दान एक रूपयाचे – पर्यावरण संवर्धनाचे

आपल्याला लेख, व्हिडीओ आवडल्यास आम्हाला किमान १ रूपया ते पुढील ऐच्छिक दान करा.


गच्चीवरची बाग ही पर्यावरण संवर्धन करणारी उद्मशीलता आहे. मार्च २०२२ मधे दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. एकादं बिज आकाशातून येवून मातीत पडावं. नि त्याला काळाने प्रतिकूलतेपासून झाकलं जावं. व योग्य वातावण मिळावं. त्याच कुणीतरी पालकत्व स्विकारावं या प्रमाणे गच्चीवरची बागेचे बिजाचे २००१ मधेच नाशिकच्या मातीत धुळपेरणी झाली. ते २०१३ पासून अंकुरल व रूजलं व त्याचं आम्ही पूर्णवेळ पालकत्व स्विकारले. याचे पूर्णवेळ पालकत्व स्विकारतांना पर्यावरण प्रेमीनी स्वागत केलं कारण लोकांच्या प्रश्नांना शंकाना कुणीतरी पूर्णवेळ उत्तर देणारं हवं होते. तर या बिजाने अंकुरण्यापासूनच नाशिककरांना आपलेसे केले. अंकुरण्यापासूनचा हा प्रवास आता रोपट्या पर्यंत म्हणजे दहाव्या वर्षात प्रदार्पण करत आहे. गच्चीवरची ऑरगॅनिक भाजीपाल्याची बागेचा डेमो प्रयोग, गच्चीवरची बाग एक्सटेंशन व व्हर्च्युअल प्रझेन्स या तिन ठिकाणी काम करतांना या रोपट्याला पाच फांद्या डवरल्या. त्या म्हणजे Grow, guide, Build, Products, Sales N Services…

हा सारा डोलारा आता बर्यापैकी बहरू लागला लागला. पण मध्यतंरी कोरोनाच्या वावटळीमधे कोडमडायला आलं होते. पण त्याला नाशिककरांनी, पर्यावरणप्रेमीनी जोर लावून तुटू दिलं नाही. खरं तर गच्चीवरची बाग हे पर्यावरण प्रदुर्षनाच्या सागरात आत्मशोधाला निघालेले जहाज आहे. त्याचा जाब विचारायला कुणीतरी असावं असा म्होरक्या मी आहे. पण याला पुढे नेण्याची, वल्हवण्याची ताकद लावणारे नाशिककर व पर्यावरण प्रेमी आहे. मी फक्त नाममात्र. खर श्रेय तुम्हा सगळ्याचे आहे.

कोरोना संकटात वाकलेल्या फांद्या तुटता तुटता वाचल्या पण जखमा अजून ओल्या आहेत. येत्या काही महिण्यात किंवा वर्षभरात त्या बर्या होतील. आम्ही तशी पावले उचलली आहेत. आम्ही नेहमी सांगत आलो की आम्ही बाय प्रोफेशन हे करत असलो तरी आमची पर्यावरण संवर्धनाची ही पॅशन (आस) आहे. आपल्याकडून सातत्याने वरील पाच फांद्याव्दारे सुर्यप्रकाश मिळत आहे. म्हणूनच तर जगण्यासाठी अन्न तयार होतेय.

यातील सर्वात महत्वाचा भाग आहे. लोकांना मार्गदर्शन Guide करणे होय. ते आम्ही युट्यूब ( Home Grow vegetable Services- गच्चीवरची बाग नाशिक) , कंन्टेन्ट ब्लॉग www.organic-vegetable-terrace-garden.com या व तसेच व्हाट्सअपच्या माध्यमांतून करत आहोत. होम कंपोस्टींग व घरी भाज्या उगवणे हे मुख्य काम आहे. त्या संदर्भात लोकांना वाचता येईल, डोळ्यांवर विश्वास बसेन असे काम उभे करत आहोत.

यातील सर्वात महत्वाचे म्हणजे कंन्टेन्ट ब्लॉगला दरवर्षी भेट देणार्या वाचकांची संख्या पन्नास हजाराच्या घरात पोहचली आहे. या वर पाचशे पेक्षा अधिक लेख व २५० पेक्षा व्हिडीओस आहेत. हे संकेतस्थळ चालविण्यासाठी वर्षाचा खर्च पंचवीस हजार आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपणास हा लेख, किंवा युट्यूबवरील व्हिडीओ आवड्यास आपण फक्त कमीत कमी एक रूपया व तेथून पुढे रक्कम तुमच्या ऐच्छिकतेनुसार डोनेट करावा. जेणेकरून आमचा उत्साह वाढेल. (वाचन अर्थात पर्यावरण दान कर्त्त्याची यादी आम्ही संकेतस्थळावर वेळोवेळी प्रकाशीत करणार आहोत.) तसेच त्यातून निर्माण होणारा पैसा हा संकेतस्थळ जिवंत (चालू वर्ष व पुढील वर्ष) रहाण्यासाठी वापरता येईल. तेव्हा कृपया हा लेख इतरांनाही पाठवा. त्यासाठी आमचे प्रयत्न वर दिलेल्या संकेतस्थळावर जावून तपासून शकता.

(सदर उपक्रम हा आपल्या पुढील पिढीसाठी आकार घेत आहे. कारण यात आरोग्य, पर्यावरण, सामाजिक प्रश्नावर काम करणारा आहे. तसेच जल, जंगल जमीन या विषयीच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. अशी सर्वव्यापी संकल्पना जगवणे, टिकवणे फक्त गावकरांच्या हाती आहे. कारण राव त्यांच्या पुढील पिढ्या मजबूत करण्यात गुल आहे. त्यामुळे रावं न करी ते गावकरी म्हणून जगनाथ्थाच्या हाती हा रथ सोपवत आहे. आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

सोबत QR कोड देत आहे. किंवा (9850569644 G Pay, Phone Pay) किंवा UPI id देत आहे.

चिमणीचे घरटं

बाग फुलवतांना आपल्या बागेत चिमणीचे घरटे असणे फार आवश्यक आहे. कारण चिमणी हा पक्षी इतर पक्षांपेक्षा मानव वस्तीला राहणारा किंबहुना माणसाळलेला आहे. एकदा का चिमणी आपल्या बागेत नांदू लागली की ती इतर पक्षांनाही आंमत्रीत करते. उदाः शिंपी पक्षी, बुलबुल.


sparrow

चिमणीचे घर असावे अंगणी...

रसायन मुक्त भाजीपाल्याची बाग फुलवायची म्हणजे कीड ही आलीच. आणि त्या मागोमाग त्यांचे नियंत्रण हे आलेच. मुळातच कोणतीही रासायनिक फवारणी न करता म्हणजे जैविक औषधींची फवारणी करणे म्हणजे जैवविवधतेला आपण आमंत्रित करतो. किंबहुना किड येणे हे खरं तर रसायनमुक्त बागेचे लक्षण आहे. अशा बागेतून पिकलेला भाजीपाला हाच खर्या अर्थाने आरोग्यदायी असतो. अशा बागेचे काटेकोर पणे फवारणी, खत, पाणी यांचे नियोजन केले तर कीड ही दूरच राहते. तरी सुध्दा कीड आलीच तर काही उपाय हे करावे लागतात. अनेक उपाय आहेत. हे उपाय म्हणजे रामबाण नसले तरी त्यातून बर्याचं अंशी कीड नियंत्रण साधता येते. यातील एक महत्वाचा उपाय म्हणजे चिमणीचे घरटे…

बाग फुलवतांना आपल्या बागेत चिमणीचे घरटे असणे फार आवश्यक आहे. कारण चिमणी हा पक्षी इतर पक्षांपेक्षा मानव वस्तीला राहणारा किंबहुना माणसाळलेला आहे. एकदा का चिमणी आपल्या बागेत नांदू लागली की ती इतर पक्षांनाही आंमत्रीत करते. उदाः शिंपी पक्षी, बुलबुल.

हे पक्षी आपले मित्रच असतात. पण बागेचेही मित्र असतात. पक्षाचे मुख्य अन्न म्हणजे अळ्या. बागेत अळ्या झाल्यातर त्या टिपणे हे त्यांचे मुख्य अन्न…. थोडक्यात त्यांचेसाठी मासांहरी व प्रोटीन्सयुक्त चविष्ठ भोजन…

बघा ना.. पावसाळ्यात अन्नाची मुबलकता असते. म्हणजे पावसाळा हा सर्वच जिवांसाठी प्रजननाचा काळ, कारण त्या काळातच सर्वत्र व मुबलक निसर्ग अन्न तयार करतो. झाड, वनस्पतीनां बहार येतो. त्यातील कवळी पाने हे अळ्याचे अन्न. अळ्या हे पक्षाचे अन्न म्हणून पक्षांच्या प्रजननाचा सुध्दा हाच काळ असतो.

सिमेंटच्या जंगलात चिमण्याची संख्या कमी होत चाललीय. कारण सिमेंट काही अन्न नाही, ना निवारा. पण याच सिमेंटच्या भिंती, आसरा हा त्यांच्यासाठी अधिवास, निवारा होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला प्लायवूडची, पृष्ठ्याची घरे तयार करता येतात. बरीच मंडळी प्लास्टिकची घरटी तयार करतात. कृपया प्लास्टिकची घरटी तयार करू नका. त्यात उकडते. शिवाय तो रंग त्यांना आवडत नाही. त्यांना मातीचा, लाकडाचा रंग आवडतो. म्हणून रंगीत, छापिल पृष्ठ्याची खोकी वापरू नयेत.

बरेचदा लोक प्लायवूडची घरे तयार करतात पण चिमणी आतमधे जाण्याचा दरवाजा हा मोठा ठेवतात. लक्षात घ्या मोठा दरवाजा हा इतर पक्षांनाही प्रवेश देवू शकतो त्यामुळे अशी घरे चिमण्या नाकारतात. त्यामुळे त्यांचे प्रवेशव्दार हे दीड बाय दीड इंचाचे असावे.

चिमणीचे घर टांगतांना हे पावसाचे पाणी लागणार नाही अशा ठिकाणी टांगावे तसेच त्याच्या समोरील बाजू मोकळी असावी. तेथे कोणताही टप्पा नसावा. नाहीतर इतर पक्षी, मांजर तेथे जावून त्यांना असुरक्षीतता निर्माण करू शकतात. नव्याने घरटे लावतांना त्याच्या आजूबाजूला सुतळीचे तोडे ठेवावेत. त्याचे धागे पिंजून ते पिल्लांसाठी उब मिळावी म्हणून गादीसाठी वापरतता.  शक्य झाल्यास बागेत, घराभोवती पाळणे तयार करावेत. बोटाएवढ्या जाडीच्या सहा इंच लांब काठीला केवळ दोन दोर्या बांधाव्यात, त्या भक्कमपण टांगून द्यावात. यावर छान पणे ते झोके घेत संसाराची गाणी म्हणतात.

एक लक्षात आपल्या बागेत चिमण्यांना, पक्ष्यांना बोलावयाचे असेल तर त्यांच्यासाठी फेब्रवारी पासून पाण्याची व्यवस्था करावी. आणि मे महिना व जूनच्या शेवाटपर्यंत त्यांना दाण्याची व्यवस्था करावी. कारण या दिवसात त्यांना बाहेर कुठेही अन्न मिळत नाही. त्यांनतर पावासाळ्यात बाग फुलतेच. शक्य झाल्यास बागेत बाजरी, ज्वारीची दाणे पेरावीत. त्याला आलेल्या कणसांवर त्यांना नाचत गात ताव मारता येतो.

टांगले घरटे आणि आल्या चिमण्या असे होत नाही. चिमणी हा पक्षी जोडीने नव्या घराभोवती पाच ते बारा महिणे या निरिक्षण करतात. कोण येते कोण जाते. हे तपासून पाहतात. मगच त्याची जोडी पिल्लांना जन्म देण्याचे ठरवते.

आपल्या बागेत, घराभोवती पक्षांची बाळंतपण होतांना व त्यांचे संगोपन करतांना खूप आनंद वाटतो. हा घास चिऊचा, हा घास कावूचा.. ही आठवण आपल्या बालपणाची स्मृती ताज्या करतात.

आमच्या कडे चिमणीचे प्लायवूडची घरटी विकत मिळतात. आपण पूर्व नोंदणी केल्यास अधिक प्रमाणात तयार करू ठेवता येतील.

टीपः लेख आवडल्यास लेखा प्रती आपण एच्छिक आर्थिक योगदान करू शकता. phone pay 9850569644

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

Clean_ganesh_visarjan

कोणत्याही गोष्टीला दोन किनार असतात. त्याचे फायदे तोटे असतात. तोट्याचा तराजू थोडा जरी झुकता असला तरी फायद्याकडे पाहणे किंबहूना तोटा कसा भरून काढता येईल असे काही उपाय केले तर नक्कीच आपण कोणतीही गोष्ट उपयोगी, फायदेशीर व आनंदी करू शकतो. हे विवेचन अर्थातच सार्या गोष्टीना लागू होत असली तरी गणेश उत्सवामुळे तो अभ्यासणार आहोत. गणेश उत्सवाची उजवी बाजू आपल्या सर्वांना माहितच आहे.


#Clean_ganesh_visarjan #coir_collectionगणपती महाराष्ट्राचे अराध्य दैवत. समुद्राला भरती यावी नि उंचउंच लाटा किनार्यावरील लोकांना भिजवावं तसंच अगदी गणेश उत्सवाचे होते. गणेशभक्तांनी गणेशाच्या आगमनापर्यंत उत्साहात लाटामधे भक्तीरसानी न्हाऊन निघावं. खरं तर लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक उत्सव आजही त्याच महत्व टिकवून आहे किंबहूना दिवसागणिक वाढत जाणार हे नक्कीच. कारण प्लॅट संस्कृतीत वर्षभर एकमेंकाना न भेटलेली मंडळी या दहा दिवासाच्या उत्सवामुळे भेटतात. चार गोष्टीची देवाण घेवाण होते.thumbnail.jpgकोणत्याही गोष्टीला दोन किनार असतात. त्याचे फायदे तोटे असतात. तोट्याचा तराजू थोडा जरी झुकता असला तरी फायद्याकडे पाहणे किंबहूना तोटा कसा भरून काढता येईल असे काही उपाय केले तर नक्कीच आपण कोणतीही गोष्ट उपयोगी, फायदेशीर व आनंदी करू शकतो. हे विवेचन अर्थातच सार्या गोष्टीना लागू होत असली तरी गणेश उत्सवामुळे तो अभ्यासणार आहोत. गणेश उत्सवाची उजवी बाजू आपल्या सर्वांना माहितच आहे. पण डावी बाजूची प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे अनंत चतुर्दशीचा ऊतू जाणारा उत्साह, गर्दी, कचरा निर्मिती.. व दुसर्या दिवशी तो कचरा उचलण्यासाठी भिडलेले प्रशासन व सफाई बांधव…तर आपण या उत्सवाची डावी बाजू जी आहे तिची थोडी पण प्रत्येकाने काळजी घेतली तर आपला उत्सव पर्यावरण पुरक होऊ शकतो. गणेश विर्सजन हे पर्यावरण पुरक व्हावे म्हणून गच्चीवरची बाग, नाशिक तर्फे मागील वर्षी नारळाच्या शेंड्या संकलन करण्याचा कार्यक्रम केला होता.नाशिक येथील गोदावरी नदीच्या काठावरील सोमेश्वर धबधबा येथे प्रचंड गर्दीने गणेश भक्त गणेश विसर्जन करण्यासाठी येतात. गणेशाची आरती झाली की नारळ फोडले जाते. बरेचदा अनवधानाने नारळशेंड्या तेथेच ठेवून ( काही मंडळी आमच्याकडे आणून देत होते) देत. आम्ही प्रत्येकाच्या पायाजवळून त्याचे संकलन करत होते. मागील वर्षी तीन लोकांनी मिळून २ ट्रॅक्टर एवढ्या नारळाच्या शेंड्या गोळ्या केल्या होतो. नाशिक महानगर पालिकेच्या आरोग्याधिकार्यांनी आमचं कौतुकही केलं होते.अर्थातच या शेंड्या शहरी परसबाग फुलवण्यासाठी उपयोग करतो. ( नारळ शेंड्यांचा उपयोग हा भाजीपाल्याचे वाफे किंवा कुंड्यामध्ये तळाशी भरल्या जातात. कोकोपीठ वापरत नाही. कारण हे एकतर दक्षिण भारतातून येते. व त्याचा केवळ seedling साठी उपयोग होतो.)तर या वर्षी नारळ शेंड्या गोळ्या करण्याचा हा उपक्रम आम्ही या वेळेस पाच ठिकाणी व स्टेप फाऊंडेशन, नाशिक या संस्थेच्या मदतीने राबवणार आहोत.या वर्षी १२ संप्टेबंर या दिवशी अनंत चतुर्थी आहे. १२ सप्टेंबर व १३ सप्टेंबर १९ या दोनही दिवशी नारळ शेंड्या गोळा करण्यात येणार आहेत. नाशिक येथील गंगापूर रोडवर ४ ठिकाणी ( गंगापूर गावातील अमरधाम, बालाजी मंदीर येथील धबधबा, सोमेश्वर व नवश्या गणपती) व त्र्यंबक रोड वरील एका ठिकाणी ( पपया नर्सरी जवळील नंदीनी पूल) येथे नारळ शेंड्या जमा करण्यात येणार आहे. आम्हाला खात्री आहे. या पाच ठिकाणाहून जवळपास १० ट्रॅक्टर नारळ शेंड्या गोळ्या होतील.याठी श्रमदान, वस्तूदान, समयदान व अर्थदान व एकलव्याचा अंगठा ( जो सोशल मीडियावर प्रचार प्रसारासाठी हवाय) स्वंयसेवक, कचरा वेचक महिला, समन्वयक असतील त्यांच्या कडे आपण नारळ शेंड्या द्याव्यात ही विनंती आहे. त्यासाठी आपण एका वेगळ्या पिशवीत दहाही दिवसाच्या व विसर्जनाच्या दिवशी नारळ फोडल्यानंतरच्या शेंड्या जमा करून आमच्याकडे द्याव्यात. कृपया त्यात नासलेले नारळ, प्रसाद, खोबर्याचा प्रसाद, प्लास्टिक, निर्माल्य देवू नये. या सार्यासाठी म.न.पा.ची वेगळी घंटागाडी असणार आहे. आम्हाला खात्री आहे हा लेख व आमची विनंती नाशिक करांपर्यंत पोहचवाल.संस्थांची माहिती व दान देण्याविषयीचे सविस्तर पोस्टमध्ये दिलेच आहे. ति आपण काळजीने वाचावलच.. Share पण करा… सविस्तर माहितीची PDF file पहा…sandeep Chavan, http://www.gacchivarchibaug.in8087475242

Smart City: Swachmev Jayate


वाढते शहरीकरण व दाट लोकवस्तीमुळे कचर्याची समस्या गंभीर होत चालली आहे. कचरा ही निरोपयोगी, त्याज्य, अपायकारक व गंभीर बाब आहे व त्याचा व आमचा काडीमात्र काहीही संबध नाही असं काही नागरिक समजतात. कचरा ऊचलणे, त्याची विल्हेवाट, व्यवस्थापन ही प्रशासनाची जाबाबदारी आहे असे समजून नागरिक यातून आपली जबाबदारी झटकून घेतात. कचरा ही आरोग्याशी संबधीत बाब असल्यामुळे व कल्याणकारी राज्य, प्रशासनाची ची जबाबदारी असल्यामुळे त्यावर वेगवेगळे उपाय योजले जातात. यातील सर्वात लोकप्रिय उपाय म्हणजे घराघरातून कचरा गोळा करणे, तो वाहून नेणे व कुठेतरी एकत्र टाकून देणे, त्यासाठी नागरिकांनी भरलेल्या कराचा मोठा ”अ[न]र्थ” आहे. [खर्च केला जातो.] पण खरी समस्या येथेच आहे. कचरा विक्रेंद्रीत पध्दतीने त्याचे व्यवस्थापन झाले पाहिजे. विक्रेंद्रीकरण म्हणजे काय तर कचरा आहे तेथेच त्याची व्यवस्था लावणे, व्यवस्था व विल्हेवाट ही दोन वेगवेगळया संकल्पना आहेत. विल्हेवाटीपेक्षा व्यवस्थापन हे सहज सोपे, कमी कालावधीत परिणाम देणारे असते. कचरा हा विविध प्रकारचा असतो. सर्वसामान्यपणे कचरा सुका ओला, जैविक अजैविक, असे प्रकार पडतात. ज्याला भंगारात पुर्नविक्रीचे मुल्य असते तो विकला जातो. पण ज्या कचर्याला मुल्य नसते ते फेकले जाते. वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणारी कचर्याची समस्या विचारात घेवूनच ”गच्चीवरची बाग” या सामाजिक उपक्रमाने पर्यावरण संवर्धनासाठी एक सृजनशील पाऊल उचलेले आहे. अर्थात लोकांना केवळ त्याचे खत करा असे न सांगता जैविक कचर्याचा विषमुक्त भाजीपाला निर्मीतीसाठी वापर करणे असे सांगणे, त्यासाठी प्रेरीत करणे हे खरे आनंददायी, लोकसहभाग देणारे व परिणामकारक असा उपक्रम आहे.

गच्चीवरची बाग या उपक्रमात उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तू व उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांचा वापर केला जातो. त्यासाठी प्रेरीत केले जाते. वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गाला बाजूला सारत मानव वस्ती दाटू लागली. त्यामुळे निसर्ग हा परिघावर लोटला गेला. त्यात जागेचा अभाव आलाच. पण झाडांना जगण्यासाठी हवा, पाणी, प्रकाश यांची गरज असतेच. ती आपण माणूस म्हणून शोधू शकतो किवां शहरातही ती उपलब्ध होतेच. याचा विचार केला तर आपण घराच्या अवतीभोवती बाग बगीचा सहजपणे जगवता येतो, यात शंका नाही. घर, फ्लॅट, बंगला, इमारती येथे उपलब्ध होणारा सुर्यप्रकाश येणारी जागा आपण बाग फुलवण्यासाठी उपयोगात आणता येते.

उपलब्ध वस्तू म्हणजे ज्या गोष्टीत सहजतेने फेकून देतो त्यात माती, पालापाचोळा भरून बिज रोवता येईल अशी कोणतीही वस्तू, उदाः दूधाची पिशवी, शितपेयाच्या बाटल्या तर माती सिमेंट्च्या कुंड्या पर्यंत वस्तूत आपण बाग फुलवू शकतो. शक्यतो. टाकावू असलेल्या वस्तू भंगारात न देता त्या अंतापर्यंत वापर करणे हे एका अर्थाने प्रदुर्षण रोखण्याची पहिली पायरी आहे. दर वेळेस नवीन वस्तू आणणे म्हणजे त्याची कचरा निर्मीतीत भर पडण्यासारखी आहे. त्यामुळे गच्चीवरची बाग या संकल्पनेत उपलब्ध वस्तूचा वापर करावा.

उपलब्ध नैसर्गिक स्त्रोत.. म्हणजे पालापाचोळा, वाळलेला ग्रीन किचन वेस्ट, नारळाच्या शेंड्या, ऊसाचे चिपाट हा होय. सर्वसाधारण पणे आपण कुंडी किंवा वाफा भरण्यासाठी शंभर टक्के मातीचा व थोड्याफार खताचा वापर केला जातो. त्याने कुंडी जड होते. पण वरील नैसर्गिक स्त्रोतांचा कुंडी वाफा भरण्यासाठी वापर केल्यास त्यातून कचर्याचे सहजतेने व्यवस्थापन होते. अशा पध्दतीने फुलवलेला बाग बगीचा हा अधिक तजेलदार, हिरवागार, टवटवीत तर असतोच पण त्यात येणारी फळे, फुले, भाजीपाला हा रासायनिक शेतीतील उत्पन्नापेक्षा अधिक चवदार व सत्वयुक्त असतो.

अशी गच्चीवरची बागेची संकल्पना असली तर शहरी परसाबाग म्हणूनही ती अंमलात आणता येते. सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक अभिसरण घडवून आणणारी ही संकल्पना सर्वदूर पसरावी यासाठी प्रयत्नरत आहे. इच्छुकांना फक्त फोनवर निशुल्क मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जेणेकरून लोकांनी ही स्वच्छमेव जयते ची चळवळ व्हावी. रसायनमुक्त भाजीपाला, निसर्ग निर्माण करावा या सदिच्छेसह.

लेखक – संदीप चव्हाण, नाशिक. ९८५०५६९६४४, sandeepkchavan79@gmail.com

http://www.gacchivarchibaug.in

You Tube Chaneel पहा..

सदर लेख विकासपीडिया या संकेतस्थळावर पूर्वप्रकाशीत झाला आहे.

वाचकांची प्रतिक्रिया….

http://www.gacchivarchibaug.in

 

Treasure of the heart & soul


lavender-823600_1920Treasure of the heart & soul

मला आठवतयं…मी दहावी बारावीला असेन. तेव्हा गंगापूरस्थित निम्रल ग्राम निर्माण केंद्रांची ओळख झाली होती. तेथील शेती, मातीचे घर, शहराच्या जवळ असूनही निर्सगाची साथ संगत, कचर्याचे व्यवस्थापन, अहिसांत्मक मुल्य, त्यामागील शाश्वत, ठाम त्तत्वबैठक इ. मूर्त, अमूर्त सारे अनुभवयास मिळाले. जीवन जगतांना तयार होणारा विविध तर्हेचा कचरा त्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा त्याचे व्यवस्थापन करणे सोपे आहे हे उमजले. अगदी मानवी मलमूत्रापासून, कागदापासून, काडी कचर्यापासून  विविध तर्हेच्या कलात्मक, पर्यावरणपुरक वस्तू कशा तयार कराव्यात, त्या केवळ शोभेच्या वस्तू न राहता त्या रोजच्या वापरात कशा आणता येतील याचा मूळ विचार नि.ग्रा.नि.केंद्रातून मिळाला. मला आठवतय त्यांनी पुस्तकाचे खोली माझ्यासाठी खुली ठेवली होती. केव्हांही जावून वाचत असे. तेथील कामाचे खूप कौतुक व आपल्यापणा वाटायचा… त्यांचे हेच विचार आपल्याही जीवनाचा अविभाज्य भाग होतील असं कधी वाटलं नव्हंत. अवघड आहे असे वाटण्यापेक्षा मला नेहमीच त्याचे आकर्षण वाटायच. आज त्यांनी रूजवलेले विचार माझ्याही जीवनाचा एक अविभाज्य भाग झालयं. असं मला ठाम वाटतयं.

कचरा निर्माणच होवू नये असे अशी जीवनशैली जगणं हे खूप महत्वाचं आहे. म. गांधीजीचं स्वराज नावाचं पुस्तक वाचनात आलं. भाऊ नारवेकराचं जीवनगाथा वाचण्यात आली. विनोबा भावेची पुस्तक वाचली. म. गांधीनी किती जणानां प्रेरणा दिली आहे. खर स्वराज्य हे राजसत्तेच्या हस्तांतरणातून नव्हे तर स्वःच्या सम्यक वर्तनातून येणार आहे हा म. गांधीचीच्या जगण्याचा मतितार्थाने माझे जगणं सार्थक केलं आहे असे मला वाटतय. (मोहनचंद गांधी अनेक अर्थानी जगणं जगला. त्याचं सर्वच जगण हे प्रत्येकालाच भावेल असं नाही. पण प्रत्येकाला काहीतरी भावावं असं त्यात नक्कीच आहे.)

शहरी जीवनशैली ही जीवाला वीट आणणारी व्यवस्था आहे. अनेक समस्यांना जन्माला घालणारी आहे. पण आता शहरात जन्मलो. मला लाख वाटत असले तरी खेड्यात घरची मंडळी येणार नाही. आणि मलाही एकट्याला जाता येणार ही अपरिहार्यता जेंव्हा लक्षात आली तेव्हा नाशिक मध्येच राहयचे ठरवले. शहरातील कचर्याची समस्या व  शेतीची अनामिक ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हती. नाशिकस्थित एका माध्यम संस्थेत काम करतांना जगण्याच्या काही मर्यादा लक्षात येत होत्या.. आपलं मातीतलं मूळ शोधण्याच्या ओढीने एक दिवस राजीनामा दिला.  शहरातील कचर्याची समस्या व शेती यांच्या समन्वयातून शहरी शेतीचा अर्थातच गच्चीवरची बागेचा जन्म झाला. या विषयावरच काम करण्याचे ठरवले. अर्थात याची बिज पेरणी नि.ग्रा.नि. केंद्रातून खूप पूर्वी झाली असली तरी त्यास अकुंरण्यास बराच काळ गेला. आपल्याही असं काही करायचं आहे. ठोस, शाश्वत, निरतंर, जे मला व इतरांनाही नेहमी प्रेरणादायी ठरेल. आणि या विचारातूनच गच्चीवरची बाग हा कार्यक्रम सर्वदूर फूलत चाललाय. बघता बघता त्यास विविध माध्यमांची जोड व साथ मिळत गेली. आता हा विचार महाराष्ट्रात पोहचलाय. हौशी लोकांना सोशल मीडियाव्दारे निशुल्क मार्गदर्शन करू लागलोय.

गच्चीवरची बाग अर्थातच शहरी शेती करतांना बाजारातून काहीच विकत आणायचे नाही. असा ठाम निश्चय केला होता. आपल्याकडे जे काही उपलब्ध आहे त्याचा वापर करत बाग फुलवायची असे ठरवले होते. त्यास आज माझ्याच नव्हे तर अनेकांच्या बागेतून त्यास मूर्त स्वरूप येवू लागले आहे. अर्थातच हाही विचार स्वराज पुस्तकातून मधून मिळाला. अंबर चरख्यावर सूत कताई, गाय पालन, घरातील ओला कचरा व परिसरातील सुक्या कचर्याचे व्यवस्थापन, सायकलचा ऊपयोग करणे, प्लास्टिक, फास्टफूड, प्रोसेस्ड फूड कमीत कमी वापरणे किंवा टाळणे, कचरा होणार नाही याची दक्षता घेणे. असे अनेक भौतिक बदल जरी माझ्यात झाले तरी समोरच्याचे प्रथम ऐकून घेणे हा बदल माझ्या जडणघडणीस खूप महत्वाचा ठरला. प्रत्येक गोष्ट ही काटेकोरपणे समजून घेणे, ती अंमलात आणणे. शंभर टक्के प्रयत्न केले तरच ते कुठेतरी काही टक्यांपर्यंत साध्य करता येते याचा अनुभव घेता आला.

जीवनशैली कशी असावी, त्यासाठी काय करावे , काय करू नये हे शिकवणारा हा जीवनउत्सव खरोखरच जीवनाचा आनंदी उत्सव आहे. गरज ही शोधाची जननी असली तरी आपल्या गरजा मर्यादीत ठेवून जगणं गरजेचं आहे. आपल्याला जसा या पृथ्वीवर जगण्याचा हक्क व अधिकार आहे तसाच निर्सगातील इतर जीवांनाचाही तेवढाचं आहे.  पण दूर्दैवाने हम करे सो कायदा किंवा धरती सिर्फ मेरे बाप की म्हणत मानव स्वतःच शेखचिल्लीप्रमाणे आपली  मानवजात नष्ट करायला निघाली आहे.

गरज, हौस, चैन, हव्यास याला लगाम घातलाच गेला पाहिजे. अर्थात हे बाहेरून होणार नाही. आपण सम्यकविचाराने हे आचरणात आणलं पाहिजे तरच ही बहूप्रसवा धरणीमातेचा विविधांगी ठेवा आपल्याला पुढील पिढीपर्यंत पोहचवता येईल. नाहीतर एकदिवस स्वछंदी, स्वतंत्र विचार करणारी मानवजातही पुस्तकात वाचण्यातील कथा बनेल व आपलं आयुष्य हे कुणीतरी मानव निर्मीत रोबोट हाताळतांना जाणवू लागेल. अर्थात आजच्या प्रगत तंत्रज्ञानाने त्याचे पाऊलं ही पाळण्यात दिसू लागले आहेतच. आधुनिक प्रश्नांची निर्मिती ही या यांत्रिकीकरणाने, तंत्रज्ञानाने निर्माण केली आहेत व आपण या आशेवर आहोत की यांची उत्तरे ही तंत्रज्ञानाच्या प्रगतीतच, वापरात लपलेली आहेत. पण हा केवळ भ्रम आहे असे म्हणावेसे वाटते. हे मानवजातीला उमजेपर्यंत बराच उशीर झालेला असेन यात शंकाच नाही.  अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान चूकीचं आहे असं मुळीच नाही. त्याचा मर्यादीत वापर करत सावधपणे पुढे सरकंण गरजेचे आहे. त्याचे सर्रास अंधानुकरण ही धोक्याची घंटा आहे. यासाठी जीवन उत्सव व त्यातील कार्यरत मंडळी ही वाट दाखवण्याचे काम करतेय. अशा या जीवन उत्सवातील विचारांना आचारांना किमान समजून तर घेवू या…नव्हे घेतलंच पाहिजे. मला खात्री आहे हे आचरण सोपं नाही… पण अवघड मात्र नक्कीच नाही. कारण शेवटी हे आपल्या येणार्या पिढीच्या भवितव्याचा विचार त्यात लपलेला आहे. त्याचा साक्षात्कार माझ्याप्रमाणे आपल्याला होवो ही सदिच्छा…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

www.gacchivarchibaug.in

हो गया यार… अब क्या करे…

पत्रकार मित्र हेमंतने गच्चीवरची बाग विषयी कार्यपरिचय देणारी बातमी तयार केली. तो वार रविवार होता. हेमंतने दिव्य मराठी मधे प्रकाशीत केलेल्या माझ्या कामाच्या बातमीचे नाव होते. – प्रेम केले ते भाज्यांवर,


heart-3280747_1920.jpg

हो गया यार… अब क्या करे…

गच्चीवरची बागेचे (गारबेज टू गार्डन) हे व्रत नाशिककरांपर्यंत पोहचावे म्हणून सुरवातीच्या काळात धडपडत होतो. नाशिककरांसाठी रसायनमुक्त व गारबेज टू गार्डन भाजीपाला उगवण्या संदर्भात स्पर्धा आयोजनाचे प्रपोजल तयार केले. ते घेवून मी प्रत्येक वर्तमान पत्राच्या दारोदारी फिरलो. कल्पना तशी सोपी होती. मी नाशिककरांसाठी निशुल्क (पदरचे पैसे खर्च करून, मानधन, शुल्क न घेता) कार्यशाळा घेईन. त्या बदल्यात इच्छुक वर्तमानपत्राने कार्यशाळा पूर्वीचे व नंतरची बातमी करावी व सदर कार्यक्रम संयुक्त उपक्रम असेल. पण कुणीच दाद दिली. कोण्या एका जेष्ठ पत्रकाराने म्हटलेच आहे की केवळ काम चांगल असून उपयोग नसतो. त्याच्या बातम्या करणारी मित्र त्या त्या वर्तमान पत्रात असावी लागतात. त्याचा प्रत्यय दिव्य मराठी या वर्तमानपत्रासोबत आला.

दिव्यमराठी या नव्याने नाशिकमधे प्रकाशीत होणार्या वर्तमानपत्रातील पत्रकार हेंमत भोसले यांना ही कल्पना खूप भावली. त्यांनी निवासी संपादकाशी बोलणी घडवून आणली नि त्या वर्षभरात सात आठ निशुल्क कार्यशाळा झाल्या. नाशिकरांनी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला. बातम्या यायला लागल्या तशा लोकांचे प्रश्न, विचारणा वाढू लागली. घरच्या बागेला लोक भेटी देवू लागले.

fb of img033.jpg

पत्रकार मित्र हेमंतने गच्चीवरची बाग विषयी कार्यपरिचय देणारी बातमी तयार केली. तो वार रविवार होता. हेमंतने दिव्य मराठी मधे प्रकाशीत केलेल्या माझ्या कामाच्या बातमीचे नाव होते. – प्रेम केले ते भाज्यांवर, पेपर दारात होता खरा.. पण मी सकाळी गच्चीवरच्या बागेतच, टेरेसवर रमलो होतो. फोन वाजला. संदीप सर आपली बातमी छापून आली आहे. बातमी खरचं छान झाली आहे. गच्चीवरून धावत येवून बातमी वाचली. मित्र हेंमत भोसले यांनी बातमी खरंच सुंदर लिहली होती. बातमी लोकांपर्यंत पोहचली खरी.. मी बायकोला नाचतच बातमी दाखवली. तिने बातमी वाचली. तिने बातमीचे शिर्षक वाचले प्रेम केले ते भाज्यावरं —पुढे काही वाचलेच नाही. कारण तिला बातमीचे शिर्षक आवडले नव्हते. तर बातमी कशी आवडेल. बातमीच्या शिर्षकानुसार संदीप माझ्या शिवाय आणखी कोणावर प्रेम करू शकतो म्हणजे गच्चीवरच्या बागेवर हे तिला पटलेच नव्हते. ती रागावून बसली. असा कसा तुमचा मित्र, अशी काय बातमीचे टायटल देतात. पण माझे गच्चीवरची बागेवर किती प्रेम आहे. हे मित्र हेंमतला जास्त कळालं होतं. (मला हे जास्त भावलं होतं कारण त्याला माझी पॅशन कळाली होती.) बायकोसाठी हा मोठा धक्का होता. (खरं तर पुढे जावून बरंच काही अर्पण होणार आहे याची तिला कल्पना नसावी) बायकोला कळून चुकलं (नि सारं जगजाहिर झालं याच तिला जास्त त्रास होत होता) की संदीपच्या आयुष्यात आपण एकटेच नाही आहोत. संदीपला गच्चीवरची बाग नावाची दुसरीच जिवा भावाची, जवळची मैत्रीण आहे. घरात एकतर्फी वाद झाला… पाय, भांडे आपटून झाली. खरं चूक माझीच होती. एवढ्या आनंदाने तिला बातमी दाखवयलाच नव्हती. तशी ती माझ्या कोणत्याच निर्णयात, कार्यपध्दतीत खोलवर लक्ष घालत नव्हती. पण तिचा पूर्ण पांठिबा असतो. तरी पण बातमीच्या शिर्षकाने घरात अबोला सुरू झाला होता. आपलचं चुकल म्हणून मी माफी मागू लागलो. (संसारात काहीही झालं तरी नवर्याचच चुकत व त्याने लगेच माफी मागीतली पाहिजे हे विवाहित पुरुषांनी दिलेल्या सल्ला वाचल्याची आठवण झाली) मी तिची मनधरणी करत होतो. पण तिचा ठाम विश्वास होता की या बातमीचे टायटल संदीपनेच हेंमतला पुरवले असावे. कारण गच्चीवरची बाग हे नाव उपक्रमाला ठेवण्यामागे, एकाद्याचे मुल्यांकन करण्यासाठी योग्य शब्द वापरण्यामागे संदीपचा हातखंडा आहे हे ती जाणून होती.) मी लाख समजावून सांगीतल की बातमीचं टायटल काय, यातील कोणतच वाक्य माझं नाही आहे. बातमीतील शब्द न शब्द १०० टक्के सत्य असली तरी मित्र हेमंतने बरोबर हेरली होती. पण काय करणार. तिने अबोला धरला. सात दिवस तो काही जाईना. त्यात आमचं लव्हमॅरेज… तिच्या पेक्षा मी कुणावर जास्त प्रेम करू शकेन हे गच्चीवरची बाग संकल्पना माझ्या डोक्यात येईपर्यत मलाही कल्पना नव्हती… पण म्हणतात ना. हो गया यार… अब क्या करे…त्याला काही पर्याय नाही. अशी माझ्या दुसर्या प्रेमाची गोष्ट. दिवसाचे चोविस तास त्यातच असतो. मी कुटुंबाला वेळ देवू शकतं नाही हे तिच म्हणंण बरोबर आहे. पण हा फर्स्ट जनेरेशन उदयोग आहे. तो उभा केलाच पाहिजे. सारंच काही एकट्याला बघावं लागतं. रेशमाच्या बारिक वस्त्रासारखी विण असलेले गच्चीवरच्या बागेचे काम मलाही भितीदायक वाटतं. पण आपल्या पॅशनच प्रोफेशन झालं (पुर्ण वेळ काम करून सहा वर्ष झाली, लढाईच्या मैदानावर अजूनही उभा आहे) यातच मोठं समाधान आहे. कर्ज असलं तरी ते फेडण्याची धमक नाशिककरांनी मला मिळवून दिली आहे.

हेच काम झिब्मांब्वे देशातील हरारे देशात करण्याची संधी होती. जमीन द्यायला तयार होते. पण माझं प्रेम कुटुंबावर व नाशिककरांवर होतं. म्हणूनच तर नाशिकला परतलो होतो. व गच्चीवरची बाग नाशिक मधे जोमानं फुलतय याचा हेवा नाशिकपेक्षा बाहेरच्या शहरातील मित्रांना, बाग फुलवू इच्छिणार्या खूप वाटतोय. ते व्यक्तही होतात. यातच मला प्रेरणा मिळतेय.

लेख आवडला तर नक्कीच लाईक व शेअर करा…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, 9850569644

Email: mindblowingsandip@yahoo.co.in

http://www.gacchivarchibaug.in

वाचकांची प्रतिक्रिया

Needs to equipments/ funds


vertical garden 1 1 (1098)संदीप चव्हाण, नाशिक, महाराष्ट्र में रहते है। पिछले चार साल से गारबेज टू गार्डन तंत्र को लेकर नाशिक में जहर से मुक्त सब्जिया और बागवानी बनाने के लिए लोगोंको प्रेरीत करते है। उनका सपना है की लोग अपने छोटी छोटी कौशिसे व्दारा जहर मुक्त सब्जिया घरपर ही उंगाये, पर्यावरण का खयाल रखे और निसर्ग के साथ जुडे रहे। इसलिए खेती की जरूरू नही है। शहर में जो भी जगह उपलब्ध है जैसे की (पंराडा, टेरेस, बाल्कनी, विंडो) उसीमें उपलब्ध नैसर्गिक संसाधनो (किचन वेस्ट, सुखे पत्ते,)  के साथ और जो भी उपलब्ध वस्तूंए में बागवानी करने के लिए प्रेरीत करते है। आज शहर में डंपीग ग्रांऊड की समस्या बढ रही है। अगर लोगों ने इस तरह किचन वेस्ट का जगह ही पर उसका सुखाकर इस्तेमाल किया तो डंपीग ग्रांऊड की समस्या नही रहेगी। और यह एक कारगर व आसान तरीका है। किचन वेस्ट का कंपोस्टिंग बनाने की कोई जरूरी नही.. ऐसा उनका कहना है। खाद बनाना यह प्राकृतिक के खिलाफ है और उसमें समय का गवाना है यह उनका मानना है।

इसलिए वह पिछले १२ साल से प्रयत्न कर कर रहे है। इस प्रयत्नों के पिछले चार साल में अपने परिवार के लिए उपजिवाका का माध्यम बनाया है। उनके साथ उनका परिवार और दो लोगों को भी रोजगार की प्राप्ती होती है।

जहर मुक्त खेती की आज बहूत जरूरी है। इसके बारे में लोगों को जागृत करना और निसर्ग के प्रती उनका सहयोग लेना जरूरी समजते है। इसलिए उन्होंने एक देशी नस्ल की गाय पाली है। उसीके गोमुत्र और गोबर से टेरेस फार्मिंग में उपयोग करते है।  इस काम को गती मिलने के लिए लंबे प्रयोसो के बाद एक चार पैयावाली गाडी खरेदी है। उसीसे थोडा आसानी हो गयी है। लेकीन यह सब कर्जा है। और कुछ कुछ करना है। उसके लिए और कर्जा मिलना मुश्किल है। और उनके सपने की कडी में कुछ साधनों की कमतरता है। अगर निचे नमुद कियें हुंए साधन का जुगाड हो जाता है तो  में पर्यावरण के क्षेत्र में लोगोंका और बडी मात्रा में सहयोग ले सकत है। और अपनी सिंमेंट की निस्तेज वंसुधरा को हरे हरे रंग के कुछ रंग भरना चाहते है।

  • Petrol Shredder machine 65000/- छत पर बागवानी के लिए 80 % बायोमास ( नारियल के छिलके, गन्ने का छिलके, पेड पौध्दे के पत्ते, सुका हुआ किचन वेस्ट और 20%  मिट्टी और खाद का उपयोग करते है। उपरोक्त मशीन व्दारा जो भि बायोमास लोगोव्दारा फेका या जलाया जाता है। उनको क्रश करके उपयोग कर सकते है। इससे दो फायदे है। एक  कम जगह में जादा से जादा संग्रहीत कर सकते है। और ट्रान्सपोर्ट के लिए सुविधा होगी।
  • किताब प्रकाशन 75000/- अब गच्चीवरची बाग ( टेरेस फार्मिंग) ये किताब की व्दितीय आवृत्ती प्रकाशीत करना चाहते है। जो स्वः एक प्रशिक्षण पुस्तिका की तरह होगी। ताकी इसे पढकर इच्छुक लोंग अपने घरपे ही किताब पढकर छत पर बागवानी कर सकते है। इससे पर्यावरण के क्षेत्र में बढा काम खडा रह सकता है।
  • बफींग machine 10000/- मंदीर से जमा किए नारियल के कठीण कवच से मैं किचेन्स बनाना चाहते है। कुछ चिंजे हातोसेही बनायी है इसमें बहोत सारा वक्त लग जाता है। उपरी मशीन अगर मिल गयी तो मैं कोकोनट शेल से अलग अलग चिंजे बना सकते है। जो पर्यावरण पुरक होगी। और स्थानिक महिलांए के लिए रोजगार की प्राप्ती होगी।

Total amt: 150000/-(1.5 lakh)

उनके कार्यपर युट्यूब पर एक फिल्म है उसे हर रोज २५० लोग देखते है। इसी विषय में मैने लोकसत्ता इस वर्तमान पत्र में एक साल कॉलम लिखा है। इसी काम की विविध माध्यमों व्दारो समाचार पत्र में जीवन परिचय प्रकाशित हुए है।

www.gacchivarchibaug.in

www.youtube.com

 

 

%d bloggers like this: