वाळवी, दिमक, Termite
बाग फुलवायची म्हणजे त्यात मित्र किटक, शत्रू किटक आलेत. त्यात काहींची आपल्याला उगीच भिती वाटत असते. तर कधी काहीच होत नाही म्हणून त्याकडे अक्षम्य दुर्लक्षही केले जाते. तर काहींना उगीचच शत्रू मानून त्यावर अघोरी उपाय केले जातात. या शत्रु किटकातील प्रमुख कीड असते ति म्हणजे वाळवी. वाळवी म्हणजे काय? ति का जन्माला येते ? ति का वाढीस लागते ? ति कुठपर्यंत आपल्याला व किती व कसे नियंत्रीत करायची या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
वाळवी म्हणजे काय ? वाळवी ही बागेत पडलेल्या, सुकी लाकडं, फांद्या यांना खाण्याचे काम करते. ती खाऊन त्याची माती तयार करते. व ज्या लाकडाभोवती लागते त्याभोवती ति मातीचे आवरण तयार करते. वाळवी ही अनेक प्रकारची असते. मुख्यतः वाळवी ही वाळलेलीच काष्ट अर्थात लाकडं खात असते. फार कमी जातीच्या वाळवी असतात ज्या ओल्या लाकडांना खात असतात. वाळवी ही आंब्याच्या खोडाला लागते. कारण आंबा ठराविक वयाचा झाला की त्यावर सुकलेले आवरण तयार होते. ते नैसर्गिक रित्या काढून टाकण्याचे काम करते. वाळवी ही घातक नसते. ती उपकारक असते. पण हीच वाळवी घरातील फर्निर्चरला, जुन्या कागदांना खाते. वेळोवेळी स्वच्छता असली तर ति पण आपल्यापासून दूरच राहते. सध्याच्या काळात केमिकलचा वापर करून तयार केलेले फर्निर्चर असल्यामुळे ति सहसा लागत नाही.
बागेत वाळवी लागण्याचे कारण म्हणजे जूनी झालेली झाडांची खोडं. खर तर जंगलात वारूळे वाढण्याचे एक प्रक्रिया आहे. मोठ मोठी झाडे नैसर्गिक रित्या वाळून जातात. त्याची खोडं ही तशीच वर्षानुवर्ष जमीनीत गाडलेली असतात. यात ही खोड खाण्याचे काम वाळवी करत असते. लाकूड खाऊन झाले की त्यात जो पोकळपणा तयार होतो. तेथे मुंग्या अधिवास करतात. थोडक्यात वारूळंही मुंग्याची नसतात. त्याचा मुळ मालक ही वाळवी असते. अर्थात यात वाळवी हे मुंग्याचे खाद्य असते. एकाच रेषेत असलेली वारूळांच्या खाली पाण्याचे प्रवाह असतात. त्यामुळे वारूळ्याच्या जवळपास आपल्याला पाण्याची कुपनलिका तयार करू शकतो. तसेच हा प्रवाह किवां दिशा ही नदीच्या दिशेला घेवून जातात. असे हे शाश्त्र आहे. असो..
बागेत मुंग्या होत आहेत म्हणून त्यावर नियंत्रण मिळवायला गेलो तर वाळवीचे प्रमाण वाढत जाते. कारण त्यांना खायला कुणीच नसते. त्यामुळे मुंग्या या परसबागेत असणे हे उत्तम आहे. तसेच वारंवार वाळवी होत असल्यास किंवा मुंग्या होत नसल्यास परसबागेच्या एका कोपर्यात कंपोस्टींगचा एरोब्रिक्सचा हौद कराव्यात. येथे वाळवी व मुंग्या सहजिवन पध्दतीनी एकत्र नांदतात. किंवा एकाच जागेवर एकवटतात.
वाळवी घरात येण्याची शक्यता असल्यास त्यांना नियंत्रीत करणे गरजेच आहे. कारण त्याला काहीच पर्याय नाही. पण उगीचच घाबरून जावून त्यावर नियंत्रण मिळवू नये. तसा प्रयत्नही करू नये. जिव जिवस्य जिवनम हे निसर्गाचे तत्व आहे. निसर्गाती प्रत्येक जन्माला आलेला जीव, वनस्पती ही परस्परांचे अन्न आहे.
जून्या जिवंत झाडांच्या सालीला वाळवी लागल्यास मिठाचे पाणी फवारावे. बागेत थोडफार व वरचेवर खडे मिठाचा वापर केल्यास वाळवी ही नियंत्रीत होते. त्यामुळे पूर्वी लाकडी बांधकाम करतांना जमीनीत खडे मिठ टाकले जायचे त्यामुले वर्षानुवर्ष लाकडी वाडे ही शाबूत रहायचे. नंतर नंतर डांबराचा वापर करायला लागले.
तसेच थोड्या प्रमाणात असल्यास कपडे धुण्याच्या साबणाचा वापर करावा. पण तेही रसायन आहे. इतर सुक्ष्म जिवांना घातक ठरतात. मातीची उत्पादकता कमी होते. या पेक्षा रॉकलची फवारणी ही योग्य ठरते. तसेच देशी गायीच्या गोमुत्राचीही फवारणी ही फायदेशीर ठरते.
आंबा, नारळ, आवळा जांभूळ अशा फळझांडाना हात पोहेचेल तिथपर्यंत (साधारण ५ -६ फूटापर्यंत) या झाडांना ऑक्टोबर महिण्यात चूना व गेरूचे आवरण द्यावे म्हणजे वाळवी लागत नाही.
बरेचदा मंडळी ही कच्च्या शेणखताचा वापर करतात. शेणखत हे किमान वर्षभर तरी चांगले मुरलेले अथवा कंपोस्ट झालेले असावे. शेणखत कच्चं व अर्धवट असल्यास त्यास वाळवी लवकर लागते व आयतेच आमंत्रण दिल्यासारखा होते.
परसबाग, शेतातील, फळबागेतील परिसर वरचेवर स्वच्छ करणे गरजेचे असते.
मिठ हे नैसर्गिक आहे. या ऐवजी थायमेट पण रसायन वापरले जाते खरे. पण त्याचा दुर्गंध फार येतो तसेच ते पाण्यात, मातीत मिसळणे घातक आहे.
हा लेखही वाचा… बागेतील मुंग्या…
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक,
9850569644 / 8087475242