Terrace Gardening In Nashik नाशकात बहर टेरेस गार्डनिंगचा
एकीकडे वाढत्या शहरीकरणामुळे शेती हद्दपार होत असताना शहरांमध्ये मात्र टेरेस गार्डनिंगमुळे पर्यावरण रक्षक्षाला चालना मिळत आहे. नाशिकही याला अपवाद नाही. शोभेच्या फुल झाडांबरोबरच आपल्याच घराच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये आपल्या आवडीनुसार भाजी पिकवण्याकडे नाशिककरांचा ओढा वाढत आहे.
मटा ऑनलाइन | Updated:May 24, 2014, 12:39AM IST
आशिष कोकरे, नाशिक
पर्यावरणाचे महत्व वाढत आहे लोकाना आपण थोडी का होईना हिरवळ करावेस वाटते हे चांगले आहे परंतु त्याच बरोबर फ्लाटच्या बाहेरच्या भिंतींवर पाण्याचे ओघळ जाणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी 50 …+
एकीकडे वाढत्या शहरीकरणामुळे शेती हद्दपार होत असताना शहरांमध्ये मात्र टेरेस गार्डनिंगमुळे पर्यावरण रक्षक्षाला चालना मिळत आहे. नाशिकही याला अपवाद नाही. शोभेच्या फुल झाडांबरोबरच आपल्याच घराच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये आपल्या आवडीनुसार भाजी पिकवण्याकडे नाशिककरांचा ओढा वाढत आहे.
शहरात सध्या फ्लॅट संस्कृतीत मोठी वाढ झशी आहे. त्यामुळे रिकाम्या जागेत लावली जाणे झाडे, एखादा वेल किंवा एखादी भाजी याला फारसा वाव उरलेला नाही. त्यामुळेच ही टेरेस गार्डनिंगची संकल्पाना जोर धरत आहे. इंटरनेटवर तसेच मित्र – मैत्रिण किंवा नातेवाईकच्या घरी प्रत्यक्ष पाहून मग थोड त्यावर संशोधन करून प्रत्यक्षात त्याचा अवलंब करण्याला आता शहरात सुरुवात झाली आहे.
पूर्वी टेरेस गार्डनिंग करताना फक्त फ्लॉवर गार्डनिंगवर लोकांचा भर होता. आता यामध्ये भाजीपाला पिकवविण्यालाही स्थान मिळू लागले आहे. त्यामुळे नर्सरीमध्येही फुलांप्रमाणेच फळभाज्या, पालेभाज्या, औषधी वनस्पती यांच्या रोपांना, बियाण्यांना मागणी वाढत आहे.
असे करतात टेरेस गार्डनिंग
यासाठी ड्रम, तुपाचे/तेलाचे डबे, बादली, कुंड्या, करंड्या (फळ ठेवण्याची टोपली), बरणी यासारख्या साधनांचा वापर केला जातो. विटांचे वाफे रचून फळभाज्या तथा पालेभाज्यांची लागवड केली जाते. या रोपांची निगा राखण्यासाठी गांडूळ खत, जीवामृत, तीसपर्णी, ताक, गोमुत्र, पाणी आदींचा वापर होतो. यात कुठल्याही रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. रोपांना दिलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची यात सोय करता येत असल्याने पाण्याची बचत देखील होते. घराच्या परिसरातील केरकचरा, पालापाचोळा, चहाची पत्ती, नारळाच्या शेंड्या, थोडीफार माती यांचा त्या रोपांच्या उभारणीत मोलाचा वाटा असतो.
टेरेस गार्डनिंगचे फायदे
– कमी खर्चात लागवड.
– भाज्यांच्या उत्पादनातून आर्थिक बचत.
– कचऱ्याचा पुनर्वापर
– यात कुठल्याही रासायनिक खतांचा वापर नसतो.
– टेरेस गार्डनिंगमुळे टेरेस तथा बाल्कनीमध्ये हिरवळ बहरते.
– गार्डनिंग करतांना गांडूळ खताची निर्मिती ही करता येते.
– पक्षी व चिमण्यांना अन्न व निवारा यातून मिळतो.
‘मला गेल्या ९ वर्षांपासून टेरेस गार्डनिंग म्हणजे गच्चीवरील बाग साकारण्याचा अनुभव आहे. माझ्या या कामातून संशोधन करून मी ‘गच्चीवरील बाग’ हे पुस्तकदेखील लिहले आहे. टेरेस गार्डनिंग करताना संमिश्र पद्धतीने रोपांची लागवड करणे फायदेशीर ठरते. कमी खर्चात जास्त उत्पादन, पर्यावरण समतोल साधने व आर्थिक बचत यामुळे टेरेस गार्डनिंग आपल्याला आरोग्य व आर्थिक दुष्ट्या कधीही उपयुक्त ठरते. अशा प्रकारची शेती जास्तीत जास्त लोकांनी करावी ’
संदीप चव्हाण www.gacchivarchibaug.in 8087475242

आपणही link forward करून एकाच ठिकाणी माहिती पोहचू शकता. वर्षभराचे शुल्क 1090/- असेल. renewal 730/-
https://organicvegetableterracegarden.wordpress.com
You must be logged in to post a comment.