#Clean_ganesh_visarjan #coir_collectionगणपती महाराष्ट्राचे अराध्य दैवत. समुद्राला भरती यावी नि उंचउंच लाटा किनार्यावरील लोकांना भिजवावं तसंच अगदी गणेश उत्सवाचे होते. गणेशभक्तांनी गणेशाच्या आगमनापर्यंत उत्साहात लाटामधे भक्तीरसानी न्हाऊन निघावं. खरं तर लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक उत्सव आजही त्याच महत्व टिकवून आहे किंबहूना दिवसागणिक वाढत जाणार हे नक्कीच. कारण प्लॅट संस्कृतीत वर्षभर एकमेंकाना न भेटलेली मंडळी या दहा दिवासाच्या उत्सवामुळे भेटतात. चार गोष्टीची देवाण घेवाण होते.thumbnail.jpgकोणत्याही गोष्टीला दोन किनार असतात. त्याचे फायदे तोटे असतात. तोट्याचा तराजू थोडा जरी झुकता असला तरी फायद्याकडे पाहणे किंबहूना तोटा कसा भरून काढता येईल असे काही उपाय केले तर नक्कीच आपण कोणतीही गोष्ट उपयोगी, फायदेशीर व आनंदी करू शकतो. हे विवेचन अर्थातच सार्या गोष्टीना लागू होत असली तरी गणेश उत्सवामुळे तो अभ्यासणार आहोत. गणेश उत्सवाची उजवी बाजू आपल्या सर्वांना माहितच आहे. पण डावी बाजूची प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे अनंत चतुर्दशीचा ऊतू जाणारा उत्साह, गर्दी, कचरा निर्मिती.. व दुसर्या दिवशी तो कचरा उचलण्यासाठी भिडलेले प्रशासन व सफाई बांधव…तर आपण या उत्सवाची डावी बाजू जी आहे तिची थोडी पण प्रत्येकाने काळजी घेतली तर आपला उत्सव पर्यावरण पुरक होऊ शकतो. गणेश विर्सजन हे पर्यावरण पुरक व्हावे म्हणून गच्चीवरची बाग, नाशिक तर्फे मागील वर्षी नारळाच्या शेंड्या संकलन करण्याचा कार्यक्रम केला होता.नाशिक येथील गोदावरी नदीच्या काठावरील सोमेश्वर धबधबा येथे प्रचंड गर्दीने गणेश भक्त गणेश विसर्जन करण्यासाठी येतात. गणेशाची आरती झाली की नारळ फोडले जाते. बरेचदा अनवधानाने नारळशेंड्या तेथेच ठेवून ( काही मंडळी आमच्याकडे आणून देत होते) देत. आम्ही प्रत्येकाच्या पायाजवळून त्याचे संकलन करत होते. मागील वर्षी तीन लोकांनी मिळून २ ट्रॅक्टर एवढ्या नारळाच्या शेंड्या गोळ्या केल्या होतो. नाशिक महानगर पालिकेच्या आरोग्याधिकार्यांनी आमचं कौतुकही केलं होते.अर्थातच या शेंड्या शहरी परसबाग फुलवण्यासाठी उपयोग करतो. ( नारळ शेंड्यांचा उपयोग हा भाजीपाल्याचे वाफे किंवा कुंड्यामध्ये तळाशी भरल्या जातात. कोकोपीठ वापरत नाही. कारण हे एकतर दक्षिण भारतातून येते. व त्याचा केवळ seedling साठी उपयोग होतो.)तर या वर्षी नारळ शेंड्या गोळ्या करण्याचा हा उपक्रम आम्ही या वेळेस पाच ठिकाणी व स्टेप फाऊंडेशन, नाशिक या संस्थेच्या मदतीने राबवणार आहोत.या वर्षी १२ संप्टेबंर या दिवशी अनंत चतुर्थी आहे. १२ सप्टेंबर व १३ सप्टेंबर १९ या दोनही दिवशी नारळ शेंड्या गोळा करण्यात येणार आहेत. नाशिक येथील गंगापूर रोडवर ४ ठिकाणी ( गंगापूर गावातील अमरधाम, बालाजी मंदीर येथील धबधबा, सोमेश्वर व नवश्या गणपती) व त्र्यंबक रोड वरील एका ठिकाणी ( पपया नर्सरी जवळील नंदीनी पूल) येथे नारळ शेंड्या जमा करण्यात येणार आहे. आम्हाला खात्री आहे. या पाच ठिकाणाहून जवळपास १० ट्रॅक्टर नारळ शेंड्या गोळ्या होतील.याठी श्रमदान, वस्तूदान, समयदान व अर्थदान व एकलव्याचा अंगठा ( जो सोशल मीडियावर प्रचार प्रसारासाठी हवाय) स्वंयसेवक, कचरा वेचक महिला, समन्वयक असतील त्यांच्या कडे आपण नारळ शेंड्या द्याव्यात ही विनंती आहे. त्यासाठी आपण एका वेगळ्या पिशवीत दहाही दिवसाच्या व विसर्जनाच्या दिवशी नारळ फोडल्यानंतरच्या शेंड्या जमा करून आमच्याकडे द्याव्यात. कृपया त्यात नासलेले नारळ, प्रसाद, खोबर्याचा प्रसाद, प्लास्टिक, निर्माल्य देवू नये. या सार्यासाठी म.न.पा.ची वेगळी घंटागाडी असणार आहे. आम्हाला खात्री आहे हा लेख व आमची विनंती नाशिक करांपर्यंत पोहचवाल.संस्थांची माहिती व दान देण्याविषयीचे सविस्तर पोस्टमध्ये दिलेच आहे. ति आपण काळजीने वाचावलच.. Share पण करा… सविस्तर माहितीची PDF file पहा…sandeep Chavan, http://www.gacchivarchibaug.in8087475242