164500_XL.jpg
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनराईत झाडांच्या वाढदिवसा निमित्त पुन्हा पुन्हा आलेल्या वृक्षप्रेंमीसाठी…

एक झाड…

एक झाड लावू त्या दूरच्या वनराईत

देवू त्याला पाणी, देवू त्याला खत..

करू साजरा त्याचा वाढदिवस

आता दरवर्षीच

त्याला जगवू..त्याला वाढवू,

पून्हा पून्हा भेटू आपण,

त्याच्या काळजीच्या निमित्ताने तरी

देवू उजाळा त्याच्या निमित्ताने आपल्या सोबतच्या क्षणांची, करू उजळणी आठवणीनींची

जरा आपल्या नात्याची,

त्याच्या सावलीत, त्याच्या आंबट गोड फळांच्या चवीने

जपू आयुष्याच्या आठवणी…

कारण…

कारण…

एक झाड तूझ्या माझ्या आठवणीच,

एक झाड आपल्या जूळलेल्या नात्याचं

एक झाड आपण ठरवून जपलेल्या नात्याचं

एक झाड एकमेंकाकडून घेतलेल्या वचनाचं

एक झाड आपल्या पहिल्या वहिल्या प्रेमाचं

एक झाड आपल्या अचानक झालेल्या भेटीचं

एक झाड आपल्या लग्नाचं

एक झाड आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं

एक झाड आपल्या घरात आलेल्या सोनपावलांच

एक झाड आपल्या सोन्याचं.. सोनपरिचं

एक झाड आपल्या ठरवून केलेल्या मैत्रीचं

एक झाड आपल्या मित्रांच्या मैत्रीचं

एक झाड आपल्या यारीचं

एक झाड आपल्या यशाचं

एक झाड आपल्या ठरवलेल्या नात्याचं

एक झाड कदाचीत पुन्हा भेटू या वचनाचं

एक झाड फक्त नि फक्त माझं

एक झाड आईच

एक झाड भावाचं

एक झाड बाबांच

एक झाड…तिचं- माझं…

एक झाड त्याचं नि माझं

एक झाड.. बर्याच आठवणींच..

एक झाड सर्वांचच

 

एक झाड न संपणार्या आठवणीचं

एक झाड आपल्या अस्तित्वाचं

एक झाड ….

फक्त झाड लावू, एवढचं नाही…

झाडानं फूलवलेलं आपल नातं

जपू… वाढवू…

देवू त्यालापण आठवणींच पाणी, नि भेटीच खत

करू साजरा त्याचा वाढदिवस दरवर्षी…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक

 

 

 

 

नातं काहीही असो…

झाडं हे निमित्तमात्र