रान भाज्या…

रान भाज्यां या फार महत्वाच्या आहेत. आपण त्याच त्याच भाज्या खावून एकाच प्रकारचे व विशिष्ट तत्व ही पोटात जातात. व बाकीचे तत्व हे गोळ्या औषधांनी पूर्ण करावे लागते. पावसाळा आला की रान भाज्यांचे पेव फुटते. पण खरं तर रान भाज्या आपल्या बागेतच असतात. त्या ओळखणे त्यांची भाजी बनवण्याची पध्दत समजून सांगतो.

बरेचदा बागेत उगवलेले गवत हे गवत समजले जाते पण ते खर्या अर्थाने त्या रानभाज्या असतात. त्याही बद्दल आम्ही लोकांना शिक्षीत करत असतो. तसे बघावयास गेले तर प्रत्येक वनस्पती ही भाजी आहे पण त्याला रासायनिक शेतीचे घावूक उत्पादनाचे स्वरूप आल्यामुळे त्या बाजारातील नेहमीच्या भाज्या झाल्या आहेत. आपण घरीच विषमुक्त भाजी उगवत असाल तर ती प्रत्येक भाजी रानभाजीच्या तोडीची होते. असा आम्हाला विश्वास आहे. यात टाकळा, घोळू, चिवळ, केना अशा अनेक भाज्यांची नावे घेता येतील.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.