importance of home grow vegies

बाजारातील रासायनिक (Chemical) भाज्यांचं करायचं काय ?

तुमच्या आमच्या आवडीची बाग गच्चीवरची

अर्थात रसायन मुक्त भाजीपाल्याची!

नमस्कार मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक,

गच्चीवरची बाग नाशिक ही पर्यावरणीय उद्मशीलता (environmental entrepreneur)  असून आम्ही मागील २२ वर्षापासून विषमुक्त (chemical  Free) भाजीपाला पिकवण्यासंदर्भात काम करत आहोत. भाज्या कसल्या औषधंच (Medicinal Herbs) म्हणा हवं तरआज प्रत्येक पदार्थात रसायनांचा (Chemical) वापर होत आहे. मग ते जनावरांना असो की माणूस प्राण्यांसाठी). अगदी शेतात (Farming) पिकणार्या भाज्यांपासून तर अगदी इंस्टट पॅकिंग फूड (Instant Food , Fast Food) थोडक्यात agriculture industry पासून ते Food industry पर्यंत सर्रास वापर होतोय. भाज्यांचा नैसर्गिक वाढीचा (Natural Growth) कालावधी कमी केला गेलाय. तर कुठे रसायनांचा (chemical) वापर करून खाल्या जाणार्या पदार्थांचे नैसर्गिक आयुष्यमान वाढवले गेले. काय तर एवढ्या मोठ्या जनतेला भाजीपाला, अन्न मिळावे (food Security)  म्हणून, पण तुम्ही पाहत आहात कीना पिकवणार्याला (Farmers) योग्य तो दाम मिळत, ना विकत घेणार्याला (buyers) त्याचा चवीचा, (Taste) पोषणाचा मोबदलामग अशा बाजारातल्या भाज्यांना काय आग लावायची का?  आग सोडाच पण सडवून सुध्दा खत (Home fertilizer) तयार होत नाही. असो

ब्रॅडेंड मसाले वापरूनही घरची अन्नपूर्णा (House Wife) जर भाजीला चव नाही असं ऐकून घेत असेन तर तो तिचा दोष ( Guilt) नाही की, तिच्या आई बाबांनी स्वयंपाक (Cooking Skill) करायला शिकवलनाही, असं नाही.. खरी मेख रसायनं टाकून उगवलेला भाजीपाला (Chemical Farming) ही खरी गोची आहे.. पण या मुळांपर्यंत (Roots Problem) फार कमी लोक जातात. आणि त्यातले तूम्ही एक आहात, जे हा विषय मुळापासून समजून घेण्याचा विचार करत आहोत. म्हणूनच तर हा लेख वाचत आहात. असोहे झाले भाज्यां संदर्भात,, भाजीचं रासायनिक पुराण फार मोठ आहे

तर इंस्टट पॅकिंग फूड ( Instant Food) मधील रसायानांबद्दल बोलणार आहोत.. आज पाणीपुरीच्या दुकानापासून ते मिठाईच काय अगदी जगप्रसिध्द च्याऊ म्याऊ बनवणार्यापर्यंत तर अगदी अमृततूल्य बनणार्या पेय व शितपेयांपर्यंत सर्वच जण रसायनांचा (Chemical essence)  वापर करत आहेत. (खरं तर चहाची पाने सुध्दा रसायनं टाकून वाढवली जातात) या रसायंन कृत्रीम चव, त्याचा दिर्घाआयुष्य (Preservative) वाढवण्यासंर्दभात असतात. कशात रसायनं नाहीत हे सांगाखरं तर सारेच जण slow poisoning चे बळी पडत आहोत. तर अशी पदार्थ आपण जेव्हां खातो. अशी कोणकोणती पदार्थ सकाळी पासून अगदी चघळण्यापासून ते पोट भरण्यापर्यंत खातोय.. त्याची जरा यादी (monthly bucket List) करातुम्ही बाहेरची (Out Dore Food) पदार्थच नव्हे वेगवेगळी रसायनं खात आहात. तेव्हां या पदार्थात वापरलेले रासायनिक रंग, चव, त्यातील रसायनं हे जेव्हां पोटात जातात, त्याचे पचनास (Digestion) जेव्हां सुरूवात होत असेन तेव्हां त्यातून कोणता केमिकल लोचा होत असेन याचा कधी विचार केलायनाहीखरं तर विचार करायला लागलात तर खायचं काय हा बेसिक प्रश्न तुम्हाला पडेल. त्यामुळे काही मंडळी याचा विचार न केलेलाच बराअसं म्हणतील. (म्हणजे प्रश्न तसाच सोडून दिला तर तो सुटेल की गुंता वाढवेल … ?) असो विचार करायचा कि नाही, किती खोलवर करायचा हे वैयक्तिक स्वांतत्र्य आहे. त्यावर मला गदा आणायची नाही असो.. 

तर पोटात जाणार्या या वेगवेगळ्या रसायनांची लक्षणं (Symptoms) साधी व सोपी आहेत. अनिद्रा, (Insomnia) अनामिक भिती, feeling unnecessary fears  कसलंतरी भय, चिंता,(anxiety)  चिडचिडेपणा, छोटे छोटे निर्णय घेण्यात चालढकल (Decision making) किंवा अगदीच दुर्लेक्ष, विसराळू पणा, विस्मरण अशी अनेक गोष्टी दिसून येतात. 

या सर्वाचा आपल्या दैनदिन जिवनावर (Daily routines)  कार्यक्षमतेवर (अगदी सकाळच्या मॉर्निंग वॉक पासून तर रात्री बेडवर निंवात झोपेपर्यंत) परिणाम करत आहेत. तो स्वतःवरही होत आहेच पण कुटुंबावरही होत आहे. त्यामुळे अशी पदार्थ टाळा, आता तर नुसंत घरी बनवलेलं खाऊन चालणार नाही तर घरी पिकवून घरीच बनवलेलं खाणं गरजेचं आहे.. निवड तुम्हाला करायचीय.

आम्ही तर मागील २२ वर्षापूर्वीच सुरूवात केलीय.. आम्ही Grow, Guide, Build, Products, Sales N services या पाच सुंत्राव्दारे काम करत आहोत. भाजीपाला उत्पादन सहज सोपे व्हावे म्हणून आम्ही पाच प्रकारचे (Top Five products) तयार केले आहेत.

अधिक माहितीसाठी http://www.gacchivarchibaug.in संपर्क स्थळाला भेट द्या