सहाप्रकारे टाळू शकता विषारी भाज्यांचे सेवन...
रासायनिक भाज्यांचे सेवनाने शरिराची प्रतिकार शक्ती कमी होते. आणि त्यामागे विविध आजार पिच्छा पुरवतात. या रासायनिक भाज्या रोजच्या जेवणात टाळावयाच्या असतील आपल्याला खालील प गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजे. तरच आपले खाणं हे विषापासून दूर ठेवू शकतो.
1. रेड्यूसी फ्री भाज्या विकत घ्या.. रेड्यूसी फ्री म्हणजे शेती क्षेत्रात भाजीपाला उत्पादन वाढीसाठी जे काही रासायनिक खते, कीडनाशक वापरली जातात त्यांच्या अठ्ठेचाळीस तासाने भाजीपाला हा हा बाजारात विक्रीला आणला जावा असे आहे. रसायने फवारल्या नंतर जवळपास अठ्ठेचाळीस तासाने रसायनांचा प्रभाव हा कमी होतो. पर्यायाने लोक आपली भाजी कमीत कमी रसायने रसायने सेवन करतील असा हेतू असतो. पण कोणताही शेतकरी अठ्ठेचाळीस तास वाट पाहत नाही. कारण रासायनिक खते व फवारणीने उत्पादीत भाजीपाला हा वेगाने खराब होतो. सडतो. तसेच ताज्या भाज्यांना बाजारात मागणी असते किंवा त्यास लांबचा प्रवास करून इतर बाजारपेठेत पोहचावयाचे असते. त्यामुळे त्यास आदल्या दिवशी रसायनांची फवारणी करून भाजीपाला विकला जातो. पर्यायाने आपण एका अर्थाने अठ्ठेचाळीस तासात आपण विषारी अन्न पोटात गेलेले असते. त्यामुळे हा पर्याय आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतो. जितका शेतकरी छोटा तितके रसायनांचा वापर कमी असे काही लक्षात घेवून स्थानिक शेतकर्याकडून भाज्या विकत घेवू शकतो. पण त्याचीही खात्री नसते. हे लक्षात घेतले पाहिजे.
(पुढे वाचा)
2. विषमुक्त भाज्याः तुम्हाला रोजच्या आहारात विषमुक्त भाज्यांची गरज असल्यास रसायनांचा वापर न करणारा, नैसर्गिक पध्दतीने भाजीपाला उत्पादन करणारा शेतकरी असेन तर त्याच्या कडून विषमुक्त भाज्या तुम्ही विकत घेवू शकता. पण त्यासाठी आपल्याला त्यास दत्तक घेणे गरजेचे आहे. थोडक्यात आपण त्यांच्या कौटुंबिक गरजा भागवणे व त्या बदल्यात रसायनमुक्त भाज्या व अन्नधान्य विकत घेणे असा होतो. किंवा अशा खात्रीलायक शेतकर्याकडून जास्त भावात भाज्या विकत घेता येतात.
3. शिळ्या भाज्या विकत घेणे… मी माझ्या एका सन्यांशी मित्रासोबत भाजी विकत घेण्यासाठी गेलो होतो. त्यावर गच्चीवरची भाजीपाला निर्मिती करणारी बाग हे काम चालू केले नव्हते. तो सन्यांशी मित्र शिळ्याभाज्या विकत घेत असे. मी त्याला ताज्या भाज्यांचे महत्व सांगतीले. तर त्याने सांगीतले की या भाज्या रसायनांवर उगवलेल्या असल्या तरी त्या शिळ्या झाल्यामुळे त्यांचा प्रभाव कमी झाला आहे. आणि त्या अनुषंगाने आपण कमीत कमी रसायन पोटात घेतो हे त्याने समजावून सांगतीले. तर शक्य असल्यास भाज्या शिळ्या विकत घ्या किंवा शिळ्या करून खाव्यात. उदाः फळभाज्या या २-३ दिवस टिकतात. आणि अनुभवाने सांगतो. अशा भाज्या चवीला ताज्या भाज्यांपेक्षा चिवष्ट लागतात. (पुढे वाचा)
4. रंग, आकार, कीड लागलेल्या भाज्या…. बाजारातील ताज्या भाज्या घेण्याची वेळ आली तर रसायनांचा प्रभाव कमी असलेल्या भाज्या लगेच ओळखू य़ेतात. त्यांचा रंग हा काहीस उतरलेला निस्तेज असतो. मळकट असतो. तर त्यांचा आकार लहान असतो. तसेच त्या काही कोनात वाकलेल्या असतात. उदाः कारली, दूधी भोपळा हा आकाराने छोटा असतो. तर काही अंशी वाकडी झालेली असतात. बरेचदा त्याला कीड लागलेली असते. अशा भाज्यांचा कीडीचा भाग काढून टाकून आपण चांगल्या भाज्यांची भाजी करू शकतो. गवार, वांगी, गिलके, दोडके तसेच पाले भाज्यांमधे छोट्या पानांची, कमी उंचीची भाजी विकत घेवू शकतो. एकदा थायलंड येथे गेलो असता. तेथे कळाले की तेथे कीड,अळी पडलेला फूलकोबी लवकर विकला जातो.. काय कारण असेल… या विचार तुम्ही करा… (उत्तर नाही मिळाले तर फोन करा 9850569644)
5. वाळवलेल्या भाज्या … ताज्या भाज्यांपेक्षा वाळवलेल्या भाज्या या नेहमीच चांगल्या. कारण त्यात विषारी घटक हे बर्यांच अंशी कमी होत जातात. शिवाय त्या बाराही महिने कधीही खाता येतात. तसेच त्या निवडलेल्या व स्वच्छ ही असतात. भाज्या तुम्ही घरीसुध्दा सोप्या पध्दतीने वाळवू शकता. ( पुढे वाचा)
6. सर्वात चांगला व खात्रीलायक उपाय म्हणजे.. घरीच भाज्या पिकवा.. घरी पिकवलेल्या भाज्या या आपल्या डोळ्यासमोर उगवलेल्या असतात. अशा भाजीपाला बागेचे मातृत्व आपण स्विकारल्यामुळे आपल्या माहिती असते की आपण त्यात रासायनिक खते, औषधे टाकली आहेत की नाही. त्याला वाढीसाठी लागलेला वेळ आपल्याला माहित असतो. त्यामुळे आज तरी घरीच पिकवलेल्या भाज्यां या सर्वात खात्रीलायक आहेत. आणि आपण थोडी कष्टाची तयारी दाखवल्यास त्या घरच्या घरी उगवणे हे सहज सोपे आहे.
विषमुक्त भाज्यांसेवनासाठी उपाय नक्की करा.
गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक. 9850569644 8087475242
घरीच भाज्या पिकवण्यासाठी वाचा.. Books / E books