एका काडातून क्रांती… पुस्तक


One straw revolution या पुस्ताकाचे म्हणजेच एका काडातून क्रांती हे पुस्तक वेणू पळशीकर यांनी मराठीत भाषांतरीत केले आहे. २००५ साली वाचनात आलेले या पुस्तकाने इतरांप्रमाणे माझीही निसर्गाप्रती, शेती बद्दलच्या विचारांची दिशाच बदलवली. इतक सुंदर पुस्तक खर्या अर्थाने ओघवत्या शैलीत भाषांतरीत केले आहे. शेतीकडे पहाण्याचीच दृष्टी बदलून जाते.

जपानमधील मासानोबू फुकुओका यांनी लिहलेले पुस्तक आहे. या पुस्तकांती कितीतरी संदर्भ लख्खपणे डोक्यात आहेत. पुन्हा पुन्हा वाचतांना कंटाळा येत नाही. दर वेळेस नवे संदर्भ, त्याचे पुरावे मिळू लागतता.  खरं म्हणजे ज्याला शेती करायची आहे त्याचा फांऊडेशन कोर्स म्हणजे हे पुस्तक आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. शेतीच्या कितीतरी पध्दती आहेत. सध्या रासायनिक शेतीच्या दृष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेतीपध्दतीचे महत्व हे ठळकपणे अधोरेखीत होते. ( या पुस्तकांतील निवडक कोटस ( वाक्य)  तुम्हाला माहित आहे का या गच्चीवरची बाग पुस्तकात मिळतील.)

शेती करणे म्हणजे नफा, इनपुट आऊटपुट, उत्पादन असे व्यापारी दृष्टी नाही. ती एक जिवनदृष्टी आहे. निसर्गाला समजून घेत, पुढे जाण्याची, जगण्या जगवण्याची. निसर्ग कधीच हातचं राखून ठेवतं नाही. तो स्वार्थी नाही. तो परतावा देतो. पण त्याची वाट पहावी लागते.

या पुस्तकातील जिवनदृष्टीने माझ्याही जिवनात अमुलाग्र बदल केले. किंबहुना गच्चीवरची बाग हे काम या पुस्तकाच्या वाचल्यानंतर 8 वर्षानी सुरू झाले. एवढं कृतीशील चिंतन या पुस्तकाने घडवून आणले हे मान्य करायला हरकत नाही. मुळात गच्चीवरची बागेचा पायाच या पुस्तकातून अंकुरला आहे. आम्ही अंमलात आणत असलेले बरचसे तत्वे ही या पुस्तकावर आधारित आहेत. कारण जिवनशैली बदलल्या शिवाय जगण्यात शांतता नाही. जी आपण आजच्या शहरी जिवनात हरवून बसलो आहोत. जगण्यात शांतता हवी असेल तर निसर्गाची साथ संगत असावी. निसर्गाची साथ संगत हवी असेन तर शेती घ्या, फार्म हाऊस घ्या. ते शक्य नसेन तर घरा भोवती, छतावरती, गच्चीवर बाग फुलवा. तेथे काम केल्याने, मेहनत केल्याने अपार शांतता, समाधान मिळते.

बरीच मंडळी फुलझाडांनाच निसर्ग समजून घेतात. पण फुलांमधे काहीच प्रकार असतात. बरेचदा निवडक असतात. तशा प्रमाणात भाजीपाल्यात विविधता असते. प्रत्येकाची गरज वेगळी, कीड, पाणी, कालावधी यात बहुविविधता असते. त्यामुळे तेथे फुलांपेक्षा शिकायलाही फार मिळते. आमचा एक मित्र व्हेटरनरी डॉक्टर आहे. त्याला सहज विचारले का रे सोपे असेन ना सगळे हे शिकणे. तेव्हा त्याने सुंदर उत्तर दिले. माणसांचा डॉक्टर होणे सोपे आहे. कारण त्यात फक्त दोनच शरिर अभ्यासायची आहेत. ति म्हणजे स्त्री पुरूष. जनांवराचा डॉक्टर होणे तसे फार अवघड आहे. अभ्यास फार असतो. कारण कुत्रे, मांजर, गायी, म्हशी,  घोडे, गाढवे, उंट, एका ना अनेक प्राण्यांच्या शरिरराचा अभ्यास करणे आवाहानात्मक आहे. फक्त यात रिस्क कमी असते. कारण मानवी जिवापेक्षा  प्राण्यांच्या जिवाला काही झाले तरी त्याची जबाबदारी कमी असते. असो. तर मुद्दा असा की फुलांपेक्षा भाजीपाला निर्मिती व त्यातल्या त्यात विषमुक्त करणे हे फार कौशल्याचे काम आहे. थोडक्यात फुलांची बाग फुलवायची म्हणजे आळशांची हौस आहे. जसे शेती ज्यांना जमत नाही. आवडत नाही. त्यांनी ऊस लागवड करून द्यावा. पाणी देत रहा. कापणीला आला की तोही इतरांकडून घ्या. बाकी मातीची काय माती होते हे डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मंडळीना काय कळणार.. असो.

ई पुस्तकं उपलब्ध…

शेती, निसर्ग, जिवनशैली, जगणं हे सारं शिकायचं म्हणजे आधी कृतीतून ते समजून घेतले पाहिजे. आणि ते समजून घेण्यासाठी एका काडातून क्रांती हे पुस्तक वाचले पाहिजे. आजच्या धावपळीच्या, इंस्टंटच्या जमान्यात संयम कुणाकडे आहे. प्रत्येक गोष्ट फायद्या तोट्यात मोजून पाहतो आपण. पण निसर्ग, शेती, गच्चीवरची बाग म्हणजे यंत्र नाही आहे. इनपुट दिले की आऊटपुट मिळते. तो निसर्ग आहे. त्याच्या कलाने आपण गेलो तर आपल्याला तो भरभरून देणार आहे. पण त्याला समजून तर घ्या आधी…

 नक्की वाचा.. हे पुस्तक…

पुस्तक ऑनलाईन मिळते.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

%d bloggers like this: