“की फरक पैंदा”?

क्या फरक पडता है”।

“काय फरक पडतो”?

असे आपले रोजच्या जीवनात कुठे ना कुठे एकदा तरी म्हणत असतो. एकाद्या व्यवहारात आपण तडजोड करतो तेव्हा हे वाक्य हमखास आपल्या डोक्यात येते. आता “की फरक पैंदा है” असं आणि आपल्या गच्चीवची बागेचा येथे का संबध असं आपल्या मनात आले असणार.. आलेच पाहिजे.. कारण अत्तर सोडून आपण कुत्रिम सुंगध वापरतांना सुध्दा फरक पडत असेन तर आपल्या रोजच्या जगण्यात ज्या भाज्या बाजारातून ताटात येतात. त्याचा सुध्दा आपल्या शरिरावर नक्कीच फरक पडत असतो.

गेल्या सहा वर्षापासून रसायमुक्त भाजीपाला पिकवून देण्याचे नाशिक मधे पूर्ण वेळ काम चालू आहे. त्याआधी घरच्या गच्चीवर विषमुक्त भाज्या पिकवण्याचे प्रयोग चालू होते. काही ना काही रोजची भाजी मिळत होती. रोजच्या डोळ्यासमोरच्या भाज्या खाल्यामुळे घरातल्या छोट्या छोट्या आजारावंर होणारा खर्च बराच आटोक्यात आला होता. पण मागील वर्षी घरच्या बागेकडे दुर्लक्ष केले (खर तर या काळात इतरांच्या ठिकाणी भाज्या उगवण्याचं प्रमाण वाढलं होत) त्यामुळे साहजिकच घरी उगवलेल्या भाज्या या ताटात येणं कमी झालं. (त्याचा परिणाम काय होणार याचा अंदाज होता पण प्रयोग करून पहायचं होत) आणि झाला तसचं. घरच्या भाज्या खाणं कमी म्हणजे जवळ जवळ नाहीच झालं. नि दिवाळीमधे बायकोला हायपरटेशंनमुळे आठवडा भर अडमीट कराव लागलं. नको तेवढा पाण्यासारखा पैसा दवाखान्यात खर्च झाला. मनस्ताप झाला तो वेगळाच. (कळत असूनही विषाची परिक्षा घेतली)

त्या काळात काम बुडालं ते नुकसान वेगळचं. तसंच शरिरात रासायनिक औषधांचा मारा झाला तो वेगळाच. घरी भाज्या न पिकवणं हे एकूणच महागात पडलं होतं.शक्यतो रोज संध्याकाळी वरण भात हा ठरलेला असतो. इतर कडधान्याच्या भाज्याही होतातच. (बाजारातल्या ताज्या भाज्या पेक्षा कडधान्यात कमी विषतत्व असतात. कारण बाजारात आलेल्या भाज्यावर रसायनं मारून २४ तासाच्या आत त्या शिजवून पचवलेल्या असतात. रेसुड्यू फ्री नसतात) त्यामुळे घरच्या हिरव्या भाज्या आठवड्यात तीन –चार असल्यातरी पुरेशा होतात. पण त्याहीकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं. याचा मला चांगलाच अनुभवाचा चटका लागलाय.

आपण बाजारातून रोजच्या भाज्या खातो त्यात कुठेना कुठे त्यात रसायनांचे अंश हे आपल्या पोटात, पचसंस्थेतून रक्तात मिसळतात. त्यातल्या त्यात आपलं रोजचा व्यायाम नसतोच. त्यातून हायपरटेशंन सारख्या गोष्टी घडतात. मी प्रयोग म्हणून केलेला हा प्रयत्न करतांना मी पण असेच म्हणालो होतो की काय फरक पडतो. पण फरक पडतो…. घरी उगवलेल्या भाज्या या मूठभर असल्यातरी तरी त्या औषधांच काम करतात. नि बाजारातल्या भाज्या स्लो पाईझनचे काम करतात. तेव्हा निवड तुमची आहे. ‘’की फरक पैंदा’’ म्हणून बेफिकीर होऊन चालणार नाही….

एकादे वस्त्र हे जसे सुक्ष्म धाग्यानीं विणून तयार होतं. तसचं आपल शरीर, आपलं जगणं सुध्दा छोट्या छोट्या प्रयत्नांनीच समृध्द, सुदृढ होत असतं. ते आपल्या लक्षात येत नाही… घरी भाज्या पिकवणे व त्यांचे सेवन करणे हा सुध्दा सुक्ष्म धागा आहे. जर तो विस्कटला तर आपलं शरीर ही कापड विस्कटल्या प्रमाणे तक्रार करू लागतं. एक वेळ कापड बदलवता येईल. पण जीवात जो पर्यंत प्राण आहे. ते काहीही करून बदलवता येत नाही… हे लक्षात घेवूनच आपल्या रोजच्या जगण्यात, धडपडण्यात घरच्या भाज्या घरीच पिकवण्याचा प्रयत्न करा. हळू हळू त्यात मास्टरकी येणारच.

 

वरील चित्रफितीत दाखवल्या प्रमाणे आम्ही जमीनीवर किंवा गच्चीवर विटांच्या वाफे बनवून रसायनमुक्त भाज्या पिकवून देतो.लेख आवडला तर नक्की लाईक,शेअर, व कंमेट करा…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.9850569644/ www.gacchivarchibaug.in

 

 उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तू व उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर करून घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला पिकवा. गच्चीवरची बाग पुस्तक (व्दितीय आवृत्ती)
घरपोहोच by post 250/- WTS app 9850569644  http://www.gacchivarchibaug.in

संदीप चव्हाण नाशिक.

 

लेख आवडला तर या लिंक वर अभिप्राय नोंदवा.