बिजांकूर….नव काही शोधून काढायला
सर्व बाल दोस्तांना गच्चीवरच्या बागेचा नमस्कारकाय म्हणता…? सुट्टी सुरू झाली ना… मग मज्जा! गावाला जायचं! वेगवेगळे खेळ खेळायचे!. तुमचं बर बुवा टी.व्ही,वर कार्टून, चित्रपट पाहता येतात, मोबाईलवर गेम खेळता येतो. पोहायला जाता येतं. संगीत, नाटक, नाच, बॅडमींटन, पोहण असे काय काय क्लासेस लावता येतात. आमचं असं नव्हत बुबा. त्यावेळी कसले टी.व्ही नि कसले मोबाईल. आम्ही उन्हातान्हात हुंदडायचो, माकडा सारखं झाडावर उड्या काय मारायचो. कच्च्या कैर्या खायच्या, चिंचेच पन्ह प्यायचं. झालंच तर कोयी जमा करून त्यांचा खेळ खेळायचा. असं आमचं नियोजन असायचं. पण या नियोजनालाही प्लॅनिंग असायचं बरंका.. या सुट्टीत काय करायचं अशी यादीच करायचो. अर्थात तुम्हीही प्लॅनींग करतातच म्हणा…मग इतरांपेक्षा नवं काही करायचं का?. तुमची तयारी असेल तर मग सांगतो. आमच्या यादीतला एक गंमतीशीर खेळ सांगतो. खेळ म्हणजे ते करता करता नव नवीन माहिती कळायची.दिसेल त्या बिया गोळा करायचो. त्यात साचवून ठेवायच्या. मग काय… त्या मातीत लावून बघायचो. कोणतं बियाणं कधी येतं?, त्याला किती वेळ लागतो?. सुरवातीची पाने किती असतात ?. मग त्याची वेल होते की झुडूप ?. असे बरच काही काही करायचो. म्हणूनच तर निसर्गाची आवड तयार झाली. मला तर बाप्पा असं काही मातीत रूजवून ते उगवून येतांना जाम मजा याचची. तुम्हालाही अशी मजा अनुभवायची असेल तर मग करा सुरूवात… पण एकदम गूपचूप. आपलं प्लॅनिंग लगेच सगळ्यांना कळू दयायचं नाही. अर्धी तयारी झाली की सांगायचे. मग करायची सुरवात…
- पहिल्यांदा आपल्या घरात काय काय बिज (बिज म्हणजे धान्य, कडधान्य, तेलबिया आहेत त्याची यादी करायची. घरातल्या मोठ्याची मदत घेतली तरी चालेल. (हसत खेळत, रमत दोन दिवसात तयार होते यादी)
- त्या बिजांची वर्गवारी करायची. म्हणजे धान्य कोणतं, म्हणजे तृणधान्य की कडधान्य.
एकदल की व्दीदल. तेलबिया, ( त्यातही एकदल व्दीदल येतं बरका..) अशी वर्गवारी करायची..
- मग या सर्व बिजांची चिमुटभर किंवा चमचाभर मापाचं पुडके तयार करायची. त्यावर नावे टाकून ठेवायची. उगाच मोठ्याना पून्हा पुन्हा विचारून आपलं हसं करून घेण्यापेक्षा काय ते एकदाच त्यावर नाव टाकून ठेवायची. ( आपल्यालाही काही स्वाभिमान आहे की नाही.)
ही बियाणं मग रूजवून बघायची. मूठभर माती बसेल अशी श्रीखंडाची, आम्रखंडाची नाही तर आईसक्रीम, एवढचं काय चहाचे, ताकाचे, पाण्याचे कागदी पेलेही चालतील. त्यांना छिद्र करायची. (मोठ्याची मदत घ्या नाही तर पुन्हा काय वेडेचाळे चाललेत म्हणून रागवायचे. असो …तर मूठभर माती गोळा केलेल्या वस्तूत टाकायची. थोडं बिया पेरून त्याला उन्ह सावलीत ठेवायची. रोज पाणी द्यायचं. नि त्याचं निरीक्षण करायचं. बि उगल नाही तर हार मानायची नाही… ते का उगलं नाही याचा शोध घ्यायचां… नि आपल्या माहितीत अनुभवांची भर टाकायची. नि आपणंही हुशांर आहोत, आम्हालाही त्यातल कळतं हो म्हणून थोरा मोठ्यात शाबासकी मिळवायची. मग लागताहेत ना कामाला .. छे छे कामाला कशाला नव काही शोधून काढायला.संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग ९८५०५६९६४४ , 8087475242 http://www.gacchivarchibaug.in
website
http://www.gacchivarchibaug.in
website https://atomic-temporary-145492773.wpcomstaging.com
profile
https://about.me/sandeepchavan
cover story https://udyojak.org/gachchivarchi-baug-success-story/
YouTube https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q
facebook page
my link http://www.mylinq.in/9850569644
https://organic-vegetable-terrace-garden.business.site/
👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.