख्याने आढळून येतो. याची कारणे काय आहेत ते आपण पहाणार आहोत.


दीड दोन महिने सातत्याने पावसाची रिप रिप सुरू असली की बागेतल्या छोट्या मोठ्या झाडांवर रोग यायला सुरूवात होते. त्यातला सर्वात महत्वाचा जो रोग असतो तो बुरशीजन्य रोग होय. यात पानांवर सफेद थर, काळा थर तयार होतो. या बुरशीची सुरूवात असेल तर ती सफेद दिसते. त्यानंतर ति काळ्या रंगात रूपांतर होते. यास पावडर मिल्यू ड्यू असे म्हणतात.

पावडर मिल्यू ड्यू हा पावसाळ्यात केळीचे पानं, नारळांच्या फांद्या, हिवाळ्यात तुळस, अरेका पाम अशा झाडावंर प्रामुख्याने आढळून येतो. याची कारणे काय आहेत ते आपण पहाणार आहोत.

  • ऊनाचा अभाव…

पावसाळा व हिवाळा या दिवसात ऊन कमी झालेले असते. अशा वेळेस कुंद वातावरण हे अशा रोगाला पोषक असते. कडक ऊन हे नेहमी अशा रोगाना म्हणजे सुक्ष्म जिवांना प्रतिकुलता तयार करते असते. त्याचाच अभाव असेन तर हा रोग जोर धरतो.

  • तळाशी पाणी साठणे…

जमीनीत ही झाडे असतील व विशेषतः शहरी भागातील बंगला, अपार्टमेंट भोवताली जी झाडे असतात त्यात हा रोग प्रकर्षाने जाणवतो. कारण बंगल्याचं बांधकाम पूर्ण करतांना भर म्हणून सिमेंटचे डेब्रिज टाकले जाते. सिमेंटच्या गोण्या, चुना, सायगोल, प्लास्टिकपण त्यात असतात. व वरून मुरूम किंवा माती भरली जाते. कालातंराने त्यावर झाडे लागवड केली जाते. पण पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साठते. थोडक्यात योग्य प्रकारे पाण्याचा निचरा होत नाही. अशा वेळेस ते सडलेले, साठलेले पाणी झाडांना रोग उत्पन्न करतात. व अधिक पाण्यामुळे बुरशीजन्य रोग निर्माण होतात.

  • काही कुंडयातील झाडांमधेही हा रोग होतो. त्याला कारण ही वरील प्रमाणेच असतात. उन्हाचा अभाव, पुरेसे ऊन नसणे, तळाशी पाणी साठणे.

यावर उपाय काय…

  • ताक फवारणी…
  • मिल्यू ड्यू आल्यास त्यावर तीन सायंकाळ ताक पाणी फवारावे. ताकातील सुक्ष्म जिवाणू हे त्या मिल्यू ड्यूला संपवतात. पण पानांवर काळे डाग तसेच राहतात. कारण ते पानांच्या रंध्रामधे साचलेले असतात.
  • निमार्कची फवारणी…

निमार्क वापरावे, निमार्क व निमतेलात फरक आहे. निमतेलात लोणी सारखा गाळ  असतो जो पंपात अडकतो. तेलकट असल्यामुळे पानांवर त्याचा थर तयार होतो व पानांची प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया बंद होते. तर निमार्क हे पानांवर पडले व त्यावर पाणी पडले तरी विरघळते किंवा धुतले जाते. त्यामुळे निमार्क पाणी फवारावे.

  • घरातील कुंड्यात झाडे असल्यास त्यास दोन तीन दिवसातील हाताने पाणी स्प्रे करा. त्यावर बसणारी धुळ ( डस्ट) धुतली जाते. कारण पानांवर सुक्ष्म धुळ साचली की ती इतर कीडीना आमंत्रित तर करतेच. पण साचलेली धुळ ही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया बंद करते. व अशक्तपणामुळे झाड रोगांना बळी पडते.
  • घरात आपण काही शोभेच्या झाडांच्या कुंड्या ठेवतो. जागेच्या कमतरते मुळे एक किंवा जोडी ठेवतो. सहा महिने झाड चांगले असते व नंतर अचानक किंवा हळू हळू मरायला लागते. कारण उन्हाची कमतरता.

झाड नर्सरीत अथवा उन्हात असेन तर ते खोडामधे अन्न साठवून ठेवते. जसे आपेल शरीर साठवते तसे. पण झाडं सावलीत किंवा प्रकाशात ठेवले तर त्याचे रोजचे अन्न तयार होत नाही. व खोडात साठवलेले अन्न वापरावे लागते. ते अन्न संपले की झाड हळू हळू मरायला लागते. अशा वेळेस आपल्याकडे त्याची अतिरिक्त कुंड्या असाव्यात ज्या उन्हात असतील. तर या दोन्ही जागेवरील कुंड्याची पंधरा दिवसातून एकदा आदला बदल करावी. म्हणजे सावलीत (व्हरांडा, पॅसेज, घरात) कुंड्या पंधरा दिवसांनी उन्हात म्हणजे  गॅलरीतील, गच्चीवर जातील. व उन्हातील तिच झाडे घरात येतील. याने कुंड्यातील झाडांना योग्य अन्न तयार करता येते.

नियमीत फवारणी करा… 

आपण तहान लागली की विहीर खोदतो. पण आजाराला आमंत्रण द्यायचेच कशाला. झाडांना आजार असो किंवा नसो त्यावर दर पंधरा दिवसांनी गोईत्र पाणी, दशपर्णी-पाणी, निमार्क पाणी, ताकपाणी यांची आलटून पालटून फवारणी करावी.

टीपः सदर संकेतस्थळ आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्हाला वार्षिक पंचवीस हजार खर्च येतो. आपल्याला या संकेतस्थळासाठी काही आर्थिक मदत करू शकता.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

बागेतील कीड ओळखायला शिका.

पानानां बाहेरच्या बाजून आत शिरत पान हे वर्तुळाकार खाल्लेले दिसत असेन. किंवा पानांना मधे गोलाकार वर्तुळाकारात कापलेले दिसत असेन तर ती अळी नसून ती माशी असते.


पावसाळा ते हिवाळ्याच्या शेवटांपर्यंत आपल्या बागेतील झाडांची पाने कीड खातातच. अशा वेळेस पाने ही कोणती कीड खाते याचा अभ्यास असणे फार महत्वाचे आहे.

जी अळी पाने खाऊन खाली बाजरीच्या दाण्या एवढी हिरवी विष्टा टाकत असेन तर अळी फूलपाखरू किंवा पंतगाची असू शकते. तर जी अळी पाने खाली टाकून ओलसर व ढब्बे पडण्यासारखे हिरव्या रंगाची विष्टा टाकत असेन तर ती अळी केसाळ अळी असते. ज्याला घुल्या असे म्हणतात. ही टोकदार व विषारी केसं असतात. ज्यांच्या स्पर्शाने त्वचेला खाज सुटते. तर पानानां बाहेरच्या बाजून आत शिरत पान हे वर्तुळाकार खाल्लेले दिसत असेन. किंवा पानांना मधे गोलाकार वर्तुळाकारात कापलेले दिसत असेन तर ती अळी नसून ती माशी असते.

जिला लिफ कटर बि ( Leaf cutter bee ) असे म्हणतात. ही माशी आपली अंडी एकाद्या भिंतीच्या कपारीत देते. वा एकाद्या निर्मनुष्य जागेवर मातीच्या गोलाकार घर तयार करते. अशा ठिकाणी अंड्यातील पिल्लांना भविष्यात पोषण मिळावे म्हणून पानांची गुडांळी करून त्यात अंडी सोडते. तसेच पान हे तसेच रहावे म्हणून त्या छिद्रास ओल्या मातीचे लेपन करते. अन्न प्रिझर्व करते, हवा बंद करते.

आपण मारे रात्री टॉर्च घेवून, दिवसा मोठं डोळे करून अळी शोधत असाल तर उपयोग नाही. कारण ही माशी कितीतरी वेगाने आपल्या तोंडाने पानांचा कटर प्रमाणे तुकडा पाडते व निघून जाते. तुम्ही जर कीडीना परिचित असाल तसेच ते ही तुम्हाला परिचीत असेन तर तो नयनरम्य देखावा आपल्या डोळयांनी बघता येतो. फार मजा येते.

आता तुम्ही म्हणाल हे दृष्य आमच्या डोळ्यांना कधी बघायला मिळेल ? आपण त्यांचा परिचय करून घेवू पण आपल्याला कधी ओळखू लागतील ?

सोप्प आहे. तुम्ही जर बागेत काम करत असाल. तुम्ही त्यांना व त्यांच्या सारख्या कीडीनी हानी पोहचवत नसाल तर ते नक्की तुमचा परिचय करून घेतील. कारण आपल्या मानसिकते नुसार आपलं शरीर एक प्रकारचे गंध तयार तयार करतो. तो गंध ते ओळखू लागले की कीड आपल्याला ओळखू लागतात.

मला याचे फार अनुभव आलेत.. बाग काम करतांना सुर्यप्रकाशात आलेले गांडूळ तडफडतात. पण माझा हात लागला की लगेच शांत होतात. तसेच फुलपाखरं हे आजूबाजूला फिरायला लागतात. त्यांना फोटो, व्हिडीओ घेण्यापुरत असाच शांत बस असे मनात म्हटले तरी बसून राहतात. ही खरी निसर्गासोबतचं जोडलेली नाळ आहे. ज्याच्याशी जुळवून घेता येते. असो तर आपले अस्तित्व  त्यांच्या नाकाला जाणवतं व ते संदेश सुध्दा देतं की हे मित्र आलेत की शत्रू… कारण नाक हेच त्यांचे इंद्रिय असते. व ते फार संवेदनशील असते.

तर अशा माशांनी आपल्या बागेत पाने खाणे म्हणजे या माशीचे अस्तित्व आपल्या बागेत असेन तर धन्यवाद माना. कारण आपण त्यांना अन्न उपलब्ध करून दिले. तसेच तुमची बाग ही विषमुक्त आहे हे त्याचे निर्देशक आहे. नेहमीचे झाडे म्हणजे गुलाबाची पाने असी कापलेली दिसतात. फुलपाखरांच्या अळ्या व या प्रकारच्या माशीने झाडं संपूर्ण खाल्ले तरी झाडं नव्याने येते. कारण निसर्ग हा एका हाताने घेतो व दुसर्या हाताने देतो सुध्दा. त्या झाडांला पुन्हा वाढण्याचे दान तो भरभरून देतो. त्यामुळे काळजी करू नये. ते आहेत म्हणून आपण आहोत हे लक्षात घ्या. जगात फक्त मधमाशा परागीभवन करत नाही. तर जेवढी काही कीड, पंतग आहेत हे सारेच परागीभवनाची आपआपाली जबाबदारी निभावत असतात. यांना जैवविवधतेत फार महत्व आहे. पावसाळ्याच्या तोंडावर अशा किडी तयार होतात व नंतर सुप्तावस्थेत जातात. कारण निसर्गाने प्रत्येक जिवाला काहीतरी कर्म दिले आहे. ते कर्म जो तो निभावत असतो. त्यात अज्ञानी माणसांने हस्तक्षेप करू नये. कारण तो निसर्गापुढे फार अज्ञानी आहे व मुर्ख, उपद्रवी प्राणी आहे. बहावा  हे झाडं अशा माशांचे अन्न असते. विशेषतः ठराविक झाडांची कोवळी पाने हे त्यांचे अन्न असते. ही माशी आकाराला काळ्या मुंगळ्यासाऱखी आखीव रेखीव पण रंगाला सोनेरी असते. तिला पंख असतात.

बागेतील अळ्यांना ओळखायला शिका, कारण कोण उपद्रवी आहे. कोण पाहूणे आहेत हे जर कळाले तर निसर्गाचा एक भाग आपण संरक्षित करत आहोत. किंबहूना एक साखळी जोडत आहोत. याची खात्री बाळगा व बिनधास्त व्हा.

तसं ज्ञानेश्वरांच्या पसायदानात म्हटलंच आहे.

भूतां परस्परें जडो ll मैत्रं जीवांचें ll2ll

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

वेलभाजीचे फळे पिवळी होऊन का गळतात…

वेल छान आहे. पण बोटाएवढे फळ लागली की ते पिवळे पडून गळून जातात किंवा सडून पडून जातात. ही नेहमीची समस्या आपल्या घरी लावलेल्या वेलीबाबत होत असते. यावर उपाय काय करावा याची नेहमी चिंता असते.


वेल छान आहे. पण बोटाएवढे फळ लागली की ते पिवळे पडून गळून जातात किंवा सडून पडून जातात. ही नेहमीची समस्या आपल्या घरी लावलेल्या वेलीबाबत होत असते. यावर उपाय काय करावा याची नेहमी चिंता असते.

याची कारणे काय आहेत. याचा आपण पहिल्यांदा शोध घेतला पाहिजे. व त्यानुसार त्यावर उपाय योजना करणे गरजेचे असते.

  • योग्य पोषणखतांचा अभावामुळे सुध्दा चांगली तब्बेत असलेल्या वेलाला आलेली फळे ही पिवळी पडतात. गळून पडतात. आपण जर वेल डब, बादली, ड्रम मधे असेल तर पोषण हे कमी पडणारच. तेव्हा अशा वेलांना द्रव खत देणे फार गरजेचे असते. यात जिवामृत, ह्यूमिक जल, हे पाच लिटर पाण्यास एक लिटर या प्रमात मिसळून वेल परिसरात टाकावे. तसेच विद्राव्य खतांमधे गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खताचे आळीपाळीने डोस द्यावा.

योग्य रितीने खतांचे नियोजन केल्यास वरील साधनांमधेही फळे कमी येतात पण उत्तम प्रकारे वाढतात. मुळांजवळ हवा खेळती ठेवा. पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्या.

  • वेलावरील फळे पिवळी किंवा सडून जाण्याचे कारण म्हणजे फळांना होणारा फळमाशीचा प्रार्दुभाव होय. ही माशी रंगीत पखांची. डाससदृष्य असते. ति प्रोढावस्थेत असेल तेव्हांच ति आपल्य डोळ्यांना दिसते. अन्यथा तिचे गती व सुक्ष्म आकारामुळे ति नजरेस पडणे अशक्य आहे. पण तिच अस्तित्व हे फळांना होणार्या डंखातून जाणवते.

आपण घाईगडबडीत पिवळी झालेली फळे काढून टाकतो. पण ते फळ चिरून, तोडून त्याचे भिंगाखाली निरीक्षण करावे. अभ्यास होतो.

तर या फळमाशीचे अस्तित्व हे बाराही महिने असते. खास करून जेथे नैसर्गिक शेती अथवा भाजीपाल्याची बाग फुलवली जाते. यावर उपाय म्हणजे वेळोवेळी गोमुत्र पाणी, दशपर्णी यांची फवारणी करावी. तसेच यावर रामबाण उपाय म्हणजे ह्यूमिक जल या द्रावणाची वस्त्रगाळ करून फवारणी करावी. याचे प्रमाण साधारण एक लिटर पाण्यात १०० एम.एल. द्रावण घ्यावे.

यातील सुक्ष्म अशा आंबट गंधामुळे ही कीड दुर पळते. फवारणी ही सायंकाळच्या वेळेत करावी. तसेच योग्य पोषणामुळे वेलाची प्रतिकार शक्ती वाढते. कीडीनां ते बळी पडत नाही. ह्यमिक जल आमच्याकडे उपलब्ध होईल.

फळमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी पिवळे चिकट सापळेचाही वापर करता येतो. तसेच प्रकाश सापळे आपण लावू शकता.

यासाठी बागेत पिवळ्या रंगाचा बल्ब हा जमीनीपासून २-३ फूटांवर टांगावा. त्याखाली खराब झालेले गाडीचे ऑईल ताटामधे ठेवावे. सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत हा बल्ब पेटवावा. त्यात तुम्हाला सारी शत्रु किटक जमा झालेले दिसतील. रात्री १० नतंर या बल्ब बंद करावा. कारण रात्री १० नंतर मित्र किटकांचा वावर सुरू होतो.

हे उपाय खात्रीशिर आहेत. ते करून बघा. आपल्याला त्याचे नक्कीच परिणाम दिसून येते.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

http://www.gacchivarchibaug.in

ह्युमिक जल उत्तम मृदा संवर्धक व कीड नियंत्रक


ह्युमिक जल

आपण सारे आपल्या बागेबद्दल जागृत असतो. जणू काही आपली ती बाळंच असतात. त्यांना वेळेवर खाऊ पिऊ घालणं हे आपलं काम बाकी सारं पुढचं काम निसर्ग सांभाळतोच. झाडांना खतपाणी वेळेवर देणं हे आपल्या हातात असतं नि हातचं काहीच राखून न ठेवता ते परतं निस्वार्थपणे दान करणं हा निसर्गाचा स्वभाव.

हे खताचं देन आपण कधी कधीच करतो पण त्यात नियमितता, सातत्यता राखल्यास माती सुपिक व उत्पागकही होते. या देण्यातही आपल्याला विविधता सांभाळावी लागतो. यात तोच तोच पणा आल्यास मातीतील घटक हे (पी.एच) थोडक्यात मातीचा सामू स्थिर होतात. मग आपल्याला प्रश्न पडतो की इतकं सारं वेळेवर देवूनही झाडांना फळं, फुलं, वाढ का दिसत नाही. साहजिकच आहे. एकच प्रकारची खतं टाकल्यामुळे माती अनुत्पादक होण्याची शक्यता वाढते. कारण माती ही अल्कलीक व असिडिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे झांडाना दिली जाणारी खतात विविधता आणणे गरजेचे असते. त्यात द्राव्य खते व विद्राव्य खते हे द्यावी लागतात.

झाडांचे अमृत म्हणून त्यांना जिवामृत हे देत असतो व ते वेळोवेळी देणं गरजेचं असतही. जिवामृत हे जमीनीत दिल्यानंतर काही कालांनंतर त्यातील जिवाणू हे मृत पावतात व त्यांचे खत झाडांना मिळते. (जिवामृताचे खताचे उपयोग व त्याची माहिती स्वतंत्र लेखात दिलीच आहे) जिवामृतामुळे झाडांना पालवी फुटणे, फुटवा येणे, फुले येणे, फळांची वाढ होणे, फळे गोड व मधूर होतात.

नियमित पणे जिवामृत देवूनही कधी कधी परिणाम दिसून येत नाही. अशा वेळेस व अशा ठिकाणी ह्यूमिक जल वापरणे गरजेचे आहे. विशेषतः व्हेजेटेबल फॉरेस्टसाठी गच्चीवर अथवा जमीनीवर एरोब्रिक्स पध्दतीने केलेल्या वाफ्यामधे इंच इंच जागेवर बियाणे लागवड करणे गरजेचे असते. जिवामृत व नैसर्गिक खतांचा वापर करूनही अशा जागेत बियाणं न रूजणं, रोपे वाढत नाही, झाडांचे सर्व लाड करूनही काहीच बदल दिसत नसल्यास अशा वेळेस समजावे की मातीचा पी. एच. (सामू) स्थिर झाला आहे. अशा वेळेस ह्यूमिक जल या एक लिटर द्रावणात पाच लिटर पाणी टाकून दे हातांने एरोब्रिक्स पध्दतीने शिंपडावे किंवा कुंडीला द्यावे, माती काही दिवसातच सजीव होते. भुसभुशीत होते. मागील काही प्रयोगावरून असे जाणवले आहे की काळा मावा व सफेद मावा हा सुध्दा नष्ट होते. तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बागेला देत असलेल्या खतांचे सुक्ष्म पातळीवर विघटन करून ते झाडांना पुरवण्याचे काम करत असते. थोडक्यात ह्यूमिक जल हे खतांची प्रक्रिया करणारे प्रेरक आहे. त्यामुळे ह्यूमिक जलचा वापर आपण दोन जिवामृताच्या पाळीमधे एकदा वापरावयास हरकत नाही.

ह्यूमिक जल हे सफेद रंगाचे असते. त्यास आंबट दही सारखा गंध असतो. ही बाटली वापरतांना नेहमी हलवून वापरावी म्हणजे तळाशी बसलेले घटक पाण्यात निट मिसळतात. तुम्हाला हयुमिक जल हवे असल्यास संपर्क साधावा. २२ रू. लिटर ( २०२२ साठीचा दर)

तर आपणही वापरून पहा व आपल्याला जाणवलेले परिणाम आम्हाला सांगा…

संदीप चव्हाण, गच्चीवरची (रसायनमुक्त भाजीपाल्याची) बाग, नाशिक

Order Now

9850569644 / 8087475242

Insects Control: कीडनियंत्रण

तो फक्त आपल्या बागेचे पालकत्व स्विकारू शकतो. बागेचे मातृत्व हे त्या त्या कुटुंबानेच स्विकारायचे असते. मधल्या काळात बागेची काळजी हे कुटुंबानेच घेतली पाहिजे. तरच आपली बाग छान, टवटवीत व सुंदर होईल. 


catapillar-664250_1280.jpg

बागेत फवारणी, केव्हां, कधी..कशी.

निसर्गाला जपण्यासाठी आपण घरा, दारात फळा, फुलांची व भाजीपाल्याची बाग फुलवतो. रासायनिक खते व रासायनिक फवारणी सोडून देणे हे तर सर्वात्तम अशी निसर्गाची सेवा म्हटली पाहिजे. त्याएवजी आपण नैसर्गिक किडनियंकं फवारणे सर्वात्तम आहे. रासायनिक खतं ही कीडनाशक आहेत तर नैसर्गिक औषधे फवारणे हे कीडनियंत्रक म्हणून वापरता येतात.

कीड नियंत्रक व कीड नाशक यात दोन टोकांचे अंतर आहे. कीडनियंत्रण म्हणजे कीडीला पळवून लावणे, तिच्या प्रजनन चक्राच्या गतीत बाधा आणणे किंवा गती कमी करणे होय. तर कीड नाशक म्हणजे कीड संपवून टाकणे, मारून टाकणे, तिचा नाश करणे. कीडीचा नाश करणे एका अर्थाने जैवविवधतेत केवळ बाधाच नाही तर ती साखळीच तोडून टाकण्यासारखे आहे. जीव जीवस्य जीवनम् ही आपली संस्कृती आहे. ती रासायनिक फवारण्याने नष्ट होते. त्याने मातीतील सुक्ष्म जीवांणूचाही नाश होतो. व माती नापिक बनते.

तर कीड नियंत्रणात त्यांना ठराविक पिकावरून हाकलून लावले जाते. त्यांची घरे ही मोठ्या झाडांवर, जंगली झुडुपांवर आहे. त्यांना आमच्या बागेत लुडबुड करू नये म्हणून मारलेले उग्र वासाचे, गंधाचे द्रव म्हणजे कीड नियंत्रक होय. कीड ही उग्र गंधाला धोका समजते. उग्र गंधामुळे त्याच्या प्रजनन चक्रात बिघाड होतो. तर अशी उग्रवासाची कीड नियंत्रकं हो घरच्या घरी तयार करता येतात.

तर आपण कीड नियंत्रकांची माहिती घेवू या..

गोमुत्र हे उग्र, तिव्र गंधाचे नैसर्गिक द्रव्य आहे. जीवामृत हे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले उच्च जीवाणू युक्त द्रावण आहे. दशपर्णी सुध्दा हे उग्र व विविध गंधाचे कडवट द्रावण आहे. या सार्यामुळे कोणत्याही सजीव प्राण्याला धोका पोहचत नाही. जेवढा रासायनिक फवारणीमुळे पोहचतो.

आज रासायनिक कीडनाशकांची तिव्रता वाढत चाललीय पण कीड मरत नाही. उलट ती वाढत जाते. याचे कारण म्हणजे कीडींचे आयुष्य हे अल्पकाळ असते. पहिल्या पिढीने पचवलेले थोडेफार विष हे पुढील पिढी जास्त प्रमाणात पचवू लागते. म्हणूनच एन्डोसंल्फान, राऊंडअप सारखी इतर कीड व तण नाशकांची तिव्रता वाढवूनही कीड जात नाही. माणसं नुसती गंधाने मरतात पण कीड नाही. हे सत्य समोर आले आहे.

याच तंत्रात कीड नियंत्रक हे प्रभावी ठरतात. पण त्यातही विविधता असणं गरजेचं आहे. आपण फक्त बागेला एकच प्रकारचे कीड नियंत्रक वापरत असाल तर ते चूकीचे आहे. कारण काही काळ कीड त्याला प्रतिसाद देईलही पण पुन्हा ती वाढू लागेल. कारण आधीच्या पिढीने ते पचवायची क्षमता मिळवलेली असते. अशा वेळेस आपणास दर पंधरा दिवसांनी वेगवेगळी फवारणी केली पाहिजे.

  • गोमुत्र पाणी २) जीवामृत पाणी ३) चुना पाणी ४) हिंग पाणी ५) साधे पाणी ६) निमार्क फवारणी ७) निमतेल-साबणाचे मिश्त्रण किंवा फक्त साबण पाणी फवारणी (पालेभाजीवर करू नये) ८) लिंबू पाणी इत्यादी.

अशारितीने फवारणीत विविधता ठेवल्यास कीड ही नियंत्रणात, आटोक्यात राहते. ठराविक कालावधीनंतर ओळखू न येणारा गंध आल्याने त्या आपले मुक्कामाचे ठिकाण इतरत्र हलवतात.

जीवामृत फवारणी ही सुर्योद्य ते सुर्यास्त दरम्यान करावी कारण ते संजीवक म्हणून काम करत असते. त्यातील जीवाणूंची संख्या ही केवळ उन्हातच वाढते. तर फवारणी ही सायंकाळी ५-६ वाजेनंतर करावी. कारण त्याचा तिव्र गंध हा उन्हाच्या प्रखरतेत सुकून जात नाही किंवा त्याचे बाष्फीभवन होत नाही. तसेच बरीचसी कीड ही निशाचर असते म्हणजे रात्रीच्या वेळेस त्या अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतात.

महत्वाचे म्हणजे फवारणी हेच केवळ बागेतील कीड नियंत्रणाचे तंत्र नाही हे आवर्जून लक्षात घ्या.. आपण अर्जिणावर किंवा असीडिटी वर औषध घेताहेत नि खाणं चालूच ठेवलं तर औषधाचा परिणाम होत नाही तसेच झाडाला पाणी जास्त होणं, पाण्याची योग्य वाफसा न होणारी घट्ट माती मुळाशी असणं, पाणी योग्य रित्या निचरा न होणं हे लक्षणेही लक्षात घेवून त्यावर उपाय करणं गरजेचं आहे.

तसेच कीड नियंत्रण हे करतांना कीड कोणती आहे हे लक्षात घेणं गरजेचे आहे. रसशोषक कीड, पानं खाणारी कीड (अळी) की विषाणूजन्य कीड आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांचा ठराविक असा काळ नसतो. त्यामुळे वरील कीडनियंत्रक ही आलटून पालटून फवारल्यास कीडीच्या त्रासापासून मुक्तता होते. तसेच मित्र कीटक ओळखता आली पाहिजेत. मुंग्या, मधमाशा, गांडूळ, कंपोस्ट खतातील कीडे ही आपली मित्र आहे. काही मंडळी कीडमुक्त मातीत झाडे जगवतात. अशी माती ही कालातरांने निर्जीव व नापिक बनते. सुपिक माती बनवण्यासाठी निसर्गाला हजारो वर्ष लागलीत. ही माती सुंगधी व सुपिक बनण्यासाठी हजारो सुक्ष्म जीवांचे, कीडीचे खतात रूपंतार झालेले असते. हे विसरता कामा नये.

सारीच कामे माळ्याने करावीत असे मुळीच नाही. तो फक्त आपल्या बागेचे पालकत्व स्विकारू शकतो. बागेचे मातृत्व हे त्या त्या कुटुंबानेच स्विकारायचे असते. मधल्या काळात बागेची काळजी हे कुटुंबानेच घेतली पाहिजे. तरच आपली बाग छान, टवटवीत व सुंदर होईल.

लेख आवडल्यास नक्कीच शेअर, कंमेट व लाईक करा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. ९८५०५६९६४४

http://www.gacchivarchibaug.in

 

Desi cow urine: boost & pesticides

भारतीय जीवनशैलीत गोमातेला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळेच तिला धार्मिक कार्यात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. खर पाहता तिच्या अस्तित्वाला वैज्ञानिक आधार आहेतच. त्यातूनच तिचे महत्व अधोरेखीत होते. गाय म्हटली की आपल्या कानात तिच्या गळ्यातील घंटेचा नाद घुमतो. तिचे हबरणे, गोमुत्राचा गंध…


20180813_161201

भारतीय जीवनशैलीत गोमातेला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळेच तिला धार्मिक कार्यात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. खर पाहता तिच्या अस्तित्वाला वैज्ञानिक आधार आहेतच. त्यातूनच तिचे महत्व अधोरेखीत होते. गाय म्हटली की आपल्या कानात तिच्या गळ्यातील घंटेचा नाद घुमतो. तिचे हबरणे, गोमुत्राचा गंध… सारवलेले अंगण तर कधी अंगणात मारलेला सडा…

विदेशी गायीपेक्षा देशी गायीला खूप महत्व आहे. त्यांचे दूध हे आरोग्यदायी व पोषक आहे. झाडांमधे जसे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष मानले जाते. ज्याचे प्रत्येक भाग हा उपयोगी आहे. तसेच गायीचे सुध्दा… गायीच्या शेणाचा उपयोग प्राचिन काळात श्रीकृष्णांनी पहिल्यांदा केला. म्हणूनच एका बोटावर गोवर्धन पर्वत उचलला म्हणजे गाय उत्पादित पदार्थामुळे गाव स्वांवलंबन झाले.

तर शहरी परसबागेत देशी गायीच्या गोमुत्राला महत्व आहेच. त्यामुळेच आम्ही सुध्दा एक देशी गाय पाळली आहे. आता शहरात हे कसे शक्य आहे. आम्ही ते शक्य करून दाखवले आहे. अर्थात काही सुविधा असणे गरजेचे असते. मोकळी जागा, चारा पाणी, औषधे व काळजी घेण असं केल तर ते नक्कीच शक्य आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे गायीच्या शेणांचे आम्ही वैज्ञानिक पध्दतीने व्यवस्थापन केले आहे. त्यामुळे तिच्यापासून मिळणारे शेण व त्याचे खत हे खूपच उपयुक्त ठरते आहे.

तर गायीच्या गोमुत्राला मानवी आरोग्यात जसे अन्यन्य साधारण महत्व आहे तसेच हे शहरी परसबाग, गच्चीवरची बाग फुलवण्यासाठी उपयुक्त आहे.

गोमुत्राचे बागेसाठी फायदे…

संजीवक द्रावण…

बागेला आपण ज्या प्रमाणे जिवामृत पाणी देतो.  तेसच गोमुत्र पाणी देता येते. बागेला संजीवक द्रावण देताना १५ दिवसांचे तरी अंतर असावे. म्हणजे त्याचा परिणाम दिसून येतो. एकास दहापट पाणी मिसळून झाडांना जमीनीत दिले असता त्यातून पोषण द्रव्ये मिळतात. तसेच मुळांना मुळकूज रोग होत नाही. गोमुत्राने भिजलेली किंवा अंश असलेली माती हे गांडूळांना फार आवडते. त्यामुळे गांडूळांची संख्या वाढीस मदत होते.

फवारणी…

गोमुत्र आहे तसे बागेत फवारू नये. त्यात एकास दहापट पाणी मिसळावे. व त्याची फवारणी करावी.फवारणी ही सायंकाळी ३ वाजेनंतर करावी. म्हणजे गोमुत्राच्या उग्र वासाने कीड पळून जाते. काळा मावा व सफेद मावा यावर गोमुत्रपाण्याची फवारणी फार उपयुक्त ठरते.

गोमुत्राचा रंग, गंध व स्वभाव..

गोमुत्र शक्यतो ताजे असतांना पाण्यासारखे पिवळे दिसते. तर काही कालावधी नंतर ते  सोनेरी रंगाचे दिसू लागते. गोमुत्र जसे जूने होत जाते तसा त्याचा रंग तांबडा, लाल होत जातो. गोमुत्र व मध हे निसर्गातील असे पदार्थ आहेत. ते जसे जूने होत जाते त्याप्रमाणे ते उपयुक्त ठरत जाते. त्यामुळ गोमुत्राचा संग्रह हा कितीही जूना असला तरी चालतो. गोमुत्राचा गंध हा तिव्र असतो. पण तो सहन करता येतो. बागेत गोमुत्र फवारल्याने आपलीही श्वसन प्रक्रियेची क्षमता (deep Birthing) वाढते. गोमुत्र हे वातावरणातील विषाणू मारण्याचे काम करते. म्हणून पूर्वी कोंदट खोल्यामध्ये ते शिंपडले जायचे . जेणे करून श्वास घेण्यास मदत होईल.

गोमुत्र कुठे मिळेल… ध्रुवनगर बस स्टाप, सातपूर गंगापूर लिंकरोड, चुल्हीवरची मिसळ जवळ, नाशिक.

एक लिटर पॅकिंग मधे २० लिटर प्रमाणे उपलब्ध आहे. घरपोच हवे असल्यास मिळेल. अटी व शर्ती लागू.

इतर उपयोगः फरशी पुसण्यासाठी केला असता. फरशी चकचकीत व निर्जंतूक तर होतेच. शिवाय घरातील झुरळं पळून जातात. हवेतील विषाणू मरतात व वातावरण शुध्द होते.

दक्षताः बागेसाठी जमा होणारे गोमुत्र हे गोठ्याला उतार करून एका बादलीत संग्रहीत केले जाते. त्याचा उपयोग मानवी आरोग्यासाठी करू नये. मानवी आरोग्यासाठी वेगळ्या व शुध्द पध्दतीने गोमुत्र गोळा करतात. तसेच फवारणी करते वेळेस जूने गोमुत्र असल्यास पाण्याचे प्रमाणा वाढवावे.

गोमुत्र जमा करण्याचा गोठा…. व्हिडीओ पहा…

http://www.gacchivarchibaug.in wts app / Telegram 985069644

 

 

%d bloggers like this: