लोक विचारतात की गच्चीवर वाफे पध्दतीने बाग फुलवली ती परवडते का…
तर उत्त्तर आहे. सर्वार्थाने परवडते. ते कसे आपण पाहूया..
गच्चीवर वाफे पध्दतीने बाग फुलवतांना जो काही खर्च येतो तो गुंतवणूकीच्या दृष्टीने खूपच परवडणारा असतो. साधारण ९ इंच उचीचा व १२ बाय १२ इंच चौरसाचा खर्च जरी अंदाजे व्दीवार्षिक खर्च हा १८५ रू जरी पकडला तरी तो दररोज २५ पैसे या दराने आपल्याला एक चौरसाचा खर्च येते. एका चौरसात तीन महिन्याची भाजी पकडली तरी तो २३ रूपये खर्च येतो. या २३ रूपयात आपल्याला ( तीन महिण्यात दोन भाज्या मिळाल्या तरी त्या रासायनिक खतात पिकवल्या गेलेल्या भाज्यांच्या बाजार भावाप्रमाणे येतात.) येथे तर आपण विषमुक्त पिकवणार आहोत. ज्याचे पैशाचे मोल दुप्पट केले तरी ती भाजी ६० रू किमतीची होते. तसेच या वाफे पध्दतीत आपण पंचस्तरीय भाज्या लागवड करणार आहोत. एकादे भाजी कमी आली तरी त्याची कसर दुसरी भाजी भरून काढते. तर अशा प्रकारे हा वाफा परवडणारा तर आहेच. शिवाय आपल्याला बाग फुलवण्याचा आनंद, समाधान, पर्यावरणाचे जे रक्षण होणार आहे. त्याचे पैशात मोल करता येणार नाही. (वाफ्याविषयी सविस्तर वाचा)
शिवाय आपल्याला कोणतेही बांधकाम करावयाचे नाही. त्या विटा आपण सहजतेने दुसरीकडे हलवू शकतो. बाग करायवयाची नसेल तर त्याचा इतरत्र वापर करू शकतो. खाली अंथरला जाणारा प्लास्टिक कागद हा वर्षानुवर्ष टिकतो. शिवाय तयार होणारी सुपीक व सुंगधीत माती ही खता सारखी तयार होते.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
अशा पध्दतीने आपल्याला गच्चीवर वाफे तयार करणे हे सर्वार्थाने परवडणारे आहे.