Advertisements
कुंड्या पूर्नभरण हे फक्त रोपांना बाहेर काढून त्यात पुन्हा खत माती टाकून लागवड करणे एवढेच नाही. त्यात विविध शास्त्रांचा संगम आहे. त्यात कला, (Art) आहे, त्यात विज्ञान (science), गणीत (Geometry) रसायन शास्त्र (chemical science) आहे. आम्ही कुंड्या पूर्नभरण करतांना झाडांचा सर्वागीन अभ्यास (त्याचे अन्न, निवारा, तापमान याचा विचार) केला जातो. व त्या पध्दतीने त्याचे पूर्नरोपन केले जाते. आम्ही भरलेल्या कुंड्या या वजनाने हलक्या असतात. सहज हलवता येतात. पाणी सुध्दा कमी लागते. हे आम्ही अनुभवाने शिकलो आहोत. तळाशी नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा, श्रेडींग मटेरियल, माती, खत वापरली जाते. अशा पध्दतीने भरलेली कुंडी ही निरतंर खत पुरवठा करत राहते. व अशा पध्दतीने भरलेली कुंडीचे पुन्हा नव्याने पूर्नभरण करतांना सोपे जाते.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.