गच्चीवरची बाग पूर्ण वेळ सुरू करून आता सहा वर्ष पूर्ण झालीत. आम्ही उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा, उपलब्ध वस्तूंचा, उपलब्ध जागेचा वापर करत नैसर्गिक पध्दतीने भाज्या उगवत आहोत. त्या उगवण्यासाठी विविध प्रयोग, करत आहोत. जे प्रयोगातून शिकत ते ज्ञान आम्ही लोकांमधे वाटत आहोत. सामाजिक जबाबदारीच भानं बाळगत उपजिवेकेसाठी प्रयत्न करत आहोत. थोडक्यात लोकांना भाज्या उगवून देत आहोत.

या सार्या प्रवास शुन्यापासून सुरू झाला. म्हणजे फक्त शेतीची, होम कंपोस्टींग करण्याची आवड होती.. त्यातून एक एक पाऊल पुढे टाकत हळू हळू (कर्ज घेत) गुंतवणूक वाढवत नेलीय. या सार्या प्रवासात आम्ही बावन्न प्रकारच्या सेवा सुविधा, उत्पादने कमीत कमी किमतीत (गेल्या सहा वर्षापासून आहे त्याचे भावाने, किंमतीने विकत आहोत)

पण हे सारं करतांना काही गोष्टी आम्ही पर्यावरणीय तत्व म्हणून पाळत आहोत.उदाः कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते, संजीवके वापरावयाची नाहीत. ति खतात, प्रक्रियेत मिश्त्रण करत नाही.

आमच्या घरी देशी घेवून तिचे संगोपन करत तिच्यापासून दूधापेक्षा (दूध तिच्या पिल्लांला देतो) शेण व गोमुत्रांचा वापर करत आहोत. शहरात राहूनही नैसर्गिक पधद्तीने वेळेनुसार बिज रेतन केले जाते. निर्माण होणारे गोमुत्र प्लास्टीकच्या पेयजलाच्या बाटल्या गोळ्या करून त्यात भरून बागकामासाठी विकले जाते (पॅकींगचा खर्च तर वाचतोच पण वस्तूंचा पूर्नउपयोग होतो, पुनचक्रीकरणातून तयार होणारे घातक रसायनं टाळली जातात.)

शेणखत व इतर खते पॅकींग करतांना वापरलेल्या कॅरीबॅग्जस पुन्हा पुन्हा वापरतो. बागबगीचा मेन्टनन्स करतांना टाकावू जैविक कचरा घरी आणून त्यास बारीक करून त्याचे कंपोस्टीग तयार केले जाते. नाऱळाच्या मिळालेल्या झावळ्यापासून घरीच खराटा तयार केला जातो. घरी चुल असल्यामुळे तयार होणारा कोळसा पुन्हा बारिक करून त्याच्या गोवर्या तयार केल्या जातात. तसेच राख ही बाग बगीचेसाठी खत व किड नियंत्रणासाठी वापरतो. आम्ही कीड मारत नाही. तिचे नियंत्रण करतो. त्यांना पळवून लावतो. रासायनिक प्रक्रियेत कीड मारून टाकली जाते.

सध्या आई बाबांच्या कष्टाने विकत घेतलेल्या २५ बाय ६० या जागेवर तेवढेच पत्राचे शेड टाकले आहे. (पूर्वी छिद्र असलेली, गळकी, जूनी पत्रे होती. आता नवीन टाकली आहेत.) या ठिकाणी, गाय गोठा, गाडी (गार्डन परी), माती, खत याचे संग्रह केला आहे. याच जागेवर आमचे जूने सिमेंट पत्राचे घर आहे. (आमची ही जागा म्हणजे गुगलचे सुरवातीचे गॅरेज आहे तसेच आहे. पसारा सर्वत्र) डांबरी रस्त्याची  उंची वाढल्यामुळे आता घर पाच फूट खोल गेले आहे. (विशेषत ते कघी पडेल याची भिती आहेच. ते दरपावसाळ्यात त्यास ओल यायची. विजेचा कंरट पाझरत असे ( पण त्यावरून शेड टाकल्यामुळे मागील दोन वर्षापूसन टिकले आहे.) पण आता हे पाडण्याची वेळ आली आहे. कारण दैनंदिन उपयोगापेक्षा कामकाजात त्याची अडचण वाटू लागली आहे. तसेच त्याने २५ बाय ६० च्या शेड मधील अर्धी जागा व्यापली आहे. ते पाडून तेथे वॉल कंपाऊंडसाठी वापरतात त्या सिमेंट फळ्यांचे १० बाय १० च्या ३ खोल्या काढणार आहोत. या भिंती उभ्या करण्यास ८० हजाराचा खर्च आहे. तसेच त्याचे दरवाजे, खालील कोबा करण्यास २० हजाराची गरज आहे. असे एकूण एक लाख रूपये गरजेचे आहे.

या खोल्या तयार झाल्यास थोडी मोकळी जागा उपलब्ध होईल. भेट देणार्या मंडळीना थोड बसण्यासाठी जागाही मिळेल हा हेतू आहे.  यासाठी आपणा कडून दोन प्रकारच्या मदत हवी आहे. एक आपले श्रम व दुसरे आर्थिक. आपणास श्रम करण्याची इच्छा असल्यास आपण जून घर पाडण्यासाठी, खड्डयात भर टाकण्यासाठी, साहित्य हलवण्यासाठी श्रमाची मदत करू शकता.

दुसरे आर्थिकः आपण किंवा आपल्या ओळखीतील कोणी या खोल्या बांधण्यासाठी आर्थिक (उसनवारी) मदत केल्यास खूप मोठी गरज पूर्ण होईल.  आम्हाला हे पैसे मदत म्हणून नको हवेत. ते परत फेडीच्या बोलीवर दर महिण्याला परत करू.

आपल्याला पर्यावरणासाठी काही करण्याची ईच्छा आहे पण आपल्याकडे वेळ नाही, पण आर्थिक मदत करू ईच्छीता तर आपले स्वागत  आहे. कारण पर्यावरण संवर्धन हेच आमचे जगणे आहे , धैय्य आहे. तसेच आपण हा संदेश दानशूर व्यक्तिपर्यंत पोहचावा हि विनंती…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.9850569644, 8087475242

ई-मेलः sandeepkchavan79@gmail.com