Site icon Grow Organic

नर्सरीतून आणलेली झाडे कसे वाढवावेत…How to nurture nursery plants in garden..

नर्सरीतून रोपे आणले की लगेच लागवड करू नये. त्यांना आपल्या बागेत, परिसरातील वातावरणाशी व खाणपाणाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. शक्यतो प्रखर उन्हात ठेवण्यापेक्षा उन सावलीत ठेवा. कपभर पाणी द्या म्हणजे ते पाण्यासाठी कार्यरत होईल.

Advertisements

How to nurture nursery plants in garden…

नर्सरीतून आणलेली झाडे कशी जगवावीत व बहारदार बनवावित….

नर्सरीतून आणलेली झाडे जगत नाहीत किंवा त्यांना सुरवातीला फूले येतात नंतर येत नाही…असा अनुभव आपल्याला कधीना कधी आलेला असतो. पण त्यावर उपाय आहे का ? 

उपाय क्रं 1) झाडांची निवड… नर्सरीत झाडे  किंवा त्याला येणारी फुले ही कोणत्या रंगाची आहे हे ओळखू यावे म्हणून त्यांना विविध रसायने ही वापरली जातात.  अर्थाच फुले नसतील ती फूल झाडे विकली तरी कशी जातील. असो तर हा व्यवसायाचा भाग आहे. या रसायनांचा वापर करून झाडांना फूल आणणं म्हणजे वय वर्ष अठरा न होताच मुलीचं लग्न लावून तिच बाळंतपण साजरं करण्यासारखं आहे. असो… तर झाडं निवडतांना फूलांपेक्षा कळ्या असलेलं घ्यावे. तसेच थोडेसे राकट, मजबूत व अधिक फांद्यांच घ्यावं म्हणजे त्याची रूजवण आपल्याकडील बागेत छान पणे करता येते. (पुढे वाचा)

२) झाडांची वातावरणाशी जुळवणे.- नर्सरीतून रोपे आणले की लगेच लागवड करू नये. त्यांना आपल्या बागेत, परिसरातील वातावरणाशी व खाणपाणाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. शक्यतो प्रखर उन्हात ठेवण्यापेक्षा उन सावलीत ठेवा. कपभर पाणी द्या म्हणजे ते पाण्यासाठी कार्यरत होईल.

३) झाडांची लागवड… कुंडीत किंवा बागेत झाडं लावतांना त्यात खाली नारळशेंड्या, सुकलेला पालापाचोळा भरावा. माती खत टाकून त्यात झाडं लावावे.

४) रोप लावण्याची पध्दत- बरेचदा आपण मुळांना धक्का न लावता प्लास्टिक पिशवी फाडतो व त्यास काढून रोपांच्या मुळाभोवती असलेल्या घट्ट मातीच्या गोळ्या सहित तो लागवड करतो. हे चुकीचे आहे. रोपाची पिशवी फाडा. गोळा घट्ट असेल तर त्यास पाण्यात भिजवा अथवा त्यास हलकासा दाब देवून मोकळा करून घ्या. म्हणजे रोपांना श्वास घेता येईल. बरेचदा हुंडीत रोपांच्या मुळा वरच असतात. व त्यास खाली भरमसाठी माती असते. तो गोळा तसाच ठेवल्यास मुळ सडण्याची शक्यता असते. त्यामुळे अनावश्यक मातीचा गोळा काढून टाका. रोप  अपेक्षीत कुंडीत, जागेत लागवड करा. पाणी लगेच  देवू नका… त्यास थोडा वेळ कुंडीत, मातीत लावल्यावर उन्हांच्या, वातावरणातील कोरडे पणानुसार त्यास पाणी पाजण्याची वेळ ठरवा. म्हणजे तास दीड तासांनंतर पाणी देवू शकता. (पुढे वाचा)

५) रोपे लावण्याची वेळ- रोपे सहसा वरील पध्दतीने दुपारी तीन नंतर लावावीत म्हणजे ती रात्रभरात त्यांचा अवकाश शोधतात. तसेच त्यांना रात्री उशीराही पाणी दिल्यास चालते.  दुपारी कुंडीत रोपे लावले असल्यास कुंडीस चार पाच तास सावलीत ठेवा.

६) रोपांना फुले येण्याची वाट पहा… रोपे नवीत जागेत लागवड केल्यानंतर त्यास रूजू द्या.. पाण्याची मात्रा किती द्यायची ते ठरवा. लावलं झाडं नि भरा पाणी असे करू नका. जास्त पाण्यामुळे मुळं कुजण्याची शक्यता असते. महिना दीड महिण्यानंतर त्यास वर खते देण्यास सुरवात करा. त्याचे सात ते पंधरा दिवसानंतर द्राव्य व विद्राव्य खते द्या.. त्याचे कॅलेंडर तयार करा.. म्हणजे रोपाला खतांचा ओव्हर डोस होऊन गरम होणार नाही.

७) माती निवडः शक्यतो काळ्या मातीत रोप लावू नये.. ( जमीन असेल तर चालेल) पाण्याचा योग्य निचरा होणे गरजेचे आहे. एक वेळ पाण्याचा ताण पडला तर झाडं तग धरेल पण जास्त पाणी राहिलं तर मुळ सडतात. (पुढे वाचा)

८) रोपांचा अभ्यास करा… त्याला उन किती वेळ हवयं. पाणी किती लागतं. त्याला खतांची गरज आहे का… याचा अभ्यास असणं गरजेचे आहे प्रत्येक माणूस, प्राण्यागणीक अन्न,पाण्याची गरज, मात्रा ही वेगवेगळी असते. तसेच झाडांचेही असते. त्यामुळे जाणकारांशी बोलून, चर्चा करून रोपांचा सवयीचा थोडक्यात DNA अभ्यास करायचा..

वरील टीप्स पाळल्या तर आपले झाडं जगतीलच पण ते बहरतील सुध्दा…

लेख आवडल्यास लाईक, शेअर व कमेंटस करा..

गच्चीवरची बाग. नाशिक. 8087475242

Exit mobile version