Kitchen Waste Composter – single… Drum
चार व्यक्तिच्या कुटुंबात तयार होणारा हिरवा कचरा व खरकटे अन्न याचे उत्तम प्रकारे खत तयार करता येते. आकर्षक रंगातील या कंपोस्टर मधे कचर्याचे खतात वेगाने रूपांतर करता येते. कोणतीही दुर्गंधी येत नाही. शिवाय दर महिण्यास अल्पशा खर्चात दर्जेदार खत बनवता येणार आहे.
शिवाय बाजारात मिळणार्या कंपोस्टर पेक्षा हा मेंन्टन्स फ्री आहे. याचा अर्थ असा की तो बाजारातील कंपोस्टर हा दोन महिण्यात भरत असेल तर यास भरावयाला चार महिने लागतात. कारण यात टाकलेला कचरा हा वेगाने डिकंपोस्ट होतो. म्हणजेच तो लवकर खाली बसत जातो.
आपण कंपोस्टर्स घेतल्या नंतर या विषयीची काळजी कशी घ्यावी, तंत्र व मंत्र सांगीतले जाणार आहेत.
या कंपोस्टर्स सोबत चाळणी, हॅंडल ( कचरा विरळणी करण्यासाठी) स्टॅंड, सुपडी, ब्रश देण्यात येतो. पाच पट वेगाने कंपोस्टींग तयार करणारे कल्चर व कंपोस्टींग पावडरही दिली जाते. हा ड्रम सिंगल असून त्यास जाळी असलेले झाकण आहे. याची क्षमता ५० लिटर आहे.
योग्य प्रकारे आपणास कंपोस्टिंग शिकवण्यास मदत करण्यात येते.
|
|
All in one Waste composter – Devil Digester विकसीत केला आहे. त्याचीच नवीन आवृत्ती म्हणजे “ग्रोव्हर कम कंपोस्टर” आम्ही विकसीत केला आहे. बाजारातील कंपोस्टरच्या किमती एवढा आहे. त्यात आपण रोजचा कचरा डंम्प करू शकता. तसेच त्यात कंपोस्टींग करता करता त्यात पालेभाजी, फळभाजी (वांगी, टोमॅटो, मिरची) वेलवर्गीय व एकादे वर्षायु झाड उगवू शकता. ( उदाः शेवगा, पपई) हा २०० लिटर क्षमतेचा ड्रम असून त्याला ५२ कप्पे करण्यात आले आहेत. |
Bricks Composter पालापाचोळा, किचन वेस्ट( फरमेंनटेड), खरकटे पाणी, शेण असा सारा कचरा कंपोस्ट करण्याचा सोपा मार्ग म्हणजे Bricks Composter होय. |
क्रेटस कंपोस्टर…
बाल्कनीत, गच्चीवर पाऊस लागणार नाही अशा ठिकाणी ठेवता येईल, साधारण दहा व्यक्तिंच्या कुटुंबाचा रोजचा जैविक कचरा यात जिरवता येऊ शकतो.