ह्युमिक जल
आपण सारे आपल्या बागेबद्दल जागृत असतो. जणू काही आपली ती बाळंच असतात. त्यांना वेळेवर खाऊ पिऊ घालणं हे आपलं काम बाकी सारं पुढचं काम निसर्ग सांभाळतोच. झाडांना खतपाणी वेळेवर देणं हे आपल्या हातात असतं नि हातचं काहीच राखून न ठेवता ते परतं निस्वार्थपणे दान करणं हा निसर्गाचा स्वभाव.
हे खताचं देन आपण कधी कधीच करतो पण त्यात नियमितता, सातत्यता राखल्यास माती सुपिक व उत्पागकही होते. या देण्यातही आपल्याला विविधता सांभाळावी लागतो. यात तोच तोच पणा आल्यास मातीतील घटक हे (पी.एच) थोडक्यात मातीचा सामू स्थिर होतात. मग आपल्याला प्रश्न पडतो की इतकं सारं वेळेवर देवूनही झाडांना फळं, फुलं, वाढ का दिसत नाही. साहजिकच आहे. एकच प्रकारची खतं टाकल्यामुळे माती अनुत्पादक होण्याची शक्यता वाढते. कारण माती ही अल्कलीक व असिडिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे झांडाना दिली जाणारी खतात विविधता आणणे गरजेचे असते. त्यात द्राव्य खते व विद्राव्य खते हे द्यावी लागतात.
झाडांचे अमृत म्हणून त्यांना जिवामृत हे देत असतो व ते वेळोवेळी देणं गरजेचं असतही. जिवामृत हे जमीनीत दिल्यानंतर काही कालांनंतर त्यातील जिवाणू हे मृत पावतात व त्यांचे खत झाडांना मिळते. (जिवामृताचे खताचे उपयोग व त्याची माहिती स्वतंत्र लेखात दिलीच आहे) जिवामृतामुळे झाडांना पालवी फुटणे, फुटवा येणे, फुले येणे, फळांची वाढ होणे, फळे गोड व मधूर होतात.
नियमित पणे जिवामृत देवूनही कधी कधी परिणाम दिसून येत नाही. अशा वेळेस व अशा ठिकाणी ह्यूमिक जल वापरणे गरजेचे आहे. विशेषतः व्हेजेटेबल फॉरेस्टसाठी गच्चीवर अथवा जमीनीवर एरोब्रिक्स पध्दतीने केलेल्या वाफ्यामधे इंच इंच जागेवर बियाणे लागवड करणे गरजेचे असते. जिवामृत व नैसर्गिक खतांचा वापर करूनही अशा जागेत बियाणं न रूजणं, रोपे वाढत नाही, झाडांचे सर्व लाड करूनही काहीच बदल दिसत नसल्यास अशा वेळेस समजावे की मातीचा पी. एच. (सामू) स्थिर झाला आहे. अशा वेळेस ह्यूमिक जल या एक लिटर द्रावणात पाच लिटर पाणी टाकून दे हातांने एरोब्रिक्स पध्दतीने शिंपडावे किंवा कुंडीला द्यावे, माती काही दिवसातच सजीव होते. भुसभुशीत होते. मागील काही प्रयोगावरून असे जाणवले आहे की काळा मावा व सफेद मावा हा सुध्दा नष्ट होते. तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बागेला देत असलेल्या खतांचे सुक्ष्म पातळीवर विघटन करून ते झाडांना पुरवण्याचे काम करत असते. थोडक्यात ह्यूमिक जल हे खतांची प्रक्रिया करणारे प्रेरक आहे. त्यामुळे ह्यूमिक जलचा वापर आपण दोन जिवामृताच्या पाळीमधे एकदा वापरावयास हरकत नाही.
ह्यूमिक जल हे सफेद रंगाचे असते. त्यास आंबट दही सारखा गंध असतो. ही बाटली वापरतांना नेहमी हलवून वापरावी म्हणजे तळाशी बसलेले घटक पाण्यात निट मिसळतात. तुम्हाला हयुमिक जल हवे असल्यास संपर्क साधावा. २२ रू. लिटर ( २०२२ साठीचा दर)
तर आपणही वापरून पहा व आपल्याला जाणवलेले परिणाम आम्हाला सांगा…
संदीप चव्हाण, गच्चीवरची (रसायनमुक्त भाजीपाल्याची) बाग, नाशिक
Order Now
9850569644 / 8087475242