Advertisements
गच्चीवर नऊ इंच वाफ्याच्या खोलीत आपण भारतीय उपखंडात येणार्या फळभाज्यांचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेवू शकतो. यामधे आपण वांगी, टोमॅटो, चेरी टोमॅटो, मिरच्या, ढोबळी मिरची, बोर मिरची, असे विविध मिरच्यांचे उत्पन्न घेवू शकतो. तसेच भेंडी, गवार, श्रावण घेवडा यांची सुध्दा लागवड करू शकतो.
फळभाज्यांना पानांव्दारे स्वतःचे अन्न तयार करून फळांचे अन्न तयार करून त्यांचे पोषण करावयाचे असते. त्यामुळे त्यांना सात ते आठ तास ऊन हवे. तरच त्या चांगल्या प्रकारे येवू शकतात. बरेचदा फळभाज्यांची रोपे आधी तयार करून त्यांना इतर ठिकाणी पूर्नलागवड करावी लागते. तरच त्या चांगल्या प्रकारे तग धरतात. ऊन, प्रकाश, वाहणारा वारा व तापमान यांच्या योग्य संतूलनाने आपण फळभाज्या वर्षभर घेता येतात.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.