IMG_0820 copy

गच्चीवर बाग बनवतांना वाफे पध्दत ही सर्वात फायदेशीर व परवडणारी पध्दत आहे. यात वाफेची उंची नऊ इंच असली तरी त्यात संपूर्णतः माती व खत भरले जात नाही. यात जवळपास नव्वद टक्के पानझड झालेला, वाळलेला पालापाचोळाचा थर दिला जातो व दहा टक्के माती वापरली जाते. सुरवातीला २० टक्के माती वापरली जायची. पण पालापाचोळा पासून तयार केलेला चुरा (BI.SH.CO.M) मातीत मिश्त्रन केले जाते. त्यामुळे मातीची आवश्यकता ही पन्नास टक्के कमी झाली आहे. अशा प्रकारे ९० टक्के कमी मातीत बाग फुलवली जाते.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.